1 ULB हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक; माझ्या विनवणीकडे कान दे. तू आपल्या विश्वासाने आणि न्यायीपणाने मला उत्तर दे. BSB BSB: A Psalm of David. O LORD, hear my prayer. In Your faithfulness, give ear to my plea; in Your righteousness, answer me.
2 ULB तू आपल्या सेवकाबरोबर न्यायनिवाड्यात प्रवेश करू नकोस. कारण तुझ्या दृष्टीने कोणीही नितीमान नाही. BSB BSB: Do not bring Your servant into judgment, for no one alive is righteous before You.
3 ULB शत्रू माझ्या जिवाचा पाठलाग करीत आहेत; त्यांनी माझे जीवन धुळीस मिळवले आहे; पुरातन काळच्या मेलेल्यासारखे त्याने मला अंधकाराच्या स्थळी राहण्यास लाविले आहे. BSB BSB: For the enemy has pursued my soul, crushing my life to the ground, making me dwell in darkness like those long since dead.
4 ULB माझ्याठायी माझा आत्मा व्याकुळ झाला आहे; माझे हृदय घाबरे झाले आहे. BSB BSB: My spirit grows faint within me; my heart is dismayed inside me.
5 ULB मी पूर्वीचे दिवस आठवतो; मी तुझ्या सर्व कृत्यांवर मनन करतो; तुझ्या हाताने सिद्धीस नेलेल्या कामावर विचार करतो. BSB BSB: I remember the days of old; I meditate on all Your works; I consider the work of Your hands.
6 ULB मी प्रार्थनेत आपले हात तुझ्यापुढे पसरतो; शुष्क भूमीप्रमाणे माझा जीव तुझ्यासाठी तहानेला झाला आहे. BSB BSB: I stretch out my hands to You; my soul thirsts for You like a parched land. Selah
7 ULB हे परमेश्वरा, त्वरा करून मला उत्तर दे कारण माझा आत्मा क्षीण झाला आहे. माझ्यापासून तू आपले मुख लपवू नकोस, किंवा लपवशील तर मी गर्तेत उतरणाऱ्यांसारखा होईन. BSB BSB: Answer me quickly, O LORD; my spirit fails. Do not hide Your face from me, or I will be like those who descend to the Pit.
8 ULB सकाळी मला तुझ्या वात्सल्याचे शब्द ऐकू दे, कारण मी तुझ्यावर भरवसा ठेवला आहे. ज्या मार्गाने मी चालावे तो मला दाखव, कारण मी आपला जीव तुझ्याकडे उंचावतो. BSB BSB: Let me hear Your loving devotion in the morning, for I have put my trust in You. Teach me the way I should walk, for to You I lift up my soul.
9 ULB हे परमेश्वरा, माझ्या शत्रूपासून माझे रक्षण कर. मी लपण्यासाठी तुझ्याकडे धाव घेतो. BSB BSB: Deliver me from my enemies, O LORD; I flee to You for refuge.
10 ULB मला तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास शिकव, कारण तू माझा देव आहेस. तुझा चांगला आत्मा मला सरळपणाच्या देशात नेवो. BSB BSB: Teach me to do Your will, for You are my God. May Your good Spirit lead me on level ground.
11 ULB हे परमेश्वरा, तुझ्या नावाकरता मला सजीव कर. तुझ्या न्यायीपणाने माझा जीव संकटातून वर काढ. BSB BSB: For the sake of Your name, O LORD, revive me. In Your righteousness, bring my soul out of trouble.
12 ULB तू आपल्या दयेने माझ्या शत्रूंचा नायनाट कर; आणि माझ्या जीवनातील सर्व शत्रूंचा नाश कर, कारण मी तुझा दास आहे. BSB BSB: And in Your loving devotion, cut off my enemies. Destroy all who afflict me, for I am Your servant.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.