1 ULB माझ्या देवा, हे राजा, मी तुझी खूप स्तुती करीन; मी सदासर्वकाळ व कायम तुझ्या नावाचा धन्यवाद करीन. BSB BSB: A Psalm of praise. Of David. I will exalt You, my God and King; I will bless Your name forever and ever.
2 ULB प्रत्येक दिवशी मी तुझा धन्यवाद करीन. मी सदासर्वकाळ व कायम तुझ्या नावाचे स्तवन करीन. BSB BSB: Every day I will bless You, and I will praise Your name forever and ever.
3 ULB परमेश्वर महान आणि परमस्तुत्य आहे; त्याची महानता अनाकलनीय आहे. BSB BSB: Great is the LORD and greatly to be praised; His greatness is unsearchable.
4 ULB एक पिढी दुसऱ्या पिढीपुढे तुझ्या कृत्यांची प्रशंसा करीत राहील, आणि तुझ्या पराक्रमी कृतीचे वर्णन करतील. BSB BSB: One generation will commend Your works to the next, and will proclaim Your mighty acts—
5 ULB ते तुझ्या राजवैभवाचा गौरवयुक्त प्रतापाविषयी बोलतील, मी तुझ्या अद्भुत कार्यांचे मनन करीन. BSB BSB: the glorious splendor of Your majesty. And I will meditate on Your wondrous works.
6 ULB ते तुझ्या भयावह कृत्यांच्या पराक्रमाविषयी बोलतील, मी तुझ्या महिमेचे वर्णन करीन. BSB BSB: They will proclaim the power of Your awesome deeds, and I will declare Your greatness.
7 ULB ते तुझ्या विपुल अशा चांगुलपणाविषयी सांगतील, आणि तुझ्या न्यायीपणाबद्दल गाणे गातील. BSB BSB: They will extol the fame of Your abundant goodness and sing joyfully of Your righteousness.
8 ULB परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे, तो मंदक्रोध व अतिदयाळू आहे. BSB BSB: The LORD is gracious and compassionate, slow to anger and abounding in loving devotion.
9 ULB परमेश्वर सर्वांना चांगला आहे; त्याची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यांवर आहे. BSB BSB: The LORD is good to all; His compassion rests on all He has made.
10 ULB हे परमेश्वरा, तू केलेली सर्व कृत्ये तुला धन्यवाद देतील; तुझे भक्त तुला धन्यवाद देतील. BSB BSB: All You have made will give You thanks, O LORD, and Your saints will bless You.
11 ULB ते तुझ्या राज्याच्या गौरवाविषयी सांगतील, आणि तुझ्या सामर्थ्याविषयी बोलतील. BSB BSB: They will tell of the glory of Your kingdom and speak of Your might,
12 ULB हे यासाठी की, त्यांनी देवाची पराक्रमी कृत्ये आणि त्याच्या राज्याचे वैभवयुक्त ऐश्वर्य ही मानवजातीस कळवावी. BSB BSB: to make known to men Your mighty acts and the glorious splendor of Your kingdom.
13 ULB तुझे राज्य युगानुयुग राहणारे राज्य आहे. आणि तुझा राज्याधिकार पिढ्यानपिढ्या टिकणारा आहे. BSB BSB: Your kingdom is an everlasting kingdom, and Your dominion endures through all generations. The LORD is faithful in all His words and kind in all His actions.
14 ULB पडत असलेल्या सर्वांना परमेश्वर आधार देतो, आणि वाकलेल्या सर्वांना तो उभे करतो. BSB BSB: The LORD upholds all who fall and lifts up all who are bowed down.
15 ULB सर्वांचे डोळे तुझ्याकडे लागतात. आणि तू त्यांना योग्य वेळी त्यांचे अन्न देतोस. BSB BSB: The eyes of all look to You, and You give them their food in season.
16 ULB तू आपला हात उघडून प्रत्येक जीवंत प्राण्याची इच्छा तृप्त करतो. BSB BSB: You open Your hand and satisfy the desire of every living thing.
17 ULB परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्यायी आहे; आणि तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे. BSB BSB: The LORD is righteous in all His ways and kind in all His deeds.
18 ULB जे कोणी त्याचा धावा करतात, जे सत्यतेने त्याचा धावा करतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे. BSB BSB: The LORD is near to all who call on Him, to all who call out to Him in truth.
19 ULB तो त्याचे भय धरणाऱ्यांची इच्छा पुरवतो; तो त्यांची आरोळी ऐकून त्यांना वाचवतो. BSB BSB: He fulfills the desires of those who fear Him; He hears their cry and saves them.
20 ULB परमेश्वर आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचे रक्षण करतो. परंतु तो वाईटांचा नाश करतो. BSB BSB: The LORD preserves all who love Him, but all the wicked He will destroy.
21 ULB माझे मुख परमेश्वराची स्तुती करील. सर्व मानवजात त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद सदासर्वकाळ व कायम करो. BSB BSB: My mouth will declare the praise of the LORD; let every creature bless His holy name forever and ever.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.