1 ULB अहो माझ्या लोकांनो, माझी शिकवण ऐका, माझ्या तोंडच्या वचनाकडे लक्ष द्या. BSB BSB: A Maskil of Asaph. Give ear, O my people, to my instruction; listen to the words of my mouth.
2 ULB मी शहाणपणाचे गीत गाईन; मी पूर्वकाळच्या गुप्त गोष्टीबद्दल सांगेन. BSB BSB: I will open my mouth in parables; I will utter things hidden from the beginning,
3 ULB ज्या आम्ही ऐकल्या आणि ज्या आम्हास समजल्या, त्या आमच्या वाडवडिलांनी आम्हास सांगितल्या. BSB BSB: that we have heard and known and our fathers have relayed to us.
4 ULB त्या आम्ही त्यांच्या वंशजापासून गुप्त ठेवणार नाही. त्या आम्ही पुढील पिढीला परमेश्वराची स्तुत्य कृत्ये, त्याचे सामर्थ्य आणि त्याने केलेले आश्चर्ये कृत्ये सांगू. BSB BSB: We will not hide them from their children but will declare to the next generation the praises of the LORD and His might and the wonders He has performed.
5 ULB कारण त्याने याकोबात निर्बंध स्थापले आणि इस्राएलासाठी नियमशास्त्र नेमले. त्याने आमच्या पूर्वजांना आज्ञा दिल्या की, त्यांनी त्या आपल्या मुलांना शिकवाव्या. BSB BSB: For He established a testimony in Jacob and appointed a law in Israel, which He commanded our fathers to teach to their children,
6 ULB त्याने ही आज्ञा यासाठी दिली की, पुढच्या पिढीने म्हणजे जी मुले जन्माला येतील, त्यांनी त्या आज्ञा जाणाव्या, त्या आपल्या स्वतःच्या मुलांना सांगाव्या. BSB BSB: that the coming generation would know them—even children yet to be born—to arise and tell their own children
7 ULB मग ते आपली आशा देवावर ठेवतील आणि त्याची कृत्ये विसरणार नाहीत परंतु त्याच्या आज्ञा पाळतील. BSB BSB: that they should put their confidence in God, not forgetting His works, but keeping His commandments.
8 ULB तर त्यांनी आपल्या पूर्वजासारखे हट्टी आणि बंडखोर पिढी होऊ नये, त्यांनी आपले अंतःकरण योग्य राखले नाही, आणि जिचा आत्मा देवाला समर्पित व प्रामाणिक नव्हता. BSB BSB: Then they will not be like their fathers, a stubborn and rebellious generation, whose heart was not loyal, whose spirit was not faithful to God.
9 ULB एफ्राइमाचे वंशज धनुष्यासह सशस्र होती, परंतु त्यांनी युद्धाच्यादिवशी पाठ फिरवली. BSB BSB: The archers of Ephraim turned back on the day of battle.
10 ULB त्यांनी देवाबरोबर करार पाळला नाही, आणि त्यांनी त्याचे नियमशास्त्र पाळण्याचे नाकारले. BSB BSB: They failed to keep God’s covenant and refused to live by His law.
11 ULB ते त्याची कृत्ये व त्याने दाखवलेली विस्मयकारक गोष्टी ते विसरले. BSB BSB: They forgot what He had done, the wonders He had shown them.
12 ULB मिसर देशातल्या सोअन प्रांतात त्यांच्या वडिलांच्या दृष्टीसमोर त्याने आश्चर्यकारक गोष्टी केल्या. BSB BSB: He worked wonders before their fathers in the land of Egypt, in the region of Zoan.
13 ULB त्याने समुद्र दुभागला आणि त्यांना पलिकडे नेले, त्याने पाणी भिंतीसारखे उभे केले. BSB BSB: He split the sea and brought them through; He set the waters upright like a wall.
14 ULB तो त्यांना दिवसा मेघ व रात्रभर अग्नीच्या प्रकाशात मार्ग दाखवित घेऊन जात असे. BSB BSB: He led them with a cloud by day and with a light of fire all night.
15 ULB त्याने रानात खडक फोडला, आणि समुद्राची खोली पुरे भरण्यापर्यंत त्यांना विपुल पाणी दिले. BSB BSB: He split the rocks in the wilderness and gave them drink as abundant as the seas.
16 ULB त्याने खडकातून पाण्याचे प्रवाह आणि नदीसारखे पाणी बाहेर वाहविले. BSB BSB: He brought streams from the stone and made water flow down like rivers.
17 ULB तरी ते त्याच्याविरुध्द पाप करितच राहिले. रानात परात्पराविरूद्ध बंड केले. BSB BSB: But they continued to sin against Him, rebelling in the desert against the Most High.
18 ULB नंतर त्यांनी आपली भूक तृप्त करण्यासाठी, अन्न मागून आपल्या मनात देवाला आव्हान दिले. BSB BSB: They willfully tested God by demanding the food they craved.
19 ULB ते देवाविरूद्ध बोलले, ते म्हणाले, ‘देव खरोखर आम्हास रानात भोजन देऊ शकेल का?’ BSB BSB: They spoke against God, saying, “Can God really prepare a table in the wilderness?
20 ULB पहा, त्याने खडकावर प्रहार केला तेव्हा पाणी उसळून बाहेर पडले, आणि पाण्याचे प्रवाह भरून वाहू लागले. पण भाकरही देऊ शकेल काय? तो आपल्या लोकांसाठी मांसाचा पुरवठा करील काय? BSB BSB: When He struck the rock, water gushed out and torrents raged. But can He also give bread or supply His people with meat?”
21 ULB जेव्हा परमेश्वराने हे ऐकले, तेव्हा तो रागावला; म्हणून याकोबावर त्याचा अग्नि भडकला, आणि त्याच्या रागाने इस्राएलवर हल्ला केला, BSB BSB: Therefore the LORD heard and was filled with wrath; so a fire was kindled against Jacob, and His anger flared against Israel,
22 ULB कारण त्यांनी देवावर विश्वास ठेवला नाही, आणि त्याच्या तारणावर भरवसा ठेवला नाही. BSB BSB: because they did not believe God or rely on His salvation.
23 ULB तरी त्याने वर आभाळाला आज्ञा दिली, आणि आभाळाचे दरवाजे उघडले. BSB BSB: Yet He commanded the clouds above and opened the doors of the heavens.
24 ULB खाण्यासाठी त्याने त्यांच्यावर मान्नाचा वर्षाव केला, आणि त्यांना आकाशातून धान्य दिले. BSB BSB: He rained down manna for them to eat; He gave them grain from heaven.
25 ULB देवदूतांची भाकर लोकांनी खाल्ली. त्याने त्यांना भरपूर अन्न पाठवून दिले. BSB BSB: Man ate the bread of angels; He sent them food in abundance.
26 ULB त्याने आकाशात पूर्वेचा वारा वाहविला, आणि त्याच्या सामर्थ्याने त्याने दक्षिणेच्या वाऱ्याला मार्ग दाखवला. BSB BSB: He stirred the east wind from the heavens and drove the south wind by His might.
27 ULB त्याने त्यांच्यावर धुळीप्रमाणे मांसाचा आणि समुद्रातील वाळूप्रमाणे असंख्य पक्षांचा वर्षाव केला. BSB BSB: He rained meat on them like dust, and winged birds like the sand of the sea.
28 ULB ते त्यांच्या छावणीच्यामध्ये पडले, त्यांच्या तंबूच्या सर्व सभोवती पडले. BSB BSB: He felled them in the midst of their camp, all around their dwellings.
29 ULB मग त्यांनी ते खाल्ले आणि तृप्त झाले. त्यांच्या हावेप्रमाणे त्याने त्यांना दिले. BSB BSB: So they ate and were well filled, for He gave them what they craved.
30 ULB पण अजून त्यांची तृप्ती झाली नव्हती; त्यांचे अन्न त्यांच्या तोडांतच होते. BSB BSB: Yet before they had filled their desire, with the food still in their mouths,
31 ULB त्याच क्षणाला, देवाच्या कोपाने त्याच्यावर हल्ला केला, आणि त्यांच्यातील बलवानास मारून टाकले. त्याने इस्राएलाच्या तरुणास हाणून पाडले. BSB BSB: God’s anger flared against them, and He put to death their strongest and subdued the young men of Israel.
32 ULB इतके झाले तरी ते पाप करितच राहीले, आणि त्यांनी त्याच्या आश्चर्यकारक कृत्यांवर विश्वास ठेवला नाही. BSB BSB: In spite of all this, they kept on sinning; despite His wonderful works, they did not believe.
33 ULB म्हणून देवाने त्यांचे दिवस थोडके केले; त्यांचे आयुष्य भयानक भयात संपवले. BSB BSB: So He ended their days in futility, and their years in sudden terror.
34 ULB जेव्हा कधी देवाने त्यांना पीडिले, तेव्हा त्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरवात केली. उत्सुकतेने ते त्याच्याकडे वळले. BSB BSB: When He slew them, they would seek Him; they repented and searched for God.
35 ULB देव आमचा खडक आहे, आणि परात्पर देव आमचा सोडवणारा याची आठवण त्यांना झाली. BSB BSB: And they remembered that God was their Rock, that God Most High was their Redeemer.
36 ULB पण त्यांनी आपल्या मुखाने त्याची खोटी स्तुती केली आणि आपल्या जीभेने त्याच्याजवळ लबाडी केली. BSB BSB: But they deceived Him with their mouths, and lied to Him with their tongues.
37 ULB कारण त्यांचे मन त्यांच्याठायी स्थिर नव्हते, आणि ते त्याच्या कराराशी एकनिष्ठ नव्हते. BSB BSB: Their hearts were disloyal to Him, and they were unfaithful to His covenant.
38 ULB परंतु तो दयाळू असल्यामुळे त्यांच्या अपराधांची क्षमा करतो आणि त्याने त्यांचा नाश केला नाही. होय, तो अनेक वेळा आपला राग आवरून धरतो, आणि आपला सर्व राग भडकू देत नाही. BSB BSB: And yet He was compassionate; He forgave their iniquity and did not destroy them. He often restrained His anger and did not unleash His full wrath.
39 ULB ती केवळ देह आहेत, वारा वाहून निघून जातो आणि तो परत येत नाही याची त्याने आठवण केली. BSB BSB: He remembered that they were but flesh, a passing breeze that does not return.
40 ULB त्यांनी किती वेळा रानात त्याच्याविरुध्द बंडखोरी केली, आणि पडिक प्रदेशात त्यांनी त्यास दु:खी केले. BSB BSB: How often they disobeyed Him in the wilderness and grieved Him in the desert!
41 ULB पुन्हा आणि पुन्हा देवाला आव्हान केले, आणि इस्राएलाच्या पवित्र प्रभूला खूप दु:खविले. BSB BSB: Again and again they tested God and provoked the Holy One of Israel.
42 ULB त्यांनी त्याच्या सामर्थ्याविषयी विचार केला नाही, त्याने त्यांना शत्रूपासून कसे सोडवले होते. BSB BSB: They did not remember His power—the day He redeemed them from the adversary,
43 ULB मिसरात जेव्हा त्याने आपली घाबरून सोडणारी चिन्हे आणि सोअनाच्या प्रांतात आपले चमत्कारही दाखविले ते विसरले. BSB BSB: when He performed His signs in Egypt and His wonders in the fields of Zoan.
44 ULB त्याने मिसऱ्यांच्या नद्यांचे रक्तात रुपांतर केले. म्हणून त्याच्या प्रवाहातील पाणी त्यांच्याने पिववेना. BSB BSB: He turned their rivers to blood, and from their streams they could not drink.
45 ULB त्याने चावणाऱ्या माशांचे थवे पाठवले त्यांनी त्यांना खाऊन टाकले, आणि बेडकांनी त्यांचा देश आच्छादला. BSB BSB: He sent swarms of flies that devoured them, and frogs that devastated them.
46 ULB त्याने त्यांची पिके नाकतोड्यांच्या हवाली आणि त्यांच्या श्रमाचे फळ टोळाला दिले. BSB BSB: He gave their crops to the grasshopper, the fruit of their labor to the locust.
47 ULB त्याने गारांनी त्यांच्या द्राक्षवेलींचा आणि त्यांच्या उंबराच्या झाडांचा नाश बर्फाने केला. BSB BSB: He killed their vines with hailstones and their sycamore-figs with sleet.
48 ULB त्याने त्यांची गुरेढोरे गारांच्या व त्यांचे कळप विजांच्या हवाली केली. BSB BSB: He abandoned their cattle to the hail and their livestock to bolts of lightning.
49 ULB त्यांने आपल्या भयंकर रागाने त्यांच्याविरुद्ध तडाखे दिले. त्याने अरिष्ट आणणाऱ्या प्रतिनीधीप्रमाणे आपला क्रोध, प्रकोप आणि संकट पाठवले. BSB BSB: He unleashed His fury against them, wrath, indignation, and calamity—a band of destroying angels.
50 ULB त्याने आपल्या रागासाठी मार्ग सपाट केला; त्याने त्यांना मरणापासून वाचविले नाही पण त्याने त्यांना मरीच्या हवाली केले. BSB BSB: He cleared a path for His anger; He did not spare them from death but delivered their lives to the plague.
51 ULB त्याने मिसरमध्ये प्रथम जन्मलेले सर्व, हामाच्या तंबूतील त्यांच्या शक्तीचे प्रथम जन्मलेले मारून टाकले. BSB BSB: He struck all the firstborn of Egypt, the virility in the tents of Ham.
52 ULB त्याने आपल्या लोकांस मेंढरांसारखे बाहेर नेले आणि त्याने त्याच्या कळपाप्रमाणे रानातून नेले. BSB BSB: He led out His people like sheep and guided them like a flock in the wilderness.
53 ULB त्याने त्यांना सुखरुप आणि न भीता मार्गदर्शन केले, पण समुद्राने त्यांच्या शत्रूंना बुडवून टाकले. BSB BSB: He led them safely, so they did not fear, but the sea engulfed their enemies.
54 ULB आणि त्याने त्यास आपल्या पवित्र देशात, हा जो पर्वत आपल्या उजव्या हाताने मिळवला त्याकडे आणले. BSB BSB: He brought them to His holy land, to the mountain His right hand had acquired.
55 ULB त्याने त्यांच्यापुढून राष्ट्रांना हाकलून लावली, आणि त्यांना त्यांची वतने सूत्राने मापून नेमून दिली; आणि त्यांच्या तंबूत इस्राएलाचे वंश वसविले. BSB BSB: He drove out nations before them and apportioned their inheritance; He settled the tribes of Israel in their tents.
56 ULB तरी त्यांनी परात्पर देवाला आव्हान दिले आणि त्याच्याविरुध्द बंडखोरी केली, आणि त्यांनी त्याच्या आज्ञा पाळल्या नाहीत. BSB BSB: But they tested and disobeyed God Most High, for they did not keep His decrees.
57 ULB ते आपल्या पूर्वजाप्रमाणे अविश्वासू होते आणि त्यांनी विश्वासघातकी कृत्ये केली; फसव्या धनुष्याप्रमाणे ते स्वतंत्रपणे वळणारे होते. BSB BSB: They turned back and were faithless like their fathers, twisted like a faulty bow.
58 ULB कारण त्यांनी आपल्या उंच जागा बांधल्या आणि देवाला क्रोधित केले आणि आपल्या कोरीव मूर्तींमुळे त्यास आवेशाने कोपविले. BSB BSB: They enraged Him with their high places and provoked His jealousy with their idols.
59 ULB जेव्हा देवाने हे ऐकले, तो रागावला, आणि त्याने इस्राएलाला पूर्णपणे झिडकारले. BSB BSB: On hearing it, God was furious and rejected Israel completely.
60 ULB त्याने शिलोतले पवित्रस्थान सोडून दिले, ज्या तंबूत लोकांच्यामध्ये तो राहत होता. BSB BSB: He abandoned the tabernacle of Shiloh, the tent He had pitched among men.
61 ULB त्याने आपल्या सामर्थ्याचा कोश बंदिवासात जाण्याची परवानगी दिली, आणि आपले गौरव शत्रूच्या हातात दिले. BSB BSB: He delivered His strength to captivity, and His splendor to the hand of the adversary.
62 ULB त्याने आपले लोक तलवारीच्या स्वाधीन केले, आणि आपल्या वतनावर तो रागावला. BSB BSB: He surrendered His people to the sword because He was enraged by His heritage.
63 ULB अग्नीने त्यांच्या तरुण मनुष्यास खाऊन टाकले, आणि त्यांच्या तरुण स्रीयांना लग्नगीते लाभली नाहीत. BSB BSB: Fire consumed His young men, and their maidens were left without wedding songs.
64 ULB त्यांचे याजक तलवारीने पडले, आणि त्यांच्या विधवा त्यांच्यासाठी रडल्या नाहीत. BSB BSB: His priests fell by the sword, but their widows could not lament.
65 ULB मग प्रभू झोपेतून जागा झालेल्या मनुष्यासारखा उठला, द्राक्षारसामुळे आरोळी मारणाऱ्या सैनिकासारखा तो उठला. BSB BSB: Then the Lord awoke as from sleep, like a mighty warrior overcome by wine.
66 ULB त्याने आपल्या शत्रूंना मारून मागे हाकलले; त्याने त्यांची कायमची नामुष्की केली. BSB BSB: He beat back His foes; He put them to everlasting shame.
67 ULB त्याने योसेफाचा तंबू नाकारला, आणि त्याने एफ्राईमाच्या वंशाचा स्वीकार केला नाही. BSB BSB: He rejected the tent of Joseph and refused the tribe of Ephraim.
68 ULB त्याने यहूदाच्या वंशाला निवडले, आणि आपला आवडता सियोन पर्वत निवडला. BSB BSB: But He chose the tribe of Judah, Mount Zion, which He loved.
69 ULB उंच आकाशासारखे व आपण सर्वकाळ स्थापिलेल्या पृथ्वीसारखे त्याने आपले पवित्रस्थान बांधले. BSB BSB: He built His sanctuary like the heights, like the earth He has established forever.
70 ULB त्याने आपला सेवक दावीदाला निवडले, आणि त्यास त्याने मेंढरांच्या कोंडवाड्यांतून घेतले. BSB BSB: He chose David His servant and took him from the sheepfolds;
71 ULB आपले लोक याकोब व आपले वतन इस्राएल यांचे पालन करण्यास त्याने त्यास दुभत्या मेंढ्याच्या मागून काढून आणले. BSB BSB: from tending the ewes He brought him to be shepherd of His people Jacob, of Israel His inheritance.
72 ULB दावीदाने आपल्या मनाच्या सरळतेने त्याचे पालन केले, आणि आपल्या हातच्या कौशल्याने त्यास मार्ग दाखविला. BSB BSB: So David shepherded them with integrity of heart and guided them with skillful hands.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.