1 ULB हे परमेश्वरा, माझ्या तारणाऱ्या देवा, मी रात्र व दिवस तुझ्यापुढे आरोळी करतो. BSB BSB: A song. A Psalm of the sons of Korah. For the choirmaster. According to Mahalath Leannoth. A Maskil of Heman the Ezrahite. O LORD, the God of my salvation, day and night I cry out before You.
2 ULB माझी प्रार्थना ऐक; माझ्या आरोळीकडे लक्ष दे. BSB BSB: May my prayer come before You; incline Your ear to my cry.
3 ULB कारण माझा जीव क्लेशांनी भरला आहे, आणि माझे जीवन मृतलोकाजवळ आले आहे. BSB BSB: For my soul is full of troubles, and my life draws near to Sheol.
4 ULB खाचेत खाली जातात त्यांच्यासारखे लोक माझ्याशी वागत आहेत; मी असहाय्य मनुष्यासारखा आहे. BSB BSB: I am counted among those descending to the Pit. I am like a man without strength.
5 ULB मला मृतामध्ये सोडून दिले आहे; अशा मृतासारखा जो कबरेत पडून राहतो, ज्याची तू आणखी दखल घेत नाहीस, ज्याला तुझ्या सामर्थ्यापासून कापून टाकले आहेत, त्यांच्यासारखा मी झालो आहे. BSB BSB: I am forsaken among the dead, like the slain who lie in the grave, whom You remember no more, who are cut off from Your care.
6 ULB तू मला त्या खड्यांतल्या खालच्या भागात, काळोखात व अगदी खोल जागी टाकले आहेस. BSB BSB: You have laid me in the lowest Pit, in the darkest of the depths.
7 ULB तुझ्या क्रोधाचे खूप ओझे माझ्यावर पडले आहे, आणि तुझ्या सर्व लाटा माझ्यावर जोराने आपटत आहेत. BSB BSB: Your wrath weighs heavily upon me; all Your waves have submerged me. Selah
8 ULB तुझ्यामुळे माझ्या ओळखीचे मला टाळतात. त्यांच्या दृष्टीने माझा त्यांना वीट येईल असे तू केले आहे; मी आत कोंडलेला आहे आणि मी निसटू शकत नाही. BSB BSB: You have removed my friends from me; You have made me repulsive to them; I am confined and cannot escape.
9 ULB कष्टामुळे माझे डोळे थकून जात आहेत; हे परमेश्वरा, मी दिवसभर तुला आरोळी मारित आहे. मी आपले हात तुझ्यापुढे पसरत आहे. BSB BSB: My eyes grow dim with grief. I call to You daily, O LORD; I spread out my hands to You.
10 ULB तू मृतांसाठी चमत्कार करशील काय? जे मरण पावलेले आहेत ते उठून तुझी स्तुती करतील काय? BSB BSB: Do You work wonders for the dead? Do departed spirits rise up to praise You? Selah
11 ULB तुझ्या दयेची व प्रामाणिकपणाची कबरेत किंवा मृतांच्या जागी घोषणा होईल का? BSB BSB: Can Your loving devotion be proclaimed in the grave, Your faithfulness in Abaddon?
12 ULB तुझ्या विस्मयकारक कृतीचे अंधारात किंवा विस्मरणलोकी तुझे नितीमत्व कळेल काय? BSB BSB: Will Your wonders be known in the darkness, or Your righteousness in the land of oblivion?
13 ULB परंतु हे परमेश्वरा, मी तुला आरोळी मारतो; सकाळी माझी प्रार्थना तुझ्यापुढे सादर होते. BSB BSB: But to You, O LORD, I cry for help; in the morning my prayer comes before You.
14 ULB हे परमेश्वरा, तू माझा त्याग का केलास? तू आपले मुख माझ्यापासून का लपवतोस? BSB BSB: Why, O LORD, do You reject me? Why do You hide Your face from me?
15 ULB मी नेहमीच पीडित असून माझ्या तरुणपणापासूनच मरणोन्मुख झालो आहे; मी तुझ्या दहशतीने व्यथित झालो आहे; मी काहीच करू शकत नाही. BSB BSB: From my youth I was afflicted and near death. I have borne Your terrors; I am in despair.
16 ULB तुझा संतप्त क्रोध माझ्यावरून चालला आहे, आणि तुझ्या घाबरून सोडणाऱ्या कृत्यांनी माझा संपूर्ण नाश केला आहे. BSB BSB: Your wrath has swept over me; Your terrors have destroyed me.
17 ULB त्यांनी दिवसभर मला जलाप्रमाणे घेरले आहे; त्यांनी मला सर्वस्वी वेढून टाकले आहे. BSB BSB: All day long they engulf me like water; they enclose me on every side.
18 ULB तू माझ्यापासून प्रत्येक मित्राला आणि परिचितांना दूर केले आहेस. माझा परिचयाचा केवळ काळोख आहे. BSB BSB: You have removed my beloved and my friend; darkness is my closest companion.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.