Psalm 97 97 Psalms Book 4 Marathi Unlocked Literal Bible 1 ULB परमेश्वर राज्य करतो; पृथ्वी आनंदित होवो. अनेक द्वीपसमूह आनंदित होवो. BSB BSB: The LORD reigns, let the earth rejoice; let the distant shores be glad.
2 ULB ढग आणि काळोख त्याच्याभोवती आहेत. निती व न्याय त्याच्या सिंहासनाचा पाया आहेत. BSB BSB: Clouds and darkness surround Him; righteousness and justice are His throne’s foundation.
3 ULB अग्नी त्याच्यापुढे चालतो, आणि प्रत्येक बाजूने त्याच्या शत्रूंना नष्ट करून टाकतो. BSB BSB: Fire goes before Him and consumes His foes on every side.
4 ULB त्याच्या विजांनी जग प्रकाशित केले; पृथ्वी हे पाहून थरथर कापली. BSB BSB: His lightning illuminates the world; the earth sees and trembles.
5 ULB परमेश्वरासमोर, सर्व पृथ्वीच्या प्रभूसमोर पर्वत मेणासारखे वितळले. BSB BSB: The mountains melt like wax at the presence of the LORD, before the Lord of all the earth.
6 ULB आकाशाने, त्याचा न्याय जाहीर केला, आणि सर्व राष्ट्रांनी त्याचे वैभव पाहिले. BSB BSB: The heavens proclaim His righteousness; all the peoples see His glory.
7 ULB जे कोरीव मूर्तीची पूजा करतात, जे मूर्तीचा अभिमान बाळगतात ते सर्व लज्जित झाले. अहो सर्व देवहो! त्याच्यासमोर नमन करा. BSB BSB: All worshipers of images are put to shame—those who boast in idols. Worship Him, all you gods!
8 ULB सियोनेने हे ऐकले आणि आनंदित झाली, कारण हे परमेश्वरा, तुझ्या न्यायामुळे यहूदाच्या नगरांनी आनंद केला. BSB BSB: Zion hears and rejoices, and the towns of Judah exult because of Your judgments, O LORD.
9 ULB कारण हे परमेश्वरा, सर्व पृथ्वीवर तू परात्पर आहेस. तू सर्व देवापेक्षा खूपच उंचावलेला आहेस. BSB BSB: For You, O LORD, are Most High over all the earth; You are exalted far above all gods.
10 ULB जे तुम्ही परमेश्वरावर प्रीती करता, ते तुम्ही वाईटाचा द्वेष करा, तो आपल्या भक्तांच्या जीवाचे रक्षण करतो, आणि तो त्यास दुष्टांच्या हातातून सोडवतो. BSB BSB: Hate evil, O you who love the LORD! He preserves the souls of His saints; He delivers them from the hand of the wicked.
11 ULB नितीमानासाठी प्रकाश आणि जे सरळ अंतःकरणाचे आहेत त्यांच्यासाठी हर्ष पेरला आहे. BSB BSB: Light shines on the righteous, gladness on the upright in heart.
12 ULB अहो नितीमानांनो, परमेश्वराठायी आनंदी व्हा. त्याच्या पवित्र नावाला धन्यवाद द्या. BSB BSB: Rejoice in the LORD, you righteous ones, and praise His holy name.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.
Chapter complete
You’ve read Psalm 97
Make Opened yours A free account keeps your place, highlights and notes on every device. Add Plus to ask Study Help about Psalm 97, and keep Opened free for readers who can’t pay.