Revelation 15 15 Revelation Seals, trumpets and bowls Marathi Unlocked Literal Bible 1 ULB यानंतर मी स्वर्गात आणखी एक महान व आश्चर्यकारक चिन्ह बघितले; ज्यांच्याजवळ ‘सात पीडा’ होत्या, असे सात देवदूत मी पाहिले त्या शेवटल्या पीडा होत्या, कारण देवाचा क्रोध त्यानंतर पूर्ण होणार होता. BSB BSB: Then I saw another great and marvelous sign in heaven: seven angels with the seven final plagues, with which the wrath of God is completed.
2 ULB मग मी बघितले की, जणू एक अग्निमिश्रित काचेचा समुद्र आहे आणि ज्यांनी त्या पशूवर व त्याच्या मूर्तीवर आणि त्याच्या नावाच्या संख्येवर विजय प्राप्त केला होता ते त्या काचेच्या समुद्राजवळ, देवाने दिलेली वीणा घेऊन उभे होते. BSB BSB: And I saw something like a sea of glass mixed with fire, beside which stood those who had conquered the beast and its image and the number of its name. They were holding harps from God,
3 ULB ‘देवाचा दास मोशे ह्याचे गीत व कोकर्याचे गीत गात होते.’ सर्वसमर्थ देवा, परमेश्वरा, तुझ्या कृती महान आणि आश्चर्यकारक आहेत. हे ‘प्रभू’ देवा, तू सर्वांवर राज्य करतो तुझे मार्ग योग्य आणि खरे आहेत. BSB BSB: and they sang the song of God’s servant Moses and of the Lamb: “Great and wonderful are Your works, O Lord God Almighty! Just and true are Your ways, O King of the nations!
4 ULB ‘हे प्रभू, तुला कोण भिणार नाही? आणि तुझ्या नावाचे गौरव कोण करणार नाही?’ कारण तू एकच ‘पवित्र’ आहेस; कारण ‘सगळी राष्ट्रे येऊन तुझ्यापुढे नमन करतील. कारण तुझ्या नीतिमत्त्वाची कृत्ये प्रकट झाली आहेत.’ BSB BSB: Who will not fear You, O Lord, and glorify Your name? For You alone are holy. All nations will come and worship before You, for Your righteous acts have been revealed.”
5 ULB नंतर मी बघितले आणि ‘साक्षीच्या मंडपाचे’ परमेश्वराचे स्वर्गातील भवन उघडले गेले. BSB BSB: After this I looked, and the temple—the tabernacle of the Testimony—was opened in heaven.
6 ULB आणि त्या भवनातून सात देवदूत बाहेर आले; त्यांच्याजवळ सात पीडा होत्या. त्यांनी स्वच्छ, शुभ्र तागाची वस्त्रे परिधान केली होती आणि आपल्या छातीभोवती सोन्याचे पट्टे बांधले होते. BSB BSB: And out of the temple came the seven angels with the seven plagues, dressed in clean and bright linen and girded with golden sashes around their chests.
7 ULB तेव्हा त्या चार प्राण्यांतील एकाने त्या सात देवदूतांना, जो युगानुयुग जिवंत आहे त्या देवाच्या रागाने भरलेल्या, सात सोन्याच्या वाट्या दिल्या. BSB BSB: Then one of the four living creatures gave the seven angels seven golden bowls full of the wrath of God, who lives forever and ever.
8 ULB आणि देवाच्या सामर्थ्यापासून व तेजापासून जो धूर निघाला, त्याने परमपवित्रस्थान भरून गेले आणि त्या सात देवदूतांच्या ‘सात पीडा’ पूर्ण होईपर्यंत कोणीही आत जाऊ शकला नाही. BSB BSB: And the temple was filled with smoke from the glory of God and from His power; and no one could enter the temple until the seven plagues of the seven angels were completed.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.
Chapter complete
You’ve read Revelation 15
Make Opened yours A free account keeps your place, highlights and notes on every device. Add Plus to ask Study Help about Revelation 15, and keep Opened free for readers who can’t pay.