1 ULB बंधूंनो, त्यांचे तारण व्हावे, ही माझ्या मनाची कळकळीची इच्छा व माझी त्यांच्याकरिता देवाजवळ विनंती आहे. BSB BSB: Brothers, my heart’s desire and prayer to God for the Israelites is for their salvation.
2 ULB कारण त्यांच्याविषयी मी साक्ष देतो की, त्यांना देवाविषयी ईर्ष्या आहे, पण ती ज्ञानामुळे नाही. BSB BSB: For I testify about them that they are zealous for God, but not on the basis of knowledge.
3 ULB कारण ते देवाच्या नीतिमत्त्वाविषयी अज्ञानी असता आणि स्वतःचे नीतिमत्त्व प्रस्थापित करू पाहत असता ते देवाच्या नीतिमत्त्वाला वश झाले नाहीत. BSB BSB: Because they were ignorant of God’s righteousness and sought to establish their own, they did not submit to God’s righteousness.
4 ULB कारण ख्रिस्त हा विश्वास ठेवणार्या प्रत्येकाला नीतिमत्त्वासाठी नियमशास्त्राचा शेवट आहे. BSB BSB: For Christ is the end of the law, to bring righteousness to everyone who believes.
5 ULB कारण नियमशास्त्राने प्राप्त होणार्या नीतिमत्त्वाविषयी मोशे लिहितो की, ‘जो मनुष्य ते आचरतो तो त्याद्वारे जगेल.’ BSB BSB: For concerning the righteousness that is by the law, Moses writes: “The man who does these things will live by them.”
6 ULB पण विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्त्व असे म्हणते की, तू आपल्या मनात म्हणू नकोस की, स्वर्गात कोण चढेल? (म्हणजे ख्रिस्ताला खाली आणण्यास) BSB BSB: But the righteousness that is by faith says: “Do not say in your heart, ‘Who will ascend into heaven?’ (that is, to bring Christ down)
7 ULB किंवा मृतलोकात कोण उतरेल? (म्हणजे ख्रिस्ताला मरण पावलेल्यांमधून वर आणण्यास) BSB BSB: or, ‘Who will descend into the Abyss?’ (that is, to bring Christ up from the dead).”
8 ULB पण ते काय म्हणते? ते वचन तुझ्याजवळ, ते तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे. म्हणजे आम्ही ज्याची घोषणा करतो ते विश्वासाचे वचन हे आहे. BSB BSB: But what does it say? “The word is near you; it is in your mouth and in your heart,” that is, the word of faith we are proclaiming:
9 ULB कारण येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्यास मरण पावलेल्यांमधून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. BSB BSB: that if you confess with your mouth, “Jesus is Lord,” and believe in your heart that God raised Him from the dead, you will be saved.
10 ULB कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. BSB BSB: For with your heart you believe and are justified, and with your mouth you confess and are saved.
11 ULB म्हणून शास्त्रलेख म्हणतो की, ‘जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही.’ BSB BSB: It is just as the Scripture says: “Anyone who believes in Him will never be put to shame.”
12 ULB यहूदी व हेल्लेणी ह्यांच्यात फरक नाही, कारण तोच प्रभू सर्वांवर असून जे त्याचा धावा करतात त्या सर्वांसाठी तो संपन्न आहे, BSB BSB: For there is no difference between Jew and Greek: The same Lord is Lord of all, and gives richly to all who call on Him,
14 ULB मग ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा ते कसा धावा करतील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते कसा विश्वास ठेवतील? आणि घोषणा करणार्याशिवाय ते कसे ऐकतील? BSB BSB: How then can they call on the One in whom they have not believed? And how can they believe in the One of whom they have not heard? And how can they hear without someone to preach?
15 ULB आणि त्यांना पाठविल्याशिवाय ते कशी घोषणा करतील? कारण असे लिहिले आहे की, ‘जे चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगतात त्यांचे पाय किती सुंदर आहेत!’ BSB BSB: And how can they preach unless they are sent? As it is written: “How beautiful are the feet of those who bring good news!”
16 ULB पण सर्वांनीच सुवार्तेचे आज्ञापालन केले नाही, कारण यशया म्हणतो की, ‘प्रभू, आमच्याकडून ऐकले त्यावर कोणी विश्वास ठेवला आहे?’ BSB BSB: But not all of them welcomed the good news. For Isaiah says, “Lord, who has believed our message?”
17 ULB तर मग ऐकण्यामुळे विश्वास होतो आणि ख्रिस्ताच्या वचनामुळे ऐकणे होते. BSB BSB: Consequently, faith comes by hearing, and hearing by the word of Christ.
18 ULB पण मी म्हणतो की त्यांनी ऐकले नव्हते काय? हो, खचित ऐकले; ‘सर्व पृथ्वीवर त्यांचा आवाज आणि जगाच्या टोकापर्यंत त्यांचे शब्द पोहोचले आहेत.’ BSB BSB: But I ask, did they not hear? Indeed they did: “Their voice has gone out into all the earth, their words to the ends of the world.”
19 ULB पण मी म्हणतो की, इस्राएलाला कळले नव्हते काय? प्रथम मोशे म्हणतो, ‘जे राष्ट्र नाहीत त्यांच्याकडून. मी तुम्हास ईर्ष्येस चढवीन, एका निर्बुद्ध राष्ट्राकडून मी तुम्हास चेतवीन.’ BSB BSB: I ask instead, did Israel not understand? First, Moses says: “I will make you jealous by those who are not a nation; I will make you angry by a nation without understanding.”
20 ULB पण यशया फार धीट होऊन म्हणतो की, ‘ज्यांनी माझा शोध केला नाही त्यांना मी सापडलो आहे, ज्यांनी माझ्याविषयी विचारले नाही त्यांना प्राप्त झालो आहे.’ BSB BSB: And Isaiah boldly says: “I was found by those who did not seek Me; I revealed Myself to those who did not ask for Me.”
21 ULB पण इस्राएलाविषयी तो म्हणतो, ‘मी एका, अवमान करणार्या आणि उलटून बोलणार्या प्रजेपुढे दिवसभर माझे हात पसरले.’ BSB BSB: But as for Israel he says: “All day long I have held out My hands to a disobedient and obstinate people.”
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.