1 ULB म्हणून बंधूंनो देवाची दया स्मरून मी तुम्हास विनंती करतो की, तुम्ही आपली शरीरे ‘पवित्र व देवाला संतोष देणारे जिवंत ग्रहणीय’ यज्ञ म्हणून सादर करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. BSB BSB: Therefore I urge you, brothers, on account of God’s mercy, to offer your bodies as living sacrifices, holy and pleasing to God, which is your spiritual service of worship.
2 ULB आणि या जगाशी समरूप होऊ नका पण तुमच्या मनाच्या नविनिकरणाने तुमचे रूपांतर होऊ द्या; म्हणजे देवाची उत्तम व त्यास संतोष देणारी परिपूर्ण इच्छा काय आहे ती तुम्ही ओळखावी. BSB BSB: Do not be conformed to this world, but be transformed by the renewing of your mind. Then you will be able to test and approve what is the good, pleasing, and perfect will of God.
3 ULB कारण मला दिलेल्या कृपेच्या योगे, मी तुमच्यातील प्रत्येक जणाला असे सांगतो की, त्याने स्वतःला जसे मानावे त्याहून अधिक मोठे मानू नये, पण प्रत्येक जणाला देवाने दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार त्याने समंजसपणे स्वतःला मानावे. BSB BSB: For by the grace given me I say to every one of you: Do not think of yourself more highly than you ought, but think of yourself with sober judgment, according to the measure of faith God has given you.
4 ULB कारण आपल्याला एका शरीरात जसे पुष्कळ अवयव आहेत आणि सर्व अवयवांचे काम एक नाही, BSB BSB: Just as each of us has one body with many members, and not all members have the same function,
5 ULB तसे आपण पुष्कळ असून ख्रिस्तात एक शरीर आहोत; आणि आपण एकमेकांचे अवयव आहोत. BSB BSB: so in Christ we who are many are one body, and each member belongs to one another.
6 ULB पण आपल्याला पुरविलेल्या कृपेप्रमाणे आपल्याला वेगवेगळी कृपादाने आहेत; जर ते परमेश्वराचा संदेश देणे असेल तर विश्वासाच्या परिमाणानुसार आपण संदेश द्यावेत; BSB BSB: We have different gifts according to the grace given us. If one’s gift is prophecy, let him use it in proportion to his faith;
7 ULB सेवा असेल, तर सेवा करण्यात तत्पर रहावे; जो शिक्षण देतो त्याने शिक्षण देण्यात, BSB BSB: if it is serving, let him serve; if it is teaching, let him teach;
8 ULB किंवा बोध करतो त्याने बोध करण्यात तत्पर रहावे; जो दान देतो त्याने औदार्याने द्यावे; जो कारभार चालवतो त्याने तत्परतेने कारभार चालवावा, जो दया करतो त्याने संतोषाने दया करावी. BSB BSB: if it is encouraging, let him encourage; if it is giving, let him give generously; if it is leading, let him lead with diligence; if it is showing mercy, let him do it cheerfully.
9 ULB प्रीती निष्कपट असावी. वाईटापासून दूर रहा, चांगल्याला बिलगून रहा. BSB BSB: Love must be sincere. Detest what is evil; cling to what is good.
10 ULB बंधुप्रेमात एकमेकांशी सहनशील, मानात एकमेकांना अधिक मानणारे, BSB BSB: Be devoted to one another in brotherly love. Outdo yourselves in honoring one another.
11 ULB कामात आळशी न होत, आत्म्यात उत्तेजित होऊन प्रभूची सेवा करणारे व्हा. BSB BSB: Do not let your zeal subside; keep your spiritual fervor, serving the Lord.
12 ULB आशेत आनंद करणारे, संकटात धीर धरणारे, प्रार्थनेत ठाम राहणारे, BSB BSB: Be joyful in hope, patient in affliction, persistent in prayer.
13 ULB पवित्रजनांच्या गरजेसाठी भागी देणारे, आतिथ्यात पुढे जाणारे असे व्हा. BSB BSB: Share with the saints who are in need. Practice hospitality.
15 ULB आनंद करणार्यांबरोबर आनंद करा आणि रडणार्यांबरोबर रडा. BSB BSB: Rejoice with those who rejoice; weep with those who weep.
16 ULB एकमेकांशी एकमनाचे व्हा, उंच गोष्टींवर मन ठेवू नका, पण दीन अवस्थेत असलेल्यांकडे ओढले जा. स्वतःला समजते तेवढ्यात शहाणे होऊ नका. BSB BSB: Live in harmony with one another. Do not be proud, but associate with the lowly. Do not be conceited.
18 ULB शक्य असल्यास सर्व लोकांशी तुम्ही आपल्याकडून शांतीने रहा. BSB BSB: If it is possible on your part, live at peace with everyone.
20 ULB पण तुझा वैरी भुकेला असेल तर त्यास खायला दे; तो तान्हेला असेल तर त्यास प्यायला दे; कारण असे करण्यात तू त्याच्या डोक्यावर विस्तवातल्या इंगळांची रास करशील. BSB BSB: On the contrary, “If your enemy is hungry, feed him; if he is thirsty, give him a drink. For in so doing, you will heap burning coals on his head.”
21 ULB वाईटाने जिंकला जाऊ नकोस; पण बऱ्याने वाईटाला जिंक. BSB BSB: Do not be overcome by evil, but overcome evil with good.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.