1 ULB तेव्हा दुसर्याला दोष लावणार्या अरे बंधू, तू कोणीही असलास तरी तुला सबब नाही; कारण तू ज्या गोष्टींत दुसर्याला दोष लावतोस त्यामध्ये तू स्वतःला दोषी ठरवतोस; कारण दोष लावणारा तूही त्याच गोष्टी करतोस. BSB BSB: You, therefore, have no excuse, you who pass judgment on another. For on whatever grounds you judge the other, you are condemning yourself, because you who pass judgment do the same things.
2 ULB पण आपल्याला माहीत आहे की, अशा गोष्टी करणार्यांविरुद्ध, देवाचा सत्यानुसार न्यायनिवाडा आहे. BSB BSB: And we know that God’s judgment against those who do such things is based on truth.
3 ULB तर अशा गोष्टी करणार्यांना दोष लावणार्या आणि आपण स्वतः त्याच गोष्टी करणार्या, अरे बंधू, तू स्वतः देवाच्या न्यायनिवाड्यातून सुटशील असे मानतोस काय? BSB BSB: So when you, O man, pass judgment on others, yet do the same things, do you think you will escape God’s judgment?
4 ULB किंवा देवाची दया तुला पश्चात्तापाकडे घेऊन जात आहे हे न ओळखून तू त्याच्या ममतेचे, क्षमाशीलतेचे आणि सहनशीलतेचे धन तुच्छ मानतोस काय? BSB BSB: Or do you disregard the riches of His kindness, tolerance, and patience, not realizing that God’s kindness leads you to repentance?
5 ULB पण तू आपल्या हटवादीपणाने व आपल्या पश्चात्तापहीन मनाने आपल्या स्वतःसाठी देवाच्या क्रोधाच्या व यथोचित न्यायाच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी क्रोध साठवून ठेवत आहेस. BSB BSB: But because of your hard and unrepentant heart, you are storing up wrath against yourself for the day of wrath, when God’s righteous judgment will be revealed.
7 ULB म्हणजे जे धीराने सत्कर्मे करीत राहून गौरव, सन्मान व अक्षयता ही मिळवू पाहतात त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच; BSB BSB: To those who by perseverance in doing good seek glory, honor, and immortality, He will give eternal life.
8 ULB परंतु जे तट पाडणारे सत्याला न मानता अनीतीला मानतात त्यांना भयानक क्रोध व भयानक कोप. BSB BSB: But for those who are self-seeking and who reject the truth and follow wickedness, there will be wrath and anger.
9 ULB संकट व क्लेश हे येतील. म्हणजे दुष्कृत्य करणारा मनुष्य प्रथम यहूदी आणि मग हेल्लेणी अशा प्रत्येकाच्या जीवावर ती येतील. BSB BSB: There will be trouble and distress for every human being who does evil, first for the Jew, then for the Greek;
10 ULB पण प्रत्येक चांगले करणार्या प्रथम यहूद्याला आणि मग ग्रीकास गौरव, शांती व सन्मान ही मिळतील. BSB BSB: but glory, honor, and peace for everyone who does good, first for the Jew, then for the Greek.
11 ULB कारण देवाजवळ पक्षपात नाही. BSB BSB: For God does not show favoritism.
12 ULB कारण, नियमशास्त्राशिवाय असलेल्या जितक्यांनी पाप केले असेल ते नियमशास्त्राशिवाय नाश पावतील आणि नियमशास्त्राखाली असलेल्या जितक्यांनी पाप केले असेल त्यांचा नियमशास्त्रानुसार न्याय होईल. BSB BSB: All who sin apart from the law will also perish apart from the law, and all who sin under the law will be judged by the law.
13 ULB कारण नियमशास्त्राचे श्रवण करणारे देवापुढे नीतिमान आहेत असे नाही, पण नियमशास्त्राचे आचरण करणारे नीतिमान ठरतील. BSB BSB: For it is not the hearers of the law who are righteous before God, but it is the doers of the law who will be declared righteous.
15 ULB आणि एकमेकांतील त्यांचे विचार जेव्हा एकमेकांवर आरोप करतात किंवा एकमेकांचे समर्थन करतात आणि त्यांचे विवेकही त्यांच्या जोडीला साक्ष देतात तेव्हा ते त्यांच्या हृदयावर लिहिलेल्या नियमशास्त्राचा परिणाम दाखवितात. BSB BSB: So they show that the work of the law is written on their hearts, their consciences also bearing witness, and their thoughts either accusing or defending them
16 ULB देव, माझ्या सुवार्तेप्रमाणे जेव्हा मनुष्यांच्या गुप्त गोष्टींचा ख्रिस्त येशूकडून न्याय करील त्यादिवशी हे दिसून येईल. BSB BSB: on the day when God will judge men’s secrets through Christ Jesus, as proclaimed by my gospel.
17 ULB आता जर तू स्वतःला यहूदी म्हणतोस, नियमशास्त्राचा आधार घेतोस आणि देवाचा अभिमान मिरवतोस; BSB BSB: Now you, if you call yourself a Jew; if you rely on the law and boast in God;
18 ULB तू त्याची इच्छा जाणतोस आणि चांगल्या गोष्टी पसंत करतोस, कारण तुला नियमशास्त्रातून शिक्षण मिळाले आहे; BSB BSB: if you know His will and approve of what is superior because you are instructed by the law;
19 ULB आणि तुझी खातरी आहे की तूच अंधळ्यांचा वाटाड्या आहेस जे अंधारात आहेत त्यांचा प्रकाश, BSB BSB: if you are convinced that you are a guide for the blind, a light for those in darkness,
20 ULB अल्पबुद्धी लोकांचे शिक्षक आणि लहान बाळांचा गुरु आहेस; कारण तुझ्याजवळ नियमशास्त्रात ज्ञानाचे व सत्याचे स्वरूप आहे; BSB BSB: an instructor of the foolish, a teacher of infants, because you have in the law the embodiment of knowledge and truth—
21 ULB तर मग जो तू दुसर्याला शिकवतोस तो तू स्वतःला शिकवीत नाहीस काय? चोरी करू नये, असे जो तू घोषणा करतोस तो तू चोरी करतो काय? BSB BSB: you, then, who teach others, do you not teach yourself? You who preach against stealing, do you steal?
22 ULB व्यभिचार करू नये, असे जो तू सांगतोस तो तू व्यभिचार करतोस काय? जो तू मूर्तींचा विटाळ मानतोस तो तू देवळे लुटतोस काय? BSB BSB: You who forbid adultery, do you commit adultery? You who abhor idols, do you rob temples?
23 ULB जो तू नियमशास्त्राचा अभिमान मिरवतोस तो तू नियमशास्त्राचे उल्लंघन करून देवाचा अपमान करतोस काय? BSB BSB: You who boast in the law, do you dishonor God by breaking the law?
24 ULB कारण शास्त्रलेखात लिहिल्याप्रमाणे देवाच्या नावाची परराष्ट्रीयात तुझ्यामुळे निंदा होत आहे. BSB BSB: As it is written: “God’s name is blasphemed among the Gentiles because of you.”
25 ULB कारण जर तू नियमशास्त्राचे आचरण केलेस तर सुंता खरोखर उपयोगी आहे; पण जर तू नियमशास्त्राचे उल्लंघन करतोस तर तुझी सुंता झालेली असूनही ती न झाल्यासारखीच आहे. BSB BSB: Circumcision has value if you observe the law, but if you break the law, your circumcision has become uncircumcision.
26 ULB म्हणून कोणी मनुष्य जर सुंता न झालेला असूनही, नियमशास्त्राचे नियम पाळील तर त्याची सुंता न होणे हे सुंता असे गणण्यात येणार नाही काय? BSB BSB: If a man who is not circumcised keeps the requirements of the law, will not his uncircumcision be regarded as circumcision?
27 ULB आणि देहाने सुंता न झालेला कोणी जर नियमशास्त्राचे पालन करीत असेल, तर ज्या तुला शास्त्रलेख व सुंताविधी मिळाले असूनही तू नियमशास्त्राचे उल्लंघन करतोस त्या तुझा तो न्याय करणार नाही काय? BSB BSB: The one who is physically uncircumcised yet keeps the law will condemn you who, even though you have the written code and circumcision, are a lawbreaker.
28 ULB कारण बाहेरून यहूदी आहे तो यहूदी नाही किंवा बाहेरून देहात सुंता आहे ती खरोखर सुंता नाही. BSB BSB: A man is not a Jew because he is one outwardly, nor is circumcision only outward and physical.
29 ULB कारण जो अंतरी यहूदी आहे तो यहूदी होय आणि जी आध्यात्मिक अनुसरून आहे, शास्त्रलेखाला अनुसरून नाही, अशी जी अंतःकरणाची सुंता आहे ती सुंता होय आणि त्याची प्रशंसा मनुष्याकडून नाही परंतु देवाकडून होईल. BSB BSB: No, a man is a Jew because he is one inwardly, and circumcision is a matter of the heart, by the Spirit, not by the written code. Such a man’s praise does not come from men, but from God.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.