1 ULB हे शलमोनाचे गीतरत्न आहे: BSB BSB: This is Solomon’s Song of Songs.
2 ULB (तरुणी आपल्या प्रियकराशी बोलत आहे) तू माझे मुखचुंबन घे, कारण तुझे प्रेम द्राक्षरसापेक्षा उत्तम आहे. BSB BSB: Let him kiss me with the kisses of his mouth! For your love is more delightful than wine.
3 ULB तुझ्या अभिषेकाच्या तेलाचा सुगंध मोहक आहे, तुझे नाव दरवळणाऱ्या सुवासासारखे आहे. त्यामुळेच तरुणी तुझ्यावर प्रेम करतात. BSB BSB: The fragrance of your perfume is pleasing; your name is like perfume poured out. No wonder the maidens adore you.
4 ULB मला तुझ्याबरोबर ने आणि आपण पळून जाऊ. (तरुणी स्वतःशीच बोलते) राजाने मला त्याच्या अंतःपुरात आणले आहे. (तरुणी तिच्या प्रियकराबरोबर बोलत आहे) मी आनंदीत आहे. मी तुझ्याविषयी आनंदीत आहे. मला तुझे प्रेम साजरे करू दे. ते द्राक्षारसापेक्षा चांगले आहे. BSB BSB: Take me away with you—let us hurry! May the king bring me to his chambers. We will rejoice and delight in you; we will praise your love more than wine. It is only right that they adore you.
5 ULB (ती स्त्री दुसऱ्या स्त्रीबरोबर बोलते) अहो, यरुशलेमेच्या कन्यांनो, मी काळीसावळी पण सुंदर आहे. मी केदारच्या तंबूसारखी काळी आणि शलमोनाच्या पडद्यासारखी सुंदर आहे. BSB BSB: I am dark, yet lovely, O daughters of Jerusalem, like the tents of Kedar, like the curtains of Solomon.
6 ULB मी काळी आहे म्हणून माझ्याकडे टक लावून पाहू नका. कारण सूर्याने मी होरपळले आहे. माझे स्वतःचे भाऊ माझ्यावर रागावले होते. त्यांनी मला द्राक्षांच्या मळ्याची राखण करण्यास ठेवले. परंतु मी आपल्या स्वत:च्या द्राक्षमळ्याची काळजी घेतली नाही. BSB BSB: Do not stare because I am dark, for the sun has gazed upon me. My mother’s sons were angry with me; they made me a keeper of the vineyards, but my own vineyard I have neglected.
7 ULB (ती स्त्री तिच्या प्रियकराबरोबर बोलत आहे) माझ्या जीवाच्या प्रियकरा, मला सांग: तो तू तुझा कळप कोठे चारतोस? तू तुझ्या कळपाला दुपारी कोठे विसावा देतोस? तुझ्या सोबत्यांच्या कळपाजवळ भटकणाऱ्यांसारखी मी का व्हावे? BSB BSB: Tell me, O one I love, where do you pasture your sheep? Where do you rest them at midday? Why should I be like a veiled woman beside the flocks of your companions?
8 ULB (तिचा प्रियकर तिला उत्तर देतो) हे परम सुंदरी, जर तुला काय करायचे ते माहीत नाही तर माझ्या कळपाच्या मागे जा. तुझ्या लहान बकऱ्यांना मेंढपाळाच्या तंबूजवळच्या कुरणात चार. BSB BSB: If you do not know, O fairest of women, follow the tracks of the flock, and graze your young goats near the tents of the shepherds.
9 ULB माझ्या प्रिये, फारोच्या रथाच्या घोड्यांतल्या एका घोडीशी मी तुझी तुलना करतो. BSB BSB: I compare you, my darling, to a mare among Pharaoh’s chariots.
10 ULB तुझे सुंदर गाल सोन्याने अलंकृत केले आहेत. तुझी मान मोत्यांच्या हारांनी सुंदर दिसत आहे. BSB BSB: Your cheeks are beautiful with ornaments, your neck with strings of jewels.
11 ULB मी तुझ्यासाठी चांदीचे टिके लाविलेले सोन्याचे दागिने करेन. BSB BSB: We will make you ornaments of gold, studded with beads of silver.
12 ULB (ती स्त्री स्वतःशीच बोलते) राजा आपल्या पलंगावर असता माझ्या जटामांसीचा सुगंध पसरला. BSB BSB: While the king was at his table, my perfume spread its fragrance.
13 ULB माझ्या वक्षस्थळांमध्ये रात्रभर विसावलेला, माझा प्रियकर माझ्या गळ्यात असलेल्या गंधरसाच्या पुडीसारखा मला आहे. BSB BSB: My beloved is to me a sachet of myrrh resting between my breasts.
14 ULB माझा प्रियकर एन-गेदी मधील द्राक्षाच्या मळ्याजवळील मेंदीच्या फुलांच्या गुच्छासारखा आहे. BSB BSB: My beloved is to me a cluster of henna blossoms in the vineyards of En-gedi.
15 ULB (तिचा प्रियकर तिच्याशी बोलतो) पाहा माझ्या प्रिये, तू किती सुंदर आहेस! तू फारच सुंदर आहेस. तुझे डोळे कबुतरासारखे आहेत. BSB BSB: How beautiful you are, my darling! Oh, how very beautiful! Your eyes are like doves.
16 ULB (तरुणी आपल्या प्रियकराशी बोलते) पाहा, माझ्या प्रियकरा, तू देखणा आहेस, तू किती देखणा आहेस. आपला बिछाना किती आल्हाददायक आणि सुखावह आहे. BSB BSB: How handsome you are, my beloved! Oh, how delightful! The soft grass is our bed.
17 ULB आपल्या घराच्या तुळ्या गंधसरूच्या लाकडाच्या आहेत. आणि छताचे वासे देवदारुच्या लाकडाचे आहे. BSB BSB: The beams of our house are cedars; our rafters are fragrant firs.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.