1 ULB (ती स्त्री स्वतःशी बोलते) रात्रीच्या वेळी मी माझ्या शय्येवर पडले असता, ज्याच्यावर माझा जीव प्रेम करतो, त्याची उत्कंठा मला लागली. मी त्यास उत्कटतेने शोधले; पण तो मला सापडला नाही. BSB BSB: On my bed at night I sought the one I love; I sought him, but did not find him.
2 ULB मी स्वतःशीच म्हणाले, मी उठून, शहरासभोवती, रस्त्यावर आणि चौकांत फिरून माझ्या प्राणप्रियाला शोधीन. मी त्यास शोधले पण मला तो सापडला नाही. BSB BSB: I will arise now and go about the city, through the streets and squares. I will seek the one I love. So I sought him but did not find him.
3 ULB शहरात पहारा देणाऱ्या पहारेकऱ्यांना मी सापडले. मी त्यांना विचारले, “माझ्या प्राणप्रियाला तुम्ही पाहिलेत का?” BSB BSB: I encountered the watchmen on their rounds of the city: “Have you seen the one I love?”
4 ULB मी पहारेकऱ्यांना सोडून निघाले होते. इतक्यात ज्याच्यावर माझा जीव प्रेम करतो तो माझा प्राणप्रिय मला सापडला. मी त्यास धरले. मी त्यास जाऊ दिले नाही. मी त्यास माझ्या आईच्या घरी नेले. जिने माझे गर्भधारण केले तिच्या खोलीत आणीपर्यंत मी त्यास सोडले नाही. BSB BSB: I had just passed them when I found the one I love. I held him and would not let go until I had brought him to my mother’s house, to the chamber of the one who conceived me.
5 ULB (ती स्त्री दुसऱ्या स्त्रीशी बोलत आहे) यरुशलेमेच्या कन्यांनो, रानतल्या हरीणी आणि मृगी यांच्या साक्षीने मी शपथ घालून सांगते. आमचे प्रेम करणे संपत नाही, तोपर्यंत त्यामध्ये व्यत्यय आणू नका. BSB BSB: O daughters of Jerusalem, I adjure you by the gazelles and does of the field: Do not arouse or awaken love until the time is right.
6 ULB (ती तरुणी स्वतःशीच बोलते) गंधरस व ऊद व्यापाऱ्याकडील सर्व चूर्णानी सुवासिक द्रव्ये यांच्या सुगंधाने अशी धुराच्या खांबासारखी, रानातून येणारी ती ही कोण आहे? BSB BSB: Who is this coming up from the wilderness like a column of smoke, scented with myrrh and frankincense from all the spices of the merchant?
7 ULB पाहा, ती शलमोनाची पालखी येत आहे. त्याच्यासभोवती साठ सैनिक आहेत, ते साठजण इस्राएलाच्या सैनिकांपैकी आहेत. BSB BSB: Behold, it is Solomon’s carriage, escorted by sixty of the mightiest men of Israel.
8 ULB ते सगळे निपुण लढवय्ये व तलवारधारी आहेत. रात्री येणाऱ्या कोणत्याही संकटाचा मुकाबला करायला ते तयार आहेत. BSB BSB: All are skilled with the sword, experienced in warfare. Each has his sword at his side prepared for the terror of the night.
9 ULB राजा शलमोनाने स्वत:साठी लबानोनी लाकडाची पालखी तयार केली. BSB BSB: King Solomon has made his carriage out of the timber of Lebanon.
10 ULB त्याचे खांब चांदीचे केले. पाठ सोन्याची केली. बैठक जांभळ्या रंगाच्या कापडाने मढवली. त्याचा अंतर्भाग यरुशलेमेच्या कन्यांनी प्रेमाने सजवला आहे. BSB BSB: He has made its posts of silver, its base of gold, its seat of purple fabric. Its interior is inlaid with love by the daughters of Jerusalem.
11 ULB (ती स्त्री यरुशलेमेच्या स्त्रियांशी बोलत आहे) सीयोनेच्या कन्यांनो बाहेर या, आणि राजा शलमोनाला पाहा. ज्या दिवशी त्याचे लग्र झाले, त्या दिवशी त्याच्या आईने त्याच्या मस्तकावर ठेवलेला मुकुट पाहा. त्या दिवशी तो खूप आनंदी होता. BSB BSB: Come out, O daughters of Zion, and gaze at King Solomon, wearing the crown with which his mother crowned him on the day of his wedding—the day of his heart’s rejoicing.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.