1 ULB (यरुशलेमेतील स्त्री तरुणीशी बोलत आहे) स्त्रियांतील सर्वात सुंदरी! तुझा प्रियकर कोठे गेला आहे? तुझा प्रियकर कोणत्या दिशेने गेला आहे म्हणजे, तुझ्याबरोबर आम्ही त्यास शोधावयाला येऊ? BSB BSB: Where has your beloved gone, O most beautiful among women? Which way has he turned? We will seek him with you.
2 ULB (ती तरुण स्त्री स्वतःशीच बोलते) माझा प्रियकर आपल्या बागेत सुगंधी झाडांच्या वाफ्यांकडे, बागेत आपला कळप चारायला आणि कमळे वेचण्यास गेला आहे. BSB BSB: My beloved has gone down to his garden, to the beds of spices, to pasture his flock in the gardens and to gather lilies.
3 ULB मी आपल्या प्रियकराची आहे. तो प्रियकर माझा आहे. तो आपला कळप कमलपुष्पात चारत आहे. BSB BSB: I belong to my beloved and he belongs to me; he pastures his flock among the lilies.
4 ULB (स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे) माझ्या प्रिये, तू तिरसा नगरीप्रमाणे सुंदर आहेस. यरुशलेमेसारखी सुरूप आहेस. ध्वजा फडकिवणाऱ्या सेनेसारखी भयंकर आहेस. BSB BSB: You are as beautiful, my darling, as Tirzah, as lovely as Jerusalem, as majestic as troops with banners.
5 ULB तू आपले डोळे माझ्यापासून फिरीव, त्यांनी मला घाबरे केले आहे. जो शेरडांचा कळप गिलाद पर्वताच्या बाजूवर बसला आहे त्यासारखे तुझे केस आहेत. BSB BSB: Turn your eyes away from me, for they have overcome me. Your hair is like a flock of goats streaming down from Gilead.
6 ULB ज्या मेंढ्या धुतल्या जाऊन वरती आल्या आहेत, ज्यांतल्या प्रत्येकीला जुळे आहे, आणि ज्यांतली कोणी पिल्ले वेगळी झाली नाही, त्यांच्या कळपासारखे तुझे दात आहेत. BSB BSB: Your teeth are like a flock of sheep coming up from the washing; each has its twin, and not one of them is lost.
7 ULB तुझ्या बुरख्याच्या आत तुझी कानशिले डाळिंबाच्या फोडींसारखी आहेत. BSB BSB: Your brow behind your veil is like a slice of pomegranate.
8 ULB (स्त्रीचा प्रियकर स्वतःशीच बोलतो) साठ राण्या आणि ऐंशी उपपत्नी, आणि अगणित कुमारी असतील. BSB BSB: There are sixty queens and eighty concubines, and maidens without number,
9 ULB पण माझे कबुतर, माझी सर्वोत्कृष्ट एकच आहे, ती तिच्या आईची एकुलती एक विशेष मुलगी आहे, आपल्या जननीची आवडती आहे. माझ्या नगरातील कन्यांनी तिला पाहिले आणि तिला आशीर्वादित म्हटले, राण्यांनी आणि उपपत्नींनीसुध्दा तिची स्तुती केली. BSB BSB: but my dove, my perfect one, is unique, the favorite of the mother who bore her. The maidens see her and call her blessed; the queens and concubines sing her praises.
10 ULB ती पहाटेप्रमाणे चमकते आहे, ती चंद्रासारखी सुंदर आहे. सूर्यासारखी तेजस्वी आहे; आणि आकाशातल्या सैन्याप्रमाणे भयंकर आहे. ती पूर्णपणे आकर्षित करून घेणारी कोण आहे? BSB BSB: Who is this who shines like the dawn, as fair as the moon, as bright as the sun, as majestic as the stars in procession?
11 ULB खोऱ्यातील हिरवीगार झाडेझुडपे बघायला, द्राक्षाच्या वेली फुलल्या आहेत की काय, डाळिंबांना फुले आले आहेत की काय, ते बघायला मी आक्रोडाच्या मळ्यातून गेले. BSB BSB: I went down to the walnut grove to see the blossoms of the valley, to see if the vines were budding or the pomegranates were in bloom.
12 ULB मी खूप आनंदीत होते, जसे मला राजपुत्राच्या रथात बसवले होते. BSB BSB: Before I realized it, my desire had set me among the royal chariots of my people.
13 ULB (त्या स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे) मागे फिर, परत ये, हे शुलेमकरिणी परिपूर्ण स्त्री, मागे फिर, मागे फिर म्हणजे आम्ही तुला बघू शकू, (ती तरुण स्त्री प्रियकराला म्हणते) त्या परिपूर्ण स्त्रीकडे तुम्ही टक लावून का पाहता? जसे मी दोन नृत्य करणाऱ्याच्या रांगेत नृत्य करत आहे काय? BSB BSB: Come back, come back, O Shulammite! Come back, come back, that we may gaze upon you. Why do you look at the Shulammite, as on the dance of Mahanaim?
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.