1 ULB पारसाचा राजा दारयावेश याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षाच्या आठव्या महिन्यात, जखऱ्या, जो बरेख्याचा मुलगा, जो इद्दोचा मुलगा, त्यास परमेश्वराकडून वचन प्राप्त झाले ते असे, BSB BSB: In the eighth month of the second year of Darius, the word of the LORD came to the prophet Zechariah son of Berechiah, the son of Iddo, saying:
2 ULB परमेश्वर तुमच्या पूर्वजांवर फार रागावला होता. BSB BSB: “The LORD was very angry with your fathers.
3 ULB तर त्यांना असे सांग, सैन्यांचा परमेश्वर असे म्हणतो: “तुम्ही माझ्याकडे फिरा!” हे सैन्यांच्या परमेश्वराचे वचन आहे; “म्हणजे मी तुमच्याकडे फिरेन.” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. BSB BSB: So tell the people that this is what the LORD of Hosts says: ‘Return to Me, declares the LORD of Hosts, and I will return to you, says the LORD of Hosts.’
4 ULB संदेष्टे तुमच्या पूर्वजांना पूर्वी संदेश देत म्हणाले, “सैन्याचा देव असे म्हणतो: आपल्या दुष्ट मार्गांपासून आणि वाईट चालीरीतींपासून वळा!” परंतु त्यांनी ऐकले नाही आणि माझ्याकडे लक्ष दिले नाही. त्या पूर्वजांसारखे होऊ नका. ही परमेश्वराची वाणी होय. BSB BSB: Do not be like your fathers, to whom the former prophets proclaimed that this is what the LORD of Hosts says: ‘Turn now from your evil ways and deeds.’ But they did not listen or pay attention to Me, declares the LORD.
5 ULB “तुमचे पूर्वज, कोठे आहेत? आणि संदेष्टे देखील सर्वकाळाकरता येथे राहतील काय? BSB BSB: Where are your fathers now? And the prophets, do they live forever?
6 ULB परंतु मी माझ्या ज्या वचनांनी आणि माझ्या ज्या नियमांनी माझे दास, जे माझे संदेष्टे त्यांना आज्ञापिले, ती तुमच्या पूर्वजांवर आली नाहीत काय?” तेव्हा त्यांनी पश्चाताप केला व म्हणाले, “सेनाधीश परमेश्वराच्या योजना या त्याचे वचन आणि त्याची कामे यांच्यानुसार आहेत, त्या त्याने पूर्णतेस नेल्या आहेत.” BSB BSB: But did not My words and My statutes, which I commanded My servants the prophets, overtake your fathers? They repented and said, ‘Just as the LORD of Hosts purposed to do to us according to our ways and deeds, so He has done to us.’”
7 ULB दारयावेश ह्याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षाच्या अकराव्या म्हणजे शबाट महिन्याच्या चोविसाव्या दिवशी जखऱ्या, जो बरेख्याचा मुलगा, जो इद्दोचा मुलगा याला, परमेश्वराचा संदेश प्राप्त झाला तो असा: BSB BSB: On the twenty-fourth day of the eleventh month, the month of Shebat, in the second year of Darius, the word of the LORD came to the prophet Zechariah son of Berechiah, the son of Iddo.
8 ULB “रात्र असतांना मला दृष्टांतात दिसले ते असे: तांबड्या घोड्यावर आरुढ झालेला एक मनुष्य मी पाहिला आणि तो दरीतल्या मेंदीच्या झुडुपांमध्ये उभा होता. त्याच्यामागे तांबड्या, तपकिरी आणि पांढऱ्या रंगाचे घोडे होते.” BSB BSB: I looked out into the night and saw a man riding on a red horse. He was standing among the myrtle trees in the hollow, and behind him were red, sorrel, and white horses.
9 ULB मी विचारले, “प्रभू, हे कोण आहेत?” तेव्हा माझ्याशी बोलत असलेला देवदूत मला म्हणाला, “हे कोण आहेत ते मी तुला दाखवतो.” BSB BSB: “What are these, my lord?” I asked. And the angel who was speaking with me replied, “I will show you what they are.”
10 ULB मग मेंदीच्या झुडुपांमध्ये उभा असलेल्या मनुष्याने उत्तर दिले व म्हणाला, “पृथ्वीवर इकडे तिकडे संचार करायला परमेश्वराने हे पाठवले आहेत.” BSB BSB: Then the man standing among the myrtle trees explained, “They are the ones the LORD has sent to patrol the earth.”
11 ULB नंतर त्यांनी मेंदीच्या झुडुपांत उभ्या असलेल्या परमेश्वराच्या दिव्यदूताला उत्तर दिले व ते म्हणाले, “आम्ही पृथ्वीवर इकडे तिकडे फिरलो आणि पाहा संपूर्ण पृथ्वी शांत व विसावली आहे.” BSB BSB: And the riders answered the angel of the LORD who was standing among the myrtle trees, “We have patrolled the earth, and behold, all the earth is at rest and tranquil.”
12 ULB मग परमेश्वराच्या दिव्यदूताने उत्तर देऊन म्हटले, “हे सेनाधीश परमेश्वरा, या सत्तर वर्षांपासून यरुशलेमेचे आणि यहूदातील नगरांनी जो क्रोध सहन केला आहे त्याविषयी आणखी किती काळ तू करूणा करणार नाहीस?” BSB BSB: Then the angel of the LORD said, “How long, O LORD of Hosts, will You withhold mercy from Jerusalem and the cities of Judah, with which You have been angry these seventy years?”
13 ULB माझ्याशी बोलत असलेल्या परमेश्वराच्या देवदूताला परमेश्वर चांगल्या शब्दांत व सांत्वन देणाऱ्या शब्दांत बोलला. BSB BSB: So the LORD spoke kind and comforting words to the angel who was speaking with me.
14 ULB मग माझ्याशी बोलणाऱ्या परमेश्वराचा दूत मला म्हणाला, “घोषणा करून सांग की, ‘सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो: “मी यरुशलेम व सियोन यांच्यासाठी अती ईर्षावान असा झालो आहे! BSB BSB: Then the angel who was speaking with me said, “Proclaim this word: This is what the LORD of Hosts says: ‘I am very jealous for Jerusalem and Zion,
15 ULB आणि स्वस्थ बसलेल्या राष्ट्रांवर माझा राग पेटला आहे; कारण मी तर थोडासाच रागावलो होतो, पण या राष्ट्रांनी त्यांच्या दुःखात आणखी भर घालण्याची मदत केली.” BSB BSB: but I am fiercely angry with the nations that are at ease. For I was a little angry, but they have added to the calamity.’
16 ULB म्हणून परमेश्वर असे म्हणतो, “मी यरुशलेमेकडे करुणामय होऊन परत फिरलो आहे. माझे निवासस्थान तिच्यात पुन्हा बांधले जाईल.” सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “मापनसूत्र यरुशलेमेवर लावण्यात येईल.” BSB BSB: Therefore this is what the LORD says: ‘I will return to Jerusalem with mercy, and there My house will be rebuilt, declares the LORD of Hosts, and a measuring line will be stretched out over Jerusalem.’
17 ULB पुन्हा पुकार आणि असे सांग, “सेनाधीश परमेश्वर म्हणतो: ‘माझी नगरे पुन्हा एकदा चांगूलपणाने भरभरून वाहतील, परमेश्वर पुन्हा सियोनचे सांत्वन करील, आणि तो पुन्हा एकदा यरुशलेमची निवड करील.” BSB BSB: Proclaim further that this is what the LORD of Hosts says: ‘My cities will again overflow with prosperity; the LORD will again comfort Zion and choose Jerusalem.’”
18 ULB मग मी माझे डोळे वर करून पाहिले आणि मला चार शिंगे दिसली! BSB BSB: Then I looked up and saw four horns.
19 ULB माझ्याशी बोलत असलेल्या देवदूताला मी म्हणालो, “ही काय आहेत?” त्याने मला उत्तर दिले, “इस्राएल, यहूदा व यरुशलेम यांना ज्या शिंगांनी विखरले ती ही आहेत.” BSB BSB: So I asked the angel who was speaking with me, “What are these?” And he told me, “These are the horns that have scattered Judah, Israel, and Jerusalem.”
20 ULB मग परमेश्वराने मला चार लोहार दाखवले. BSB BSB: Then the LORD showed me four craftsmen.
21 ULB मी विचारले, “हे लोक येथे काय करण्यासाठी आहेत?” त्याने उत्तर दिले आणि म्हणाला, “ज्या शिंगांनी यहूदाच्या लोकांस विखरले आणि कोणाही मनुष्यांस डोके वर करू दिले नाही. परंतू त्या शिगांना घालवून देण्यासाठी ते आले आहेत, ती शिंगे म्हणजे यहूदाच्या लोकांवर हल्ला करून त्यांना परागंदा करणाऱ्या राष्ट्रांची शिंगे होत.” BSB BSB: “What are these coming to do?” I asked. And He replied, “These are the horns that scattered Judah so that no one could raise his head; but the craftsmen have come to terrify them and throw down these horns of the nations that have lifted up their horns against the land of Judah to scatter it.”