1 ULB देवदूताने मला दाखवले, मुख्य याजक यहोशवा परमेश्वराच्या दूतापुढे उभा होता आणि सैतान त्यास दोष करण्यासाठी त्याच्या उजवीकडे उभा होता. BSB BSB: Then the angel showed me Joshua the high priest standing before the angel of the LORD, with Satan standing at his right hand to accuse him.
2 ULB मग परमेश्वराचा दूत सैतानाला म्हणाला, “सैताना, परमेश्वर तुला धमकावो. परमेश्वराने, त्याची खास नगरी म्हणून यरुशलेमची निवड केली आहे, तो तुला धमकावो. आगीतून कोलीत ओढून काढावे, तसा हा नाही काय?” BSB BSB: And the LORD said to Satan: “The LORD rebukes you, Satan! Indeed, the LORD, who has chosen Jerusalem, rebukes you! Is not this man a firebrand snatched from the fire?”
3 ULB यहोशवा देवदूतापुढे मळकट वस्त्रे घालून उभा होता, BSB BSB: Now Joshua was dressed in filthy garments as he stood before the angel.
4 ULB म्हणून जवळ उभ्या असलेल्या इतरांना हा देवदूत म्हणाला, “याच्यावरची मळकट वस्रे काढून घ्या.” नंतर तो देवदूत यहोशवाला बोलला, “आता, मी तुझी सर्व पापे काढून घेतली आहेत. आणि मी तुला भरजरी वस्त्रे नेसवत आहे.” BSB BSB: So the angel said to those standing before him, “Take off his filthy clothes!” Then he said to Joshua, “See, I have removed your iniquity, and I will clothe you with splendid robes.”
5 ULB तो म्हणाला, “त्यांनी त्याच्या डोक्यावर स्वच्छ फेटा बांधावा” त्याप्रमाणे त्यांनी यहोशवाला स्वच्छ फेटा बांधला आणि परमेश्वराचा दूत तेथे उभा असतानाच त्यांनी त्यास स्वच्छ वस्त्रेसुध्दा घातली. BSB BSB: Then I said, “Let them put a clean turban on his head.” So a clean turban was placed on his head, and they clothed him, as the angel of the LORD stood by.
6 ULB पुढे परमेश्वराच्या दूताने यहोशवाला गंभीरतेने आज्ञा केली आणि म्हणाला, BSB BSB: Then the angel of the LORD gave this charge to Joshua:
7 ULB सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “माझ्या मार्गात चालशील, आणि तू माझ्या आज्ञा पाळशील, तर तूच माझ्या मंदिराचा मुख्य अधिकारी होशील आणि मंदिराच्या अंगणाची तू निगा राखशील. माझ्यासमोर उभ्या असलेल्यामध्ये तुला जाता-येता येईल असे मी करीन. BSB BSB: “This is what the LORD of Hosts says: ‘If you walk in My ways and keep My instructions, then you will govern My house and will also have charge of My courts; and I will give you a place among these who are standing here.
8 ULB तेव्हा हे यहोशवा मुख्य याजका, तू स्वत: व तुझ्यासमोर राहणाऱ्या सहकारी याजकांनो ऐका! ही माणसे तर चिन्ह अशी आहेत, मी माझ्या सेवकाला आणतो, त्यास फांदी असे म्हणतील. BSB BSB: Hear now, O high priest Joshua, you and your companions seated before you, who are indeed a sign. For behold, I am going to bring My servant, the Branch.
9 ULB आता मी यहोशवापुढे ठेवलेला दगड पाहा. या एका दगडाला सात बाजू आहेत, आणि मी त्यावर एक शिलालेख कोरीन. ‘हा सेनाधीश परमेश्वर आहे’ आणि मी एका दिवसात या देशातील अधर्म नाहीसा करीन.” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. BSB BSB: See the stone I have set before Joshua; on that one stone are seven eyes. Behold, I will engrave on it an inscription, declares the LORD of Hosts, and I will remove the iniquity of this land in a single day.
10 ULB सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “त्या दिवसात, प्रत्येक पुरुष आपल्या शेजाऱ्याला आपल्या अंजिराच्या झाडाखाली व द्राक्षवेलीखाली बसण्यासाठी बोलवील.” BSB BSB: On that day, declares the LORD of Hosts, you will each invite your neighbor to sit under your own vine and fig tree.’”