1 UDB मी पौल, हे पत्र लिहित आहे. मी हे लिहित असता आपला सोबतीचा विश्वासणारा सोस्थनेस, माझ्या बरोबर आहे. देवाने मला येशू ख्रिस्ताचा एक प्रेषित होण्यासाठी नियुक्त केले आहे, आणि देवाने त्याची सेवा करण्यासाठी मला निवडले आहे. BSB BSB: Paul, called to be an apostle of Christ Jesus by the will of God, and our brother Sosthenes,
2 UDB करिंथमधील देवाच्या मंडळीसाठी, ज्या प्रत्येक एकाला, सर्वत्र, देवाने ख्रिस्त येशूच्या नावात त्यांना वाचवावे म्हणून हाक मारतात अशांसाठी हे पत्र आहे, त्यांना ख्रिस्ताने देवासाठी वेगळे केले आहे, जो त्यांचा व आपलाही तारणारा आहे. BSB BSB: To the church of God in Corinth, to those sanctified in Christ Jesus and called to be holy, together with all those everywhere who call on the name of our Lord Jesus Christ, their Lord and ours:
3 UDB आपला देव पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त तुम्हांवर प्रीती करो आणि तुम्हांला शांती देवो. BSB BSB: Grace and peace to you from God our Father and the Lord Jesus Christ.
4 UDB येशू ख्रिस्ताने तुम्हाला अनेक भेटी दिल्या आहेत कारण तो तुमच्यावर प्रीती करतो म्हणून मी तुमच्यासाठी प्रत्येक दिवशी माझ्या देवाचे आभार मानतो. BSB BSB: I always thank my God for you because of the grace He has given you in Christ Jesus.
5 UDB ख्रिस्ताने तुम्हाला अनेक गोष्टी दिल्या आहेत. तुम्ही देवाला ओळखावे आणि त्याचे सत्य बोलावे म्हणून त्याने तुम्हाला मदत केली आहे. BSB BSB: For in Him you have been enriched in every way, in all speech and all knowledge,
6 UDB जसे तुम्ही ख्रिस्ता विषयी बोलला तेव्हा तुम्ही स्वतःच ह्या विधानाच्या बाजूने उभे राहिले आहात. BSB BSB: because our testimony about Christ was confirmed in you.
7 UDB देव प्रभू येशू ख्रिस्ताला प्रत्येकास प्रकट करील आणि प्रत्येकाने त्याला ओळखावे असे करील, ह्या दिवसाची तुम्ही वाट पाहात असता तुम्हाला देवाच्या आत्म्यापासून कोणत्याही दानांची कमतरता भासू नये म्हणून मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. BSB BSB: Therefore you do not lack any spiritual gift as you eagerly await the revelation of our Lord Jesus Christ.
8 UDB तुम्हाला शेवट पर्यंत त्याची सेवा करता यावी म्हणून देव देखील तुम्हाला मजबूत बनवील, जेणेकरून आपला प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वीवर माघारी येईल त्या दिवशी तुम्ही स्वतःला लाज वाटण्यास कारण ठरू नये. BSB BSB: He will sustain you to the end, so that you will be blameless on the day of our Lord Jesus Christ.
9 UDB देव ते करण्यासाठी त्याचे अभिवचन राखील. देवाने त्याचा पुत्र, येशू ख्रिस्त जो आमचा प्रभू आहे, ह्याला तुम्ही ओळखावे आणि त्याच्यावर प्रीती करावी, म्हणून तुम्हांला बोलावले आहे. BSB BSB: God, who has called you into fellowship with His Son Jesus Christ our Lord, is faithful.
11 UDB तुमच्यातील काही जणांमध्ये विभाजन आणि असहमती आहे असे मला ख्लोवेच्या घरात असणाऱ्यांकडून कळविण्यात आले. BSB BSB: My brothers, some from Chloe’s household have informed me that there are quarrels among you.
12 UDB हिच ती समस्या आहे. तुमच्यातील प्रत्येकजण एका पुढाऱ्याशी किंवा दुसऱ्या एकाशी एकनिष्ठ असल्याचा दावा करतात. एक म्हणतो, “मी पौलाशी एकनिष्ठ आहे. दुसरा म्हणतो, “मी अपुल्लोस ह्याच्याशी एकनिष्ठ आहे.” कोणीतरी म्हणतो, “मी पेत्राशी एकनिष्ठ आहे.” आणि शेवटचा एक म्हणतो, “परंतु मी तर ख्रिस्ताशी एकनिष्ठ आहे.” BSB BSB: What I mean is this: Individuals among you are saying, “I follow Paul,” “I follow Apollos,” “I follow Cephas,” or “I follow Christ.”
13 UDB परंतु ख्रिस्त त्याचा एकनिष्ठपणा विभाजीत करत नाही. पौल तुमच्यासाठी वधस्तंभी गेला नाही. तुमचा बाप्तिस्मा ज्या व्यक्तिने केला त्याने पौलाच्या नावात तुमचा बाप्तिस्मा केला नाही. BSB BSB: Is Christ divided? Was Paul crucified for you? Were you baptized into the name of Paul?
14 UDB तेथे मी केवळ थोड्याच लोकांना बाप्तिस्मा दिला; त्यापैकी क्रिस्प व गायस ह्यांनाच मी बाप्तिस्मा दिला, म्हणून मी देवाचे आभार मानतो. BSB BSB: I thank God that I did not baptize any of you except Crispus and Gaius,
15 UDB मी त्यांना माझ्या नावात बाप्तिस्मा दिला हे सत्य नाही. BSB BSB: so no one can say that you were baptized into my name.
16 UDB आता करिंथमधिल कोणाचाही बाप्तिस्मा केल्याचे मला आठवत नाही, मात्र ह्या लोकांपेक्षा, मी स्तेफनाच्या घराण्याचा देखील बाप्तिस्मा केला हे मला आठवते. BSB BSB: Yes, I also baptized the household of Stephanas; beyond that I do not remember if I baptized anyone else.
17 UDB ह्याचे अतिशय महत्वाचे कारण म्हणजे ख्रिस्ताने मला लोकांचा बाप्तिस्मा करण्यासाठी पाठवले नाही, परंतु प्रत्येकाला त्याच्या विषयीची सुवार्ता सांगण्यासाठी पाठवले होते. मी केलेल्या सुवार्तेची घोषणा मनुष्याचे ज्ञान आणि हुशारीचे शब्द वापरून रचलेली नव्हती, तर तो संदेश ख्रिस्त जेव्हा वधस्तंभावर मरण पावला ह्या त्याच्या कार्याच्या पायावर तयार केलेला होता. BSB BSB: For Christ did not send me to baptize, but to preach the gospel, not with words of wisdom, lest the cross of Christ be emptied of its power.
19 UDB एका संदेष्ट्याने शास्त्रलेखात असे लिहिले आहे: “आपण ज्ञानी आहोत असे जे विचार करतात, त्यांचा शहाणपणा मी नष्ट करीन, आणि बुद्धीमानांनी पुर्णतः अपयशी व्हावे अशी मी उत्तम योजना करीन.” BSB BSB: For it is written: “I will destroy the wisdom of the wise; the intelligence of the intelligent I will frustrate.”
21 UDB देवाच्या शहाणपणानुसार, अविश्वासणारे त्यांच्या स्वतःच्या ज्ञानाने देवाला ओळखू शकत नाहीत. म्हणून देव तो संदेश सांगण्यात संतुष्ट असतो, जो त्यांच्यादृष्टीने मुर्खपणाचा आहे. तोच संदेश आम्ही सांगितला आणि जे त्याच्यावर विश्वास ठेवतात, त्या सर्वांना वाचण्याचे सामर्थ्य त्याच्याठायी आहे. BSB BSB: For since in the wisdom of God the world through its wisdom did not know Him, God was pleased through the foolishness of what was preached to save those who believe.
22 UDB यहूदी लोकांना कोणालाही अनुसरण्याआधी चमत्कारीक सामर्थ्याचे उघड प्रदर्शन व्हावे असे त्यांना वाटते. ग्रीक हे आध्यात्मिक कल्पनेविषयी नवीन आणि ताज्या विचार करण्याच्या पद्धतीद्वारे ज्ञानाचा शोध घेतात. BSB BSB: Jews demand signs and Greeks search for wisdom,
24 UDB परंतु आमच्यासाठी, आम्ही देवाला ओळखावे म्हणून त्याने आम्हाला बोलावले आहे, नाश होण्यापासून वाचवण्यासाठी आणि देवाला ओळखण्याचे शहाणपण व त्याच्या विषयी शिकण्यासाठी ख्रिस्तच त्याचे सामर्थ्य आहे. परंतु शुभवार्ता कोणत्याही वंशासोबत किंवा तत्त्वज्ञानात बांधलेली नाही; ख्रिस्तामध्ये यहूदी आणि पृथ्वीवरील इतर राष्ट्रे आणि वंश ह्यात कोणताही भेदभाव नाही. BSB BSB: but to those who are called, both Jews and Greeks, Christ the power of God and the wisdom of God.
25 UDB देवासाठी जे काही मुर्खपणाचे आहे ते मानव प्राणी जितक्या उत्तम कल्पना करू शकतो त्या पेक्षा जास्त ज्ञानीपणाचे आहे. आणि देवाच्या स्वभावाचा कमकुवतपणा बलवानाहून आणि सर्वात महान मानवप्राणी जे होऊन गेले त्याहूनही अधिक बलशाली आहे. BSB BSB: For the foolishness of God is wiser than man’s wisdom, and the weakness of God is stronger than man’s strength.
26 UDB बंधू आणि भगिनिंनो, देवाने तुम्हाला पाचारण केले तेव्हा पाहा तुम्ही कशा प्रकारचे लोक होता. पाहा की तुमचे काही मोल नव्हते. तुम्ही बुद्धिमान लोक नव्हता. लोकांनी तुमचे आज्ञापालन करावे एवढ्या योग्यतेचे तुम्ही नव्हता. तुम्हाला फार महत्वाचे पूर्वज नव्हते. BSB BSB: Brothers, consider the time of your calling: Not many of you were wise by human standards; not many were powerful; not many were of noble birth.
27 UDB त्याऐवजी, देवाने अविश्वासणाऱ्यांसाठी ज्यांचा काही अर्थ नव्हता अशा गोष्टींना निवडले, जेणेकरून त्यांनी स्वतःची स्तुती करणे थांबवावे. ज्या गोष्टी अतिशय बलवान होत्या असा विश्वास ठेवणाऱ्यांना लाजवता यावे म्हणून, देवाने अशक्त गोष्टींना वापरण्यासाठी निवडले. BSB BSB: But God chose the foolish things of the world to shame the wise; God chose the weak things of the world to shame the strong.
28 UDB ज्या गोष्टींना अविश्वासणारे महत्वाच्या समजतात त्यांना काही मोल नाही, हे दर्शवण्यासाठी देवाने त्यांच्या दृष्टीने जे विशेष नाही अशांना निवडले. BSB BSB: He chose the lowly and despised things of the world, and the things that are not, to nullify the things that are,
29 UDB देवाने असे केले जेणे करून मनुष्याकडे स्वतःची प्रशंसा करण्यासाठी कोणतेही कारण असू शकणार नाही आणि त्याऐवजी त्याने सर्व स्तुती प्रशंसा देवाला द्यावी. BSB BSB: so that no one may boast in His presence.
30 UDB देवाने जे काही केले आहे त्यामुळे, आता तुम्ही येशू ख्रिस्ताशी जोडले गेले आहात, त्यानेच आम्हाला स्पष्ट केले की देव किती ज्ञानी आहे, त्याने आपल्याला देवा बरोबर योग्य करून ठेवले आहे, त्याने आम्हांला देवासाठी वेगळे केले आहे, आणि त्यानेच आम्हांला वाचवले आणि सुरक्षित ठिकाणी आणिले आहे. BSB BSB: It is because of Him that you are in Christ Jesus, who has become for us wisdom from God: our righteousness, holiness, and redemption.
31 UDB म्हणून, जसे शास्त्रभागात सांगितले आहे: “जो कोणी स्वतःची प्रशंसा करतो त्याने केवळ प्रभूने त्याच्यासाठी जे काही केले त्याबद्दल स्वतःची प्रशंसा करावी.” BSB BSB: Therefore, as it is written: “Let him who boasts boast in the Lord.”
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.