1 UDB बंधूनो आणि भगिनींनो, आता मला तुम्हांला आत्मिक दानांविषयी शिकवू द्या. त्यांचा उपयोग कसा करावा ह्याची माहिती तुम्हांला असावी अशी माझी इच्छा आहे. BSB BSB: Now about spiritual gifts, brothers, I do not want you to be uninformed.
2 UDB ज्या मूर्तींना एक शब्द देखील बोलता येत नसेल तर त्या मूर्तींची उपासना तुम्ही कशी केली तेव्हा कसे त्यांनी तुम्हांला चुकीच्या मार्गाने चालवले होते. हे तुमच्या आठवणीत आहे. BSB BSB: You know that when you were pagans, you were influenced and led astray to mute idols.
3 UDB “येशू ख्रिस्त हा प्रभू आहे”, हे तुम्हाला जाहीर करण्यासाठी देवाचा आत्मा मदत करतो. पवित्र आत्म्याने भरलेला कोणीही मनुष्य कधीही असे म्हणत नाही की, “येशू शापित असो!” BSB BSB: Therefore I inform you that no one who is speaking by the Spirit of God says, “Jesus be cursed,” and no one can say, “Jesus is Lord,” except by the Holy Spirit.
4 UDB ख्रिस्ताच्या लोकांना आत्मा अनेक निरनिराळे कृपादाने देतो, परंतु तो आत्मा एकच आहे. BSB BSB: There are different gifts, but the same Spirit.
5 UDB तसेच देवाची सेवा करण्याचे अनेक निरनिराळे मार्ग देखील आहेत, पंरतु प्रभू केवळ एकच आहे. BSB BSB: There are different ministries, but the same Lord.
6 UDB देवाच्या राज्यात लोकांना कार्ये करण्यासाठी अनेक निरनिराळे मार्ग देखील आहेत, पंरतु तो देवच आहे जो त्याच्याकरता कार्ये करण्यासाठी त्याच्या लोकांना सामर्थ्य देतो. BSB BSB: There are different ways of working, but the same God works all things in all people.
7 UDB प्रत्येक विश्वासणाऱ्यांजवळ आत्म्याच्या सामर्थ्यापैकी काही सामर्थ्य त्यांच्याकडे आहे हे त्यांना दाखवता यावे म्हणून देवाने ते शक्य बनवले आहे; देवाने हे केले यासाठी की, सर्व विश्वासणाऱ्यांना एकत्र होऊन त्याच्यावर विश्वास ठेवण्याकरता मदत व्हावी आणि त्याचा अधिक सन्मान व्हावा. BSB BSB: Now to each one the manifestation of the Spirit is given for the common good.
9 UDB तसेच दुसऱ्या विश्वासणाऱ्याला त्याच आत्म्याच्या योगे देवावर विस्मयकारक गोष्टी घडवण्याकरता विश्वास ठेवण्याचे कृपादान तो देतो. आणखी तसेच देखील तो दुसऱ्या एका व्यक्तीला देवाला प्रार्थना करून लोकांना बरे करण्यास पात्र करतो. तो आत्मा विविध कृपादांने देतो, पंरतु तरी देखील तो आत्मा देवाचा आहे. BSB BSB: to another faith by the same Spirit, to another gifts of healing by that one Spirit,
10 UDB देवाची स्तुती लोकांनी करावी म्हणून तो आत्मा काही विश्वासणाऱ्यांना सामर्थ्ययुक्त कृत्ये करण्यासाठी सक्षम बनवतो. देवापासून आलेल्या उपदेशाला त्यांना सागंता यावे, म्हणून इतर काही विशिष्ट विश्वासणाऱ्यांना, तो सक्षम करतो. कोणता आत्मा देवाचा सन्मान करतो आणि कोणता करत नाही हे सांगण्यासाठी तोच आत्मा इतर विश्वासणाऱ्यांना देखील सक्षम करतो. तो आत्मा देवापासून येणाऱ्या उपदेशाला विविध भाषेतून सांगता यावे म्हणून तो भाषा देतो, आणि त्या उपदेशांना आपल्या भाषेत भांषातर करून त्याचा अर्थ सांगण्यासाठी तो इतरांना देखील सक्षम करतो. BSB BSB: to another the working of miracles, to another prophecy, to another distinguishing between spirits, to another speaking in various tongues, and to still another the interpretation of tongues.
11 UDB पुन्हा आणि पुन्हा आम्ही अनेक निरनिराळे कृपादांनाना पाहतो, परंतु तो आत्मा सारखाच आहे जो ही कृपादाने ज्याला तो निवडतो, त्या व्यक्तीला देतो. BSB BSB: All these are the work of one and the same Spirit, who apportions them to each one as He determines.
13 UDB कारण ख्रिस्ताच्या आत्माच्याद्वारे, आमचा बाप्तिस्मा झाला, तेव्हा आम्ही प्रत्येकजण ख्रिस्ताच्या शरीरामध्ये सामील झालो होतो. आमची पार्श्वभूमी कशी होती, आम्ही यहूदी किंवा ग्रीक होतो, दास किंवा स्वतंत्र होतो, त्याने काही फरक पडला नाही, परंतु आपल्यापैकी प्रत्येकाने पवित्र आत्म्याचे दान प्राप्त केले. BSB BSB: For in one Spirit we were all baptized into one body, whether Jews or Greeks, slave or free, and we were all given one Spirit to drink.
14 UDB लक्षात ठेवा, शरीर हे केवळ एक भाग नाही, पंरतु संपूर्ण शरीर तयार होण्यासाठी बरेच भाग एकत्र काम करत आहेत. BSB BSB: For the body does not consist of one part, but of many.
15 UDB तुझा पाय तुझ्याशी बोलला आणि म्हणाला, “मी हात नाही, म्हणून मी तुझ्या शरीराचा भाग नाही,” तर तो तुझ्या हातासारखा नाही म्हणून त्यावरून तुमच्या शरीराचा काही भाग कमी होणार नाही. BSB BSB: If the foot should say, “Because I am not a hand, I do not belong to the body,” that would not make it any less a part of the body.
16 UDB आणि तुझा कान तुझ्याशी बोलला आणि तुला म्हणाला, “मी एक डोळा नाही, म्हणून, शरीरात माझे कुठलेही ठिकाण नाही,” तर तो तुझ्या डोळ्यासारखा नाही म्हणून त्यावरून तुमच्या शरीराचा काही भाग कमी होणार नाही. BSB BSB: And if the ear should say, “Because I am not an eye, I do not belong to the body,” that would not make it any less a part of the body.
17 UDB तुझे संपूर्ण शरीर एक डोळा झाला, तर तुम्ही काहीही ऐकू शकणार नाही. तुझ्या संपूर्ण शरीरात एकच कानाने ऐकू येत असल्यास, तर तूला वास घेता येणार नाही. BSB BSB: If the whole body were an eye, where would the sense of hearing be? If the whole body were an ear, where would the sense of smell be?
18 UDB पंरतु शरीरातील प्रत्येक अवयव देवाने एकत्रित लावून ठेवले आहेत, आणि ज्याप्रमाणे त्याने त्याची रचना केली आहे तसेच ते कार्य करते. प्रत्येक अवयव आवश्यक आहे. BSB BSB: But in fact, God has arranged the members of the body, every one of them, according to His design.
19 UDB जर आपल्यातला प्रत्येक जण इतर सर्व अवयवांप्रमाणेच सारखे असतो, तर आपण एक शरीर नसतो. BSB BSB: If they were all one part, where would the body be?
20 UDB आम्ही सर्व अनेक सदस्य आहोत, पण फक्त एकच शरीर असे आहोत. BSB BSB: As it is, there are many parts, but one body.
21 UDB तुमच्या शरीरामध्ये, डोळा हाताला म्हणू शकणार नाही, “मला तुझी गरज नाही”, नक्कीच त्याला त्या हाताची गरज आहे. किंवा डोके पायांना म्हणू शकणार नाही, “मला तुझी गरज नाही.” BSB BSB: The eye cannot say to the hand, “I do not need you.” Nor can the head say to the feet, “I do not need you.”
22 UDB कमी सक्षम असलेले अवयव देखील किंवा जे आवश्यक असलेले आणि सासांरिक कार्ये करणारे, हे सर्व संपूर्ण शरीर म्हणून या सर्वांची आवश्यकता असते. BSB BSB: On the contrary, the parts of the body that seem to be weaker are indispensable,
23 UDB ज्या अवयवांना इतरांनी पाहिल्यास आम्हाला लाज वाटते, त्यांना झाकण्यासाठी आम्ही अधिक काळजी घेतो. अशा प्रकारे आम्ही त्यांच्यासाठी अधिक आदर व्यक्त करतो. BSB BSB: and the parts we consider less honorable, we treat with greater honor. And our unpresentable parts are treated with special modesty,
24 UDB पंरतु देवाने कमी महत्वाच्या असलेल्या अवयवांना प्रतिष्ठित अवयवांशी जोडले. आणि ते शरीराचा भाग आहेत म्हणून देवाने त्या कमी प्रदर्शनीय अवयवांना सन्मान दिला आहे. BSB BSB: whereas our presentable parts have no such need. But God has composed the body and has given greater honor to the parts that lacked it,
25 UDB देवाने ह्याप्रकारे संपूर्ण शरीराला सन्मानित केले आहे म्हणून मंडळीत कुठलेही विभाजन नाही, आणि ते सदस्य त्यांचे कृपादाने किंवा क्षमता, हेतू किंवा भूमिका काहीही असो, तरी ते ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहेत, म्हणून त्या शरीराच्या प्रत्येक सदस्याची त्याच स्नेहभावाने काळजी घ्यावी. BSB BSB: so that there should be no division in the body, but that its members should have mutual concern for one another.
26 UDB आम्ही एकाच शरीराचे अवयव आहोत, म्हणून एखादा सदस्य दुःख सोसतो, तेव्हा आम्ही सर्व दुःख सहन करतो. एका सदस्याला ख्रिस्तासाठी पूर्ण केलेल्या गोष्टीबद्दल त्याला सन्मानित केले जाते, तेव्हा संपूर्ण शरीर एकत्र आनंद करते. BSB BSB: If one part suffers, every part suffers with it; if one part is honored, every part rejoices with it.
27 UDB आता तुम्ही ख्रिस्ताचे शरीर आहात, आणि वैयक्तिकरीत्या, तुम्ही सर्व त्याचे सदस्य आहात. BSB BSB: Now you are the body of Christ, and each of you is a member of it.
28 UDB देवाने मंडळीला एक भेट म्हणून लोकांना दिले आहे. त्याने मंडळीला प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक, त्यानंतर ज्यांनी सामर्थ्यशाली कृत्ये केली, जे बरे करत होते, जे लोक प्रशासन काम करतात, त्यांना ज्यांनी मदत केली, आणि आत्म्याने ज्यांना विविध प्रकारच्या भाषा त्यांना दिल्या आहेत. स्थानिक मंडळीचे सदस्य असणारे लोक, हे देवाने तुम्हांला दिलेल्या त्या भेटवस्तू आहेत. देवाने तुम्हांला ते दिले आहेत. BSB BSB: And in the church God has appointed first of all apostles, second prophets, third teachers, then workers of miracles, and those with gifts of healing, helping, administration, and various tongues.
29 UDB प्रत्येकजण काही एक प्रेषित नाही. सर्वच संदेष्टे नाहीत. केवळ आम्हापैकी काही शिक्षक आहेत. केवळ काहीच सामर्थ्यशाली कृत्ये करतात. BSB BSB: Are all apostles? Are all prophets? Are all teachers? Do all work miracles?
30 UDB आम्ही सर्वजण आजाऱ्याला बरे करू शकतो का? नक्कीच नाही. आम्ही सर्वजण विशेष भाषांमध्ये बोलू शकतो का? केवळ काहीजणाकडे ते कृपादान आहेत. आम्ही सर्वजण इतर भाषांमध्ये संदेशांचा अर्थ सांगू शकतो का? केवळ काही करू शकतात. देवाकडून आम्हाला मिळणाऱ्या कृपादानांमध्ये आम्ही सर्वजण भिन्न आहोत. BSB BSB: Do all have gifts of healing? Do all speak in tongues? Do all interpret?
31 UDB पंरतु तुम्ही मोठ्या उत्सुकतेने महान कृपादाने, विशेषकरून मंडळीला प्रोत्साहित आणि मजबूत करणाऱ्या कृपादांनाना शोधून काढावे अशी माझी इच्छा आहे. आणि आता, मी अधिक उत्कृष्ट असा एक मार्ग तुम्हाला दाखवेन. BSB BSB: But eagerly desire the greater gifts. And now I will show you the most excellent way.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.