1 UDB इतर विश्वासणाऱ्या बरोबर तुमचा एखादा वाद असेल, तेव्हा तुम्ही ते प्रकरण अविश्वासणाऱ्या नागरी न्यायाधीशाकडे घेऊन जाऊ नये. तर ज्यांना देवाने ह्याच कामासाठी वेगळे केले आहे, अशा सोबतीच्या विश्वासणाऱ्याकडे, ते प्रकरण घेऊन जावे. BSB BSB: If any of you has a grievance against another, how dare he go to law before the unrighteous instead of before the saints!
2 UDB आम्ही देवाचे आहोत म्हणून आपण जगाचा न्यायनिवाडा करणार आहोत हे तुम्हाला माहीत असावे. जर तुम्ही एके दिवशी जगाचा न्यायनिवाडा करणार आहात, तर ज्या गोष्टी कमी महत्वाच्या आहेत अशा समस्यांना सोडवण्यास देखील तुम्ही सक्षम असले पाहिजे. BSB BSB: Do you not know that the saints will judge the world? And if you are to judge the world, are you not competent to judge trivial cases?
3 UDB तुम्ही देवदूतांचा न्यायनिवाडा कराल हे तुम्हाला माहीत असायला हवे! निश्चितच तुम्ही ह्या जीवनातील प्रकरणांचाही न्याय करण्यास सक्षम व्हाल. BSB BSB: Do you not know that we will judge angels? How much more the things of this life!
4 UDB आणि जर तुम्ही ह्या जीवनातील महत्वांच्या प्रकरणांचे निवारण करू शकाल तर, ख्रिस्ती लोकांमध्ये होणाऱ्या वादविवादाचे अविश्वासणाऱ्यांकडून निवारण व्हावे याची तुम्हाला आवश्यकता वाटणार नाही. BSB BSB: So if you need to settle everyday matters, do you appoint as judges those of no standing in the church?
5 UDB ह्या बाबतीत तुम्ही कशारीतीने अपयशी झालात हे दर्शवण्यासाठी मी असे बोललो आहे. ख्रिस्ती भाऊ आणि बहिणींमध्ये याप्रकारचे विवाद उत्पन्न होतात तेव्हा त्यांचे निवारण करण्यास पुरेसे असे नक्कीच कोणीतरी ज्ञानी लोक तेथे मंडळीत असतीलच. BSB BSB: I say this to your shame. Is there really no one among you wise enough to arbitrate between his brothers?
6 UDB परंतु त्याऐवजी तुमच्या पैकी काही विश्वासणारे इतर विश्वासणाऱ्यांवर नागरी न्यायालयात दोषारोप करतात, आणि अविश्वासणाऱ्या न्यायाधिशाने तुमचा न्याय करण्यास तुम्ही परवानगी देता! BSB BSB: Instead, one brother goes to law against another, and this in front of unbelievers!
7 UDB तुम्हामध्ये आपसात कोणतेही वाद असतात, तेव्हा असे समजा की जे तुम्ही करायला हवे होते ते तुम्ही केले नाही. एका भावाला किंवा बहिणीला न्यायालयात घेऊन जावे ह्यापेक्षा तुम्ही त्यांना तुमच्यापासून लाभ घेऊ द्यावा. BSB BSB: The very fact that you have lawsuits among you means that you are thoroughly defeated already. Why not rather be wronged? Why not rather be cheated?
8 UDB त्याऐवजी तुम्ही चूकला आहात, आणि इतरांची फसवणूक केली आहे, आणि एकदा तर तुम्ही आपल्या स्वतःच्या भावांना आणि बहिणींना फसवले आहे. BSB BSB: Instead, you yourselves cheat and do wrong, even against your own brothers!
9 UDB देव दुष्टांवर राज्य करणे कधिच स्वीकार करणार नाही हे तुम्ही खात्रीने नीट समजून घ्या. जर ते तुम्हाला ह्या पेक्षा निराळे काही सांगतील तर त्यावर विश्वास ठेऊ नका. सत्य हे आहे की, लैंगिकरित्या अनैतिक पापे करणारे, देवाव्यतिरीक्त जे कोणाचीही किंवा इतर कशाचीही उपासना करतात, जे त्यांच्या विवाहाच्या शपथा मोडतात, जे कोणी लैंगिक कृत्यांचा समावेश असलेल्या तथाकथित उपासनेच्या घृणास्पद कृत्यांमध्ये लुप्त आहेत. ज्या उपासनेमध्ये लैंगिक कर्मासारख्या घृणास्पद कृत्यांचा सहभाग असतो अशी उपासना करणारे, जे कोणी समलैंगिकतेमध्ये जीवन जगतात, BSB BSB: Do you not know that the wicked will not inherit the kingdom of God? Do not be deceived: Neither the sexually immoral, nor idolaters, nor adulterers, nor men who submit to or perform homosexual acts,
10 UDB जे कोणी चोरी करतात, कोणी एक अजून जास्त प्राप्तकरण्यासाठी लोभी आहे, जे कोणी मद्यपान करतात, कोणी एक दुसऱ्याविषयी लबाड बोलतो, आणि जे त्यांच्यावर भरवसा ठेवतात त्यांच्यापासून जे कोणी चोरी करतात देव त्यांच्यावर राज्य करण्यास तयार होणार नाही. BSB BSB: nor thieves, nor the greedy, nor drunkards, nor verbal abusers, nor swindlers, will inherit the kingdom of God.
11 UDB तुमच्यापैकी काही लोक ह्या गोष्टी करतात. परंतु देवाने तुम्हाला तुमच्या पापांपासून शुद्ध केले आहे, त्याने तुम्हाला त्याच्या स्वतःसाठी वेगळे करून ठेवले आहे, आणि त्याने तुम्हाला त्याच्या बरोबर योग्य केले आहे. त्याने हे सर्व प्रभू येशू ख्रिस्ताच्या आणि आपल्या देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्यानेच केले आहे. BSB BSB: And that is what some of you were. But you were washed, you were sanctified, you were justified, in the name of the Lord Jesus Christ and by the Spirit of our God.
12 UDB काही असेही म्हणतात: “मला जे काही करावेसे वाटते, ते काहिही करण्याची मला मोकळीक आहे, कारण मी ख्रिस्ताशी जोडलेला आहे.” होय, परंतु जे काही करण्याची मला परवानगी आहे ते माझ्यासाठी उपयोगी आहे असा त्याचा अर्थ होत नाही. कारण “मला जे काही करावेसे वाटते ते काहीही करण्याची मला मोकळीक आहे” कशानेही माझ्यावर धनिपण करावे अशी परवानगी मी देत नाही. BSB BSB: “Everything is permissible for me,” but not everything is beneficial. “Everything is permissible for me,” but I will not be mastered by anything.
13 UDB लोक असे देखील म्हणतात, “अन्न मनुष्याला खाण्यासाठी बनवलेले आहे, आणि मनुष्य अन्न खाण्यासाठी बनवण्यात आलेला आहे.” परंतु देव लवकरच अन्न आणि मनुष्य ह्यांना नाहीसे करील. अर्थातच, हे लोक खरोखर शारिरीक संबंधाविषयी बोलतात. तथापी, देवाने आमची शरिरे लैंगिकरित्या अनैतीक व्हावीत म्हणून बनवले नाही. परंतु शरीराने प्रभूची सेवा करावी, आणि प्रभूने शरीरासाठी पूरवठा करावा म्हणून बनवले आहे. BSB BSB: “Food for the stomach and the stomach for food,” but God will destroy them both. The body is not intended for sexual immorality, but for the Lord, and the Lord for the body.
14 UDB देवाने प्रभूला मरणातून उठवले, आणि तो आम्हाला देखील पुन्हा जीवंत राहता यावे म्हणून आपल्या सामर्थ्याने उठवील. BSB BSB: By His power God raised the Lord from the dead, and He will raise us also.
15 UDB तुमची शरिरे ख्रिस्ताशी जोडलेली आहेत हे तुम्हाला माहीत असावे. तुम्ही ख्रिस्ताच्या शरीराचा एखादा भाग काढून आणि तो वेश्येशी जोडावा काय? कधिच नाही! BSB BSB: Do you not know that your bodies are members of Christ? Shall I then take the members of Christ and unite them with a prostitute? Never!
16 UDB तुम्हाला हे माहित आहे की जो कोणी एका वेश्ये सोबत झोपतो तो तिच्याशी एकरूप होतो. शास्त्रभागात विवाहा विषयी सांगितल्याप्रमाणे हे आहे: “ते दोघे एकदेह होतील.” BSB BSB: Or don’t you know that he who unites himself with a prostitute is one with her in body? For it is said, “The two will become one flesh.”
17 UDB आणि जे कोणी प्रभूशी जोडलेले आहेत ते त्याच्या बरोबर एक आत्मा असे होतील. BSB BSB: But he who unites himself with the Lord is one with Him in spirit.
18 UDB म्हणून तुम्हाला लैंगिक पाप करावेसे वाटते, तेव्हा जितक्या लवकर तुम्हाला जाता येईल तितक्या लवकर तेथून पळून जा! लोक म्हणतात, “मनुष्य जे प्रत्येक पाप करतो ते तो शरीराच्या बाहेरून करतो”—लैंगिकरित्या केलेले एकमेव पाप सोडून, तो आपल्या स्वतःच्या शरीराच्या विरोधात पाप करतो. BSB BSB: Flee from sexual immorality. Every other sin a man can commit is outside his body, but he who sins sexually sins against his own body.
20 UDB देवाने पुत्राच्या जीवनाची किंमत देऊन तुम्हाला विकत घेतले आहे. म्हणून तुम्ही आपल्या मानवी देहामध्ये जे काही कराल त्या सर्वांद्वारे देवाचा सन्मान करा. BSB BSB: you were bought at a price. Therefore glorify God with your body.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.