1 UDB माझ्या स्वतःच्या मुलासारखे तुम्ही जे मला प्रिय आहात, तुम्ही पाप करण्यापासून दूर राहावे म्हणून मी तुम्हाला हे लिहित आहे. परंतु तुम्हा विश्वासणाऱ्यांपैकी कोणी पाप करतो तर, प्रभू येशू ख्रिस्त जो एक नीतिमान, त्याच्यासाठी आम्हाला क्षमा करण्याकरीता तो पित्याकडे विनंती करत आहे, ह्याची आठवण ठेवा. BSB BSB: My little children, I am writing these things to you so that you will not sin. But if anyone does sin, we have an advocate before the Father—Jesus Christ, the Righteous One.
2 UDB येशू ख्रिस्ताने स्वेच्छेने त्याच्या स्वतःच्या जिवनाचे आमच्यासाठी अर्पण होऊ दिले, जेणेकरून त्याचा परिणाम म्हणजे देवाने आमच्या अपराधांची क्षमा करावी. होय, देव आमच्या अपराधांची क्षमा करू शकतो, परंतु केवळ आमच्याच नाही! तर प्रत्येक ठिकाणातील लोकांच्या अपराधांची देखील क्षमा करण्यासाठी तो सक्षम आहे! BSB BSB: He Himself is the atoning sacrifice for our sins, and not only for ours but also for the sins of the whole world.
3 UDB आम्हाला देव ठाऊक आहे ह्याची खात्री आम्ही कशी करू शकतो हे मी तुम्हाला सांगतो. त्याने आम्हाला जे काही करण्याची आज्ञा दिली तीचे जर आम्ही पालन केले तर, त्यावरून दिसून येईल की आम्ही त्याच्यासोबत एकत्र जोडलेले आहोत. BSB BSB: By this we can be sure that we have come to know Him: if we keep His commandments.
4 UDB “आम्ही देवाला ओळखतो,” असे जे कोणी म्हणतात, आणि देवाने आम्हाला जे काही करण्यास आज्ञापिले त्याचे आज्ञा पालन करत नाही, ते लबाड आहेत. देवाच्या सत्य संदेशानुसार ते त्यांचे जीवन जगत नाहीत. BSB BSB: If anyone says, “I know Him,” but does not keep His commandments, he is a liar, and the truth is not in him.
5 UDB परंतु देवाने जे काही करण्यास आज्ञापिले त्याचे जे कोणी आज्ञापालन करतात ते प्रत्येक मार्गात देवावर प्रीती करणारे लोक आहेत. आम्ही देवाबरोबर जोडलेले आहोत त्याची ह्याद्वारे आम्ही खात्री करू शकतो. BSB BSB: But if anyone keeps His word, the love of God has been truly perfected in him. By this we know that we are in Him:
6 UDB देवाला पाहिजे तसे जीवन आम्ही जगत आहोत असे जर आम्ही म्हणत असलो, तर आम्ही ख्रिस्ताने केल्याप्रमाणे आमचे जीवन जगायला हवे. BSB BSB: Whoever claims to abide in Him must walk as Jesus walked.
7 UDB प्रिय मित्रांनो, तुम्ही काहीतरी नवीन करणे आवश्यक आहे म्हणून मी तुम्हाला लिहित नाही. त्याऐवजी, तुम्ही ख्रिस्तामध्ये प्रथमच विश्वास ठेवला तेव्हापासून ज्या गोष्टी करण्याचे तुम्हाला ठाऊक आहे, त्याच मी तुम्हाला लिहित आहे. तुम्ही नेहमी ऐकत आलेल्या संदेशाचा हा एक भाग आहे. BSB BSB: Beloved, I am not writing to you a new commandment, but an old one, which you have had from the beginning. This commandment is the message you have heard.
8 UDB परंतु ह्याच मुद्यावर मी पुन्हा तुमच्याशी काही गोष्टी बोलणार आहे: मी तुम्हाला काहीतरी नवीन करण्यासाठी सांगत आहे, असेही मी म्हणू शकतो. हे नवीन आहे कारण ख्रिस्ताने जे काही केले होते ते देखील नवीनच होते, आणि तुम्ही जे काही करत आहात तेही नवीनच आहे. हे यासाठी कारण तुम्ही वाईट करणे थांबवत आहात आणि तुम्ही अधिकाधिक चांगले करत आहात. रात्र निघून जाऊन दिवस उजाडतो, तेव्हा ख्रिस्ताचा खरा दिवस उजाडावा असे हे आहे. BSB BSB: Then again, I am also writing to you a new commandment, which is true in Him and also in you. For the darkness is fading and the true light is already shining.
9 UDB जे कोणी आपल्या सहविश्वासू बांधवांपैकी एखाद्याचा द्वेष करतात, मात्र प्रकाशात जगणाऱ्या लोकांसारखे आम्ही पण जगतो असा दावा करतात, ते अजून देखील अंधकारात जगणाऱ्या लोकांसारखे आहेत. BSB BSB: If anyone claims to be in the light but hates his brother, he is still in the darkness.
10 UDB परंतु जे कोणी आपल्या सहविश्वासू बांधवावर प्रीती करतात ते प्रकाशात जगणाऱ्या लोकांसारखे वागतात; पाप करण्यासाठी त्यांच्याकडे कोणतेही कारण नाही. BSB BSB: Whoever loves his brother remains in the light, and there is no cause of stumbling in him.
11 UDB कोणी आपल्या सहविश्वासू बांधवाचा द्वेष करतो तर तो अजूनही अंधारातच जीवन जगत आहे, देवा विषयीचे सत्य काय आहे ह्याची त्याला जाणीव नाही. BSB BSB: But whoever hates his brother is in the darkness and walks in the darkness. He does not know where he is going, because the darkness has blinded his eyes.
12 UDB जणुकाय तुम्ही माझी स्वतःची मुले होता ज्यांच्यावर मी प्रीती करतो त्या तुम्हाला मी हे लिहित आहे. ख्रिस्ताने तुमच्यासाठी जे काही केले आहे त्यामुळे देवाने तुमच्या पापांची क्षमा केली आहे. BSB BSB: I am writing to you, little children, because your sins have been forgiven through His name.
13 UDB तुम्ही जे इतरांपेक्षा वयस्कर विश्वासणारे आहात त्या तुम्हाला मी हे लिहित आहे. ख्रिस्त सर्वदा जिवंत आहे, त्याला तुम्ही ओळखता. तरूण पुरुषांनो; जो दुष्ट त्या सैतानाला तुम्ही हरवले आहे, म्हणून मी तुम्हाला देखील लिहित आहे. आणि तुम्ही लहान मुलांनो, देव जो पिता ह्याला तुम्ही ओळखता म्हणून मी तुम्हाला लिहित आहे. BSB BSB: I am writing to you, fathers, because you know Him who is from the beginning. I am writing to you, young men, because you have overcome the evil one. I have written to you, children, because you know the Father.
14 UDB मी पुन्हा तेच सांगेन तुम्ही वयस्कर पुरुषांनो ख्रिस्त जो सर्वदा अस्तित्वात आहे, हे तुम्हाला समजले आहे, म्हणून मी तुम्हाला लिहित आहे. आणि तरूण पुरूषांनो, तुम्ही त्या दुष्ट सैतानाला पराभूत केले आहे. आणि तुम्ही सशक्त आहात आणि देव जी काही आज्ञा देतो तसे तुम्ही वागता म्हणून मी तुम्हाला लिहित आहे. BSB BSB: I have written to you, fathers, because you know Him who is from the beginning. I have written to you, young men, because you are strong, and the word of God abides in you, and you have overcome the evil one.
15 UDB देवाचा सन्मान न करणाऱ्या जगातल्या लोकांसारखे वागू नका; ते ज्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतात त्या गोष्टींची इच्छा धरू नका. ते करतात तसे कोणीही जीवन जगत असेल तर, निश्चितच ते आपला देव जो पिता ह्याच्यावर प्रीती करत नाही. BSB BSB: Do not love the world or anything in the world. If anyone loves the world, the love of the Father is not in him.
16 UDB कारण ज्या सर्व चुकीच्या गोष्टी लोक करतात, त्या सर्व गोष्टी ज्या लोक पाहतात आणि स्वतःसाठी मिळवण्याचा प्रयत्न करतात, आणि त्या सर्व गोष्टी ज्या विषयी ते बढाई मारतात, ह्या सर्व गोष्टींचा आपल्या स्वर्गीय पित्याशी काही संबंध नाही, म्हणून मी हे लिहितो. ते जगाचे आहेत. BSB BSB: For all that is in the world—the desires of the flesh, the desires of the eyes, and the pride of life—is not from the Father but from the world.
17 UDB जगातील जे लोक देवाचा सन्मान करत नाहीत, त्यांनी इच्छा धरलेल्या गोष्टींसोबत, त्यांचा देखील नाश होईल. परंतु देवाच्या इच्छेप्रमाणे जे कोणी करतात ते सर्वकाळ जगतील. BSB BSB: The world is passing away, along with its desires; but whoever does the will of God remains forever.
18 UDB तुम्ही मला अतिप्रिय आहात, येशू पृथ्वीवर परत येण्या अगोदर. ख्रिस्त मीच आहे असा ढोंग करणारा तो व्यक्ती येत आहे, हे तुम्ही अगोदरच ऐकले आहे; प्रत्यक्षात, अशा प्रकारचे अनेक व्यक्ती अगोदर पासूनच आलेले आहेत, परंतु ते सर्व ख्रिस्ताच्या विरोधात आहेत. ह्या कारणामुळे, ख्रिस्त लवकरच परत येईल हे आम्हाला समजते. BSB BSB: Children, it is the last hour; and just as you have heard that the antichrist is coming, so now many antichrists have appeared. This is how we know it is the last hour.
20 UDB परंतु तुमच्यासाठी, ख्रिस्त जो एकच पवित्र आहे, त्याने तुम्हाला त्याचा आत्मा दिला आहे; त्याच्याच आत्म्याने, तुम्हाला सर्व सत्य शिकवले आहे. BSB BSB: You, however, have an anointing from the Holy One, and all of you know the truth.
21 UDB देवाबद्दलचे सत्य तुम्हाला ठाऊक नाही म्हणून, मी तुम्हाला हे पत्र लिहित आहे असे नाही, परंतु यासाठी की ते काय आहे हे तुम्हाला ठाऊक आहे. देव आम्हाला असत्य असे काहीही शिकवत नाही हे देखील तुम्हाला माहीत आहे; तर त्याऐवजी, जे काही सत्य आहे तेच तो आम्हाला शिकवतो. BSB BSB: I have not written to you because you lack knowledge of the truth, but because you have it, and because no lie comes from the truth.
23 UDB येशू हा देवाचा पुत्र आहे हे जे कोणी कबूल करत नाही ते कोणत्याही प्रकारे पित्याशी जोडलेले नाहीत, परंतु ख्रिस्त देवाचा पुत्र आहे हे जे कोणी स्वीकार करतात ते देखील पित्या बरोबर जोडलेले आहेत. BSB BSB: Whoever denies the Son does not have the Father, but whoever confesses the Son has the Father as well.
24 UDB तर, तुमच्यासाठी, तुम्ही प्रथम ऐकले होते त्या येशू ख्रिस्ताच्या सत्यावर तुम्ही नेहमी विश्वास ठेवला पाहिजे, आणि त्या नुसारच जीवन जगले पाहिजे. जर तुम्ही असे कराल तर तुम्ही पिता आणि पुत्र ह्यांच्या बरोबर जोडून राहाल. BSB BSB: As for you, let what you have heard from the beginning remain in you. If it does, you will also remain in the Son and in the Father.
25 UDB आणि देवाने आपल्याला जे सांगितले आहे ते म्हणजे आम्ही सर्वकाळासाठी जिवंत राहावे असे त्याने केले आहे! BSB BSB: And this is the promise that He Himself made to us: eternal life.
26 UDB ख्रिस्ता विषयीच्या सत्या संबंधी जे कोणी तुम्हाला फसवू पाहतात त्यांच्या बाबतीत तुम्हाला चेतावणी देण्यासाठी मी तुम्हाला हे लिहिले आहे. BSB BSB: I have written these things to you about those who are trying to deceive you.
27 UDB जसे तुमच्यासाठी, देवाचा आत्मा ज्याला तुम्ही ख्रिस्तापासून प्राप्त केले, तुमच्यात तो कायम राहो. तुमचा शिक्षक व्हावे म्हणून तुम्हाला इतर कोणाचीही गरज नाही. तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे, अशा सर्व गोष्टी देवाचा आत्मा तुम्हाला शिकवत आहे. तो सर्वदा सत्यच शिकवतो आणि जे काही खोटे आहे ते तो कधीही बोलत नाही. म्हणून त्याने तुम्हाला शिकवल्या नुसार राहा, आणि त्याच्या बरोबर जोडलेले असा. BSB BSB: And as for you, the anointing you received from Him remains in you, and you do not need anyone to teach you. But just as His true and genuine anointing teaches you about all things, so remain in Him as you have been taught.
28 UDB आता, माझ्या प्रियांनो, तुम्ही ख्रिस्ताशी जडून राहावे अशी मी विनंती करतो. तो पुन्हा परत येईल तेव्हा तो आमचा स्विकार करील अशी आम्हाला खात्री करता येईल अशाप्रकारे आम्हाला ते करण्याची गरज आहे. जर आम्ही असे केले तर, तो येईल तेव्हा त्याच्या समोर उभे राहण्यासाठी आम्हाला लाज वाटणार नाही. BSB BSB: And now, little children, remain in Christ, so that when He appears, we may be confident and unashamed before Him at His coming.
29 UDB ख्रिस्त सर्वदा जे योग्य आहे तेच करतो हे तुम्हाला माहीत आहे, सर्व जण जे काही योग्य आहे ते निरंतर करीत राहतात ते देवाची मुले होतात हे तुम्हाला माहीत आहे. BSB BSB: If you know that He is righteous, you also know that everyone who practices righteousness has been born of Him.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.