1 UDB येशू ख्रिस्ताचा प्रेषित म्हणून तुमच्याकडे येण्यासाठी, ज्याला देवाने निवडले आहे तो मी पौल आहे, कलस्सै शहरातल्या प्रिय बंधुभगिनींनो, तीमथ्य ख्रिस्तातील आपल्या सहविश्वासू बांधवांबरोबर सामील झाला आहे. आम्ही हे पत्र तुम्हा सर्वांना लिहित आहोत. BSB BSB: Paul, an apostle of Christ Jesus by the will of God, and Timothy our brother,
2 UDB देवाने ज्यांना आपल्या स्वतःसाठी वेगळे करून ठेवले आहे, जे विश्वासू विश्वासणारे बांधव ख्रिस्ताचे आहेत अशा तुम्हा सर्वांना आम्ही हे पत्र पाठवत आहोत. देव जो आमचा पिता ह्याने तुम्हाला त्याचा दयाळूपणा आणि शांती द्यावी अशी आम्ही प्रार्थना करतो. BSB BSB: To the saints and faithful brothers in Christ at Colossae: Grace and peace to you from God our Father.
3 UDB आम्ही जेव्हा तुमच्यासाठी प्रार्थना करतो, तेंव्हा आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव जो पिता, ह्याचे आम्ही निरंतर आभार मानतो. BSB BSB: We always thank God, the Father of our Lord Jesus Christ, when we pray for you,
4 UDB कारण ज्यांना देवाने स्वतःसाठी वेगळे केले आहे त्या सर्वांवर तुम्ही प्रीती करता आणि तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवता असे आम्ही ऐकले आहे. BSB BSB: because we have heard about your faith in Christ Jesus and your love for all the saints—
5 UDB देवाने तुमच्यासाठी स्वर्गामध्ये ज्या गोष्टींचा साठा केला आहे त्याची तुम्ही आत्मविश्वासाने वाट पाहता म्हणून तुम्ही आपल्या विश्वासू बंधूंवर प्रीती करत आहात. ख्रिस्ता विषयीची शुभवार्ता हा खरा संदेश तुम्ही प्रथमच ऐकला होता, तेव्हाच तुम्ही ह्या गोष्टींविषयी ऐकले आहे. BSB BSB: the faith and love proceeding from the hope stored up for you in heaven, of which you have already heard in the word of truth, the gospel
6 UDB तुम्ही कलस्सैमध्ये ऐकलेल्या या सुवार्तेची घोषणा विश्वासणारे जगातील सर्वजणांकरिता करत आहेत. ज्याप्रमाणे पहिल्याने तुम्ही हे ऐकले आणि समजून घेतले की देव खरोखर किती दयाळू आहे, त्याचप्रमाणे तुमच्यामध्ये देखील त्याने कार्य केले आहे. ही शुभवार्ता एका शेतात लागवड केलेले पिक वाढत जाऊन आणि त्या पिकाची मोठ्याप्रमाणात पुरेशी कापणी व्हावी अशी आहे. BSB BSB: that has come to you. All over the world this gospel is bearing fruit and growing, just as it has been doing among you since the day you heard it and truly understood the grace of God.
7 UDB हे घडून येईल ह्या विषयी एपफ्रासने तुम्हाला शिकवले आहे. तो विश्वासूपणे ख्रिस्तासाठी व तुमच्या चांगल्यासाठी, आमच्याबरोबर ख्रिस्ताची सेवा करत आहे, म्हणून आम्ही त्याच्यावर प्रीती करतो. BSB BSB: You learned it from Epaphras, our beloved fellow servant, who is a faithful minister of Christ on our behalf,
8 UDB त्यानेच आम्हाला सांगितले आहे की तुम्ही देवाच्या सर्व लोकांवर प्रीती करता, कारण देवाच्याच आत्म्याने तुम्हाला देवावर आणि इतरांवर प्रीती करण्यास सामर्थ्यशाली बनवले आहे. BSB BSB: and who also informed us of your love in the Spirit.
9 UDB तुम्ही कशी प्रीती करता हे आम्ही ऐकले तेव्हा पासून आम्ही सर्वदा तुमच्यासाठी प्रार्थना करत असतो. देवाला जे काही करायचे आहे त्या प्रत्येक गोष्टी त्याने तुम्हाला दाखवाव्या, आणि देवाचा आत्मा तुम्हाला काय शिकवत आहे हे समजण्यासाठी त्याने तुम्हाला ज्ञानी बनवावे अशी आम्ही प्रार्थना करत आहोत. BSB BSB: For this reason, since the day we heard about you, we have not stopped praying for you and asking God to fill you with the knowledge of His will in all spiritual wisdom and understanding,
10 UDB आम्ही अशी प्रार्थना करत आहोत की तुम्ही अश्याप्रकारे जीवन जगावे ते पाहून इतरांनी देवाचा सन्मान करावा, जेणेकरून तो तुमचे समर्थन करील. त्याने तुम्हाला करण्यास सांगितलेल्या सर्व चांगल्या गोष्टी तुम्ही कराव्यात अशी आम्ही प्रार्थना करतो. BSB BSB: so that you may walk in a manner worthy of the Lord and may please Him in every way: bearing fruit in every good work, growing in the knowledge of God,
11 UDB देवाने त्याच्या सर्व महान सामर्थ्याने तुम्हाला मजबूत करावे, म्हणजे तुम्ही प्रत्येक कठीण प्रसंगाला धीराने सहन करावे अशी आम्ही प्रार्थना करतो. BSB BSB: being strengthened with all power according to His glorious might so that you may have full endurance and patience, and joyfully
12 UDB आपला देव जो पिता ह्याने इतरांसोबत म्हणजे ज्यांना त्याने त्याचे स्वतःचे लोक होण्यासाठी वेगळे केले आहे, त्यांच्यासोबत आम्हाला योग्य केल्याची घोषणा त्याने केली आहे, म्हणून तुम्ही ह्यासाठी त्याचा धन्यवाद करावा आणि आनंद करावा अशी आम्ही प्रार्थना करतो; हे यासाठी की आम्ही त्याच्यासोबत त्याच्या प्रकाशाच्या उपस्थिती मध्ये राहू तेव्हा त्याने आमच्यासाठी राखून ठेवलेल्या सर्व गोष्टी आम्हाला द्याव्या. BSB BSB: giving thanks to the Father, who has qualified you to share in the inheritance of the saints in the light.
13 UDB आम्हाला नियंत्रित करणाऱ्या वाईटापासून आमचा देव पित्याने आमची सुटका केली आहे; आता त्याचा पुत्र जो त्याला प्रिय आहे, त्याने आमच्यावर राज्य करावे, असे त्याने केले आहे. BSB BSB: He has rescued us from the dominion of darkness and brought us into the kingdom of His beloved Son,
14 UDB त्याच्या पुत्राच्याद्वारे त्याने आम्हाला त्या वाईटापासून सोडविले आहे; ते असे की, त्याने आमच्या अपराधांची क्षमा केली आहे. BSB BSB: in whom we have redemption, the forgiveness of sins.
18 UDB जसे एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर त्याचे मस्तक राज्य करते तसे तो विश्वासणाऱ्यांवर, मंडळीवर राज्य करतो. कारण त्यानेच मंडळीची सुरुवात केली आहे, म्हणून तो मंडळीवर राज्य करतो. एका परिपूर्ण शरीरासह पुन्हा जिवंत होणारा तो प्रथम व्यक्ती होता. म्हणून तो सर्व गोष्टी पेक्षा जास्त महान आहे. BSB BSB: And He is the head of the body, the church; He is the beginning and firstborn from among the dead, so that in all things He may have preeminence.
19 UDB त्याने ख्रिस्तामध्ये राहावे म्हणून सर्वकाही तयार करण्यास देव जो पिता संतुष्ट होता. BSB BSB: For God was pleased to have all His fullness dwell in Him,
21 UDB तुम्ही ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवण्याआधी, तुम्ही वाईट गोष्टी शिकवल्या आणि तुम्ही वाईट गोष्टी केल्या ह्या मुळे तुम्ही देवासाठी मैत्रीपूर्ण नव्हता, म्हणून देव तुम्हाला त्याचे शत्रू समजत होता. BSB BSB: Once you were alienated from God and were hostile in your minds, engaging in evil deeds.
23 UDB परंतु तुम्ही ख्रिस्तावर पूर्णपणे विश्वास ठेवत राहिले पाहिजे; मगच तुम्ही जसे काही त्यांनी एका मजबूत खडकावर बनविलेल्या घरासारखे व्हाल. तुम्ही व जगातील सर्व लोकांनी ऐकलेल्या शुभवार्तेमध्ये देवाने जे काही करण्यासाठी दिलेल्या अभिवचनावर कोणत्याही कारणाने विश्वास ठेवने थांबवू नये. मी पौल, ह्याच शुभवार्तेची लोकांना घोषणा करून, देवाची सेवा करत आहे. BSB BSB: if indeed you continue in your faith, established and firm, not moved from the hope of the gospel you heard, which has been proclaimed to every creature under heaven, and of which I, Paul, have become a servant.
24 UDB तुमच्या फायद्यासाठी मला जो त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे मी आता आनंद करत आहे. होय, मंडळीची मदत करण्यासाठी, जे ख्रिस्ताचे शरीर आहे, ज्या गोष्टी अजून घडायलाच हव्या त्या मी सहन करत आहे. BSB BSB: Now I rejoice in my sufferings for you, and I fill up in my flesh what is lacking in regard to Christ’s afflictions for the sake of His body, which is the church.
25 UDB देवाने मला त्याचा सेवक करून मला एका विशिष्ट काम करण्यासाठी दिले आहे, ते म्हणजे तुमच्या सारख्या परराष्ट्रीय लोकांना शुभवर्तमानाची घोषणा करावी. BSB BSB: I became its servant by the commission God gave me to fully proclaim to you the word of God,
26 UDB प्राचीन काळापासून, पिढ्यां-पिढ्यांसाठी, देवाने ही शुभवार्ता सांगितली नाही, परंतु ज्यांना देवाने त्याचे स्वतःचे लोक होण्यासाठी वेगळे केले आहे त्यांना त्याने हे रहस्य प्रकट केले आहे. BSB BSB: the mystery that was hidden for ages and generations but is now revealed to His saints.
27 UDB देवाने हे अद्भुत गुपित सांगण्याची योजना जे तुमच्या सारखेच यहूदी आणि गैर यहूदी आहेत, अशा लोकांसाठी केली. ती अशी: ख्रिस्त तुम्हामध्ये राहिल आणि तुम्ही देवाच्या गौरवाचे वाटेकरी होण्याची आत्मविश्वासाने अपेक्षा करावी असे करील! BSB BSB: To them God has chosen to make known among the Gentiles the glorious riches of this mystery, which is Christ in you, the hope of glory.
28 UDB आम्ही सुज्ञपणे इशारा देत आहोत आणि प्रत्येक व्यक्तीला ख्रिस्ताविषयी शिकवत आहोत जेणेकरून आम्हाला ख्रिस्ताशी जोडलेले आणि देवाला पूर्णपणे ओळखणाऱ्या अशा प्रत्येकाला देवाच्या उपस्थिती मध्ये आणता यावे! BSB BSB: We proclaim Him, admonishing and teaching everyone with all wisdom, so that we may present everyone perfect in Christ.
29 UDB हे करण्यासाठी ख्रिस्त मला सामर्थ्य देतो म्हणून, मी होईल तितके कठीण परिश्रम करतो. BSB BSB: To this end I also labor, striving with all His energy working powerfully within me.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.