1 UDB आपण देवाची मुले असल्याकारणाने त्याचे अनुकरण करा, कारण त्याने आम्हावर प्रेम केले आहे. BSB BSB: Be imitators of God, therefore, as beloved children,
2 UDB ज्या प्रकारे ख्रिस्ताने आपल्यावर प्रीती केली की, तो आपल्या पापांसाठी वधस्तंभावर देवाला अर्पण आणि यज्ञ असा झाला, की जे देवाला फार आनंद देणारे होते, त्याच प्रकारे आपण इतरांवर प्रेम करावे. BSB BSB: and walk in love, just as Christ loved us and gave Himself up for us as a fragrant sacrificial offering to God.
3 UDB कोणत्याही प्रकारची अनैतिक कृती सुचवू नका आणि दुसऱ्यांकडे जे आहे त्याची इच्छा धरू नका किंवा जे वाईट करतात त्याचीही इच्छा धरू नका. अशा पापांमुळे लोक देवाच्या लोकांबद्दल वाईट बोलतील, जे की देवासाठीच वेगळे केलेले आहेत, पापासाठी नाही. BSB BSB: But among you, as is proper among the saints, there must not be even a hint of sexual immorality, or of any kind of impurity, or of greed.
4 UDB इतरांना अश्लील गोष्टी किंवा मूर्खपणाच्या गोष्टी किंवा पापाबद्दल विनोद सांगू नका. जे देवाशी संबंधित आहेत त्यांनी ह्या अश्या गोष्टी बोलू नये. याउलट जेव्हा तुम्ही इतरांशी बोलता, तेव्हा देवाच्या प्रेमाबद्दल धन्यवाद द्या. BSB BSB: Nor should there be obscenity, foolish talk, or crude joking, which are out of character, but rather thanksgiving.
5 UDB आपणास ह्याची खात्री असू द्या की, कोणताही व्यक्ती जो जारकर्मी, किंवा असभ्य, किंवा लोभी(कारण हे मूर्तिपूजे सारखेच आहे) ख्रिस्त राज्य करीत असता देवाच्या लोकांत असणार नाही. BSB BSB: For of this you can be sure: No immoral, impure, or greedy person (that is, an idolater) has any inheritance in the kingdom of Christ and of God.
6 UDB कोणीही तुम्हास युक्तीवादात फसवू नये, कारण ते पापाच्या गोष्टी करतात, जे देवाच्या आज्ञा मानत नाहीत, त्यांच्या प्रती तो क्रोधीत होईल. BSB BSB: Let no one deceive you with empty words, for because of such things the wrath of God is coming on the sons of disobedience.
7 UDB तर आता जो कोणी अश्या पापाच्या गोष्टी करतो, त्याच्यासोबत सामील होऊ नका. BSB BSB: Therefore do not be partakers with them.
8 UDB प्रभू येशूवर विश्वास ठेवण्यापूर्वी तुम्ही पापी अवज्ञामध्ये राहत होता, जसे की काळोख रात्र तुम्हास पुर्णवेळेस विळखा घालून असावी. परंतु तुम्ही आता प्रभूच्या प्रकाशात जगत आहा. BSB BSB: For you were once darkness, but now you are light in the Lord. Walk as children of light,
9 UDB जसे प्रकाशामुळे चांगल्या गोष्टी निर्माण होतात, त्याचप्रमाणे जे येशूच्या प्रकाशात राहतात ते चांगले आणि सत्य काय आहे, हे ओळखतात आणि करतात. BSB BSB: for the fruit of the light consists in all goodness, righteousness, and truth.
10 UDB ते उघडपणे दाखवितात की प्रभूला काय संतुष्ट करते. BSB BSB: Test and prove what pleases the Lord.
11 UDB जे काही निरुपयोगी आत्मिक काळोखात कार्य करत आहेत त्यांच्याबरोबर सहभागी होऊ नका. त्याऐवजी, फक्त एवढे बोला की, "ते पापी कृत्ये निरुपयोगी आहेत," BSB BSB: Have no fellowship with the fruitless deeds of darkness, but rather expose them.
12 UDB कारण लोक दुष्टाईच्या ज्या गोष्टी अंधाराच्या गुप्त स्थळी करतात त्या प्रकाशात उघड करणे देखील लज्जास्पद आहे. BSB BSB: For it is shameful even to mention what the disobedient do in secret.
13 UDB कारण प्रकाश जे उघडकीस करतो त्या सर्व गोष्टी नंतर स्पष्टपणे आणि चांगल्या प्रकारे समजल्या जाऊ शकतात, BSB BSB: But everything exposed by the light becomes visible, for everything that is illuminated becomes a light itself.
14 UDB कारण प्रकाश हा आपल्याला स्पष्ट दाखवतो की सत्य आहे तरी काय. हे असे आहे जेव्हा देवाचे वचन लोकांना नष्ट करणारी पापे स्पष्ट करते आणि येशू लोकांची क्षमा करून त्यांना नविन करतो. म्हणून विश्वासणारे असे म्हणतात, "आपल्या झोपेतून जागा हो आणि जे मेलेल्यांसारखे आहेत त्यांच्यातून ऊठ ख्रिस्त आपल्याला क्षमा आणि नवीन जीवन समजून घेण्यास सक्षम करेल.” BSB BSB: So it is said: “Wake up, O sleeper, rise up from the dead, and Christ will shine on you.”
15 UDB यास्तव तुम्ही कसे जगता त्याबद्दल सावध असा. मूर्ख जसे व्यवहार करतात तसे तुम्ही करू नका. याउलट, सुज्ञ मनुष्य जसा वागतो तसे करा. BSB BSB: Pay careful attention, then, to how you walk, not as unwise but as wise,
16 UDB पृथ्वीवरील वेळेचा वापर सुज्ञपणे करा कारण तेथील दिवस वाईट गोष्टींनी भरलेले आहेत. BSB BSB: redeeming the time, because the days are evil.
17 UDB त्यामुळे मूर्ख होऊ नका, त्या ऐवजी, प्रभू येशूची काय इच्छा आहे हे समजून घ्या. BSB BSB: Therefore do not be foolish, but understand what the Lord’s will is.
18 UDB मद्यार्क असलेले पेये घेऊन झिंगू नका, जे की माणसाचे जीवन नाश करते. याउलट, पुर्णवेळ काय करावे यासाठी देवाचा आत्मा तुमचा ताबा घेवो. BSB BSB: Do not get drunk on wine, which leads to reckless indiscretion. Instead, be filled with the Spirit.
19 UDB एकमेकांसोबत स्तोत्रे, ख्रिस्ताची गाणी, आणि देवाने तुम्हाला दिलेले गीते गा. ही स्तोत्रे आणि इतर गाणी आपल्या अंतःकरणातून प्रभू येशूची स्तुती करण्यास गा. BSB BSB: Speak to one another with psalms, hymns, and spiritual songs. Sing and make music in your hearts to the Lord,
20 UDB येशू ख्रिस्ताने जे तुमच्यासाठी केले आहे, त्या प्रत्येक गोष्टीसाठी देव जो आपला पिता ह्याला प्रत्येक समयी धन्यवाद द्या. BSB BSB: always giving thanks to God the Father for everything in the name of our Lord Jesus Christ.
21 UDB ख्रिस्ताचा आदर व्हावा यासाठी तुम्ही नम्रतेने ऐकमेकांस शरण जा. BSB BSB: Submit to one another out of reverence for Christ.
22 UDB पत्नींनो, ज्याप्रकारे तुम्ही येशूच्या अधीन राहता, त्याच प्रकारे आपल्या पतीच्या नेतृत्वाच्या अधीन रहा. कारण ज्याप्रकारे पती हा पत्नीचा पुढारी असतो, त्याच प्रकारे ख्रिस्त देखील जगातील सर्व विश्वासणाऱ्या मंडळींचा पुढारी आहे. त्याने सर्व विश्वासणाऱ्यांना त्यांच्या पापांमुळे होणाऱ्या निंदेपासून वाचविले आहे. BSB BSB: Wives, submit to your husbands as to the Lord.
24 UDB जसे की सर्व विश्वासणारे ख्रिस्ताच्या अधिकाराच्या अधीन राहतात, त्याचप्रमाणे स्त्रीने सुद्धा पुर्णपणे आपल्या पतीच्या अधिकाराला शरण जावे. BSB BSB: Now as the church submits to Christ, so also wives should submit to their husbands in everything.
26 UDB म्हणजे तो आपल्याला त्याच्या स्वत:साठी वेगळे करील. आमच्या पापांची शिक्षा काढून टाकण्याद्वारे, येशूने शब्दाच्या सामर्थ्यानुसार जसे पाण्याने धुऊन टाकावे तसे विश्वासणाऱ्यांना शुद्ध केले आहे. BSB BSB: to sanctify her, cleansing her by the washing with water through the word,
27 UDB आता ख्रिस्त संपूर्ण विश्वासणाऱ्यांना स्वत:साठी पूर्णपणे स्वच्छ, क्षमा झालेले, निर्दोष, ज्यात काही पाप नाही असा गट म्हणून सादर करू शकतो. BSB BSB: and to present her to Himself as a glorious church, without stain or wrinkle or any such blemish, but holy and blameless.
28 UDB प्रत्येक मनुष्याने आपल्या पत्नीवर असे प्रेम करावे जसे तो आपल्या शरीरावर प्रेम करतो. जेव्हा पुरुष आपल्या पत्नीवर प्रेम करतो, तेव्हा असे होते की तो स्वतःवरच प्रेम करतो, BSB BSB: In the same way, husbands ought to love their wives as their own bodies. He who loves his wife loves himself.
29 UDB कारण कोणीही स्वतःच्या शरीराचा हेवा करत नाही. याउलट, तो त्याच्या शरीराची काळजी करतो आणि त्याला खाऊ घालतो, त्याच प्रकारे ख्रिस्तसुद्धा सर्व विश्वासणाऱ्या मंडळींची ज्या जगात आहेत त्यांची काळजी करतो. आम्ही विश्वासणाऱ्यांचा एक समुह झालो आहोत, जो त्याच्याशी संबंधित आहे. BSB BSB: Indeed, no one ever hated his own body, but he nourishes and cherishes it, just as Christ does the church.
31 UDB जे लग्न करतात त्यांसाठी पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, "जेव्हा एक माणूस आणि एक स्त्री लग्न करते तेव्हा ते कायमचे आपल्या आईवडिलांना सोडून देतील. ते पती आणि पत्नी असे एकत्र यावे, आणि ते दोघे नसून एकच देह असे होतील.” BSB BSB: “For this reason a man will leave his father and mother and be united to his wife, and the two will become one flesh.”
32 UDB देवाने प्रकट केलेल्या गोष्टींचा अर्थ समजावून घेणे अवघड आहे, परंतु मी तुम्हाला ख्रिस्ताच्या प्रेमाबद्दल, जे त्याला त्याच्या विश्वासणाऱ्या विश्वव्यापी मंडळीबद्दल आहे त्याबाबतीत सांगत आहे. BSB BSB: This mystery is profound, but I am speaking about Christ and the church.
33 UDB तथापि, प्रत्येक मनुष्य जशी आपणावर प्रीती करतो तशी आपल्या पत्नीवर करावी, आणि प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीचा आदर करावा. BSB BSB: Nevertheless, each one of you also must love his wife as he loves himself, and the wife must respect her husband.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.