2 UDB ऐका! मी पौल, तुम्हाला सांगत आहे की, जर सुंता करून घेऊन तुम्ही नियमशास्त्राकडे वळला तर ख्रिस्त तुमच्यासाठी कोणत्याही किंमतीचा नाही. BSB BSB: Take notice: I, Paul, tell you that if you let yourselves be circumcised, Christ will be of no value to you at all.
3 UDB सुंता करून घेणाऱ्या प्रत्येक माणसाला मी पुन्हा एकदा जाहीर करतो की, तो संपूर्ण नियमशास्त्र पाळण्यास बांधलेला आहे, BSB BSB: Again I testify to every man who gets himself circumcised that he is obligated to obey the whole law.
4 UDB तुमच्यापैकी जे नियमशास्त्राने नीतिमान ठरू पाहतात, त्यांचा ख्रिस्ताबरोबरचा संबंध तुटला आहे. देवाच्या दयेच्या बाहेर आता तुम्ही आहात. BSB BSB: You who are trying to be justified by the law have been severed from Christ; you have fallen away from grace.
5 UDB आम्ही तर आत्म्याने विश्वासाकडून न्यायीपणाच्या आशेची वाट पाहात आहोत. BSB BSB: But by faith we eagerly await through the Spirit the hope of righteousness.
7 UDB तुम्ही इतकी चांगली ख्रिस्ती शर्यत धावत होता तर तुम्हाला सत्याचे पालन करण्यास कोणी अडथळा केला? BSB BSB: You were running so well. Who has obstructed you from obeying the truth?
8 UDB सत्यापासून मन वळवणारे तुमचे कठोर वर्तन ज्याने तुम्हाला बोलाविले त्या देवापासून येत नाही. BSB BSB: Such persuasion does not come from the One who calls you.
9 UDB “थोडेसे खमिर कणकेचा गोळा फुगवून टाकते.” BSB BSB: A little leaven works through the whole batch of dough.
10 UDB प्रभूमध्ये मला तुमच्याविषयी खात्री आहे की, जे मी तुम्हाला शिकविले त्याच्याशिवाय इतर विचार तुम्ही करणार नाही. परंतु जो तुम्हाला त्रास देत आहे, तो कोणी का असेना, दंड भोगील. BSB BSB: I am confident in the Lord that you will take no other view. The one who is troubling you will bear the judgment, whoever he may be.
11 UDB बंधूजनहो, काही जण असा आरोप करतात की, अजूनही सुंतेची गरज आहे असा उपदेश मी करतो. जर तसे आहे तर अजूनही माझा छळ का होत आहे? आणि जर मी सुंतेच्या आवश्यकतेविषयी उपदेश करत असतो तर वधस्तंभाविषयीची तत्वे राहिली नसती. BSB BSB: Now, brothers, if I am still preaching circumcision, why am I still being persecuted? In that case the offense of the cross has been abolished.
12 UDB माझी इच्छा आहे की, जे तुम्हामध्ये अस्थिरता उत्पन्न करतात त्यांनी सुंतेबरोबर स्वत:ला नपुंसक करून घ्यावे. BSB BSB: As for those who are agitating you, I wish they would proceed to emasculate themselves!
13 UDB परंतु स्वतंत्रतेमध्ये राहावे म्हणून तुम्हा बंधूना देवाने बोलावले आहे. फक्त तुमच्या देहाला जे आवडते ते करण्याची एक सबब म्हणून तुमच्या स्वातंत्र्याचा उपयोग करू नका. त्याऐवजी प्रीतीमध्ये एकमेकांची सेवा करा (दास व्हा). BSB BSB: For you, brothers, were called to freedom; but do not use your freedom as an opportunity for the flesh. Rather, serve one another in love.
14 UDB कारण संपूर्ण नियमशास्त्राचा सारांश एकाच वचनात सामावला आहे. ते सांगते, “जसे आपणावर तसे आपल्या सोबतीच्या व्यक्तीवरही प्रेम करा.” BSB BSB: The entire law is fulfilled in a single decree: “Love your neighbor as yourself.”
15 UDB पण जर तुम्ही एकमेकांना चावत राहिला व खाऊन टाकीत असला, तर एकमेकांना गिळून टाकणार नाही, याविषयी सावध राहा. BSB BSB: But if you keep on biting and devouring one another, watch out, or you will be consumed by one another.
16 UDB पण मी म्हणतो: तुम्ही आत्म्यात चाला, आणि तुम्ही देहाच्या पापी इच्छा पूर्ण करणार नाही. BSB BSB: So I say, walk by the Spirit, and you will not gratify the desires of the flesh.
17 UDB कारण आपला देह ज्याची इच्छा करतो ते आत्म्याविरुद्ध आहे, आणि आत्मा जी इच्छा करतो, ती देहाविरूद्ध आहेत. परिणाम म्हणून तुम्हाला जे करावयास पाहिजे ते करता येत नाही. BSB BSB: For the flesh craves what is contrary to the Spirit, and the Spirit what is contrary to the flesh. They are opposed to each other, so that you do not do what you want.
18 UDB पण जर तुम्ही आत्म्याकडून चालविले जाता तर तुम्ही नियमशास्त्राधीन नाही. BSB BSB: But if you are led by the Spirit, you are not under the law.
19 UDB देहाची कर्मे तर उघड आहेत, ती म्हणजे, जारकर्म, अशुद्धता, कामातुरपणा, BSB BSB: The acts of the flesh are obvious: sexual immorality, impurity, and debauchery;
20 UDB मूर्तिपूजा, चेटूक, द्वेष, मारामारी, मत्सर, राग, स्वार्थी हेवे देवे, पक्षभेद, BSB BSB: idolatry and sorcery; hatred, discord, jealousy, and rage; rivalries, divisions, factions,
21 UDB दारूबाजी, रंगेलपणा, अशासारख्या दुसऱ्या सर्व गोष्टी. या गोष्टीविषयी मी तुम्हाला सूचना देत आहे. ज्याप्रमाणे मी पूर्वी तुम्हाला सूचना केल्या होत्या. जे लोक अशा गोष्टी करतात त्यांना देवाच्या राज्यात वाटा मिळणार नाही. BSB BSB: and envy; drunkenness, orgies, and the like. I warn you, as I did before, that those who practice such things will not inherit the kingdom of God.
22 UDB पण आत्मा या गोष्टी निर्माण करतो: प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्वास, BSB BSB: But the fruit of the Spirit is love, joy, peace, patience, kindness, goodness, faithfulness,
23 UDB सौम्यता व आत्मसंयमन. अशा गोष्टींविरुद्ध नियमशास्त्र नाही. BSB BSB: gentleness, and self-control. Against such things there is no law.
24 UDB जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी देह स्वभावाला त्यांच्या वासना व इच्छांसह वधस्तंभावर खिळले आहे. BSB BSB: Those who belong to Christ Jesus have crucified the flesh with its passions and desires.
25 UDB जर आम्ही आत्म्याने जगतो, तर तो जसा चालवितो तसे आम्ही सुध्दा त्याच्यामागे चालू या. BSB BSB: Since we live by the Spirit, let us walk in step with the Spirit.
26 UDB आम्ही पोकळ बढाई मारणारे, एकमेकांना चिड आणणारे, एकमेकांचा हेवा करणारे होऊ नये. BSB BSB: Let us not become conceited, provoking and envying one another.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.