2 UDB कारण आपल्या पूर्वजांनी विश्वास केला म्हणूनच ते देवाच्या पसंतीस पडले. BSB BSB: This is why the ancients were commended.
3 UDB देवाच्याठायी आपला विश्वास असल्यामुळेच आम्हांला समजते की, या जगाची निर्मिती जे सद्ध्या आहे, देवाच्या आज्ञेनेच झाली आहे. म्हणून जे काही आता दिसते ते जे दिसत नव्हते त्यापासून निर्माण केले गेले. BSB BSB: By faith we understand that the universe was formed at God’s command, so that what is seen was not made out of what was visible.
4 UDB देवाच्याठायी असलेल्या विश्वासामुळेच हाबेलाने काईनापेक्षा जो त्याच्या मोठा भाऊ होता, अधिक चांगला यज्ञ देवाला अर्पण केला. देवाने हाबेलाची दाने मान्य केल्यामुळे विश्वासाच्याद्वारे तो धार्मिक म्हणून उंचावण्यात आला, आणि जरी तो मेला असला तरी तो आपल्या विश्वासामुळे अजून बोलतो हे आपणास शिकायला मिळते. BSB BSB: By faith Abel offered God a better sacrifice than Cain did. By faith he was commended as righteous when God gave approval to his gifts. And by faith he still speaks, even though he is dead.
7 UDB नोहाला देवाने सांगितले की तो महापूर पाठवणार आहे, तेव्हा त्याने विश्वासाने त्याची दखल घेतली. त्याने आपल्या कुटूंबाला वाचविण्यास जहाज बांधण्याद्वारे देवाला आदर दिला. विश्वासामुळेच त्याने दाखवून दिले की राहीलेले लोक हे देवाच्या शिक्षेस पात्र आहेत आणि विश्वासामुळे लाभणाऱ्या धार्मिकतेचा तो देवासोबत वारस बनला. BSB BSB: By faith Noah, when warned about things not yet seen, in godly fear built an ark to save his family. By faith he condemned the world and became heir of the righteousness that comes by faith.
8 UDB जेव्हा देवाने अब्राहामाला पाचारण केले तेव्हा विश्वासानेच त्याने आज्ञापालन केले. आणि त्याला वतन म्हणून जी जागा मिळणार होती त्या देशात तो आपला देश सोडून गेला. आपण कोठे जात आहोत हे त्याला ठाऊक नसतानादेखील तो बाहेर पडला. BSB BSB: By faith Abraham, when called to go to a place he would later receive as his inheritance, obeyed and went, without knowing where he was going.
9 UDB देवाच्याठायी असलेल्या विश्वासानेच अब्राहाम वचनदत्त देशात जो त्याच्या वंशजाला देव देणार होता त्या देशात एखाद्या उपऱ्यासारखा राहिला. अब्राहाम तंबूत राहिला, आणि त्याचा मुलगा इसहाक व त्याचा नातू याकोब त्यांनी देखील असेच केले. कारण ते दोघेही अब्राहामाला दिलेल्या त्याच वचनाचे वारसदार होते. BSB BSB: By faith he dwelt in the promised land as a stranger in a foreign country. He lived in tents, as did Isaac and Jacob, who were heirs with him of the same promise.
10 UDB ज्या नगराला मजबूत पाया आहे व ज्याचा प्रयोजक बांधकाम कारागीर स्वत:देव आहे अशा नगरामध्ये अब्राहाम राहण्याची वाट पाहात होता. BSB BSB: For he was looking forward to the city with foundations, whose architect and builder is God.
11 UDB आपण दिलेल्या वचनाबाबत देव विश्वासू आहे हे जाणून सारा ही जरी वांझ होती आणि अब्राहामाचे वय लेकरे होण्याच्या अगदी मर्यादेपलीकडे गेले होते, तरी विश्वासाने मुलाला जन्म देण्याची शक्ति त्यांना मिळाली. देवाने वचन दिले की तो तिला एक मुलगा देईल, आणि अब्राहामाने विश्वास धरला की देवाने जे वचन दिले ते तो पूर्ण करेल. BSB BSB: By faith Sarah, even though she was barren and beyond the proper age, was enabled to conceive a child, because she considered Him faithful who had promised.
12 UDB आणि जरी तो फार वयातीत झाला असून तरी अशा एका अब्राहामापासून आकाशातील ताऱ्यांच्या संख्येएवढी आणि समुद्रकिनाऱ्यावरील वाळूच्या कणांइतकी अगणित संतति जन्मास आली. कारण देवाने त्याला तसे वचन दिले होते. BSB BSB: And so from one man, and he as good as dead, came descendants as numerous as the stars in the sky and as countless as the sand on the seashore.
13 UDB आणि हे सर्व लोक विश्वासात मरण पावले. देण्यात आलेल्या वचनांचे प्रतिफळ त्यांना प्राप्त झाले नव्हते. परंतु त्यांनी विश्वासाने ते दुरूनच पाहिले व त्याबद्दला आनंद केला आणि त्यांनी उघडपणे कबूल केले की ते या पृथ्वीचे रहिवासी नसून फक्त प्रवासी आहेत. BSB BSB: All these people died in faith, without having received the things they were promised. However, they saw them and welcomed them from afar. And they acknowledged that they were strangers and exiles on the earth.
14 UDB जे लोक अशा गोष्टी बोलतात ते हेच दर्शवितात की ते त्यांच्या वतनासाठी देश पाहत आहेत. असा देश जो त्यांचा स्वत:चा असणार. BSB BSB: Now those who say such things show that they are seeking a country of their own.
15 UDB ते जर त्यांनी सोडून आलेल्या देशाबद्दल विचार करीत असते तर ते आपल्या त्या देशात परत गेले असते. BSB BSB: If they had been thinking of the country they had left, they would have had opportunity to return.
16 UDB परंतु ते लोक त्याहून अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गातील घराची, तेथील वतनाची इच्छा धरुन होते. म्हणून देवाने त्यांच्यासोबत राहावे यासाठी त्यांच्यासाठी एक शहर तयार केले आहे, आणि तो त्यांचा देव आहे, असे त्यांना म्हणने त्याला आनंदाचे वाटले. BSB BSB: Instead, they were longing for a better country, a heavenly one. Therefore God is not ashamed to be called their God, for He has prepared a city for them.
18 UDB आणि देवाने त्याच इसहाका बद्दल सांगितले की, “इसहाकाकडूनच तुइया वंशाची वाढ होईल.” BSB BSB: even though God had said to him, “Through Isaac your offspring will be reckoned.”
19 UDB अब्राहामाचा असा विश्वास होता की, जरी त्याने इसहाकाला अर्पणासाठी मारले, तरी देव त्याला मरणातून पुन्हा उठवू शकेल. आणि याचा परिणाम असा झाला की अब्राहामाला इसहाक परत मिळाला जेव्हा देवाने म्हटले की त्याला काही हाणी नको करू, म्हणजेच इसहाक त्याला जसा काय मरणातून परत मिळाला. BSB BSB: Abraham reasoned that God could raise the dead, and in a sense, he did receive Isaac back from death.
20 UDB इसहाकाने देवावर भरवसा ठेवला म्हणून त्याने देवाला प्रार्थना केली की मृत्यूनंतर देव त्याचे पुत्र याकोब व एसाव यांना आशीर्वादित करेल. BSB BSB: By faith Isaac blessed Jacob and Esau concerning the future.
21 UDB आणि विश्वासानेच याकोब, जेव्हा तो मरत होता, तेव्हा त्याने योसेफाच्या प्रत्येक मुलाला आशीर्वाद दिला आणि आपल्या चालण्याच्या काठीवर तो टेकला असताना त्याने देवाची उपासना केली. BSB BSB: By faith Jacob, when he was dying, blessed each of Joseph’s sons and worshiped as he leaned on the top of his staff.
22 UDB कारण योसेफाचा देवावर विश्वास होता म्हणून त्याने आपल्या आयुष्याच्या शेवटी विश्वासाने इस्राएल लोक इजिप्त देशाच्या बाहेर जाण्याबाबत बोलला आणि जेव्हा ते इस्राएल सोडतील तेव्हा त्याच्या अस्थिही सोबत नेण्यात याव्या अशी सुचना त्याने दिली. BSB BSB: By faith Joseph, when his end was near, spoke about the exodus of the Israelites and gave instructions about his bones.
23 UDB मोशेच्या आईवडिलांनी देवावर भरवंसा ठेवल्या कारणाने, जेव्हा मोशे जन्मला तेव्हा विश्वासाने त्याच्या आईवडिलांनी त्याला तीन महिने लपवून ठेवले, कारण त्यांनी पाहिले की ते बाळ सुंदर आहे आणि राजाज्ञेची, जे की सर्व यहूदी बालकांना मारण्यात यावे, ह्याची त्यांना भीति वाटली नाही. BSB BSB: By faith Moses’ parents hid him for three months after his birth, because they saw that he was a beautiful child, and they were unafraid of the king’s edict.
24 UDB ज्याला ते फारोह असे म्हणत आणि त्या राजाची मुलगी,, तीने त्याला मोठे केले, परंतू मोशे जेव्हा मोठा झाला, तेव्हा देवाच्याठायी विश्वास असल्या कारणानेच त्याने फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवून घेण्याचे नाकारले. BSB BSB: By faith Moses, when he was grown, refused to be called the son of Pharaoh’s daughter.
25 UDB राजाच्या महालात पापाचे अल्पकाळ टिकणारे सुख भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोवर मीसुद्धा इतरांची वाईट वागनूक सोसावी हे निवडने त्याला बरे वाटले. BSB BSB: He chose to suffer oppression with God’s people rather than to experience the fleeting enjoyment of sin.
26 UDB त्याने ठरविले की जर तो ख्रिस्तामध्ये दुःख सोसेल तर, त्याला फारोच्या कुटूंबातील एक सदस्य असल्या कारणाने मिळणाऱ्या संपत्तीपेक्षाही अधिक मौल्यवान संपत्ती मिळणार आहे. कारण तो पुढे देवाकडून मिळणाऱ्या बक्षीसाकडे पाहत होता. BSB BSB: He valued disgrace for Christ above the treasures of Egypt, for he was looking ahead to his reward.
27 UDB देवाच्याठायी असलेल्या विश्वासानेच, मोशेने मिसर देश सोडला. त्याने देश सोडला म्हणून राजा त्याच्यावर क्रोधीत होईल याची पर्वा न करता त्याने देश सोडला. कारण न दिसणाऱ्या देवाला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला आणि तो पुढे चालत गेला. BSB BSB: By faith Moses left Egypt, not fearing the king’s anger; he persevered because he saw Him who is invisible.
28 UDB मोशेचा देवाच्याठायी असलेल्या विश्वासानेच तो त्याच्या लोकांचा बचाव करू शकला, नाश करणाऱ्या देवदूताने इस्राएल लोकांच्या प्रथम जन्मलेल्या मुलांपैकी एकालाही हात लावू नये म्हणून त्याने विश्वासाने वल्हांडण सण पाळला आणि रक्त शिंपडले, जो की पूढे चालून वल्हांडणाचा सन असा बनला. त्याने आज्ञा केली की कोकरू मारून त्याचे रक्त आपल्या दारावर शिंपडावे. BSB BSB: By faith he kept the Passover and the sprinkling of blood, so that the destroyer of the firstborn would not touch Israel’s own firstborn.
29 UDB इस्राएली लोकांनी देवावर विश्वास ठेवल्या कारणाने त्यांनी जणू काय कोरड्या जमिनीवरुन चालावे, तसा तांबडा समुद्र पार केला. पण जेव्हा मिसरच्या सैंन्याने समुद्रपार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते बुडाले. कारण समुद्र त्यांच्यावर जल प्रवाहाने वापस आला. BSB BSB: By faith the people passed through the Red Sea as on dry land; but when the Egyptians tried to follow, they were drowned.
30 UDB इस्राएली लोकांनी देवावर विश्वास ठेवल्या कारणाने सात दिवस फेऱ्या मारल्यावर यरीहोची भिंत पडली. BSB BSB: By faith the walls of Jericho fell, after the people had marched around them for seven days.
31 UDB आणि राहाब वेश्येचा देवाच्याठायी असलेल्या विश्वासामुळेच यरिहोत ज्या लोकांनी देवाची आज्ञा मोडली त्यांच्याबरोबर ती मारली गेली नाही, कारण यहोशवाने त्या शहराला नष्ट करण्यासाठी त्या शहरात काही मार्ग सापडतो का हे जाणण्यासाठी काही हेर पाठवले होते, परंतू देवाने राहाबेला वचवले कारण तिने हेरांचे शांतीने स्वागत केले. BSB BSB: By faith the prostitute Rahab, because she welcomed the spies in peace, did not perish with those who were disobedient.
32 UDB मी आणखी ज्यांनी देवावर विश्वास ठेवला त्यांच्याबद्दल काय सांगू? गिदोन, बाराक, शमशोन, इफ्ताह, दावीद, शमुवेल आदि संदेष्टे यांच्याबाबत सांगू लागलो तर वेळ पुरणार नाही. BSB BSB: And what more shall I say? Time will not allow me to tell of Gideon, Barak, Samson, Jephthah, David, Samuel, and the prophets, 33 UDB कारण त्यांचा देवावर विश्वास होता, म्हणून त्यातील काहींनी त्याच्यासाठी महान कृत्ये केलीत. काहींनी बळकट अशा पूरूषांची राज्ये जिंकली, काहींनी इस्राएलावर राज्य केले आणि मनुष्यांशी आणि नगरांशी न्यायाने वागले, आणि काहींना देवाने देऊ केलेल्या गोष्टी मिळाल्या जे त्याने देण्याचे वचन दिले होते, काहींनी सिंहांची तोडे बंद केली. BSB BSB: who through faith conquered kingdoms, administered justice, and gained what was promised; who shut the mouths of lions,
34 UDB काही जण अग्नितून सूटले, काहीजण त्यांच्या मागे तरवारीने लागलेल्यांपासून बचावले. काही आजारी असताही बरे झाले, त्यांनी अशक्तपणात सामर्थ्य मिळविले. काही लढाईत सामर्थ्यशाली ठरले आणि त्यांनी परकी सेना मागे हटविली. BSB BSB: quenched the raging fire, and escaped the edge of the sword; who gained strength from weakness, became mighty in battle, and put foreign armies to flight.
36 UDB काहीं जे देवावरती विश्वास ठेवत होते, अशा कहीना निंदा व काहींना पाठीवरचे चामडे सोलेपर्यंत चाबकाचा मार सहन करावा लागला. तर काहींना बेड्या व तुरूगंवास भोगावे लागले. BSB BSB: Still others endured mocking and flogging, and even chains and imprisonment.
37 UDB त्यातील काही विश्वासणाऱ्यांचा दगडमार करून जीव घेण्यात आला. तर काहींना करवतीने दोन भागात चिरण्यात आले, काहींना तरवारीने भोसकून मारण्यात आले. तर त्यातील काही विश्वासणारे मेंढ्यांचे व बकऱ्यांचे कातडे पांघरून फिरत राहिले. त्यांच्या जवळ पैसा देखील नव्हता. लोकांनी त्यांचा सतत छळ केला आणि त्यांना इजा पोहचवली. BSB BSB: They were stoned, they were sawed in two, they were put to death by the sword. They went around in sheepskins and goatskins, destitute, oppressed, and mistreated.
38 UDB पृथ्वीवरील लोकांनी जे विश्वासणारे होते त्यांच्या इतका छळ केला, की त्यांना जे विश्वासणारे आहेत त्यांच्यासोबत राहणे योग्य नव्हते. तर त्यातील काहींनी जंगलात, डोंगरकपारीत, गुहांमधून व जमिनीतील बिळांतून लपून फिरत राहिले. BSB BSB: The world was not worthy of them. They wandered in deserts and mountains, and hid in caves and holes in the ground.
39 UDB पण पाहा जरी त्यांचा विश्वास देवाच्या ठायी असल्याने ते देवाच्या पसंतीस पडले, परंतू जे अभिवचन दिले होते ते त्यांना मिळाले नाही. BSB BSB: These were all commended for their faith, yet they did not receive what was promised.
40 UDB कारण देवाला माहीत होते की जे अभिवचन त्यांना मी दिले आहे ते लगेच परिपूर्ण न करता ते काही काळाने परिपूर्ण करणे हे चांगले होईल. देवाने आमच्यासाठी काहीतरी अधिक चांगली योजना तयार केली होती यासाठी की आमच्याबरोबर त्यांनाही परिपूर्ण करावे. BSB BSB: God had planned something better for us, so that together with us they would be made perfect.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.