1 UDB लाजर नावाचा एक मनुष्य खूप आजारी पडला. बेथानी गावात मरीया आणि मार्था जेथे राहत तेथे तो राहत होता. BSB BSB: At this time a man named Lazarus was sick. He lived in Bethany, the village of Mary and her sister Martha.
2 UDB प्रभूवर तिची प्रीती दर्शविण्यासाठी आणि आदर देण्यासाठी जिने नंतर त्याच्यावर सुवासिक तेल ओतले होते आणि आपल्या केसांनी त्याचे पाय पुसले होते ती हीच मरीया होती. आजारी असलेला हा लाजर तिचा भाऊ होता. BSB BSB: (Mary, whose brother Lazarus was sick, was to anoint the Lord with perfume and wipe His feet with her hair.)
3 UDB म्हणून लाजराबद्दल येशूला सांगण्यासाठी त्या दोघी बहिणींनी कोणीतरी पाठवले; ते म्हणाले, “प्रभूजी, आपण ज्याच्यावर प्रीती करता तो आजारी आहे.” BSB BSB: So the sisters sent word to Jesus, “Lord, the one You love is sick.”
4 UDB येशूने लाजरच्या आजारपणाबद्दल ऐकले, तेव्हा तो म्हणाला, लाजरच्या मृत्यूनंतरही हा आजार संपणार नाही. देव अद्भुत गोष्टी करतो तेव्हा तो किती महान आहे म्हणून लोकांनी पाहावे आणि मी देवाच्या पुत्राने देखील शक्ती दाखवावी असा ह्या आजाराचा उद्देश आहे.” BSB BSB: When Jesus heard this, He said, “This sickness will not end in death. No, it is for the glory of God, so that the Son of God may be glorified through it.”
5 UDB आता मार्था, व तिची बहीण मरीया आणि लाजर यांच्यावर येशू प्रीती करत होता. BSB BSB: Now Jesus loved Martha and her sister and Lazarus.
6 UDB असे असले तरी, लाजर आजारी होता हे येशूने ऐकले तेव्हा, त्याला भेटण्यास जाण्यासाठी त्याने उशीर केला. तो जेथे होता तेथेच आणखी दोन दिवस राहिला. BSB BSB: So on hearing that Lazarus was sick, He stayed where He was for two days,
7 UDB तेव्हा आम्हा शिष्यांस तो म्हणाला, “चला आपण पुन्हा यहूदीया प्रांतात जाऊ या.” BSB BSB: and then He said to the disciples, “Let us go back to Judea.”
8 UDB शिष्य त्याला म्हणाले, “गुरूजी, केवळ थोड्या वेळेपूर्वी जे यहूदी तुझे विरोधक आहेत त्यांनी तुला दगडांनी मारून तुझा खून करण्याचा प्रयत्न करू पाहत होते, आणि आता आपणाला पुन्हा तेथे परत जायचे आहे!” BSB BSB: “Rabbi,” they replied, “the Jews just tried to stone You, and You are going back there?”
9 UDB येशूने त्यांना उत्तर दिले, “एका दिवसामध्ये बारा तास प्रकाश असतो हे तुम्हाला माहिती आहे, हे खरे नाही का? दिवसाच्या वेळी चालत असलेला सुरक्षितपणे चालेल कारण रस्त्यात काय आहे हे तो पाहू शकतो. BSB BSB: Jesus answered, “Are there not twelve hours of daylight? If anyone walks in the daytime, he will not stumble, because he sees by the light of this world.
10 UDB तथापि, रात्रीच्या वेळे दरम्यान एखादा व्यक्ती चालतो तेव्हा तो पाहू शकत नाही म्हणून तो सहज अडखळू शकेल.” BSB BSB: But if anyone walks at night, he will stumble, because he has no light.”
11 UDB येशूने या गोष्टी बोलल्यावर, तो त्यांना म्हणाला, “आपला मित्र लाजर झोपी गेला आहे, परंतु त्याला झोपेतून जागे करण्यासाठी मी तेथे जाईन.” BSB BSB: After He had said this, He told them, “Our friend Lazarus has fallen asleep, but I am going there to wake him up.”
12 UDB त्याचे शिष्य त्याला म्हणाले, “प्रभूजी, तो झोपी गेला आहे, तर तो बरा होईल.” BSB BSB: His disciples replied, “Lord, if he is sleeping, he will get better.”
13 UDB येशू लाजराच्या मृत्यूविषयी खरे बोलत होता, परंतु झोपेतून विश्रांती मिळते हे आम्हाला सर्वांना माहिती आहे त्याबद्दल तो बोलतो आहे असे शिष्यांना वाटले. BSB BSB: They thought that Jesus was talking about actual sleep, but He was speaking about the death of Lazarus.
14 UDB मग त्याने स्पष्टपणे त्यांना सांगितले, “लाजर मरण पावला आहे; BSB BSB: So Jesus told them plainly, “Lazarus is dead,
15 UDB परंतु, तुमच्याकरिता, तुम्ही माझ्यावर भरवसा का ठेवावा हे तुम्हाला पाहता यावे म्हणून तो मेल्यावर मी तेथे नव्हतो म्हणून मी आंनदीत आहे.” BSB BSB: and for your sake I am glad I was not there, so that you may believe. But let us go to him.”
16 UDB मग ज्याला दिदुम म्हणत, तो थोमा आपल्या सोबतीच्या बाकीच्या शिष्यांना म्हणाला, “चला आपण येशूसोबत जाऊ या म्हणजे आम्ही देखील याच्याबरोबर मरावयास जाऊ शकतो.” BSB BSB: Then Thomas called Didymus said to his fellow disciples, “Let us also go, so that we may die with Him.”
17 UDB येशू बेथानीमध्ये आला, तेव्हा लाजर हा आधीच मरण पावला होता आणि त्याला कबरेत ठेऊन चार दिवस झाले आहेत असे त्याला कळले. BSB BSB: When Jesus arrived, He found that Lazarus had already spent four days in the tomb.
18 UDB आता यरूशलेम शहर बेथानी नगरपासून केवळ सुमारे तीन किलोमीटर अंतरावर होते. BSB BSB: Now Bethany was near Jerusalem, a little less than two miles away,
19 UDB लाजर आणि त्याच्या कुंटुबाला अनेक यहूदी ओळखत होते, मार्था आणि मरीया यांच्याकडे ते त्यांच्या भावाच्या मृत्युबद्दल त्यांचे सांत्वन करण्यास यरूशलेमहून आले होते. BSB BSB: and many of the Jews had come to Martha and Mary to console them in the loss of their brother.
20 UDB येशू जवळपास आहे असे कोणीतरी बोलतांना मार्थाने ऐकले, तेव्हा त्याला भेटण्यासाठी ती बाहेर रस्त्यावर गेली. परंतु मरीया उठली नाही तर घरातच बसून राहिली. BSB BSB: So when Martha heard that Jesus was coming, she went out to meet Him, but Mary stayed at home.
21 UDB मार्थाने येशूला पाहिले, तेव्हा ती त्याला म्हणाली, “प्रभूजी, आपण येथे असता, तर माझा भाऊ मरण पावला नसता. BSB BSB: Martha said to Jesus, “Lord, if You had been here, my brother would not have died.
22 UDB तरीही, जे काही आपण देवाकडून मागता, ते देव आपल्याला देईल हे मला माहित आहे.” BSB BSB: But even now I know that God will give You whatever You ask of Him.”
23 UDB येशूने तिला म्हटले, “तुझा भाऊ पुन्हा उठेल.” BSB BSB: “Your brother will rise again,” Jesus told her.
24 UDB मार्था त्याला म्हणाली, “देव शेवटच्या दिवशी सर्व मृत लोकांना उठवेल तेव्हा त्या दिवशी तो देखील पुन्हा जिवंत होईल हे मला माहित आहे.” BSB BSB: Martha replied, “I know that he will rise again in the resurrection at the last day.”
25 UDB येशू तिला म्हणाला, मरणातून जो लोकांना उठवतो तो मीच आहे; जो त्यांना जीवन देतो तो मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवेल तो मेला असला तरीही, तो पुन्हा जिवंत होईल. BSB BSB: Jesus said to her, “I am the resurrection and the life. Whoever believes in Me will live, even though he dies.
26 UDB जे सर्वजण जीवन प्राप्त करतात ते माझ्याशी जुळले जातात आणि जे माझ्यावर विश्वास ठेवतात—ते कधीही मरणार नाहीत. तुझा माझ्यावर विश्वास आहे का?” BSB BSB: And everyone who lives and believes in Me will never die. Do you believe this?”
27 UDB ती त्याला म्हणाली, “होय, प्रभूजी! देवाने जगामध्ये जो एक येईल असे अभिवचन दिले होते तो एक, जो देवाचा पुत्र ख्रिस्त, आपण आहात, आपण काय म्हणता त्यावर माझा विश्वास आहे आणि तुम्ही कोण आहात यावर माझा विश्वास आहे. BSB BSB: “Yes, Lord,” she answered, “I believe that You are the Christ, the Son of God, who was to come into the world.”
28 UDB ती हे बोलल्यानंतर, ती घरी परत निघून गेली आणि तिची बहीण मरीया हिला एकांतात बाजूला घेतले आणि तिला म्हणाली, “गुरूजी येथे आहेत, आणि ते तुला बोलावत आहेत.” BSB BSB: After Martha had said this, she went back and called her sister Mary aside to tell her, “The Teacher is here and is asking for you.”
29 UDB मरीयेने हे ऐकले, तेव्हा ती लवकर उठली आणि त्याच्याकडे बाहेर गेली. BSB BSB: And when Mary heard this, she got up quickly and went to Him.
30 UDB आता अजूनसुद्धा येशू त्या गावाच्या आत आला नव्हता; तो त्याच ठिकाणी होता जेथे त्याला मार्थाची भेट झाली होती. BSB BSB: Now Jesus had not yet entered the village, but was still at the place where Martha had met Him.
31 UDB जे लोक बहिणींना सांत्वन करण्यासाठी घरी आले होते. मरीयेला त्वरीत उठताना आणि बाहेर जातांना त्यांनी पाहिले. म्हणून लाजराला त्यांनी जेथे पुरले होते तेथे आपल्या भावासाठी शोक करण्यासाठी ती कबरेकडे जात आहे असा विचार त्यांनी केला म्हणून तेही तिच्या मागे गेले. BSB BSB: When the Jews who were in the house consoling Mary saw how quickly she got up and went out, they followed her, supposing she was going to the tomb to mourn there.
32 UDB येशू होता त्या ठिकाणी मरीया आल्यावर; तिने त्याला पाहिले तेव्हा, ती त्याच्यासमोर जाऊन त्याच्या पाया पडली आणि म्हणाली, “प्रभूजी, आपण येथे असता, तर माझा भाऊ मरण पावला नसता.” BSB BSB: When Mary came to Jesus and saw Him, she fell at His feet and said, “Lord, if You had been here, my brother would not have died.”
34 UDB तो म्हणाला, तुम्ही त्याचे शरीर कोठे ठेवले आहे?” ते त्याला म्हणाले, “प्रभूजी, या आणि पाहा.” BSB BSB: “Where have you put him?” He asked. “Come and see, Lord,” they answered.
36 UDB यावरून यहूदी लोक म्हणाले, “पाहा, लाजरावर त्याची किती प्रीती होती!” BSB BSB: Then the Jews said, “See how He loved him!”
37 UDB तथापि, इतर काही म्हणाले, आंधळ्या मनुष्याचे डोळे याने उघडले नाहीत काय? मग या मनुष्याला मरण्यापासून याने का वाचवले नाही?” BSB BSB: But some of them asked, “Could not this man who opened the eyes of the blind also have kept Lazarus from dying?”
38 UDB येशू कबरेजवळ गेला तेव्हा तो शारीरिकरित्या खवळला आणि भावनिकरित्या उदास झाला. ती एक गुहा होती, आणि तिचे प्रवेशद्वार एका मोठ्या धोंड्याने झाकलेले होते. BSB BSB: Jesus, once again deeply moved, came to the tomb. It was a cave with a stone laid across the entrance.
39 UDB येशूने त्या ठिकाणी उभे असलेल्या लोकांना आज्ञा दिली, “धोंड बाजूला करा.” तथापि, मार्थाने आक्षेप घेतला, “प्रभूजी, आता या वेळी तेथे एक दुर्गंधी वास येत असेल; कारण त्याला मरून चार दिवस झाले आहेत.” BSB BSB: “Take away the stone,” Jesus said. “Lord, by now he stinks,” said Martha, the sister of the dead man. “It has already been four days.”
40 UDB येशू तिला म्हणाला, “तू माझ्यावर भरवसा ठेवशील तर देव कोण आहे आणि देव काय करू शकतो हे मी तुला सांगितले तेव्हा हे मी तुला सत्य सांगितले नव्हते काय?” BSB BSB: Jesus replied, “Did I not tell you that if you believed, you would see the glory of God?”
41 UDB मग त्यांनी ती धोंड काढून टाकली. येशूने वर स्वर्गाकडे पाहिले आणि म्हणाला, “हे पित्या, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे उपकार मानतो. BSB BSB: So they took away the stone. Then Jesus lifted His eyes upward and said, “Father, I thank You that You have heard Me.
42 UDB तू माझे नेहमी ऐकतोस हे मला माहित आहे. तू मला पाठविले हे खरे आहे आणि त्यांनी तुझ्यावर त्यांचा विश्वास ठेवावा म्हणून येथे जे उभे आहेत त्या लोकांच्या फायद्यासाठी मी हे बोललो आहे.” BSB BSB: I knew that You always hear Me, but I say this for the benefit of the people standing here, so they may believe that You sent Me.”
43 UDB त्याने असे म्हटल्यानंतर, मोठ्या आवाजात त्याने हाक मारली, “लाजरा, बाहेर ये!” BSB BSB: After Jesus had said this, He called out in a loud voice, “Lazarus, come out!”
44 UDB जो मनुष्य मरण पावला होता तो बाहेर आला! त्याचे हात आणि पाय अजूनही तागाच्या कपड्याच्या पट्ट्याने लपेटलेले होते आणि त्याच्या चेहऱ्यावर गुंडाळलेले एक कापड तसेच तेथे होते. येशू त्यांना म्हणाला, “त्याला बांधून ठेवलेल्या त्या कपडाच्या पट्ट्या काढून टाका आणि त्याला सोडा. त्याला जाऊ द्या.” BSB BSB: The man who had been dead came out with his hands and feet bound in strips of linen, and his face wrapped in a cloth. “Unwrap him and let him go,” Jesus told them.
45 UDB परिणामी, अनेक यहूदी जे मरीयेला भेटण्यासाठी आले होते आणि येशूने काय केले हे ज्यांनी पाहीले, त्या सर्वांनी आपला विश्वास त्यावर ठेवला. BSB BSB: Therefore many of the Jews who had come to Mary, and had seen what Jesus did, believed in Him.
46 UDB असे असले तरी, कित्येक इतर काही परूश्यांकडे गेले आणि येशूने जे काय केले ते त्यांना सांगितले. BSB BSB: But some of them went to the Pharisees and told them what Jesus had done.
47 UDB तेव्हा मुख्य याजक आणि परूशी यहूदी धर्मसभेचे सर्व सदस्य एकत्रित जमले. ते एकमेकांशी म्हणाले, “आम्ही काय करणार आहोत? हा मनुष्य अनेक चमत्कार करत आहे. BSB BSB: Then the chief priests and Pharisees convened the Sanhedrin and said, “What are we to do? This man is performing many signs.
48 UDB आम्ही त्याला ते करत राहण्यासाठी परवानगी दिली, तर प्रत्येकजण त्याच्यावर विश्वास ठेवेल आणि रोमविरुद्ध बंड करेल. मग रोमी सैन्य येईल आणि आमचे मंदिर आणि आपले राष्ट्र दोन्ही नष्ट करतील!” BSB BSB: If we let Him go on like this, everyone will believe in Him, and then the Romans will come and take away both our place and our nation.”
49 UDB धर्मसभेवर त्यांच्यापैकी एक असलेला कयफा, हा त्या वर्षाचा मुख्य याजक होता. तो त्यांना म्हणाला, “तुम्हा सर्वांना काहीच माहित नाही! BSB BSB: But one of them, named Caiaphas, who was high priest that year, said to them, “You know nothing at all!
50 UDB संपूर्ण देशाचा नाश होण्यापेक्षा मनुष्यासाठी एक मनुष्य मरतो हे तुमच्यासाठी चांगले आहे हेही तुमच्या लक्षात येत नाही.” BSB BSB: You do not realize that it is better for you that one man die for the people than that the whole nation perish.”
51 UDB आपल्या स्वतःच्या मनाला वाटले म्हणून तो बोलला असे नाही. तर त्याऐवजी, तो त्या वर्षाचा प्रमुख याजक होता, व येशू हा यहूदी राष्ट्रासाठी मरेल ही भविष्यवाणी त्याने केली होती. BSB BSB: Caiaphas did not say this on his own. Instead, as high priest that year, he was prophesying that Jesus would die for the nation,
52 UDB परंतु येशू हा केवळ यहूदी राष्ट्रासाठीच नाही, परंतु देवाचे सर्व मुले जे इतर देशांत सर्वत्र वास्तव्य करतात त्यापासून तो त्यांना एका राष्ट्रात एकत्र आणून एक करावे म्हणून तो मरेल ही देखील भविष्यवाणी त्याने केली होती. BSB BSB: and not only for the nation, but also for the scattered children of God, to gather them together into one.
53 UDB म्हणून त्या दिवसापासून पुढे, धर्मसभा परिषद येशूला कोणत्याही प्रकारे अटक करण्याचा आणि त्याला ठार मारण्याचा मार्ग शोधू लागले. BSB BSB: So from that day on they plotted to kill Him.
54 UDB यामुळे, येशू यापुढे आपल्या यहूदी विरोधकांमध्ये सार्वजनिकरित्या प्रवास करत नव्हता. त्याऐवजी, त्याने यरूशलेम सोडले आणि शिष्यांसोबत, रानाजवळच्या आणि वाळवंटी प्रदेशातील प्रांतांत एफ्राईम नावाच्या नगरास गेला. तेथे तो थोडा काळ त्याच्या शिष्यांबरोबर राहिला. BSB BSB: As a result, Jesus no longer went about publicly among the Jews, but He withdrew to a town called Ephraim in an area near the wilderness. And He stayed there with the disciples.
55 UDB आता यहूद्यांचा वल्हांडण सण साजरा करण्याची वेळ अगदी जवळ आली होती, आणि देश आणि गावातून अनेक उपासक वर यरूशलेमला गेले. वल्हांडण सण साजरा करण्याची परवानगी त्यांना दिली जावी म्हणून यहूद्यांच्या नियमांनुसार स्वतःला शुद्ध करावे लागत, म्हणून ते तयारी करताना स्वतःला धुत असत. BSB BSB: Now the Jewish Passover was near, and many people went up from the country to Jerusalem to purify themselves before the Passover.
56 UDB वल्हांडण सणासाठी यरूशलेम येथे आलेले सर्व उपासक येशूला शोधत होते. ते मंदिरात गेले आणि उभे राहिले तेव्हा, ते एकमेकांना म्हणाले, “तुम्हाला काय वाटते? वल्हांडणासाठी तो येणार आहे किंवा नाही?” BSB BSB: They kept looking for Jesus and asking one another as they stood in the temple courts, “What do you think? Will He come to the feast at all?”
57 UDB येशूला अटक करता यावे म्हणून यहूदी मुख्य याजक आणि परूश्यांनी तो कोठे आहे हे कोणालाही समजले, तर त्याने ते त्यांना कळवावे हे आदेश काढले होते. BSB BSB: But the chief priests and Pharisees had given orders that anyone who knew where He was must report it, so that they could arrest Him.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.