1 UDB येशूला परूश्यांविषयी अहवाल मिळाला. येशू बाप्तिस्मा करणाऱ्या योहानापेक्षा जास्त लोकांचा बाप्तिस्मा करीत आहे, आणि योहानापेक्षा जास्त अनुयायी त्याला मिळत आहेत हे त्यांना आढळले. BSB BSB: When Jesus realized that the Pharisees were aware He was gaining and baptizing more disciples than John
2 UDB परंतु बाप्तिस्मा करण्याचे काम येशू स्वतःवैयक्तीकरित्या करत नव्हता; त्याचे शिष्य ते करत होते. BSB BSB: (although it was not Jesus who baptized, but His disciples),
3 UDB मग येशू आणि त्याच्या शिष्यांनी यहूदा प्रांत सोडला आणि पुन्हा एकदा गालीलात परतले. BSB BSB: He left Judea and returned to Galilee.
4 UDB आता त्यांना शमरोनाच्या प्रांतातून जायचे होते. BSB BSB: Now He had to pass through Samaria.
5 UDB मग ते शमरोन प्रांतातील सूखार नावाच्या गावात आले. सूखार हे याकोबाने फार काळापूर्वी आपला मुलगा योसेफ याला दिलेल्या शेताजवळ होते. BSB BSB: So He came to a town of Samaria called Sychar, near the plot of ground that Jacob had given to his son Joseph.
6 UDB याकोबाची विहीर सूखार गावाच्या अगदी बाहेरच होती. येशू त्याच्या दूरच्या प्रवासामुळे खूप थकला होता म्हणून तो आराम करण्यासाठी त्या विहीरीच्या जवळ खाली बसला. ती दुपारची वेळ होती. BSB BSB: Since Jacob’s well was there, Jesus, weary from His journey, sat down by the well. It was about the sixth hour.
7 UDB शमरोनामधून एक स्त्री थोडे पाणी काढण्यासाठी विहीरीकडे आली. येशू तिला म्हणाला, “मला प्यायला पाणी दे.” BSB BSB: When a Samaritan woman came to draw water, Jesus said to her, “Give Me a drink.”
8 UDB आता त्याचे शिष्य त्याच्या जवळ नव्हते, कारण ते जेवण विकत घेण्यासाठी गावात गेले होते. BSB BSB: (His disciples had gone into the town to buy food.)
9 UDB ती स्त्री त्याला म्हणाली, “तुम्ही, एक यहूदी असून, एका शमरोनी स्त्रीला, पिण्यासाठी पाणी मागत आहात, ह्याचे मला आश्चर्य वाटत आहे.” BSB BSB: “You are a Jew,” said the woman. “How can You ask for a drink from me, a Samaritan woman?” (For Jews do not associate with Samaritans.)
10 UDB येशूने तिला उत्तर दिले, “देव जे दान तुला देऊ इच्छितो हे जर तू ओळखले असते आणि प्यायला दे असे मागणारा कोण आहे, हे तुला समजले असते, तर तू माझ्याकडे मागितले असते आणि मी तुला जीवनाचे पाणी दिले असते.” BSB BSB: Jesus answered, “If you knew the gift of God and who is asking you for a drink, you would have asked Him, and He would have given you living water.”
11 UDB “साहेब, ही विहीर खोल आहे, आणि विहीरीतून पाणी काढण्यासाठी बादली किंवा एक दोरी तुमच्याकडे नाही. तुम्हाला ते जीवनाचे पाणी कोठे मिळेल? BSB BSB: “Sir,” the woman replied, “You have nothing to draw with and the well is deep. Where then will You get this living water?
12 UDB तुम्ही आमचा पिता याकोब ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ असू शकत नाही. त्यानेच ही विहीर खणली आणि तो स्वतः त्यातून प्यायचा, जसे त्याच्या मुलांनी आणि गुरांनी केले, तीच विहीर आज आम्ही देखील वापरत आहोत.” BSB BSB: Are You greater than our father Jacob, who gave us this well and drank from it himself, as did his sons and his livestock?”
13 UDB येशूने तिला उत्तर दिले, “ह्या विहीरीतून पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला पुन्हा तहान लागेल, BSB BSB: Jesus said to her, “Everyone who drinks this water will be thirsty again.
14 UDB परंतु मी दिलेले पाणी जो कोणी पिईल तो पुन्हा तहानेला होणार नाही. मी जे पाणी देईन ते त्यांच्यामध्ये उपळत्या पाण्याचा झरा असे होईल आणि त्यांना सार्वकालीक जीवन असे होईल.” BSB BSB: But whoever drinks the water I give him will never thirst. Indeed, the water I give him will become in him a fount of water springing up to eternal life.”
15 UDB ती स्त्री त्याला म्हणाली, “साहेब, मला कधीही तहान लागू नये व पाणी काढायला मला येथवर येणे भाग पडू नये म्हणून ते पाणी मला द्या.” BSB BSB: The woman said to Him, “Sir, give me this water so that I will not get thirsty and have to keep coming here to draw water.”
16 UDB तो काय बोलत होता हे तिला समजले नाही, म्हणून येशू तिला म्हणाला, “बाई, जा आणि तुझ्या पतीला बोलव आणि त्याला येथे घेऊन ये.” BSB BSB: Jesus told her, “Go, call your husband and come back.”
17 UDB ती स्त्री त्याला म्हणाली, “मला पती नाही.” येशूने तिला म्हटले, “तुला पती नाही हे तू खरे बोललीस, BSB BSB: “I have no husband,” the woman replied. Jesus said to her, “You are correct to say that you have no husband.
18 UDB कारण तुला एक पती नव्हता, मात्र पाच होते, आणि आता ज्या पुरुषासोबत तू राहत आहेस तो ही तुझा पती नाही. पती नाही ह्या विषयी तू जे काही बोललीस ते खरे आहे.” BSB BSB: In fact, you have had five husbands, and the man you now have is not your husband. You have spoken truthfully.”
19 UDB ती स्त्री त्याला म्हणाली, “साहेब, तुम्ही संदेष्टे आहात असे मला दिसत आहे. BSB BSB: “Sir,” the woman said, “I see that You are a prophet.
21 UDB येशू तिला म्हणाला, “बाई, लोक पित्याची उपासना, ह्या डोंगरावर किंवा यरूशलेमेतही करणार नाहीत अशी वेळ येत आहे, ह्या माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव. BSB BSB: “Believe Me, woman,” Jesus replied, “a time is coming when you will worship the Father neither on this mountain nor in Jerusalem.
23 UDB जे कोणी खरोखर देवाची उपासना करतात ते पित्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करतील, अशी वेळ येत आहे आणि आता आलीच आहे. अशाच प्रकारे पित्याची उपासना केली जावी म्हणून तो अशाच लोकांच्या शोधात आहे. BSB BSB: But a time is coming and has now come when the true worshipers will worship the Father in spirit and in truth, for the Father is seeking such as these to worship Him.
24 UDB देव आत्मा आहे; आणि जे कोणी त्याची उपासना करतात त्यांनी त्याची उपासना आत्म्याने केली पाहिजे, आणि सत्याने त्यांना उपासनेत घेऊन जायला पाहिजे.” BSB BSB: God is Spirit, and His worshipers must worship Him in spirit and in truth.”
25 UDB ती स्त्री त्याला म्हणाली, “मसीहा, जो ख्रिस्त येणार आहे, हे मला ठाऊक आहे. तो येईल तेव्हा, जे काही आम्ही ऐकायला हवे ते सर्व तो आम्हाला सांगेल.” BSB BSB: The woman said, “I know that Messiah” (called Christ) “is coming. When He comes, He will explain everything to us.”
26 UDB येशू तिला म्हणाला, “आता, जो मी तुझ्याशी बोलत आहे, मी तोच आहे!” BSB BSB: Jesus answered, “I who speak to you am He.”
27 UDB त्यानंतर लगेच, त्याचे शिष्य गावातून परत आले. येशूच्या परिवाराची सभासद नसलेल्या एका स्त्री सोबत बोलत होता हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. (ते यहूदी रुढींच्या विरूद्ध होते.) असे असून देखील, “तुम्ही स्वतः ह्या स्त्री सोबत बोलून काय करत होता?” किंवा “तुम्ही तिच्याशी का बोलत आहात?” असे त्याला विचारण्याचे कोणाला धैर्य नव्हते. BSB BSB: Just then His disciples returned and were surprised that He was speaking with a woman. But no one asked Him, “What do You want from her?” or “Why are You talking with her?”
28 UDB मग त्या स्त्रीने आपली घागर तेथेच ठेवली आणि परत गावात गेली. ती गावातील लोकांना म्हणाली, BSB BSB: Then the woman left her water jar, went back into the town, and said to the people,
29 UDB “मी आता पर्यंत जे काही केले ते, ज्या मनुष्याने मला सांगितले त्याला येऊन पाहा! तो ख्रिस्त असू शकत नाही, किंवा असू शकतो का? BSB BSB: “Come, see a man who told me everything I ever did. Could this be the Christ?”
30 UDB पुष्कळ लोकांनी शहराबाहेर, जेथे येशू होता तेथे जाण्यास सुरवात केली. BSB BSB: So they left the town and made their way toward Jesus.
31 UDB आत्ताच जेवण घेऊन आलेल्या, त्याच्या शिष्यांनी त्याला विनंती केली, “गुरूजी, काहीतरी खाऊन घ्या.” BSB BSB: Meanwhile the disciples urged Him, “Rabbi, eat something.”
32 UDB येशू त्यांना म्हणाला, “माझ्याकडे खाण्यासाठी अन्न आहे, ज्या विषयी तुम्हाला माहित नाही!” BSB BSB: But He told them, “I have food to eat that you know nothing about.”
33 UDB म्हणून ते एकमेकांना म्हणून लागले, “कोणीतरी त्याला खाण्यासाठी काहीतरी आणिले असेल, नाही का?” BSB BSB: So the disciples asked one another, “Could someone have brought Him food?”
34 UDB येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हाला सांगतो: माझ्या पित्याने त्याच्या इच्छेप्रमाणे जे काही करण्यासाठी मला पाठवले आहे ते कार्य पूर्ण करावे, ह्या करीता मी खूप भुकेला आहे. BSB BSB: Jesus explained, “My food is to do the will of Him who sent Me and to finish His work.
35 UDB वर्षाच्या ह्या समयी तुम्ही सामान्यपणे असे म्हणता, ‘अजून चार महिने शिल्लक आहे, आणि मग आपण पिकांची कापणी करू.’ अजून तुमच्या आजुबाजूला बघा! आत्ताच पिक कापणीसाठी तयार आहे. देवाने त्यांच्यावर राज्य करावे असे गैर यहूद्यांना वाटते; ते कापणीसाठी तयार असलेल्या पिकाप्रमाणे आहेत. BSB BSB: Do you not say, ‘There are still four months until the harvest’? I tell you, lift up your eyes and look at the fields, for they are ripe for harvest.
36 UDB जो कोणी ह्यावर विश्वास ठेवतो आणि अशा प्रकारच्या कापणीमध्ये काम करण्यासाठी तयार आहे, त्याला अगोदरच त्याचे वेतन, आणि सार्वकालीक जीवनासाठी पुरेसे फळ प्राप्त झाले आहे. जो कोणी बीं पेरतो आणि जो कोणी कापणी करतो ते एकत्र आनंद करतील. BSB BSB: Already the reaper draws his wages and gathers a crop for eternal life, so that the sower and the reaper may rejoice together.
37 UDB एक व्यक्ती बीं पेरतो, आणि दुसरा व्यक्ती पिकांची कापणी करतो, हे विधान सत्य आहे. BSB BSB: For in this case the saying ‘One sows and another reaps’ is true.
38 UDB ज्या पिकांची तुम्ही लागवड केली नाही त्यांची कापणी करून गोळा करण्यासाठी मी तुम्हाला पाठविले. इतरांनी पुष्कळ कठीण श्रम केले आहेत, परंतु आता तुम्ही त्यांच्या कामाचे सहभागी होणार आहात.” BSB BSB: I sent you to reap what you have not worked for; others have done the hard work, and now you have taken up their labor.”
39 UDB येशूविषयी त्या स्त्रीकडून त्यांनी जे काही ऐकले होते त्यामुळे सुखार गावात राहणाऱ्या पुष्कळ शमरोनी लोकांनी त्याच्यावर त्यांचा भरवसा टाकला. ती म्हणाली होती, “मी आतापर्यंत केलेले सर्वकाही त्याने मला सांगितले.” BSB BSB: Many of the Samaritans from that town believed in Jesus because of the woman’s testimony, “He told me everything I ever did.”
40 UDB शमरोनी येशूकडे आले असता, त्यांच्या सोबत अधिक जास्त वेळ राहण्यासाठी त्यांनी त्याला विनंती केली. म्हणून तो अजून दोन दिवस तेथे राहिला. BSB BSB: So when the Samaritans came to Him, they asked Him to stay with them, and He stayed two days.
41 UDB येशूने त्यांना जी काही घोषणा केली त्यामुळे त्यांच्यापैकी पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. BSB BSB: And many more believed because of His message.
42 UDB ते त्या स्त्रीला म्हणाले, “आता आम्ही येशूवर विश्वास ठेवत आहोत, कारण तू आम्हाला त्याच्याविषयी सांगितले त्यावरूनच केवळ नाही तर आमच्यासाठी त्याचा संदेश देखील आम्ही ऐकला आहे. हा पुरुष खरोखर जगाचा तारणारा आहे हे आता आम्हाला कळले आहे. BSB BSB: They said to the woman, “We now believe not only because of your words; we have heard for ourselves, and we know that this man truly is the Savior of the world.”
43 UDB शमरोनातील त्या दोन दिवसानंतर, येशू आणि त्याच्या शिष्यांनी ते सोडले आणि गालील प्रांतात निघून गेले. BSB BSB: After two days, Jesus left for Galilee.
44 UDB (एका संदेष्ट्याला पुष्कळ ठिकाणात सन्मान प्राप्त होतो, मात्र ज्या ठिकाणात तो वाढला तेथे प्राप्त होत नाही, हे येशू स्वतः जाणून होता.) BSB BSB: Now He Himself had testified that a prophet has no honor in his own hometown.
45 UDB तथापि, तो गालीलात आला असता तेथील पुष्कळ लोकांनी त्याचे स्वागत केले. तो कोण आहे हे त्यांना कळून चूकले होते, कारण यरूशलेममध्ये नुकत्याच झालेल्या वल्हांडण सणाच्या साजरीकरणाच्या काळात त्याने केलेल्या सर्व गोष्टी त्यांनी पाहिल्या होत्या. BSB BSB: Yet when He arrived, the Galileans welcomed Him. They had seen all the great things He had done in Jerusalem at the feast, for they had gone there as well.
46 UDB येशू पुन्हा गालीलातील काना येथे गेला. (जेथे त्याने पाण्याचा द्राक्षारस केला होता.) तेथे एक राजाचा अधिकारी कफर्णहूमात राहत होता ते केवळ सत्तावीस किलोमीटर दूर होते, आणि त्याचा मुलगा फार आजारी होता. BSB BSB: So once again He came to Cana in Galilee, where He had turned the water into wine. And there was a royal official whose son lay sick at Capernaum.
47 UDB येशू यहूदाहून गालीलात परत आला आहे हे त्या मनुष्याने ऐकले तेव्हा, तो येशूकडे काना येथे गेला आणि त्याला विनंती करू लागला, “खाली कफर्णहूमाकडे या आणि माझ्या मुलाला बरे करा” तो मरणार आहे!” BSB BSB: When he heard that Jesus had come from Judea to Galilee, he went and begged Him to come down and heal his son, who was about to die.
48 UDB येशू त्याला म्हणाला, “मी कोण आहे असे ज्या गोष्टी प्रमाणीत करतात त्या मी केल्यावर आणि जो पर्यंत तुम्ही मला तसे करताना पाहणार नाही तो पर्यंत तुम्ही माझ्यावर भरवसा ठेवणार नाही!” BSB BSB: Jesus said to him, “Unless you people see signs and wonders, you will never believe.”
49 UDB तरीही तो अधिकारी त्याला म्हणाला, “साहेब, कृपया माझा मुलगा मरण पावण्यापूर्वी खाली माझ्या घरी या!” BSB BSB: “Sir,” the official said, “come down before my child dies.”
50 UDB येशू त्याला म्हणाला, “जा. तुझा मुलगा जगेल.” येशू जे काही बोलला त्यावर त्या मनुष्याने भरवसा ठेवला आणि तो आपल्या घराच्या मार्गाने जाण्यास निघाला. BSB BSB: “Go,” said Jesus. “Your son will live.” The man took Jesus at His word and departed.
51 UDB जसे तो आपल्या घराच्या दिशेने खाली प्रवास करत असता. वाटेतच त्याचे नोकर त्याला भेटले. त्यांनी त्याला सांगितले, “आपला मुलगा जिवंत आहे.” BSB BSB: And while he was still on the way, his servants met him with the news that his boy was alive.
52 UDB “माझ्या मुलामध्ये कोणत्या क्षणी सुधारणा होण्यास सुरवात झाली?” असे त्याने त्यांना विचारले. ते त्याला म्हणाले, “काल दुपारी सुमारे एक वाजता त्याचा ताप नाहीसा झाला.” BSB BSB: So he inquired as to the hour when his son had recovered, and they told him, “The fever left him yesterday at the seventh hour.”
53 UDB “तुझा मुलगा जगेल” हे येशूने त्याला सांगितलेली हिच ती वेळ होती हे नंतर त्या मुलाच्या पित्याच्या लक्षात आले. म्हणून जे कोणी त्याच्या घरात राहत होते त्या प्रत्येकासह, त्याने येशूवर भरवसा टाकला. BSB BSB: Then the father realized that this was the very hour in which Jesus had told him, “Your son will live.” And he and all his household believed.
54 UDB तो कोण आहे हे लोकांना प्रमाणीत करण्यासाठी त्याने दुसऱ्यांदा काहीतरी केले होते. यहूदाकडून प्रवासात असतांना, गालील प्रांतात आल्यावर त्याने ते केले. BSB BSB: This was now the second sign that Jesus performed after coming from Judea into Galilee.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.