1 UDB यहूद्यांच्या दुसऱ्या एका सणाची वेळ आली, आणि त्यासाठी येशू वर यरूशलेमेस गेला. BSB BSB: Some time later there was a feast of the Jews, and Jesus went up to Jerusalem.
3 UDB ज्यांना चालता येत नव्हते, जे आंधळे आणि आजारी होते असे लोक मोठ्या संख्येने तेथे होते. अनेक लोक ज्यांना चालता येत नसे ते अंगणात झोपलेले होते. BSB BSB: On these walkways lay a great number of the sick, the blind, the lame, and the paralyzed.
5 UDB एक मनुष्य ज्याला चालता येत नाही, तो अडतीस वर्षांपासून तेथे होता. BSB BSB: One man there had been an invalid for thirty-eight years.
6 UDB येशूने त्याला तेथे पडलेले पाहीले आणि त्याला तसे पडून आता पुष्कळ काळ लोटला आहे असे ओळखले. तो त्या मनुष्याला म्हणाला, “तुला स्वस्थ आणि बलवान होण्याची इच्छा आहे काय?” BSB BSB: When Jesus saw him lying there and realized that he had spent a long time in this condition, He asked him, “Do you want to get well?”
7 UDB त्या मनुष्याने त्याला उत्तर दिले, “साहेब, पाणी हालवील्यावर तळ्यात उतरण्यासाठी मला मदत करणारा असा कोणी एक माझ्याकडे येथे नाही. मी तळ्यात उतरण्याचा प्रयत्न करत असता, नेहमीच कोणीतरी एक माझ्या अगोदर त्यामध्ये उतरतो.” BSB BSB: “Sir,” the invalid replied, “I have no one to help me into the pool when the water is stirred. While I am on my way, someone else goes in before me.”
8 UDB येशू त्याला म्हणाला, “ऊठ! आपला बिछाना उचल आणि चालू लाग!” BSB BSB: Then Jesus told him, “Get up, pick up your mat, and walk.”
9 UDB लगेचच तो मनुष्य बरा झाला, आणि त्याने आपला बिछाना उचलला आणि चालू लागला. आता तो दिवस विश्रामाचा, शब्बाथ दिवस होता. BSB BSB: Immediately the man was made well, and he picked up his mat and began to walk. Now this happened on the Sabbath day,
10 UDB म्हणून जो मनुष्य बरा झाला होता त्याला यहूदी पुढारी म्हणाले, “आज तर शब्बाथ आहे, आणि ह्या विश्रामाच्या दिवशी तू आपली चटई उचलून चालावे हे आपल्या नियमाच्या विरूद्ध आहे, हे तुला माहित आहे.” BSB BSB: so the Jews said to the man who had been healed, “This is the Sabbath! It is unlawful for you to carry your mat.”
11 UDB जो मनुष्य बरा झाला होता तो त्यांना म्हणाला, “परंतू ज्याने मला बरे केले त्याने मला सांगितले, आपला बिछाना उचल आणि चालू लाग!’” BSB BSB: But he answered, “The man who made me well told me, ‘Pick up your mat and walk.’”
12 UDB त्यांनी त्याला विचारले, “तो मनुष्य कोण होता?” BSB BSB: “Who is this man who told you to pick it up and walk?” they asked.
13 UDB आता येशूने त्या मनुष्याला बरे केले असले तरीसुद्धा, त्या मनुष्याला त्याचे नाव माहित नव्हते. येशूने त्या मनुष्याला बरे केल्यानंतर, त्याला सोडले आणि गर्दीमध्ये परतला. BSB BSB: But the man who was healed did not know who it was, for Jesus had slipped away while the crowd was there.
14 UDB नंतर, तो मनुष्य येशूला मंदिरात आढळला आणि तो त्याला म्हणाला, “पाहा, तू बरा झाला आहेस. तुझ्यासोबत ह्यापेक्षा काही वाईट घडू नये म्हणून, येथून पूढे पाप करू नको.” BSB BSB: Afterward, Jesus found the man at the temple and said to him, “See, you have been made well. Stop sinning, or something worse may happen to you.”
15 UDB तो मनुष्य गेला आणि यहूदी पुढाऱ्यांना सांगितले, त्याला ज्या मनुष्याने बरे केले होते तो येशूच होता. BSB BSB: And the man went away and told the Jews that it was Jesus who had made him well.
16 UDB येशू आश्चर्यकारक गोष्टी करत आणि त्याचे सामर्थ्य दाखवत आणि म्हणून शब्बाथ दिवशी देखील ती कार्ये करत होता म्हणून यहूद्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न चालू केला. BSB BSB: Now because Jesus was doing these things on the Sabbath, the Jews began to persecute Him.
17 UDB येशूने त्यांना हे उत्तर दिले, “माझा पिता आत्ता सुध्दा काम करत आहे, आणि मी देखील काम करत आहे.” BSB BSB: But Jesus answered them, “To this very day My Father is at His work, and I too am working.”
19 UDB येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हाला सत्य सांगत आहे: मी, जो मनुष्याचा पुत्र, माझ्या स्वतःच्या अधिकाराने काहीच करू शकत नाही. पित्याला जे काही करताना मी पाहतो तेच मी करू शकतो. पिता जे काही करतो, ते मी, पुत्र देखील, तेच करतो. BSB BSB: So Jesus replied, “Truly, truly, I tell you, the Son can do nothing by Himself, unless He sees the Father doing it. For whatever the Father does, the Son also does.
20 UDB पिता माझ्यावर, म्हणजे पुत्रावर प्रीती करतो, आणि तो जे काही करतो ते मला दाखवतो. मी जे काही करतो ते तुम्हाला पाहता यावे आणि तुम्हाला आश्चर्य वाटावे म्हणून, ह्यापेक्षाही मोठ-मोठी कार्ये पिता मला दाखवील. BSB BSB: The Father loves the Son and shows Him all He does. And to your amazement, He will show Him even greater works than these.
21 UDB पिता, जे मरण पावले आहेत त्यांना जसा उठवतो आणि त्यांना पुन्हा जीवन देतो, तसेच मी, पुत्र देखील, माझी इच्छा असेल त्या कोणालाही जीवन देतो. BSB BSB: For just as the Father raises the dead and gives them life, so also the Son gives life to whom He wishes.
22 UDB पिता कोणाचा न्याय करत नाही, परंतु संपूर्ण न्यायनिवाडा करणे माझ्याकडे सोपवून दिले आहे, BSB BSB: Furthermore, the Father judges no one, but has assigned all judgment to the Son,
23 UDB यासाठी की सर्व लोक जसा पित्याचा सन्मान करतात तशाचप्रकारे त्यांनी माझा, म्हणजे पुत्राचा, सन्मान करावा. जो कोणी माझा सन्मान करत नाही तो पित्याचा सन्मान करत नाही. BSB BSB: so that all may honor the Son just as they honor the Father. Whoever does not honor the Son does not honor the Father who sent Him.
24 UDB मी तुम्हाला सत्य सांगत आहे: जो कोणी माझा संदेश ऐकतो आणि मला देवाने पाठवले आहे असा भरवसा ठेवतो त्याला सार्वकालीक जीवन लाभले आहे. तो देवाच्या न्यायाखाली येत नाही, परंतु तो मरणातून जीवनाकडे निघून गेला आहे. BSB BSB: Truly, truly, I tell you, whoever hears My word and believes Him who sent Me has eternal life and will not come under judgment. Indeed, he has crossed over from death to life.
25 UDB मी तुम्हाला सत्य सांगत आहे: अशी एक वेळ येत आहे. तेंव्हा जे कोणी मरण पावले आहेत, ते माझी वाणी ऐकतील, आणि मी जो देवाचा पुत्र, ते माझे जे ऐकतील ते जगतील. BSB BSB: Truly, truly, I tell you, the hour is coming and has now come when the dead will hear the voice of the Son of God, and those who hear will live.
26 UDB कारण पिता जसे लोकांना जिवंत करण्यास सक्षम आहे, त्याच प्रकारे त्यांना जिवंत करण्यासाठी त्याने मला, म्हणजे पुत्राला, सामर्थ्य दिले आहे. BSB BSB: For as the Father has life in Himself, so also He has granted the Son to have life in Himself.
27 UDB मी मनुष्याचा पुत्र आहे, म्हणूनच पित्याला जे काही माहित आहे ते करण्याचा अधिकार त्याने मला दिला आहे. BSB BSB: And He has given Him authority to execute judgment, because He is the Son of Man.
29 UDB आणि ते त्यांच्या कबरांमधून बाहेर येतील. देव ज्यांनी उत्तम केले आहे त्यांना सार्वकालीक जीवनासाठी उठवील. परंतु ज्यांनी वाईट ते केले आहे—त्यांना देव उठवेल, परंतु केवळ त्यांना दोषी ठरवण्यासाठी आणि त्यांना सर्वकाळची शिक्षा देण्यासाठी. BSB BSB: and come out—those who have done good to the resurrection of life, and those who have done evil to the resurrection of judgment.
30 UDB मला स्वतःहून काही करता येत नाही. पित्याकडून मी जे काही ऐकतो, मी तसाच न्यायनिवाडा करतो, आणि मी योग्य रीतीने न्यायनिवाडा करतो. ज्याने मला येथे पाठवले, त्या पित्याला पाहिजे तसेच मी करतो, मी माझी इच्छा आहे तसे करण्याचा प्रयत्न करत नाही, मी न्यायीपणाने न्यायनिवाडा करतो. BSB BSB: I can do nothing by Myself; I judge only as I hear. And My judgment is just, because I do not seek My own will, but the will of Him who sent Me.
31 UDB जर माझ्या स्वतःविषयी साक्ष देणारा मी एकटाच असलो तर, माझी साक्ष विश्वसनीय आहे किंवा खरी आहे ह्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. BSB BSB: If I testify about Myself, My testimony is not valid.
32 UDB तरीसुद्धा, माझ्याविषयी साक्ष देणारा असा कोणीतरी एक तेथे आहे, आणि माझ्याविषयी त्याची साक्ष खरी आहे हे मला ठाऊक आहे. BSB BSB: There is another who testifies about Me, and I know that His testimony about Me is valid.
33 UDB बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाकडे तुम्ही संदेशवाहक पाठवले, आणि त्याने माझ्याविषयी तुम्हाला सत्य सांगितले. BSB BSB: You have sent to John, and he has testified to the truth.
34 UDB खरे पाहता माझ्याविषयी त्याने किंवा कोणीतरी साक्षीदार व्हावे ह्याची मला गरज नाही, देव तुम्हाला वाचवू शकतो म्हणून ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. BSB BSB: Even though I do not accept human testimony, I say these things so that you may be saved.
35 UDB बाप्तिस्मा करणारा योहान हा एक जळणारा आणि चमकणारा दिवा होता, आणि तुम्ही त्याच्या प्रकाशात थोड्या काळासाठी आनंदीत होता. BSB BSB: John was a lamp that burned and gave light, and you were willing for a season to bask in his light.
36 UDB तथापि, योहानाने माझ्याविषयी दिलेली साक्ष ह्या पेक्षा मी माझ्या विषयी दिलेली साक्ष कितीतरी महान आहे. त्या सर्व गोष्टी ज्या करण्यासाठी पित्याने मला परवानगी दिली आहे—मी त्या गोष्टी प्रत्येक दिवशी करत असतो, आणि तुम्ही मला त्या करताना पाहता—मी कोण आहे असे त्या गोष्टी पुरे-पूर सांगतात; त्या माझा येथे येण्याचा उद्देश स्पष्ट करतात. पित्याने मला पाठवले आहे त्याचा ते पुरावा आहेत. BSB BSB: But I have testimony more substantial than that of John. For the works that the Father has given Me to accomplish—the very works I am doing—testify about Me that the Father has sent Me.
37 UDB माझा पिता, ज्याने मला पाठवले आहे, त्यानेच माझ्या विषयी साक्ष दिली आहे. तुम्ही त्याला कधीच दैहिकरित्या पाहिलेले नाही, आणि तुम्ही कधीच त्याची वाणी ऐकली नाही. BSB BSB: And the Father who sent Me has Himself testified about Me. You have never heard His voice nor seen His form,
38 UDB त्याचा शब्द तुम्हामध्ये नाही ह्याचा पुरावा म्हणजे, ज्या एकाला त्याने पाठवले, त्या माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवत नाही. BSB BSB: nor does His word abide in you, because you do not believe the One He sent.
39 UDB शास्त्रलेखांचा तुम्ही काळजी पूर्वक अभ्यास करता कारण त्यांचा अभ्यास केल्याने तुम्हाला सार्वकालीक जीवन मिळेल असे तुम्हाला वाटते, आणि तेच शास्त्रलेख माझ्या विषयी सांगतात. BSB BSB: You pore over the Scriptures because you presume that by them you possess eternal life. These are the very words that testify about Me,
40 UDB तरी पण अजूनही माझ्याकडे येऊन माझ्यापासून सार्वकालीक जीवन स्वीकार करण्यास तुम्ही नकार देतो. BSB BSB: yet you refuse to come to Me to have life.
41 UDB जरी लोक माझे अभिनंदन करतात, माझी प्रशंसा करतात, मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. BSB BSB: I do not accept glory from men,
42 UDB तुम्ही देवावर प्रीती करत नाही, असे मला तुम्हाविषयी माहित आहे. BSB BSB: but I know you, that you do not have the love of God within you.
43 UDB मी माझ्या पित्याच्या अधिकाराने आलो आहे, परंतु अजुनही तुम्ही माझ्यावर भरवसा ठेवला नाही किंवा माझे स्वागतही केले नाही. जर कोणी तरी त्याच्या स्वतःच्या अधिकाराने येतो, तुम्ही त्याचे ऐकाल. BSB BSB: I have come in My Father’s name, and you have not received Me; but if someone else comes in his own name, you will receive him.
44 UDB तुम्हापैकी इतरांनी तुमचा सन्मान करावा म्हणून तुम्ही फार कठीण परिश्रम करता तेव्हा तुम्ही माझ्यावर कसा विश्वास ठेवू शकाल? तरीसुद्धा, तुम्ही एकच आणि एकमात्र देवाकडून मिळणारा खरा सन्मान शोधण्यास तुम्ही नकार दिला आहे. BSB BSB: How can you believe if you accept glory from one another, yet do not seek the glory that comes from the only God?
45 UDB माझ्या पित्यासमोर तुम्हाला दोषी ठरवणारा तो एक मीच आहे असा विचार करू नका. मोशे तुमचा बचाव करेल असे तुम्हाला वाटले, त्याच्यावर तुम्ही आपल्या आशा ठेवल्या. तथापि, तुम्हाला दोष देणारा मोशेच असेल. BSB BSB: Do not think that I will accuse you before the Father. Your accuser is Moses, in whom you have put your hope.
47 UDB मोशेने जे काही लिहिले त्यावर देखील तुम्ही विश्वास ठेवला नाही, तर मी जे काही सांगितले त्यावर तुम्ही विश्वास ठेवाल हे कसे शक्य होईल!” BSB BSB: But since you do not believe what he wrote, how will you believe what I say?”
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.