1 UDB येशू त्याच्या शिष्यांसोबत जैतूनाच्या डोंगराकडे गेला, त्या रात्री ते तेथेच राहिले. BSB BSB: But Jesus went to the Mount of Olives.
2 UDB दुसऱ्या दिवशी सकाळी, ते मंदिराच्या अंगणात परत आले. येशूच्या अवती भोवती पुष्कळ लोक एकत्र आले, आणि त्यांना शिकवण्यासाठी तो खाली बसला. BSB BSB: Early in the morning He went back into the temple courts. All the people came to Him, and He sat down to teach them.
3 UDB मग यहूदी नियमशास्त्र शिकवणारे मनुष्य आणि काही जे परूशी होते त्यांनी एका स्त्रिला त्याच्याकडे आणिले. ती व्यभिचार करत असतांना पकडण्यात आली होती—ती एका पुरुषाबरोबर झोपलेली होती जो तिचा पती नव्हता. तिला प्रश्न विचारता यावे म्हणून त्यांनी तिला ह्या समुहा (गट) समोर उभे केले. BSB BSB: The scribes and Pharisees, however, brought to Him a woman caught in adultery. They made her stand before them
4 UDB ते येशूला म्हणाले, “गुरूजी, कोणीतरी असा एक पुरुष जो ह्या स्त्रिचा पती नसून, त्याच्यासोबत व्यभिचार करत असतांना हिला पकडण्यात आले. BSB BSB: and said, “Teacher, this woman was caught in the act of adultery.
5 UDB आता अशा स्त्रीला दगडांनी मारून टाकावे अशी मोशेने आम्हाला नियमशास्त्रात आज्ञा दिली आहे. तरी सुध्दा, आम्ही काय करावे असे तुम्ही म्हणता?” BSB BSB: In the Law Moses commanded us to stone such a woman. So what do You say?”
6 UDB काहीतरी चुकीच्या बोलण्याद्वारे त्याच्यावर दोषारोप करण्यासाठी एक सापळा म्हणून त्यांनी हा प्रश्न विचारला. त्यांनी तिला ठार मारू नये असे जर तो म्हणाला असता, तर तो मोशेच्या नियमशास्त्राचा अनादर करतो असे ते म्हणाले असते. तथापि, त्यांनी तिला ठार मारावे असे जर तो बोलला असता, तर लोकांना शिक्षा देण्याचे सामर्थ्य असलेल्या राज्यपालासाठी राखून ठेवलेल्या रोमी कायद्यांचे त्याच्याकडून उल्लंघन झाले असते. तथापि, येशू खाली वाकला आणि त्याच्या बोटाने जमिनीवर काहीतरी लिहू लागला. BSB BSB: They said this to test Him, in order to have a basis for accusing Him. But Jesus bent down and began to write on the ground with His finger.
7 UDB त्यांनी त्याला प्रश्न विचारने चालूच ठेवले असता, तो उठला आणि त्यांना म्हणाला, “तुम्हापैकी कोणा एकाने जर कधीच पाप केले नसेल, तर तुम्हीच ते आहात जे हिला शिक्षा देण्यासाठी बाकीच्यांना चालवाल. त्या तुम्हीच पहिला दगड मारावा!” BSB BSB: When they continued to question Him, He straightened up and said to them, “Let him who is without sin among you be the first to cast a stone at her.”
8 UDB मग येशू खाली वाकला आणि जमिनीवर आणखी थोडे लिहू लागला. BSB BSB: And again He bent down and wrote on the ground.
9 UDB तो काय बोलला हे त्यांनी ऐकल्यानंतर, त्याला प्रश्न विचारणारे, प्रथम वृद्ध, आणि तरूण, एक एक करून, दूर निघून जाऊ लागले. आपण सगळेच पापी आहोत हे त्यांना कळून आले. शेवटी त्या स्त्री सोबत केवळ येशूच तेथे होता. BSB BSB: When they heard this, they began to go away one by one, beginning with the older ones, until only Jesus was left, with the woman standing there.
10 UDB येशू उभा राहिला आणि तिला विचारले, “बाई, तुला दोषी ठरवणारे कोठे आहेत? जी शिक्षा तुला व्हायची होती, त्याबद्दल कोणीही तुझ्यावर हल्ला केला नाही?” BSB BSB: Then Jesus straightened up and asked her, “Woman, where are your accusers? Has no one condemned you?”
11 UDB ती म्हणाली, “नाही, साहेब, कोणीही नाही.” मग येशू म्हणाला, “मी देखील तुला दोषी ठरवीत नाही. आता घरी जा, आणि आतापासून पूढे, ह्यासारखे आणखी काही पाप करू नको!”] BSB BSB: “No one, Lord,” she answered. “Then neither do I condemn you,” Jesus declared. “Now go and sin no more.”
12 UDB येशू पुन्हा लोकांशी बोलला. तो म्हणाला, “मी जगाचा प्रकाश आहे. जो कोणी मला अनुसरतो त्याच्या जवळ जीवन देणारा प्रकाश असेल, आणि तो पुन्हा कधीच अंधारात चालणार नाही. BSB BSB: Once again, Jesus spoke to the people and said, “I am the light of the world. Whoever follows Me will never walk in the darkness, but will have the light of life.”
13 UDB म्हणून परूशी त्याला म्हणाले, “हे असे ऐकू येत आहे जणूकाय तुम्ही वारंवार स्वतःविषयी बोलून आम्ही तुम्हावर भरवसा ठेवण्यास आमचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहात! तुम्हाविषयी जे काही तुम्ही बोलत आहात त्याने काहीच सिद्ध होत नाही!” BSB BSB: So the Pharisees said to Him, “You are testifying about Yourself; Your testimony is not valid.”
14 UDB येशूने उत्तर दिले, “माझ्याविषयी साक्ष देणारा केवळ मी एकटाच जरी असलो तरी, मी जे काही सांगतो ते सत्य आहे हे मला माहित आहे, कारण मी कोठून आलो आणि मी कोठे जाणार आहे हे मला ठाऊक आहे. तथापि, मी कोठून आलो हे तुम्हाला माहित नाही आणि मी कोठे जाणार आहे हे तुम्हाला माहित नाही. BSB BSB: Jesus replied, “Even if I testify about Myself, My testimony is valid, because I know where I came from and where I am going. But you do not know where I came from or where I am going.
15 UDB तुम्ही मनुष्याच्या नियमानुसार आणि देहबिद्धीने लोकांचा न्याय करता. मी ह्या वेळेत कोणाचाही न्याय करण्यासाठी आलो नाही. BSB BSB: You judge according to the flesh; I judge no one.
16 UDB मी न्याय करेन तेव्हा, तो योग्य आणि बरोबर असेल कारण मी केवळ एकटाच तो नाही जो न्याय मिळवून देणार आहे. पिता आणि मी ज्याने मला पाठवले, आम्ही एकत्रितपणे तो न्याय अंमलात आणू. BSB BSB: But even if I do judge, My judgment is true, because I am not alone; I am with the Father who sent Me.
17 UDB एखाद्या प्रकरणात पुरावा देण्यासाठी किमान दोन साक्षीदार असल्यावरच प्रकरणाचा निकाल लावला जाऊ शकतो असे तुमच्या नियमशास्त्रात लिहिले आहे. BSB BSB: Even in your own Law it is written that the testimony of two men is valid.
18 UDB मी तुम्हाला माझा पुरावा देत आहे, आणि माझा पिता ज्याने मला पाठवले तो देखील माझ्या विषयी पुरावा देतो. म्हणून आम्ही जे काही सांगत आहोत त्यावर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. BSB BSB: I am One who testifies about Myself, and the Father, who sent Me, also testifies about Me.”
19 UDB मग त्यांनी त्याला विचारले, “तुझा पिता कोठे आहे?” येशूने उत्तर दिले, “तुम्ही मला ओळखत नाही आणि माझ्या पित्याला ही तुम्ही ओळखत नाही.” BSB BSB: “Where is Your Father?” they asked Him. “You do not know Me or My Father,” Jesus answered. “If you knew Me, you would know My Father as well.”
20 UDB मंदिराच्या अंगणात जेथे लोक त्यांचे अर्पण आणतात त्या ठिकाणाजवळ म्हणजे खजिन्या जवळ असतांना तो बोलला होता. तरीसुद्धा कोणीही त्याला अटक केली नाही कारण त्याची मरणाची वेळ अजून आली नव्हती. BSB BSB: He spoke these words while teaching in the temple courts, near the treasury. Yet no one seized Him, because His hour had not yet come.
21 UDB येशू त्यांना हे देखील म्हणाला, “मी निघून जात आहे, आणि तुम्ही माझा शोध कराल, परंतु तुम्ही तुमच्या पापातच मरणार हे निश्चित आहे. मी जात आहे, तेथे तुम्ही येऊ शकत नाही.” BSB BSB: Again He said to them, “I am going away, and you will look for Me, but you will die in your sin. Where I am going, you cannot come.”
22 UDB त्याचे यहूदी विरोधक आपसात म्हणाले, “‘मी जात आहे, तेथे तुम्ही येऊ शकत नाही’ असे तो म्हणतो तेव्हा, तो स्वतःलाच ठार करणार आहे का? असा त्याचा अर्थ आहे की काय?” BSB BSB: So the Jews began to ask, “Will He kill Himself, since He says, ‘Where I am going, you cannot come’?”
23 UDB येशू त्यांना बोलतच राहिला, “तुम्ही खालचे म्हणजे या पृथ्वीवरील आहात, परंतु मी वरील म्हणजे स्वर्गातून आहे. तुम्ही या जगाचे आहात. मी ह्या जगाचा नाही. BSB BSB: Then He told them, “You are from below; I am from above. You are of this world; I am not of this world.
24 UDB मी तुम्हाला सांगतो तुम्ही मराल आणि देव तुम्हाला तुमच्या अपराधांबद्दल दोषी ठरवेल. मी म्हणतो तसा मी देव आहे असा जर तुम्ही विश्वास ठेवत नाही तर हे निश्चितच घडेल.” BSB BSB: That is why I told you that you would die in your sins. For unless you believe that I am He, you will die in your sins.”
25 UDB त्यांनी त्याला विचारले “तू कोण आहेस?” येशू त्यांना म्हणाला, “सुरवातीपासूनच, मी तुम्हाला सांगत आहे! BSB BSB: “Who are You?” they asked. “Just what I have been telling you from the beginning,” Jesus replied.
26 UDB मी तुमचा न्याय करू शकतो आणि तुम्ही पुष्कळ गोष्टींबाबत दोषी आहात असेही म्हणू शकतो. त्याऐवजी, मी केवळ एवढेच म्हणतो: ज्याने मला पाठवले तो सत्य सांगतो, आणि मी त्याच्याकडून जे काही ऐकले आहे, केवळ तेच मी जगातील लोकांना सांगतो.” BSB BSB: “I have much to say about you and much to judge. But the One who sent Me is truthful, and what I have heard from Him, I tell the world.”
27 UDB तो पित्याविषयी बोलत आहे हे त्यांना समजले नाही. BSB BSB: They did not understand that He was telling them about the Father.
28 UDB म्हणून येशू म्हणाला, मी—जो मनुष्याचा पुत्र, —म्हणजे मला वधस्तंभावर मारण्यासाठी उंच कराल तेव्हा, तुम्हाला कळेल की मी देव आहे, आणि मी काहीही माझ्या स्वतःच्या अधिकाराने करत नाही, हे तुम्हाला कळेल. BSB BSB: So Jesus said, “When you have lifted up the Son of Man, then you will know that I am He, and that I do nothing on My own, but speak exactly what the Father has taught Me.
29 UDB ज्याने मला पाठवले तो माझ्याबरोबर आहे, आणि मी त्याच गोष्टी करतो ज्याद्वारे त्याला आनंद होतो म्हणून तो मला एकटे सोडून गेला नाही.” BSB BSB: He who sent Me is with Me. He has not left Me alone, because I always do what pleases Him.”
30 UDB येशू ह्या गोष्टी बोलत असता अधिक जास्त लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. BSB BSB: As Jesus spoke these things, many believed in Him.
31 UDB मग आता त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या यहूद्यांना येशू म्हणाला, “मी जे काही सांगितले ते सर्व तुम्ही ऐकले आणि तुम्ही जे काही करता त्यामध्ये असेच जगलात तर, तुम्ही खरोखर माझे शिष्य आहात.” BSB BSB: So He said to the Jews who had believed Him, “If you continue in My word, you are truly My disciples.
32 UDB तुम्हाला सत्य समजेल आणि ज्याही गोष्टीने तुम्हाला त्यांचे दास करून ठेवले आहे, त्यापासून मुक्त होण्यासाठी ते सत्य तुम्हाला घेऊन चालेल.” BSB BSB: Then you will know the truth, and the truth will set you free.”
33 UDB त्यांनी त्याला उत्तर दिले, “आम्ही अब्राहामाचे वंशज आहोत, आणि कधीही कोणाचे दास नव्हतो. आम्हाला मुक्त होण्याची आवश्यकता आहे असे तुम्ही का म्हणता? BSB BSB: “We are Abraham’s descendants,” they answered. “We have never been slaves to anyone. How can You say we will be set free?”
34 UDB येशूने उत्तर दिले, “मी तुम्हाला खरे सांगत आहे: जसा एखाद्या दासाला त्याच्या धन्याची आज्ञा पालन करण्याची सक्ती असते, तसेच जो कोणी पाप करतो तो देखील त्याच्या पापी इच्छेच्या आज्ञा पालन करतो. BSB BSB: Jesus replied, “Truly, truly, I tell you, everyone who sins is a slave to sin.
35 UDB एक दास कुटूंबात कायमचा सदस्य म्हणून राहत नाही परंतु कदाचीत त्याला घरी जाण्यासाठी मुक्त केले जाते किंवा विकले जाते. तथापी, एक पुत्र कुटूंबाचा सर्वकाळचा सदस्य आहे. BSB BSB: A slave does not remain in the house forever, but a son remains forever.
36 UDB म्हणून जर पुत्र तुम्हाला बंधनमुक्त करेल तर, तुम्ही खरोखर बंधनमुक्त व्हाल. BSB BSB: So if the Son sets you free, you will be free indeed.
37 UDB तुम्ही अब्राहामाच्या कुटुंबातील आहात; तुम्ही त्याचे वंशज आहात, हे मला ठाऊक आहे. तरीसुद्धा, तुमचे लोक मला ठार मारण्याचा प्रयत्न करत आहेत. मी काहीही सांगितले त्यावर तुम्ही भरवसा ठेवत नाहीत. BSB BSB: I know you are Abraham’s descendants, but you are trying to kill Me because My word has no place within you.
38 UDB माझ्या पित्याने मला दाखवलेल्या अद्भुत गोष्टी आणि शहाणपणा ह्या सर्वांविषयी मी तुम्हाला सांगतो, परंतु तुम्ही केवळ तेच करत आहात जे तुमच्या पित्याने तुम्हाला करण्यासाठी सांगितले.” BSB BSB: I speak of what I have seen in the presence of the Father, and you do what you have heard from your father.”
39 UDB त्यांनी त्याला उत्तर दिले, “अब्राहाम आमचा पूर्वज आहे.” येशू त्यांना म्हणाला, “जर तुम्ही अब्राहामाचे वंशज असता तर, ज्या गोष्टी त्याने केल्या त्या तुम्ही देखील केल्या असत्या. BSB BSB: “Abraham is our father,” they replied. “If you were children of Abraham,” said Jesus, “you would do the works of Abraham.
40 UDB देवाकडून ऐकलेले सत्य मी तुम्हाला सांगितले आहे, परंतु तुम्ही मला ठार मारू पाहत आहात. अब्राहामाने अशा प्रकारच्या गोष्टी केल्या नाहीत. BSB BSB: But now you are trying to kill Me, a man who has told you the truth that I heard from God. Abraham never did such a thing.
41 UDB नाही! तुमच्या खऱ्या पित्याने ज्या गोष्टी केल्या त्याच तुम्ही करत आहात.” ते त्याला म्हणाले, “आम्हाला तुझ्याविषयी तर ठाऊक नाही, परंतु आम्ही व्यभिचारापासून झालेली मुले नाही आहोत. आम्हाला केवळ एकच पिता आहे, आणि तो देव आहे.” BSB BSB: You are doing the works of your father.” “We are not illegitimate children,” they declared. “Our only Father is God Himself.”
42 UDB येशू त्यांना म्हणाला, “जर देव तुमचा पिता आहे, तर तुम्ही माझ्यावर प्रीती केली असती कारण मी देवापासून आलो आहे आणि आता मी ह्या जगामध्ये आलो आहे. मी स्वतः येण्याचे ठरवले म्हणून मी आलो आहे असे नाही, कारण त्याने मला पाठवले म्हणून मी स्वतः येण्याचा निर्णय घेतला. BSB BSB: Jesus said to them, “If God were your Father, you would love Me, for I have come here from God. I have not come on My own, but He sent Me.
43 UDB मी जे काही सांगतो ते तुम्हाला का समजत नाही हे मी तुम्हाला सांगतो. याचे कारण म्हणजे तुम्ही माझा संदेश किंवा माझे शिक्षण स्वीकारणार नाही. BSB BSB: Why do you not understand what I am saying? It is because you are unable to accept My message.
45 UDB मी तुम्हाला सत्य सांगतो, म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही! BSB BSB: But because I speak the truth, you do not believe Me!
46 UDB तुमच्यापैकी कोणाला मी पाप केल्या बद्दल दोषी सापडतो? मी तुम्हाला सत्य सांगत असता, तुम्ही माझ्यावर विश्वास न ठेवण्याचे कोणते कारण द्याल? BSB BSB: Which of you can prove Me guilty of sin? If I speak the truth, why do you not believe Me?
47 UDB जो कोणी देवाचा आहे तो त्याने जे काही सांगितले ते ऐकतो आणि तो जे काही सांगेल ती आज्ञा पाळतो. तुम्ही देवाचे नाहीत म्हणून तुम्ही त्याचे ऐकत नाही आणि त्याच्या संदेशाचे आज्ञापालन करत नाही.” BSB BSB: Whoever belongs to God hears the words of God. The reason you do not hear is that you do not belong to God.”
48 UDB त्याच्या यहूदी शत्रूंनी त्याला उत्तर दिले, “तुम्ही खरोखर एक सत्य यहूदी नाही—तुम्ही एक शमरोनी आहात असे आम्ही म्हणालो तरी निश्चितच आम्ही योग्य आहोत!—आणि सैतान तुमच्यामध्ये राहतो!” BSB BSB: The Jews answered Him, “Are we not right to say that You are a Samaritan and You have a demon?”
49 UDB येशूने उत्तर दिले, “सैतान माझ्यामध्ये राहत नाही! मी माझ्या पित्याचा सन्मान करतो, आणि तुम्ही माझा अनादर करता! BSB BSB: “I do not have a demon,” Jesus replied, “but I honor My Father, and you dishonor Me.
50 UDB माझी स्तुती करण्यास मी लोकांना भाग पाडत नाही. तेथे असा कोणीतरी आहे, जो मी ज्यासाठी पात्र आहे ते मला देऊ इच्छितो, आणि तोच मी जे काही बोलतो आणि करतो त्याचा न्याय करेल. BSB BSB: I do not seek My own glory. There is One who seeks it, and He is the Judge.
51 UDB मी तुम्हाला सत्य सांगत आहे: जर कोणी माझे शब्द दृढ धरून राहतो, आणि मी दिला तसा त्यावर भरवसा ठेवतो, तर तो मनुष्य मरणार नाही!” BSB BSB: Truly, truly, I tell you, if anyone keeps My word, he will never see death.”
52 UDB नंतर त्याचे यहूदी शत्रू त्याला म्हणाले, “आता आम्हाला खात्री झाली आहे की तुझ्यामध्ये भूत राहत आहे! अब्राहाम आणि संदेष्टेही फार काळापूर्वी मरण पावले आहेत! तरीसुद्धा तुम्ही म्हणता, जे काही तुम्ही शिकवले ते जर कोणी दृढ धरून राहतो तो मरणार नाही! BSB BSB: “Now we know that You have a demon!” declared the Jews. “Abraham died, and so did the prophets, yet You say that anyone who keeps Your word will never taste death.
53 UDB आमचा पिता अब्राहाम ह्याच्यापेक्षा तुम्ही श्रेष्ठ नाही. तो मरण पावला आणि सर्व संदेष्टेही त्याच्याबरोबर मरण पावले. तुला काय वाटते तू कोण आहेस?” BSB BSB: Are You greater than our father Abraham? He died, as did the prophets. Who do You claim to be?”
54 UDB येशूने उत्तर दिले, “लोकांनी माझी स्तुती करावी असे करण्याचा मी प्रयत्न केला तर, ते कदाचीत व्यर्थ होईल. जो माझी स्तुती करतो तो माझा पिता आहे, माझे चारित्र्य आणि माझे चांगूलपण, आणि तरीसुद्धा ज्याला तुम्ही म्हणता, ‘तो आमचा देव आहे’ तो हाच आहे. BSB BSB: Jesus answered, “If I glorify Myself, My glory means nothing. The One who glorifies Me is My Father, of whom you say, ‘He is our God.’
55 UDB तरी मी त्याला ओळखतो, तुम्ही त्याला ओळखत नाही. मी त्याला ओळखत नाही असे जर मी म्हटले तर मी तुमच्यासारखा लबाड ठरेल. मी त्याला ओळखतो आणि जे काही तो सांगतो ते मी सर्वदा पाळीत असतो. BSB BSB: You do not know Him, but I know Him. If I said I did not know Him, I would be a liar like you. But I do know Him, and I keep His word.
57 UDB मग यहूदी पुढारी त्याला म्हणाले, “तुम्ही अजून पन्नास वर्षाचे देखील नाहीत! तुम्ही अब्राहामाला कधीच पाहिले नाही?” BSB BSB: Then the Jews said to Him, “You are not yet fifty years old, and You have seen Abraham?”
59 UDB यावरुन त्यांनी त्याला ठार मारण्यासाठी धोंडे उचलले. तथापि, येशूने स्वतःला लपवून, मंदिर सोडले आणि कुठेतरी निघून गेला. BSB BSB: At this, they picked up stones to throw at Him. But Jesus was hidden and went out of the temple area.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.