2 UDB तो म्हणाला, “कोणा एका शहरात एक न्यायधीश होता तो देवाचा सन्मान करीत नसे आणि कोणत्याही लोकांची भीड धरत नसे. BSB BSB: “In a certain town there was a judge who neither feared God nor respected men.
3 UDB त्याच शहरात एक विधवा होती जी नेहमी न्यायाधिशाकडे येत असे, त्याला म्हणत असे, ‘मला न्यायालयामध्ये जो विरोध करत आहे त्या माणसापासून न्याय मिळून द्या. BSB BSB: And there was a widow in that town who kept appealing to him, ‘Give me justice against my adversary.’
4 UDB बराच काळापर्यंत तो न्यायाधीश तिला मदत करण्याचे नाकारत राहिला. परंतु नंतर, तो स्वतःलाच म्हणाला, ‘मी देवाचा सन्मान करत नाही आणि लोकांशी मला काहीच घेणे देणे नाही, BSB BSB: For a while he refused, but later he said to himself, ‘Though I neither fear God nor respect men,
5 UDB परंतु ही विधवा मला फार त्रास देते! म्हणून मी तिच्या वादाचा न्याय करीन आणि तिचा योग्य न्याय व्हावा ह्याची खात्री करीन, कारण जर मी तसे केले नाही तर, ती निरंतर माझ्याकडे येऊन येऊन मला थकवून टाकील!’” BSB BSB: yet because this widow keeps pestering me, I will give her justice. Otherwise, she will wear me out with her perpetual requests.’”
6 UDB मग प्रभू येशू म्हणाला, ‘ह्या अन्यायी न्यायधीशाने काय म्हटले त्याच्यावर काळजी पूर्वक विचार करा. BSB BSB: And the Lord said, “Listen to the words of the unjust judge.
7 UDB तर मग देव जो न्यायी आहे त्याच्या निवडलेल्या लोकांसाठी किती विशेष करून न्याय करील जे त्याच्या कडे रात्रंदिवस कळवळून प्रार्थना करतात! आणि तो त्यांच्या विषयी नेहेमी धीराने वागतो. BSB BSB: Will not God bring about justice for His elect who cry out to Him day and night? Will He delay in helping them?
8 UDB मी तुम्हांला सांगतो, देव त्यांच्या निवडलेल्यांसाठी लवकरच न्याय करील! तरी देखील मनुष्याचा पुत्र मी ज्या वेळेस पृथ्वीवर परत येईन त्या वेळेस असे असंख्य लोक असतील माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत.” BSB BSB: I tell you, He will promptly carry out justice on their behalf. Nevertheless, when the Son of Man comes, will He find faith on earth?”
10 UDB तो म्हणाला, “दोन पुरुष यरुशलेमेत मंदिरात प्रार्थना करण्याकरीता गेले. त्यापैकी एक परूशी होता. तर दुसरा रोमी सरकारसाठी लोकांपासून जकात गोळा करणारा होता. BSB BSB: “Two men went up to the temple to pray. One was a Pharisee and the other a tax collector.
11 UDB तो परूशी उभा राहिला आणि त्याने स्वतःविषयी अशा प्रकारे प्रार्थना केली, ‘हे देवा, मी इतर लोकांसारखा नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो. काही लोक दुसऱ्यांपासून पैसे चोरतात, काही इतरांवर अन्याय करतात, आणि काही लोक व्यभिचार करतात. मी तर ह्यापैकी काहीही करत नाही. आणि नक्कीच ह्या पापी जकात जमा करणाऱ्यासारखा मी लोकांना फसवत तर नाहीच! BSB BSB: The Pharisee stood by himself and prayed, ‘God, I thank You that I am not like other men—swindlers, evildoers, adulterers—or even like this tax collector.
12 UDB मी आठवड्यातून दोन दिवस उपास करतो आणि मी जे काही कमावतो त्याचा दहावा भाग मंदिरात देतो!’ BSB BSB: I fast twice a week and pay tithes of all that I acquire.’
13 UDB परंतु जकात गोळा करणारा मंदिरातील अंगणात जमलेल्या लोकांपासून दूर उभा राहिला. आपली दृष्टी तो स्वर्गाकडे वर करण्यासाठी धजला नाही. त्या ऐवजी, त्याने आपला ऊर बडावून घेतला, ‘हे देवा, माझ्यावर दया कर आणि कृपया माला क्षमाकर कारण, मी महापापी आहे!’” BSB BSB: But the tax collector stood at a distance, unwilling even to lift up his eyes to heaven. Instead, he beat his breast and said, ‘God, have mercy on me, a sinner!’
14 UDB मग येशू म्हणाला, “जेव्हा ते दोघे घरी जावयास निघाले तेव्हा जकात जमा करणाऱ्याला क्षमा मिळाली परंतु परूश्याला क्षमा केली गेली नाही हे मी तुम्हास सांगतो. हे ह्यासाठी की जो कोणी स्वतःला उंच करू पाहतो त्याला नमविले जाईल आणि जो कोणी स्वतःला नम्र करतो त्याला उंचावले जाईल.’ BSB BSB: I tell you, this man, rather than the Pharisee, went home justified. For everyone who exalts himself will be humbled, but the one who humbles himself will be exalted.”
15 UDB एके दिवशी लोक लेकरांना येशूकडे आणत होते, त्याने आपले हात त्यांच्यावर ठेवून त्यांना आशीर्वाद द्यावा ही त्यांची इच्छा होती. जेव्हा शिष्यांनी हे पाहिले तेव्हा त्यांनी त्या लोकांना ते करण्यास मनाई केली. BSB BSB: Now people were even bringing their babies to Jesus for Him to place His hands on them. And when the disciples saw this, they rebuked those who brought them.
16 UDB परंतु येशूने लेकरांना माझ्याकडे येऊ द्यावे असे म्हटले. तो म्हणाला, “लेकरांना माझ्याकडे येऊ द्या! त्यांना थांबवू नका! ह्या लेकरांसारखेच नम्र आणि विश्वास ठेवणारे लोकांवरच देव आपले राज्य करणार आहे. BSB BSB: But Jesus called the children to Him and said, “Let the little children come to Me, and do not hinder them! For the kingdom of God belongs to such as these.
17 UDB मी तुम्हांला खरोखर सांगतो लहान लेकरांच्या विनम्रतेप्रमाणे जर कोणी देवाचे राज्य स्वीकारणार नाही तर देव त्या व्यक्तीलाही स्वीकारणार नाही.” BSB BSB: Truly I tell you, anyone who does not receive the kingdom of God like a little child will never enter it.”
18 UDB एकदा एका यहूदी पुढाऱ्याने येशूला विचारले, “हे उत्तम गुरूजी, सार्वकालिक जीवन मिळविण्यासाठी मी काय करायला पाहिजे?” BSB BSB: Then a certain ruler asked Him, “Good Teacher, what must I do to inherit eternal life?”
19 UDB येशूने त्याला उत्तर दिले, “तू मला उत्तम का म्हणतोस? केवळ देवच खरोखर उत्तम आहे! BSB BSB: “Why do you call Me good?” Jesus replied. “No one is good except God alone.
20 UDB आता तू जो प्रश्न विचारला त्याचे उत्तर मी तुला देतो, देवाने मोशेला आम्ही पाळाव्या म्हणून दिलेल्या आज्ञा तर तुला नक्कीच ठाऊक असतील: व्यभिचार करू नकोस, कोणाचाही खून करू नकोस, चोरी करू नकोस, कोणाविषयी खोटी साक्ष देऊ नकोस, आपल्या आईचा आणि आपल्या वडिलांचा सन्मान कर,’” BSB BSB: You know the commandments: ‘Do not commit adultery, do not murder, do not steal, do not bear false witness, honor your father and mother.’”
21 UDB तो मनुष्य म्हणाला, “मी अगदी बाळपणा पासून मी ह्या सर्व आज्ञांचे पालन करत आलो आहे.” BSB BSB: “All these I have kept from my youth,” he said.
22 UDB त्याने दिलेले उत्तर ज्या वेळेस येशूने ऐकले, तो त्याला म्हणाला, “तुला आणखी एक गोष्ट करण्याची गरज आहे. जे काही तुझ्या मालकीचे आहे ते सगळे विकून टाक. आणि ज्या लोकांना अगदी थोडे आहे त्यांना तो पैसा देऊन टाक. ह्याचा परिणाम असा होईल की तुला स्वर्गामध्ये आध्यात्मिक धन प्राप्त होईल. आणि मग तू परत ये आणि माझा शिष्य हो!” BSB BSB: On hearing this, Jesus told him, “You still lack one thing: Sell everything you own and give to the poor, and you will have treasure in heaven. Then come, follow Me.”
23 UDB हे ऐकल्या नंतर तो मनुष्य फार उदास झाला, कारण तो खूप श्रीमंत होता. BSB BSB: But when the ruler heard this, he became very sad, because he was extremely wealthy.
24 UDB तो मनुष्य किती उदास झाला आहे हे जेव्हा येशूने पाहिले, तो देखील खूप दूःखी झाला. तो म्हणाला, “देवाने जे फार श्रीमंत आहेत त्यांच्यासाठी देवाने आमच्यावर राज्य करावे ह्याच्याशी सहमत होणे फारच कठीण आहे.” BSB BSB: Seeing the man’s sadness, Jesus said, “How hard it is for the rich to enter the kingdom of God!
25 UDB वास्तविक पाहता श्रीमंत मनुष्यांसाठी देवाने त्यांच्या जीवनावर राज्य करने हे एखाद्या ऊंटाने सुईच्या नाकातून जाण्यापेक्षा ही अवघड आहे.” BSB BSB: Indeed, it is easier for a camel to pass through the eye of a needle than for a rich man to enter the kingdom of God.”
26 UDB ज्यांनी येशूचे ऐकले त्यांनी येशूला उत्तर दिले, “ह्या वरून तर असे वाटते कोणाचेही तारण होणे अशक्य आहे!” BSB BSB: Those who heard this asked, “Who then can be saved?”
27 UDB पण येशू म्हणाला, “जे मनुष्यांसाठी अशक्य आहे ते देवासाठी शक्य आहे.” BSB BSB: But Jesus said, “What is impossible with man is possible with God.”
28 UDB मग पेत्र म्हणाला, “तुझे शिष्य बनण्यासाठी जे काही आमचे होते ते सर्व सोडून आम्ही तुझ्या मागे आलो आहोत.” BSB BSB: “Look,” said Peter, “we have left all we had to follow You.”
30 UDB ते ह्याच जीवनात त्यांनी जे काही सोडले त्याच्या बहुत पट प्राप्त करतील आणि येणाऱ्या युगात त्यांना अंनतकाळचे जीवन मिळेल.” BSB BSB: will fail to receive many times more in this age—and in the age to come, eternal life.”
31 UDB मग येशूने आपल्या बारा शिष्यांना एकांतात नेले आणि तो त्यांना म्हणाला, “लक्ष पूर्वक ऐका! आता आपण यरुशलेमेस जात आहोत. आपण तेथे असतांना संदेष्ट्यांनी मनुष्याच्या पुत्राविषयी म्हणजे माझ्या विषयी खूप पूर्वी जे लिहिले ते सगळे काही पूर्ण होईल. BSB BSB: Then Jesus took the Twelve aside and said to them, “Look, we are going up to Jerusalem, and everything the prophets have written about the Son of Man will be fulfilled.
32 UDB माझे शत्रू मला गैर यहूद्यांच्या अधिकारात देतील. ते माझी थट्टा करतील, ते माझा अपमान करतील, आणि माझ्यावर थुंकतील. BSB BSB: He will be delivered over to the Gentiles and will be mocked and insulted and spit upon.
33 UDB ते मला चाबकांनी मारतील आणि मग मला ते ठार करतील. ते मला जीवे मारतील. परंतु हे घडल्यावर तिसऱ्या दिवशी मी मेलेल्यातून परत जिवंत होईन! तो जेकाही बोलला त्याच्यातले काहीही शिष्यांना समजले नाही. BSB BSB: They will flog Him and kill Him, and on the third day He will rise again.”
34 UDB परंतु तो जे काही बोलला त्यातील काहीही शिष्यांना समजले नाही. तो जे काही बोलत आहे त्याचा अर्थ त्यांना समजू नये असे देवाने केले होते. BSB BSB: But the disciples did not understand any of these things. The meaning was hidden from them, and they did not comprehend what He was saying.
35 UDB येशू आणि त्याचे शिष्य यरीहो शहराजवळ आले तेव्हा एक आंधळा मनुष्य रस्त्याच्या बाजूला बसून होता. तो भिक मागत होता. BSB BSB: As Jesus drew near to Jericho, a blind man was sitting beside the road, begging.
36 UDB जेव्हा त्याने जवळून जाणाऱ्या गर्दीचा आवाज ऐकला, त्याने कोणालातरी विचारिले, “काय घडत आहे?” BSB BSB: When he heard the crowd going by, he asked what was happening.
37 UDB त्यांनी त्याला सांगितले, “नासरेथकर येशू बाजूने जात आहे.” BSB BSB: “Jesus of Nazareth is passing by,” they told him.
38 UDB तो मोठ्याने ओरडला, “येशू दावीद राजाच्या वंशजा, माझ्यावर दया करा!” BSB BSB: So he called out, “Jesus, Son of David, have mercy on me!”
39 UDB त्या गर्दीच्या पुढे जे जात होते ते त्याच्यावर चिडले आणि त्यांनी त्याला गप्प राहण्यासाठी सांगितले. परंतु तो अधिक मोठ्याने ओरडला, “हे दावीद राजाच्या वंशजा माझ्यावर दया करा!” BSB BSB: Those who led the way admonished him to be silent, but he cried out all the louder, “Son of David, have mercy on me!”
40 UDB येशू थांबला आणि लोकांना आज्ञा दिली की त्या माणसाला त्याच्याकडे घेऊन या. जेव्हा तो आंधळा मनुष्य जवळ आला, येशूने त्याला विचारिले, BSB BSB: Jesus stopped and directed that the man be brought to Him. When he had come near, Jesus asked him,
41 UDB “मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?” त्याने उत्तर दिले, “प्रभू माझी इच्छा आहे की तू मला दृष्टी द्यावी!” BSB BSB: “What do you want Me to do for you?” “Lord,” he said, “let me see again.”
42 UDB येशूने त्याला म्हटले, “पाहू लाग! तू माझ्यावर विश्वास ठेवला आहे म्हणून मी तुला बरे केले आहे!” BSB BSB: “Receive your sight!” Jesus replied. “Your faith has healed you.”
43 UDB लागलेच तो पाहू लागला. आणि मग तो येशू सोबत देवाची स्तुती करत चालू लागला. तेथे उपस्थित सर्व लोकांनी जेव्हा हे पहिले तेही देवाची स्तुती करू लागले. BSB BSB: Immediately he received his sight and followed Jesus, glorifying God. And all the people, when they saw it, gave praise to God.