1 UDB येशूने यरीहो मध्ये प्रवेश केला आणि तो शहरातून जात होता. BSB BSB: Then Jesus entered Jericho and was passing through.
2 UDB जक्कय नावाचा एक व्यक्ती तिथे होता. लोकांकडून जकात गोळा करण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती आणि तो फार श्रीमंत होता. BSB BSB: And there was a man named Zacchaeus, a chief tax collector, who was very wealthy.
3 UDB त्याला येशूला पाहायचे होते परंतु गर्दीमुळे त्याला येशू दिसत नव्हता. तो फार बुटका मनुष्य होता आणि येशूच्या अवती भोवती बरेच लोक होते. BSB BSB: He was trying to see who Jesus was, but could not see over the crowd because he was small in stature.
4 UDB म्हणून तो रस्त्याने धावत पुढे गेला. आणि तो एका उंबराच्या झाडावर चढला आणि तेथून येशू येत असता तो पाहू शकला. BSB BSB: So he ran on ahead and climbed a sycamore tree to see Him, since Jesus was about to pass that way.
5 UDB जेव्हा येशू तेथे पोहोंचला, त्याने वर पाहिले आणि तो त्याला म्हणाला, “जक्कया लवकर खाली उतर, आज रात्री मला तुझ्या घरी मूक्काम करायचा आहे!” BSB BSB: When Jesus came to that place, He looked up and said, “Zacchaeus, hurry down, for I must stay at your house today.”
6 UDB म्हणून तो लवकर खाली आला. आपल्या घरात येशूचे स्वागत करतांना तो खूप आनंदीत होता. BSB BSB: So Zacchaeus hurried down and welcomed Him joyfully.
7 UDB परंतु येशू त्याच्या घरात जात आहे असे लोकांनी पाहून ते कुरकुर करू लागले, “खरोखर एका पापी मनुष्याचा पाहूणा म्हणून तो गेला आहे!” BSB BSB: And all who saw this began to grumble, saying, “He has gone to be the guest of a sinful man!”
8 UDB ते जेवण करत असता जक्कय उठून उभा राहिला आणि येशूला म्हणाला, “प्रभू, माझी जी काही संपत्ती आहे त्यातला अर्धा वाटा मी गरिबांना देणार आहे हे मला तुला सांगायचे आहे. आणि ज्या लोकांना मी फसवले त्यांच्याकडून मी जे काही घेतले, त्याच्या चार पट मी त्यांना परत देईन.” BSB BSB: But Zacchaeus stood up and said to the Lord, “Look, Lord, half of my possessions I give to the poor, and if I have cheated anyone, I will repay it fourfold.”
9 UDB येशू त्याला म्हणाला, “आज देवाने ह्या संपूर्ण कुटूंबाचे तारण केले आहे, कारण ह्या मनुष्याने तो अब्राहामाचा खरोखर वंशज हे दाखवून दिले आहे. BSB BSB: Jesus said to him, “Today salvation has come to this house, because this man too is a son of Abraham.
10 UDB हे लक्षात ठेवा: मी, मनुष्याचा पुत्र, देवापासून भटकलेल्यांना शोधावयास व वाचवण्यास आलेलो आहे.” BSB BSB: For the Son of Man came to seek and to save the lost.”
11 UDB येशू जे काही बोलत होता ते सर्व काही लोक ऐकत होते. तो यरुशलेमेच्या अधिक जवळ जात होता म्हणून त्याने त्यांना आणखी एक गोष्ट सांगण्याचा निर्णय घेतला. तो यरूशलेमेत पोहोंचताच, देवाच्या इच्छेप्रमाणे राजा बनणार आहे अशा त्यांच्या कल्पनेला तो दुरूस्त करू इच्छित होता. BSB BSB: While the people were listening to this, Jesus proceeded to tell them a parable, because He was near Jerusalem and they thought the kingdom of God would appear imminently.
12 UDB तो म्हणाला, “एक राजकुमार एका दूर देशात गेला तेथे सम्राटाकडून ज्या देशात तो राहत होता त्या देशाचा राजा बनण्याची आज्ञा घेण्यासाठी तो गेला. तेथून त्याला राज्य करण्याचा अधिकार मिळाल्यानंतर, तो आपल्या लोकांवर राज्य करणार होता. BSB BSB: So He said, “A man of noble birth went to a distant country to lay claim to his kingship and then return.
13 UDB म्हणून जाण्याअगोदर, त्याने आपल्या दहा सेवकांना बोलवले. त्याने त्या सर्वांना एक सारखी रक्कम दिली. तो त्यांना म्हणाला, ‘मी पुन्हा येईपर्यंत तुम्ही ह्या पैशावर व्यापार करा!’ आणि मग तो गेला. BSB BSB: Beforehand, he called ten of his servants and gave them ten minas. ‘Conduct business with this until I return,’ he said.
14 UDB परंतु त्याच्या देशातील अनेक लोक त्याचा तिरस्कार करत असत. म्हणून त्यांनी त्याच्या मागोमाग राजाकडे दूत पाठवले की ‘आम्हांला हा मनुष्य राजा म्हणून नको!’ BSB BSB: But his subjects hated him and sent a delegation after him to say, ‘We do not want this man to rule over us.’
15 UDB परंतु तरी त्याला राजा बनविण्यात आले. आणि मग तो नवीन राजा बनून परत आला. ज्या सेवकांना त्याने पैसे दिले होते त्यांना त्याने आपल्याकडे पुन्हा बोलवले. त्याने त्यांना जी रक्कम दिली होती त्यातून त्यांनी व्यापार करून किती नफा कमवला हे जाणण्याची त्याची इच्छा होती. BSB BSB: When he returned from procuring his kingship, he summoned the servants to whom he had given the money, to find out what each one had earned.
16 UDB पहिला मनुष्य त्याच्या कडे आला आणि त्याला म्हणाला, ‘महोदय तू दिलेल्या रकमेवर मी दहा पट कमाई केली आहे!’ BSB BSB: The first servant came forward and said, ‘Master, your mina has produced ten more minas.’
17 UDB तो ह्या माणसाला म्हणाला, ‘तू चांगला सेवक आहेस! तू खूप चांगले काम केले आहेस! तू एवढ्या छोट्या रकमेच्या बाबतीत विश्वासयोग्य राहिला आहेस म्हणून मी तुला दहा शहरांवर राज्य करू देईन.’ BSB BSB: His master replied, ‘Well done, good servant! Because you have been faithful in a very small matter, you shall have authority over ten cities.’
18 UDB मग दुसरा सेवक त्याच्या कडे आला आणि त्याला म्हणाला, ‘तू, मला जी रक्कम दिली आहे आता ती तिच्या पेक्षा पाच पट अधिक झाली आहे!’ BSB BSB: The second servant came and said, ‘Master, your mina has made five minas.’
19 UDB त्याने त्या दासाला आणि त्या सेवकाला देखील म्हटले, ‘खूप छान! मी तुला पाच शहरांवर अधिकारी बनवीन.’ BSB BSB: And to this one he said, ‘You shall have authority over five cities.’
20 UDB मग आणखी एक तिसरा सेवक आला तो म्हणाला, “महोदय, हा तुमचा पैसा आहे. मी तो एका कापडाने गुंडाळला आणि सुरक्षित असा झाकून ठेवला. BSB BSB: Then another servant came and said, ‘Master, here is your mina, which I have laid away in a piece of cloth.
21 UDB जर माझ्या व्यवसायात मी अपयशी ठरलो तर तुम्ही काय कराल ह्याची मला भीती वाटत होती. आणि मला तर ठाऊक आहे की तुम्ही एक कठोर मनुष्य आहात आणि जे तुमचे स्वतःचे नाही ते तुम्ही इतरांकडून काढून घेता. दुसऱ्या एखाद्या मनुष्याने पेरलेल्या शेताची तुम्ही कापणी करणाऱ्या शेतकऱ्यासारखे आहात.’ BSB BSB: For I was afraid of you, because you are a harsh man. You withdraw what you did not deposit and reap what you did not sow.’
22 UDB तो त्या सेवकाला म्हणाला, “अरे दुष्ट सेवका! तू जे शब्द बोललास त्यानेच मी तुला दोषी ठरविले. तुला ठाऊक होते की मी एक कठोर मनुष्य आहे कारण जे माझे नाहीत ते मी हिसकून घेतो आणि जे शेत मी पेरले नाही त्याची मी कापणी करतो. BSB BSB: His master replied, ‘You wicked servant, I will judge you by your own words. So you knew that I am a harsh man, withdrawing what I did not deposit and reaping what I did not sow?
23 UDB म्हणून तू माझी रक्कम व्याज देणाऱ्या सावकारांकडे ठेवायची असती! तर जेव्हा मी परत आलो तेव्हा माझी रक्कम तर मला मिळालीच असती आणि यावर मला व्याजही मिळाले असते! BSB BSB: Why then did you not deposit my money in the bank, and upon my return I could have collected it with interest?’
24 UDB जे त्याच्या जवळ उभे होते त्यांना राजा म्हणाला, ‘त्याच्या कडून पैसे घ्या आणि ज्याने दहा पट नफा मिळवला त्या सेवकाकडे द्या!’ BSB BSB: Then he told those standing by, ‘Take the mina from him and give it to the one who has ten minas.’
25 UDB त्यांनी विरोध केला, ‘परंतु महोदय, त्याच्या कडे तर आधीच एवढा सगळा पैसा आहे.’ BSB BSB: ‘Master,’ they said, ‘he already has ten!’
26 UDB परंतु राजा त्यांना म्हणाला, ‘मी तुम्हांला हे सांगतो: जे काही प्राप्त होते, त्याचा उत्तम उपयोग करणाऱ्या लोकांना मी अधिक देईन. परंतु जे काही मिळाले आहे त्याचा जे लोक उपयोग करत नाहीत, त्यांच्याकडे जे काही आहे तेही मी काढून घेईन. BSB BSB: He replied, ‘I tell you that everyone who has will be given more; but the one who does not have, even what he has will be taken away from him.
27 UDB तर, आता ज्या शत्रूंना मी त्यांच्यावर राज्य करू नये अशी इच्छा आहे, त्यांना माझ्याकडे आणा आणि माझ्यासमोर त्यांना ठार करा!’” BSB BSB: And these enemies of mine who were unwilling for me to rule over them, bring them here and slay them in front of me.’”
28 UDB येशूने ह्या गोष्टी बोलल्या, आणि तो आपल्या यरुशलेमेच्या रस्त्यावर आपल्या शिष्यां संगती पुढे प्रवास करत गेला. BSB BSB: After Jesus had said this, He went on ahead, going up to Jerusalem.
29 UDB जैतूनाच्या डोंगराशेजारी बेथफगे आणि बेथानी ह्या गावाजवळ तो आल्यानंतर, BSB BSB: As He approached Bethphage and Bethany at the Mount of Olives, He sent out two of His disciples,
30 UDB तो आपल्या दोन शिष्यांना म्हणाला, “तुमच्या समोरील ह्या गावामध्ये जा. तेथे तुम्हांला एक शिंगरू बांधलेले आढळेल ज्यावर आजपर्यंत कोणीही बसलेले नाही त्याला सोडा आणि माझ्याकडे घेऊन या. BSB BSB: saying, “Go into the village ahead of you, and as you enter it, you will find a colt tied there, on which no one has ever sat. Untie it and bring it here.
31 UDB जर तुम्हांला कोणी काही विचारले, ‘तुम्ही ह्या गाढवाला का सोडत आहात!’ तुम्ही त्यांना उत्तर द्या, ‘प्रभूला ह्याची गरज आहे.’” BSB BSB: If anyone asks, ‘Why are you untying it?’ tell him, ‘The Lord needs it.’”
32 UDB तर ते दोन शिष्य त्या गावांमध्ये गेले आणि येशूने सांगितल्या प्रमाणेच त्यांना तेथे एक गाढव आढळले. BSB BSB: So those who were sent went out and found it just as Jesus had told them.
33 UDB ते त्याला सोडत असता त्याच्या मालकाने त्यांना म्हटले “तुम्ही ह्या गाढवाला का सोडत आहात?’ BSB BSB: As they were untying the colt, its owners asked, “Why are you untying the colt?”
34 UDB त्यांनी उत्तर दिले, “प्रभूला ह्याची गरज आहे”. BSB BSB: “The Lord needs it,” they answered.
35 UDB मग त्या शिष्यांनी गाढवाला येशूकडे आणिले. त्यांनी आपले अंगरखे त्या गाढवाच्या पाठीवर टाकले आणि येशूला त्याच्यावर बसण्यास मदत केली. BSB BSB: Then they led the colt to Jesus, threw their cloaks over it, and put Jesus on it.
36 UDB आणि जसा जसा तो पुढे जात होता इतरांनी आपले अंगरखे रस्त्यांवर त्याच्या पुढे टाकत त्याचा सन्मान केला. BSB BSB: As He rode along, the people spread their cloaks on the road.
37 UDB जैतून पर्वतावरून खाली उतरणाऱ्या रस्त्यावर आले असता त्याच्या शिष्यांचा संपूर्ण समुह येशूने जे चमत्कार केले होते त्या सगळ्या मोठ्या चमत्कारांची आठवण करून आनंदीत होऊन देवाची स्तुती मोठ्याने करू लागला. BSB BSB: And as He approached the descent from the Mount of Olives, the whole multitude of disciples began to praise God joyfully in a loud voice for all the miracles they had seen:
38 UDB ते अशा प्रकारच्या गोष्टी म्हणत होते, “देवाच्या अधिकाराने येणाऱ्या राजाला देव आशीर्वादीत करो!” “स्वर्गात आणि त्याच्या लोकांना देवाकडून शांती लाभो!” “प्रत्येकजण देवाची स्तुती करो!” BSB BSB: “Blessed is the King who comes in the name of the Lord!” “Peace in heaven and glory in the highest!”
39 UDB त्या जमावामध्ये काही परूशी होते ते त्याला म्हणाले, “गुरुजी, आपल्या शिष्यांनी हे म्हणू नये म्हणून त्यांना थांबण्यास सांगा आपले शिष्य जे बोलत आहे ते त्यांनी बोलू नये म्हणून त्यांना थांबवा!” BSB BSB: But some of the Pharisees in the crowd said to Him, “Teacher, rebuke Your disciples!”
40 UDB त्याने उत्तर दिले, “मी तुम्हास हे सांगतो: जर हे लोक शांत राहतील तर हे धोंडे स्वताहून माझी स्तुती करतील!” BSB BSB: “I tell you,” He answered, “if they remain silent, the very stones will cry out.”
41 UDB येशू जेव्हा यरुशलेमजवळ आला आणि त्याने शहर पाहिले, तेव्हा तो त्याच्यातील लोकांसाठी रडू लागला तो म्हणाला. BSB BSB: As Jesus approached Jerusalem and saw the city, He wept over it
42 UDB “देवाची शांती कशी स्वीकारावी हे तुम्हा लोकांना कळायला हवे होते अशी माझी मनोमन इच्छा आहे. आत तुम्ही ते जाणणे अशक्य आहे. BSB BSB: and said, “If only you had known on this day what would bring you peace! But now it is hidden from your eyes.
43 UDB माझी इच्छा आहे की तुम्ही हे सामजावे: लवकरच तुमचे शत्रू येतील आणि तुमच्या शहाराभोवती बांधणी करतील. ते शहराला सगळीकडून वेढतील आणि सर्व बाजूंनी BSB BSB: For the days will come upon you when your enemies will barricade you and surround you and hem you in on every side.
44 UDB ते ह्या भिंती तोडतील आणि सर्व काही नाश करतील आणि तुम्हांला तुमच्या मुलाबाळांना. सर्व काही नाश केल्यानंतर दगडावर एक दगडही उरणार नाही. देव तुमचा बचाव करण्यासाठी आला होता ते तुम्ही ओळखले नाही म्हणून हे सगळे तुम्हा संगती घडेल!” BSB BSB: They will level you to the ground—you and the children within your walls. They will not leave one stone on another, because you did not recognize the time of your visitation from God.”
45 UDB येशूने यरुशलेमेत प्रवेश केला आणि तो मंदिराच्या अंगणात गेला. लोक तेथे वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू विकत आहेत हे त्याने पाहिले, BSB BSB: Then Jesus entered the temple courts and began to drive out those who were selling there.
46 UDB आणि तो त्यांना तेथून हाकलून देऊ लागला. तो त्यांना म्हणाला, “शास्त्र लेखात असे लिहिले आहे की, ‘माझे घर हे प्रार्थनेचे घर व्हावे जेथे लोक प्रार्थना करतील अशी माझी इच्छा आहे,’ ‘परंतु तुम्ही त्याला लुटारूंची गुहा बनवली आहे!” BSB BSB: He declared to them, “It is written: ‘My house will be a house of prayer.’ But you have made it ‘a den of robbers.’”
47 UDB त्या आठवड्यात येशू लोकांना मंदिराच्या अंगणात शिकवण देत असे मुख्य याजक, धार्मिक नियमांचे शिक्षक, यहूदी पुढारी त्याला ठार मारण्याचा मार्ग शोधत होते. BSB BSB: Jesus was teaching at the temple every day, but the chief priests, scribes, and leaders of the people were intent on killing Him.
48 UDB परंतु त्यांना तसे करता येईना कारण लोक त्याचे ऐकण्यास फार उत्सुक होते. BSB BSB: Yet they could not find a way to do so, because all the people hung on His words.