1 UDB मग पवित्र आत्म्याने भरल्यानंतर, येशूने यार्देन नदी सोडली, आणि पवित्र आत्म्याने त्याला रानात नेले. BSB BSB: Then Jesus, full of the Holy Spirit, returned from the Jordan and was led by the Spirit into the wilderness,
2 UDB पवित्र आत्मा त्याला चाळीस दिवसांपर्यंत रानात घेऊन गेला. तो तेथे असतांना, सैतानाने त्याची सतत परिक्षा घेतली. त्या संपूर्ण वेळेत येशू हा रानात होता. आणि त्याने काहीही खाल्ले नाही, मग जेव्हा चाळीस दिवस संपले, तेव्हा त्याला अतिशय भुक लागली. BSB BSB: where for forty days He was tempted by the devil. He ate nothing during those days, and when they had ended, He was hungry.
3 UDB तेव्हा सैतान येशूला म्हणाला, “तू खरोखर देवाचा पुत्र आहेस तर, तुला खाण्यासाठी ह्या धोडंयाची भाकर व्हावी अशी आज्ञा कर!” BSB BSB: The devil said to Him, “If You are the Son of God, tell this stone to become bread.”
4 UDB येशूने उत्तर दिले, “नाही, मी तसे करणार नाही, कारण शास्त्रालेखांमध्ये असे लिहिले आहे, ‘लोकांना जगण्यासाठी अन्नापेक्षाही इतर काहीची आवश्यकता असते.’” BSB BSB: But Jesus answered, “It is written: ‘Man shall not live on bread alone.’”
5 UDB मग सैतान येशूला उंच पर्वताच्या माथ्यावर घेऊन गेला आणि त्याला एका क्षणात जगातली सर्व राष्ट्रे दाखवली. BSB BSB: Then the devil led Him up to a high place and showed Him in an instant all the kingdoms of the world.
6 UDB मग सैतान येशूला म्हणाला, “मी तुला ह्या सर्व राष्ट्रांवर शासन करण्याचा अधिकार देईन आणि त्या सर्व प्रदेशांचे वैभव आणि संपत्ती तुझ्या ताब्यात देईन. कारण देवाने मला ह्या सगळ्यांवर नियंत्रण ठेवण्याची परवानगी दिली आहे, आणि म्हणून मी त्यांच्याबरोबर जे काही करू इच्छितो ते करू शकतो. BSB BSB: “I will give You authority over all these kingdoms and all their glory,” he said. “For it has been relinquished to me, and I can give it to anyone I wish.
7 UDB जर तू माझी उपासना करशील, तर मी ह्या सर्वांवर तुला राज्य करण्यास अधिकार देईन!” BSB BSB: So if You worship me, it will all be Yours.”
8 UDB पण येशूने उत्तर दिले, “नाही, मी तुझी उपासना करणार नाही, कारण शास्त्रालेखामध्ये असे लिहिले आहे, ‘तू केवळ तुझा देव प्रभू परमेश्वर, याचीच उपासना करावी. ज्याची तू सेवा करावी असा केवळ तोच एकमेव आहे!’” BSB BSB: But Jesus answered, “It is written: ‘Worship the Lord your God and serve Him only.’”
9 UDB नंतर सैतानाने येशूला यरुशलेमेस नेले. त्याने त्याला मंदिराच्या सर्वात उंच टोकावर उभे केले आणि म्हटले, “जर तू खरोखर देवाचा पुत्र आहेस, तर येथून खाली उडी टाक. BSB BSB: Then the devil led Him to Jerusalem and set Him on the pinnacle of the temple. “If You are the Son of God,” he said, “throw Yourself down from here.
10 UDB कारण शास्त्रालेखांमध्ये असे लिहिले आहे, ‘तुला इजा होऊ नये म्हणून, ‘देव तुझे रक्षण करण्यासाठी त्याच्या देवदूतांना आज्ञा देईल.’ BSB BSB: For it is written: ‘He will command His angels concerning You to guard You carefully,
11 UDB आणि असे देखील म्हटले आहे, ‘तू पडू नये आणि तुला इजा होऊ नये म्हणून ते तुला त्यांच्या हातावर उचलून धरतील, तुझ्या पायाला धोंडयांची साधी ठेच देखील लागणार नाही.’” BSB BSB: and they will lift You up in their hands, so that You will not strike Your foot against a stone.’”
12 UDB परंतु येशू त्याला म्हणाला, “नाही, मी तसे करणार नाही, कारण शास्त्रलेखांत असेही लिहिले आहे: ‘आपला देव परमेश्वर ह्याची परिक्षा घेण्याचा प्रयत्न करू नको.” BSB BSB: But Jesus answered, “It also says, ‘Do not put the Lord your God to the test.’”
13 UDB तेव्हा, सैतानाने बऱ्याच मार्गांनी येशूला मोहात पाडण्याचा प्रयत्न केल्यानंतर, काही वेळेसाठी तो त्याला सोडून निघून गेला. BSB BSB: When the devil had finished every temptation, he left Him until an opportune time.
14 UDB ह्यानंतर, येशू अरण्यातून निघून आला आणि गालील जिल्ह्यात परतला. पवित्र आत्मा त्याला सक्षम करीत गेला. त्या संपूर्ण प्रदेशात, लोकांनी येशूविषयी ऐकले व त्याच्याबद्दल इतरांना सांगितले. BSB BSB: Jesus returned to Galilee in the power of the Spirit, and the news about Him spread throughout the surrounding region.
15 UDB त्याने लोकांना त्यांच्या सभास्थानांमध्ये शिकविले आणि त्याच्या शिकवणीमूळे लोक त्याची प्रशंसा करू लागले. BSB BSB: He taught in their synagogues and was glorified by everyone.
17 UDB सभास्थानाच्या एका सेवकाने त्याच्या हातात यशया संदेष्टयाने फार पूर्वी लिहिलेले लेख असलेला एक ग्रंथपट दिला. येशूने तो ग्रंथपट उघडला आणि त्यात जेथे असे शब्द लिहिलेले आहेत तो भाग काढला: BSB BSB: the scroll of the prophet Isaiah was handed to Him. Unrolling it, He found the place where it was written:
18 UDB “प्रभूचा आत्मा माझ्यामध्ये आहे. त्याने मला गरीब लोकांना देवाच्या सुवार्तेची घोषना करण्यास नियुक्त केले आहे. कैदी मुक्त होतील अशी घोषणा करण्यासाठी आणि जे आंधळे आहेत ते पुन्हा पाहू शकतील हे त्यांना सांगण्यासाठी, त्याने मला येथे पाठवले आहे. रंजलेल्या-गांजलेल्या लोकांना मी मुक्त करीन. BSB BSB: “The Spirit of the Lord is on Me, because He has anointed Me to preach good news to the poor. He has sent Me to proclaim liberty to the captives and recovery of sight to the blind, to release the oppressed,
19 UDB प्रभूने लोकांसाठी अनुकूल कार्य करण्याची आता वेळ आली आहे, हे घोषित करण्यासाठी त्याने मला येथे पाठवले आहे. BSB BSB: to proclaim the year of the Lord’s favor.”
20 UDB मग त्याने तो ग्रंथपट लपेटला आणि सेवकाला परत केला, आणि तो जाऊन खाली बसला. तेव्हा सभास्थानातील सर्वजण त्याच्याकडे निरखून पाहत होते. BSB BSB: Then He rolled up the scroll, returned it to the attendant, and sat down. The eyes of everyone in the synagogue were fixed on Him,
21 UDB तो त्यांना म्हणाला, “आज जो हा शास्त्रलेख तुम्ही ऐकला तो पूर्ण झाला आहे.” BSB BSB: and He began by saying, “Today this Scripture is fulfilled in your hearing.”
22 UDB तेथे उपस्थित असणाऱ्या सर्वांनी ते ऐकले आणि त्यांना आश्चर्य वाटले की हा इतका चांगला कसा बोलू शकतो. मग काही लोकांनी म्हटले, “हा तर योसेफाचाच मुलगा आहे ना?” BSB BSB: All spoke well of Him and marveled at the gracious words that came from His lips. “Isn’t this the son of Joseph?” they asked.
23 UDB तो त्यांना म्हणाला, “तुम्हापैकी काहीजण मला अशी म्हण लावतील, ‘अरे वैद्या, स्वतःलाच बरे कर!’ तू जसे तुझ्या स्वतःच्या गावी चमत्कार केले तसे तू कफर्णहूमांतही कर!’” BSB BSB: Jesus said to them, “Surely you will quote this proverb to Me: ‘Physician, heal yourself! Do here in Your hometown what we have heard that You did in Capernaum.’”
24 UDB मग तो त्यांना म्हणाला, “हे निश्चितच सत्य आहे की, संदेष्ट्याच्या स्वतःच्या गावातील लोक त्याच्या संदेशाचा स्वीकार करत नाहीत. BSB BSB: Then He added, “Truly I tell you, no prophet is accepted in his hometown.
25 UDB परंतु ह्याचा विचार करा: एलीया संदेष्ट्यांच्या काळात इस्राएलामध्ये पुष्कळ विधवा राहत होत्या, त्यावेळेस सर्व देशभरात साडेतीन वर्ष पाऊस पडला नाही म्हणून, भयंकर दुष्काळ पडला. BSB BSB: But I tell you truthfully that there were many widows in Israel in the time of Elijah, when the sky was shut for three and a half years and great famine swept over all the land.
26 UDB परंतु देवाने इस्राएलामध्ये असलेल्या विधवांच्या मदतीसाठी एलीयाला पाठवले नाही. देवाने त्याला सिदोन प्रदेशातील सारफथ येथे इस्राएली नसलेल्या अशा एका विधवेला मदत करण्यास पाठविले. BSB BSB: Yet Elijah was not sent to any of them, but to the widow of Zarephath in Sidon.
27 UDB एलीया संदेष्ट्याच्या काळात पुष्कळसे कुष्ठरोगी इस्त्राएलामध्ये होते. पण एलीयाने त्यातील कोणालाही बरे केले नाही, परंतु सिरीयातील यहूदी नसलेल्या नामानाला बरे केले.” BSB BSB: And there were many lepers in Israel in the time of Elisha the prophet. Yet not one of them was cleansed—only Naaman the Syrian.”
28 UDB त्याने हे म्हटलेले सभास्थानातील सर्व लोकांनी हे ऐकले, तेव्हा ते फार संतापले. BSB BSB: On hearing this, all the people in the synagogue were enraged.
29 UDB म्हणून ते सर्व उठले आणि त्याला त्यांनी गावाबाहेर काढले. त्यांनी त्याला गावाबाहेरील एका डोंगराच्या माथ्यावर नेले, ते त्याला तेथील कड्यावरून ढकलून देऊन ठार करणार होते. BSB BSB: They got up, drove Him out of the town, and led Him to the brow of the hill on which the town was built, in order to throw Him over the cliff.
30 UDB परंतु तो अगदी सहज चालत त्यांच्यामधून निघून गेला. BSB BSB: But Jesus passed through the crowd and went on His way.
31 UDB एके दिवशी तो गालील जिल्ह्यातील कफर्णहूम या शहरात आपल्या शिष्यांबरोबर खाली गेला. पुढील शब्बाथ दिवशी, त्यांनी लोकांना सभास्थानामध्ये शिकविले. BSB BSB: Then He went down to Capernaum, a town in Galilee, and on the Sabbath He began to teach the people.
32 UDB त्यांना त्याच्या शिक्षणा बद्दल सतत आश्चर्य वाटले कारण तो अधिकाराने बोलत असे. BSB BSB: They were astonished at His teaching, because His message had authority.
33 UDB त्या दिवशी, सभास्थानामध्ये एक मनुष्य होता त्याला एका दृष्ट आत्म्याने पछाडले होते. तो मनुष्य मोठ्याने ओरड्ला, BSB BSB: In the synagogue there was a man possessed by the spirit of an unclean demon. He cried out in a loud voice,
34 UDB “हे! नासरेथकरापासून आलेल्या येशू! आम्ही दृष्ट आत्म्याचे तुझ्याविषयी आम्हांला काही घेणे देणं नाही! आमचा नाश करावयास तू आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे, देवापासून आलेला तू एक पवित्र आहेस!” BSB BSB: “Ha! What do You want with us, Jesus of Nazareth? Have You come to destroy us? I know who You are—the Holy One of God!”
35 UDB येशू ने दृष्ट आत्म्याला असे म्हणून धमकावले, “गप्प राहा व याच्यातून बाहेर निघ” मग त्या भूताने त्या मनुष्याला लोकांमध्ये पाडून काही उपद्रव न करिता त्यांच्यातून निघून गेला. BSB BSB: But Jesus rebuked the demon. “Be silent!” He said. “Come out of him!” At this, the demon threw the man down before them all and came out without harming him.
36 UDB सभास्थानामध्ये असलेले सर्व लोक खूप आश्चर्यचकित झाले. ते एकमेकांना म्हणाले, “तो आत्मविश्वासाने बोलतो, आणि त्याच्या शब्दामध्ये फार सामर्थ्य आहे! दृष्ट आत्मे देखील त्याच्या आज्ञा पाळतात आणि तो त्यांना आज्ञा देतो, तेव्हा ते लोकांमधून बाहेर येतात” BSB BSB: All the people were overcome with amazement and asked one another, “What is this message? With authority and power He commands the unclean spirits, and they come out!”
37 UDB आणि आसपासच्या प्रदेशांमध्ये प्रत्येक ठिकाणी, येशूने जे केले त्या बद्दल लोक सतत बोलत असत. BSB BSB: And the news about Jesus spread throughout the surrounding region.
38 UDB मग येशूने सभास्थान सोडले आणि शिमोनाच्या घरी गेला. शिमोनाची सासू आजारी होती आणि तिला खूप ताप आला होता. तेथे असलेल्या काही लोकांनी येशूला तिला बरे करावे म्हणून विनंती केली. BSB BSB: After Jesus had left the synagogue, He went to the home of Simon, whose mother-in-law was suffering from a high fever. So they appealed to Jesus on her behalf,
39 UDB म्हणून तो तिच्याजवळ उभा राहिला आणि त्या तापाला तिला सोडून जाण्यास त्याने आज्ञा केली. तत्क्षणी ती बरी झाली! ती उठली आणि तिने त्यांना जेवण वाढले. BSB BSB: and He stood over her and rebuked the fever, and it left her. And she got up at once and began to serve them.
40 UDB त्या दिवशी सूर्य मावळत होता, तेव्हा बऱ्याच लोकांनी आपल्या मित्रांना किंवा जे विविध रोगांनी आजारी पडले होते त्या नातेवाईकांना येशूकडे आणले. त्याने त्याचे हात त्यांच्यावर ठेवले आणि त्या सर्वांना बरे केले. BSB BSB: At sunset, all who were ill with various diseases were brought to Jesus, and laying His hands on each one, He healed them.
41 UDB अनेक लोकांमधून दृष्ट आत्म्यांना बाहेर येण्यास दटाविले, ज्यावेळेस दृष्ट आत्मे लोकांना सोडत होते तेव्हा ते मोठ्याने आरोळी मारत येशूला म्हणत होते, “तू देवाचा पुत्र आहेस!” परंतु त्याने त्या दृष्ट आत्म्याला त्याच्याबद्दल लोकांना सांगू नये अशी आज्ञा दिली, कारण त्यांना ठाऊक होते तो मसीहा आहे. BSB BSB: Demons also came out of many people, shouting, “You are the Son of God!” But He rebuked the demons and would not allow them to speak, because they knew He was the Christ.
42 UDB दुसऱ्या दिवशीच्या अगदी पहाटे येशूने ते घर सोडले आणि प्रार्थना करण्यासाठी तो एका निर्जन जागी गेला. असंख्य लोक त्याला शोधत होते, आणि ज्यावेळेस तो त्यांना सापडला तेव्हा त्याने त्यांना सोडून जाऊ नये म्हणून विनंती करू लागले. BSB BSB: At daybreak, Jesus went out to a solitary place, and the crowds were looking for Him. They came to Him and tried to keep Him from leaving.
43 UDB परंतु तो त्यांना म्हणाला, “मला इतर लोकांना देखील त्यांच्या शहरात जाऊन देव कसा सर्वांवर राज्य करणार आहे हा संदेश सांगायचा आहे, कारण ते करण्याकरिता मला पाठवले आहे.” BSB BSB: But Jesus told them, “I must preach the good news of the kingdom of God to the other towns as well, because that is why I was sent.”
44 UDB म्हणून त्याने यहूदीया प्रांतातील वेगवेगळ्या शहरांमधील सभास्थानांमध्ये उपदेश देणे चालू ठेवले. BSB BSB: And He continued to preach in the synagogues of Judea.