2 UDB येशू जेथे राहत होता तेथे मोठा लोकसमुदाय एकत्र जमला. खुप गर्दी असल्याने घरात पुरेशी जागा उरली नाही. तेथे उभे राहण्यासाठीही जागा नव्हती, तसेच अंगणातही जागा नव्हती. येशूने देवाचा संदेश त्यांना सांगितला. BSB BSB: they gathered in such large numbers that there was no more room, not even outside the door, as Jesus spoke the word to them.
3 UDB काही लोक एका पक्षघाती माणसाला येशूजवळ घरामध्ये घेऊन आले. चार माणसांनी त्याला खाटेवर उचलून आणले होते. BSB BSB: Then a paralytic was brought to Him, carried by four men.
4 UDB लोक समुदाय पुष्कळ असल्यामुळे त्यांना त्या मनुष्याला येशूकडे घेऊन जाणे शक्य नव्हते. त्यामुळे, ते घराच्या छतावर गेले आणि येशू जेथे उभा होता तेथे त्यांनी छत उकलून मोठे भगदाड पाडले. त्यांनी येशूच्या समोर पक्षघाती मनुष्याला अंथरुना सोबत उकललेल्या छतातून खाली सोडले. BSB BSB: Since they were unable to get to Jesus through the crowd, they uncovered the roof above Him, made an opening, and lowered the paralytic on his mat.
6 UDB यहूदी नियमशास्त्र शिकवणारे काही पुरुष तेथे बसले होते. त्यांनी स्वत:शी विचार करण्यास सुरूवात केली. BSB BSB: But some of the scribes were sitting there and thinking in their hearts,
7 UDB “हा मनुष्य स्वतःला काय समजतो? तो गर्विष्ठ आहे आणि असे बोलल्याने देवाचा अपमान करतो! फक्त देवच पापांची क्षमा करू शकतो!” BSB BSB: “Why does this man speak like this? He is blaspheming! Who can forgive sins but God alone?”
8 UDB येशूला समजले ते त्यांच्या मनात काय विचार करत आहे. तो त्यांना म्हणाला, “तुम्ही ह्या गोष्टीचा विचार का करत आहात? BSB BSB: At once Jesus knew in His spirit that they were thinking this way within themselves. “Why are you thinking these things in your hearts?” He asked.
9 UDB मला काय सांगणे सोपे होईल, ‘मी तुझ्या पापांची क्षमा केली आहे’ किंवा ‘ऊठ! आपले अंथरुन उचल आणि चालू लाग’? BSB BSB: “Which is easier: to say to a paralytic, ‘Your sins are forgiven,’ or to say, ‘Get up, pick up your mat, and walk’?
10 UDB मी तुम्हाला दाखून देईन मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे.” मग तो पक्षघाती मनुष्याला म्हणाला, BSB BSB: But so that you may know that the Son of Man has authority on earth to forgive sins...” He said to the paralytic,
12 UDB सगळे लोक पाहत असतांना, लागलेच तो मनुष्य ऊठून उभा राहिला! त्याने अंथरुन उचलले, आणि मग तो निघून गेला. हे पाहून सर्व आश्चर्यचकित झाले, आणि देवाची स्तुती करत म्हनाले, “आता घडलेली गोष्ट आम्ही यापूर्वी कधीही पाहिली नाही!” BSB BSB: And immediately the man got up, picked up his mat, and walked out in front of them all. As a result, they were all astounded and glorified God, saying, “We have never seen anything like this!”
13 UDB येशूने कफर्णहूम सोडले आणि गालील समुद्राच्या किनाऱ्याजवळून गेला. लोकांचा मोठा समुदाय त्याच्याकडे आला आणि त्याने त्यांना शिकविले. BSB BSB: Once again Jesus went out beside the sea. All the people came to Him, and He taught them there.
14 UDB तो चालत असता, त्याने लेवी नावाच्या मनुष्याला पाहिले त्याच्या पित्याचे नाव अल्फी होते. तो आपल्या कार्यालयात बसत असून तेथे कर जमा करत असे. येशूने त्याला म्हटले, “माझ्या सोबत ये.” तो ऊठला आणि येशूसोबत गेला. BSB BSB: As He was walking along, He saw Levi son of Alphaeus sitting at the tax booth. “Follow Me,” He told him, and Levi got up and followed Him.
15 UDB नंतर, येशू लेवीच्या घरी जेवण करत होता. येशू आणि त्याच्या शिष्यांबरोबर पुष्कळ पापी आणि कर गोळा करणारे जेवत होते. BSB BSB: While Jesus was dining at Levi’s house, many tax collectors and sinners were eating with Him and His disciples—for there were many who followed Him.
16 UDB यहूदी नियमशास्त्राचे शिक्षण देणारे आणि परुशी पंथाच्या सदस्यांनी येशूला पापी जण व कर गोळा करणाऱ्यांसोबत जेवतांना पाहिले. त्यांनी येशूच्या शिष्यांना विचारले, “तो पापी जण आणि कर गोळा करणाऱ्या लोकांबरोबर का खातो आणि पितो?” BSB BSB: When the scribes who were Pharisees saw Jesus eating with these people, they asked His disciples, “Why does He eat with tax collectors and sinners?”
18 UDB आता यावेळी, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शिष्य आणि परुशी पंथाचे काही सदस्य अन्नाचे सेवन करत नसत (उपास), ते असे नियमीत करत असत. त्यातले काही मनुष्य येशूकडे आले आणि त्यांनी त्याला विचारले, “योहानाचे शिष्य आणि परुशी अन्नाचे सेवन करत नाहीत (उपास). तुमचे शिष्य अन्नाचे सेवन (उपास) का करतात?” BSB BSB: Now John’s disciples and the Pharisees were often fasting. So people came to Jesus and asked, “Why don’t Your disciples fast like John’s disciples and those of the Pharisees?”
19 UDB येशू त्यांना म्हणाला, “जेव्हा एखादा माणूस एखाद्या स्त्रीशी लग्न करतो, तो सोबत असे पर्यंत त्याच्या मित्रांना उपास करणे नक्कीच शक्य होणार नाही. लग्न हे वरासह मेजवानी आणि उत्सव साजरा करण्याची वेळ आहे, विशेषतः जेव्हा वर त्यांच्यासोबत आहे. BSB BSB: Jesus replied, “How can the guests of the bridegroom fast while He is with them? As long as He is with them, they cannot fast.
20 UDB परंतु एक दिवस, वराला त्यांच्यापासून काढून घेण्यात येईल. मग त्या दिवसामध्ये, ते अन्नापासून दूर राहतील.” BSB BSB: But the time will come when the bridegroom will be taken from them; then they will fast.
21 UDB येशू त्यांच्याकडे वर जाऊन म्हणाला, “लोक जुन्या कपड्याला दुरुस्ती करण्यासाठी नविन कपड्याचे ठिगळ लावत नाहीत. त्यांनी ते केले, जेव्हा ते कपडे धुतील, तेव्हा ठिगळ लहान होईल आणि नविन कपडा जुन्याला अजून जास्त फाडून टाकेल. परिणामी, छिद्र अजून मोठे होईल! BSB BSB: No one sews a patch of unshrunk cloth on an old garment. If he does, the new piece will pull away from the old, and a worse tear will result.
22 UDB त्याचप्रमाणे, लोक नवा द्राक्षारस साठवून ठेवण्यासाठी जुन्या कातडी पिशव्यांचा उपयोग करत नाहीत. जर त्यांनी तसे केले, तर नवा द्राक्षारस कातडी पिशवी खराब करेल कारण नवा द्राक्षारस जेव्हा आंबून जातो आणि विस्तृत होतो तेव्हा नव्या द्राक्षारसमुळे जुन्या कातडी पिशव्या फाटून जातात. परिणामी द्राक्षारस आणि कातडी पिशवी दोन्हींचा नाश होईल! त्याउलट, लोक नवा द्राक्षारस नव्या कातडी पिशवीत ठेवतात!” BSB BSB: And no one pours new wine into old wineskins. If he does, the wine will burst the skins, and both the wine and the wineskins will be ruined. Instead, new wine is poured into new wineskins.”
24 UDB काही परुशांनी पाहिले ते काय करत आहेत आणि ते येशूला म्हणाले, “पाहा! ते शब्बाथा विषयीचा यहूदी नियम मोडत आहेत. ते असे का करत आहेत?” BSB BSB: So the Pharisees said to Him, “Look, why are they doing what is unlawful on the Sabbath?”
26 UDB अब्याथार मुख्य याजक असतांना, दावीद देवाच्या मंदिरात गेला आणि त्याने काही भाकरीसाठी विचारले. देवाला समर्पण केलेल्या भाकरींपैकी मुख्य याजकाने त्याला काही दिल्या. आपल्या नियमाप्रमाणे, फक्त याजकच त्या भाकरी खाऊ शकतो! परंतु दावीदानेही त्यातले काही खाल्ले. मग त्यातून काही त्याने आपल्या सोबतच्या माणसांना सुध्दा दिल्या.” BSB BSB: During the high priesthood of Abiathar, he entered the house of God and ate the consecrated bread, which was lawful only for the priests. And he gave some to his companions as well.”
27 UDB पुढे येशू त्यांना म्हणाला, “शब्बाथ हा लोकांच्या गरजासाठी स्थापन करण्यात आला होता. शब्बाथाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी लोकांना बनविले नाही! BSB BSB: Then Jesus declared, “The Sabbath was made for man, not man for the Sabbath.
28 UDB म्हणून, लक्षात ठेवा, मनुष्याचा पुत्र अगदी शब्बाथाचाही प्रभू आहे!” BSB BSB: Therefore, the Son of Man is Lord even of the Sabbath.”