1 UDB मी, पौल, ख्रिस्त येशूची सेवा करणारा, एक कैदी आहे. आमचा सहविश्वासू बंधू, तीमथ्य याच्यासोबत मी येथे आहे. आमचा प्रिय मित्र आणि सोबतीचा कामकरी, फिलेमोना, हे पत्र मी तुला लिहित आहे. BSB BSB: Paul, a prisoner of Christ Jesus, and Timothy our brother, To Philemon our beloved fellow worker,
2 UDB आमचा सहविश्वासू बांधव, अफ्फिया आणि आमच्या सोबत एका सैनिकासारखा आहे जो आमच्या सोबत सेवा करतो तो अर्खिप्पा, याला देखील मी हे लिहित आहे. आणि तुझ्या घरात भेटणाऱ्या विश्वासणाऱ्याच्या समूहाला हे मी लिहित आहे. BSB BSB: to Apphia our sister, to Archippus our fellow soldier, and to the church that meets at your house:
3 UDB आमचा देव पिता आणि आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा तुमच्या सर्वांवर सतत प्रेमळपणाच्या कृती करत राहो ही मी प्रार्थना करतो. त्याने सतत तुमच्यावर शांती देत राहण्याचे त्याने कायम असावे ही मी प्रार्थना करतो. BSB BSB: Grace and peace to you from God our Father and the Lord Jesus Christ.
4 UDB मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो, तेव्हा मी नेहमी देवाचे आभार मानतो, BSB BSB: I always thank my God, remembering you in my prayers,
5 UDB कारण प्रभू येशूमध्ये तुम्ही किती भरवसा ठेवता याबद्दल मी नेहमी ऐकत असतो. तुम्ही सतत किती प्रेमळपणे राहता आणि सर्व विश्वासणाऱ्यांना फार मदत करता याबद्दल देखील मी ऐकतो. BSB BSB: because I hear about your faith in the Lord Jesus and your love for all the saints.
6 UDB ख्रिस्तामध्ये आम्ही विश्वास ठेवतो त्यासारखाच तुम्ही देखील ठेवत आहात, म्हणून ख्रिस्ता संबंधित असलेली प्रत्येक चांगली गोष्ट जी आम्हाला तुम्हाला द्यायची आहे ती जाणून घेण्यासाठी तुम्ही सक्षम व्हावे ही मी प्रार्थना करतो. BSB BSB: I pray that your partnership in the faith may become effective as you fully acknowledge every good thing that is ours in Christ.
7 UDB माझ्या प्रिय मित्रा, तुझे देवाच्या लोकांवर प्रेम आहे आणि त्यांना तू मदत करत आहे, म्हणून मला खूप आनंद आणि खूप धीटपणा वाटत आहे. BSB BSB: I take great joy and encouragement in your love, because you, brother, have refreshed the hearts of the saints.
8 UDB तू काहीतरी करावे म्हणून मला तुम्हाला विचारायचे आहे. मी ख्रिस्ताचा एक प्रेषित आहे, म्हणून तुम्ही काय करायला हवे ही आज्ञा तुम्हाला करण्याचा मला अधिकार आहे याबद्दल मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे. BSB BSB: So although in Christ I am bold enough to order you to do what is proper,
9 UDB पंरतु देवाच्या लोकांवर तू प्रेम करतो, हे मला माहिती आहे म्हणून आज्ञा करण्याऐवजी ते करण्याची तुम्हाला मी विनंती करतो. एक वृद्ध झालेला मनुष्य, मी पौल आहे, आणि मी ख्रिस्ताची सेवा करतो म्हणून आता एक बंदिवान देखील आहे, मी त्यासाठी विनंती करतो आहे. BSB BSB: I prefer to appeal on the basis of love. For I, Paul, am now aged, and a prisoner of Christ Jesus as well.
10 UDB अनेसिमबद्दल तू काहीतरी करावे ही मी विनंती करतो आहे. मी येथे तुरूंगात असता ख्रिस्ताबद्दल त्याला सांगितले म्हणून तो आता मला माझ्या मुलासारखा झाला आहे. BSB BSB: I appeal to you for my child Onesimus, whose father I became while I was in chains.
11 UDB तू ओळखत असल्याप्रमाणे त्याच्या नावाचा अर्थ, “उपयुक्त” असला तरी भूतकाळात तुमच्यासाठी तो निरूपयोगी असा होता. परंतु आता तो दोघांनाही माझ्यासाठी आणि तुझ्या उपयोगी आहे! BSB BSB: Formerly he was useless to you, but now he has become useful both to you and to me.
12 UDB जरी तो मला फार प्रिय आहे तरी मी त्याला तुझ्याकडे परत पाठवत आहे. BSB BSB: I am sending back to you him who is my very heart.
13 UDB तुझ्या जागी तो माझी सेवा करू शकेल त्या अनुसार त्याला माझ्या सोबत ठेवायला मला आवडेल. ख्रिस्ताबद्दलच्या माझ्या उपदेशामुळे मी तुरूंगात आहे म्हणून मला त्याची गरज आहे. BSB BSB: I would have liked to keep him with me, so that on your behalf he could minister to me in my chains for the gospel.
14 UDB तथापि, मी अजून तुला विचारले नाही आणि तू त्याला माझ्याबरोबर येथे ठेवण्याची अजून परवानगी दिली नाही म्हणून त्याला येथे न ठेवण्याचे मी ठरविले आहे. तुम्हाला खरोखर माझी मदत करण्याची इच्छा असेल तरच केवळ तुम्ही माझी मदत केली पाहिजे हे मी ठरविले आहे. BSB BSB: But I did not want to do anything without your consent, so that your goodness will not be out of compulsion, but by your own free will.
17 UDB म्हणून तू आणि मी एकत्र मिळून देवाचे कार्य करत आहोत हा विश्वास तू ठेवत आहे, तर तू माझे स्वागत केले तसेच त्याचे देखील करा. BSB BSB: So if you consider me a partner, receive him as you would receive me.
18 UDB जर त्याने तुला कोणत्याही प्रकारे हानी केली असेल किंवा जर त्याला तुझे काही देणे लागत असेल, तर त्याबद्दलची ती जबाबदारी माझ्यावर सोड. BSB BSB: But if he has wronged you in any way or owes you anything, charge it to my account.
19 UDB मी पौल हे मी आता स्वहस्ते लिहित आहे; तुझे जे त्याचे देणे आहे त्याची मी तुला परतफेड करीन. अनेसिमने तुझे जे देणे आहे त्यापेक्षा तुला माझे देणे जास्त आहे, कारण ज्या गोष्टी मी तुला सांगितल्या आहे त्यामुळे तू तुझे स्वतःचे जीवन वाचविले आहे असे मी तुला म्हणू शकतो. BSB BSB: I, Paul, write this with my own hand. I will repay it—not to mention that you owe me your very self.
20 UDB होय बंधु, प्रभूच्या ठायी माझ्यावर एवढा उपकार कर, आम्ही दोघेही ख्रिस्तामध्ये सामील झालेलो आहोत, माझे मन आनंदित कर. BSB BSB: Yes, brother, let me have some benefit from you in the Lord. Refresh my heart in Christ.
21 UDB मी तुला जे काही करण्यास सांगेन ते तू करशील ह्याची मला खात्री आहे, म्हणून मी हे पत्र तुला लिहित आहे. खरं तर, मी तूला जे काही करण्यास सांगणार आहे त्यापेक्षा अधिक तू करशील हे मला माहिती आहे. BSB BSB: Confident of your obedience, I write to you, knowing that you will do even more than I ask.
22 UDB तसेच, मला तुरुंगातून सोडले जाईल आणि मी तुमच्या सर्वांकडे येईल ह्या तुमच्या प्रार्थनेच्या परिणामाची आशा मी आत्मविश्वासाने धरत आहे म्हणून मला राहण्यासाठी एक पाहूण्याची खोली तयार करा. BSB BSB: In the meantime, prepare a guest room for me, because I hope that through your prayers I will be restored to you.
23 UDB एपफ्रास, ख्रिस्त येशूला तो एकत्र झाला आहे म्हणून तो माझ्यासोबत तुरूंगात दुःख सोशीत आहे, तो देखील तुला त्याचे अभिवादन पाठवत आहे. BSB BSB: Epaphras, my fellow prisoner in Christ Jesus, sends you greetings,
24 UDB माझे इतर सह कामकरी असणारे मार्क, अरिस्तार्ख, देमास व लूक हे देखील त्यांचे अभिवादन तुला पाठवत आहे. BSB BSB: as do Mark, Aristarchus, Demas, and Luke, my fellow workers.
25 UDB प्रभू येशू ख्रिस्त तुझ्यावर सतत दयाळू राहो ही मी प्रार्थना करतो. BSB BSB: The grace of the Lord Jesus Christ be with your spirit.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.