1 UDB तीत, आपल्या समाजाला चालवणारे नियम व कायदे यांचे, शक्य होईल तेवढे पालन करावे अशी आपल्या लोकांना नक्की आठवण करुन दे. प्रत्येक संधीत चांगले ते करता यावे म्हणून आपण आज्ञाधारक व तयार असण्याची गरज आहे. BSB BSB: Remind the believers to submit to rulers and authorities, to be obedient and ready for every good work,
2 UDB आपण कोणाविषयीही अपमानास्पद शब्द बोलू नये किंवा लोकांबरोबर वादविवाद करू नये. स्वतःचेच बोलणे खरे ठरवण्यापेक्षा इतर लोकांना प्राधान्य द्यावे आणि प्रत्येकाला सभ्यतेने वागवून घ्यावे हे चांगले आहे. BSB BSB: to malign no one, and to be peaceable and gentle, showing full consideration to everyone.
3 UDB कारण एके काळी आम्ही सर्व ह्या गोष्टींबाबत विचारहिन आणि निरुपयोगी होतो. विविध वासनांच्या आहारी गेलो होतो आणि जणू काय आम्ही त्यांचे गुलाम असल्याप्रमाणे सुखविलासाची सेवा केली. आम्ही एकमेकांची इर्षा आणि वाईट करण्यामध्येच आमचे जीवन व्यतित केले. लोकांनी आमचा तिरस्कार करावा असे आम्ही होतो आणि आम्ही एकमेकांचा तिरस्कार करत होतो. BSB BSB: For at one time we too were foolish, disobedient, misled, and enslaved to all sorts of desires and pleasures—living in malice and envy, being hated and hating one another.
4 UDB परंतु जेव्हा आमच्या तारणाऱ्या देवाची सर्व लोकांसाठीची दया आणि प्रीती प्रकट झाली तेव्हा, BSB BSB: But when the kindness of God our Savior and His love for mankind appeared,
5 UDB त्याने आम्हांला आतून स्वच्छ धुऊन, आम्हास नविन जन्म देवून, आणि पवित्र आत्म्याच्याद्वारे आम्हांस नविन करून आमचे तारण केले. आम्ही चांगले काम करतो म्हणून त्याने आमचे तारण केले नाही तर, तो दयाळू आहे म्हणून त्याने आमचे तारण केले आहे. BSB BSB: He saved us, not by the righteous deeds we had done, but according to His mercy, through the washing of new birth and renewal by the Holy Spirit.
6 UDB येशू मसीहाने आमचे तारण केले त्यावेळी देवाने आम्हांस उदारपणे त्याचा पवित्र आत्मा दिला. BSB BSB: This is the Spirit He poured out on us abundantly through Jesus Christ our Savior,
7 UDB त्याने हा उपहार देऊन, त्याच्या व आमच्यामध्ये सर्व काही यथायोग्य केल्याचे देवाने जाहिर केले. आणि त्यापेक्षाही अधिक, जे प्रभू येशू आम्हांला देणार आहे ते सर्व काही, विशेष करून त्याच्याबरोबर सार्वकालीक जीवन आम्ही प्राप्त करू. BSB BSB: so that, having been justified by His grace, we would become heirs with the hope of eternal life.
8 UDB हे विधान विश्वसनिय आहे. ह्या सर्व गोष्टींना महत्त्व देऊन तुम्ही त्या सतत करत राहाव्यात, अशी माझी इच्छा आहे जेणे करून देवाने पूर्वी नेमून दिलेल्या गोष्टींना करण्यास नेहमी स्वतःला अर्पण करावे. ह्या सर्व गोष्टी प्रत्येकांसाठी उत्कृष्ट व फायदेशीर आहेत. BSB BSB: This saying is trustworthy. And I want you to emphasize these things, so that those who have believed God will take care to devote themselves to good deeds. These things are excellent and profitable for the people.
9 UDB पण मूर्खपणाचे वादविवाद, गोंधळून टाकणाऱ्या यहुद्यांच्या वंशावळ्या, आणि धार्मिक कायद्यांच्या संबंधित वाद, ह्यांपासून दूर रहा. या सर्वांमुळे तुझी शक्ती व वेळ व्यर्थ वाया जाईल. BSB BSB: But avoid foolish controversies, genealogies, arguments, and quarrels about the law, because these things are pointless and worthless.
10 UDB जर तू एक किंवा दोन वेळा इशारा देवूनही लोक ह्या फुट पाडणाऱ्या कृत्यांमध्ये जाणीवपूर्वक सहभागी होत असतील तर, त्यांच्यासोबत पुढे काही संबंध ठेवू नको, BSB BSB: Reject a divisive man after a first and second admonition,
11 UDB कारण तसल्या प्रकारचे लोक सत्यापासून फिरले आहेत; ते पापात जगतात आणि स्वतःस दोषी ठरवितात. BSB BSB: knowing that such a man is corrupt and sinful; he is self-condemned.
12 UDB मी अर्तमाला किंवा तुखिकाला तुजकडे पाठवले म्हणजे होईल तितके करून माझ्याकडे निकपलिसास निघून ये, कारण तेथे हिवाळा घालवण्याचा मी निश्चय केला आहे. BSB BSB: As soon as I send Artemas or Tychicus to you, make every effort to come to me at Nicopolis, because I have decided to winter there.
13 UDB जेना कायदेपंडित व अपुल्लो यांना त्यांच्या प्रवासाकरिता आवश्यक होईल तितक्या तयारीने पाठव. BSB BSB: Do your best to equip Zenas the lawyer and Apollos, so that they will have everything they need.
14 UDB आपले लोक इतर लोकांच्या गरजा पूर्ण करतील असे चागंले कामधंदे शिकतील ह्याची खात्री कर. जर ते असे करतील तर ते देवासाठी फळ उत्पन्न करतील. BSB BSB: And our people must also learn to devote themselves to good works in order to meet the pressing needs of others, so that they will not be unfruitful.
15 UDB तीत, माझ्याबरोबरचे सर्वजण तुला सलाम सांगतात. जे लोक विश्वासातील बंधूसारखे आम्हांवर प्रीती करतात त्यांना ही सलाम सांग. तुम्हासर्वांबरोबर कृपा असो. आमेन. BSB BSB: All who are with me send you greetings. Greet those who love us in the faith. Grace be with all of you.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.