1 UDB परंतु तीत, लोकांना देवाविषयीच्या सत्यावर विश्वास ठेवण्यास मदत होईल अशा गोष्टी तू शिकवल्याच पाहीजेत. BSB BSB: But as for you, speak the things that are consistent with sound doctrine.
2 UDB वृद्ध पुरुषांनी सर्वदा स्वतःवर संयम ठेवावा. इतर लोक त्यांचा सन्मान करतील असे जीवन त्यांनी जगावे, आणि त्यांनी सुज्ञपणे बोलावे. त्यांनी देवाविषयीच्या सत्य गोष्टींवर विश्वास ठेवावा, इतरांवर खरी प्रीती करणारे आणि अशा गोष्टी सतत करत राहणारे देखील असावेत. BSB BSB: Older men are to be temperate, dignified, self-controlled, and sound in faith, love, and perseverance.
3 UDB पुरूषांप्रमाणेच, वृद्ध स्त्रियांनीही, त्या देवाचा अतिशय आदर करतात हे प्रत्येकाला कळेल असे जीवन जगावे. त्यांनी इतर लोकांविषयी निंदात्मक गोष्टी बोलू नये, आणि त्यांनी अधिक प्रमाणात द्राक्षारसाचे सेवन करू नये. परंतु त्यांनी इतरांना जे काही चांगले ते शिकवावे. BSB BSB: Older women, likewise, are to be reverent in their behavior, not slanderers or addicted to much wine, but teachers of good.
4 UDB अश्याप्रकारे, त्यांनी तरुण स्त्रियांना, शहाणपणाने विचार करण्याचे आणि आप-आपल्या पतींवर व मुलांबाळांवर प्रीती करण्याचे शिक्षण द्यावे. BSB BSB: In this way they can train the young women to love their husbands and children,
5 UDB तसेच वृद्ध स्त्रियांनी तरुण स्त्रियांना उत्तम विचारांचे मनन करणे, कोणत्याही पुरूषाप्रती वाईट न वागणे, घरी चांगले काम करण्याचे आणि त्यांचे पती त्यांना जे सांगतील ते त्यांनी ऐकावे असे शिक्षणही द्यावे. कोणीही देवाच्या वचनाची थट्टा करू नये यासाठी त्यांनी ह्या सर्व गोष्टी कराव्यात. BSB BSB: to be self-controlled, pure, managers of their households, kind, and submissive to their own husbands, so that the word of God will not be discredited.
6 UDB आणि तरुण पुरूषांबाबतीत, तर त्यांनाही शिकव. त्यांना स्वत:वर चांगले नियंत्रण ठेवण्यास सांग. BSB BSB: In the same way, urge the younger men to be self-controlled.
7 UDB माझ्या मुला तीत, तू तर, इतर लोकांना चांगली कामे कशी करावीत हे नेहमी दाखवून देत जा; तसेच विश्वासणाऱ्यांना देवाविषयी सत्य व जे काही चांगले आहे, हे तू प्रामाणिकपणे शिकवले असे त्यांना दाखवून दे. BSB BSB: In everything, show yourself to be an example by doing good works. In your teaching show integrity, dignity,
8 UDB कोणालाही टिका करता येणार नाही अशा प्रकारे लोकांना शिकव जेणेकरून जर कोणी तुला थांबवू इच्छितो, तर इतर लोक त्याला लाजवतील, कारण त्यांच्या जवळ आपल्या विषयी वाईट बोलण्यासाठी काहीच नसेल. BSB BSB: and wholesome speech that is above reproach, so that anyone who opposes us will be ashamed, having nothing bad to say about us.
9 UDB गुलामीत असलेल्या आमच्या बंधूंविषयी आणि त्यांच्या कुटूंबीयांविषयी: त्यांनी नेहमी त्यांच्या धन्याच्या अधीन असावे. शक्य होईल तेवढे, त्यांनी प्रत्येक बाबतीत असे जीवन जगावे की त्यांचा धनी संतुष्ट होईल आणि त्यांनी त्यांच्या सोबत वादविवाद करू नये. BSB BSB: Slaves are to submit to their own masters in everything, to be well-pleasing, not argumentative,
10 UDB त्यांनी आपल्या धन्यांपासून अगदी लहानशा वस्तूंचीही चोरी करू नये; त्याऐवजी, त्यांनी त्यांच्याशी विश्वासू राहीले पाहिजे, आणि त्यांनी सर्व काही अशा प्रकारे करावे की, आमच्या तारणकर्त्या देवाविषयी आम्ही जे सर्व काही शिकवले, त्याची लोकांमधे प्रशंसा व्हावी. BSB BSB: not stealing from them, but showing all good faith, so that in every respect they will adorn the teaching about God our Savior.
12 UDB देवापासून आलेली ही तारणाची कृपा आम्हांला प्रशिक्षीत करते की, आम्ही ह्या जगात आढळणाऱ्या इच्छांना नाही म्हणणाऱ्या मुलांप्रमाणे असावे. आम्ही ह्या जगात जीवन जगत असतांना योग्य पद्धतीने विचार करावा, प्रामाणिक राहावे, सत्यावर चालण्यास, आणि दुसऱ्या लोकांशी चांगले वागण्यास आणि सर्वदा देव आमच्या विचारात आणि कृतीत असण्यासाठी ते आम्हांला मदत करते. BSB BSB: It instructs us to renounce ungodliness and worldly passions, and to live sensible, upright, and godly lives in the present age,
13 UDB आणि त्याचवेळेस, देव जे काही भविष्यात निश्चितपणे करणार आहे, ते जे काही आहे ते आम्हांला अतिशय आनंदित करणार आहे, त्याची आम्ही वाट पाहावी असे तो आम्हांला शिकवतो: ते हे आहे, येशू मशीहा, आमचा उद्धारकर्ता आणि सामर्थ्यशाली देव, जो महान वैभवाने आमच्याकडे परत येईल. BSB BSB: as we await the blessed hope and glorious appearance of our great God and Savior Jesus Christ.
14 UDB आमच्या निर्बंध स्वभावातून मुक्त करण्यासाठी, प्रेमळ संतती बनवण्यासाठी, त्याने शुद्ध केलेली मौल्यवान प्रजा, व असे लोक ज्यांचा मोठा आंनद सर्व चांगली कृत्ये करण्यात आहे असे बनविण्यासाठी त्याने स्वतःला मरणासाठी खंडणी देवून आम्हाला मुक्त केले आहे. BSB BSB: He gave Himself for us to redeem us from all lawlessness and to purify for Himself a people for His own possession, zealous for good deeds.
15 UDB तीत, ह्या गोष्टीविषयी बोल. जे तुझे ऐकतात त्यांना मी वर्णन केल्याप्रमाणे जगण्यासाठी विनंती कर. आणि आपल्या बंधु-भगिणींना सुधारण्याची आवश्यक असल्यास तुझ्या अधिकाराचा पुर्णपणे वापर कर. जे तू सांगशिल त्याचे कोणीही उल्लंघन करू नये. BSB BSB: Speak these things as you encourage and rebuke with all authority. Let no one despise you.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.