1 UDB प्रिय तीत, मी देवाचा सेवक, आणि येशू ख्रिस्ताचा प्रेषित पौल आहे. मी देवाच्या लोकांनी त्याच्यावर अधिक विश्वास ठेवावा यासाठी मदत करण्याचे काम करतो. देवाने आम्हा सर्वांना त्याचे लोक होण्यासाठी निवडले आहे व त्यांना खरोखर देवाला संतोषकारक जीवन कसे जगावे हे कळावे याकरिता मदत करण्याचे काम मी करतो. BSB BSB: Paul, a servant of God and an apostle of Jesus Christ for the faith of God’s elect and their knowledge of the truth that leads to godliness,
2 UDB आपण सर्वकाळ जिवंत राहण्यासाठी देवाने अभिवचन दिले आहे, ह्याची त्यांना खात्री पटली आहे म्हणून आपण तसे जीवन जगले पाहिजे, हे त्याचे लोक शिकू शकतील. देव खोटे बोलत नाही. कारण जगाची स्थापना होण्यापूर्वीच, त्याने सार्वकालीक जीवनाचे अभिवचन आपल्याला दिले. BSB BSB: in the hope of eternal life, which God, who cannot lie, promised before time began.
3 UDB मग, योग्यवेळी, त्याचे वचन त्याने सर्वांना समजण्यासाठी सोपे केले, कारण त्याचा संदेश सांगण्यासाठी त्याने माझ्यावर भरवसा ठेवला आहे. आमचे तारण करणाऱ्या देवाकडून मिळणाऱ्या आज्ञेचे पालन करण्यासाठी मी हे करतो. BSB BSB: In His own time He has made His word evident in the proclamation entrusted to me by the command of God our Savior.
4 UDB हे तीत, तू तर मला मुलासारखा आहेस कारण आपण दोघेही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहोत. देव जो पिता आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त ह्याची दया व शांती तुझ्यावर निरंतर राहो. BSB BSB: To Titus, my true child in our common faith: Grace and peace from God the Father and Christ Jesus our Savior.
5 UDB मी तुला करण्यासाठी सांगितल्याप्रमाणे, अपूर्ण राहिलेले काम तू करावे आणि प्रत्येक शहरातील विश्वासणाऱ्यांच्या गटावर वडीलजणांची नेमणूक देखील करावी; म्हणून मी तुला क्रेत बेटावर ठेवले आहे. BSB BSB: The reason I left you in Crete was that you would set in order what was unfinished and appoint elders in every town, as I directed you.
6 UDB आता प्रत्येक वडील ज्याच्यावर कोणीही टिका करू शकणार नाही असा असावा. त्याला केवळ एकच पत्नी असावी, त्याची मुले देवावर विश्वास ठेवणारी असावी, आणि लोकांना त्याची मुले आज्ञा न मानणारी किंवा वाईट अशी निदर्शनांस येवू नयेत. BSB BSB: An elder must be blameless, the husband of but one wife, having children who are believers and who are not open to accusation of indiscretion or insubordination.
7 UDB जो कोणी देवाच्या लोकांना चालवितो तो देवाच्या घराचे व्यवस्थापन करणाऱ्यासारखा आहे. यासाठी अशा व्यक्तीची प्रतिष्ठा चांगली असणे गरजेचे आहे. तो गर्विष्ठ नसावा, तो शीघ्रकोपी नसावा, कोणत्याच कारणासाठी बराच काळ राग धरणारा नसावा. तो वादविवाद आणि भांडण करण्याची आवड असलेला आणि दारुडा व लोभी व्यक्ती नसावा. BSB BSB: As God’s steward, an overseer must be above reproach—not self-willed, not quick-tempered, not given to drunkenness, not violent, not greedy for money.
8 UDB त्याऐवजी, तो चांगल्या गोष्टींची आवड धरणारा व अनोळखी व्यक्तींचे स्वागत करणारा असावा. सर्वदा प्रामाणिक आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणारा, नेहमी सत्य सांगणारा व लोकांना चांगली वागणुक देणारा असावा. कोणतेही विचार किंवा काम करतांना, प्रत्येक वेळेस त्याने देवाविषयी विचार करावा, आणि त्याने पाप करणे टाळावे. BSB BSB: Instead, he must be hospitable, a lover of good, self-controlled, upright, holy, and disciplined.
9 UDB ज्या सत्य गोष्टी आम्ही त्याला शिकवल्या त्यांवर त्याने सर्वदा विश्वास ठेवावा आणि त्यानुसार जीवन जगावे. हे त्याने लोकांचे मन वळवण्यासाठी करावे, आणि जे अशा प्रकारे जीवन जगू इच्छीत नाहीत त्या लोकांमध्ये सुधारणा करण्यासाठीही हे करावे. BSB BSB: He must hold firmly to the faithful word as it was taught, so that he can encourage others by sound teaching and refute those who contradict it.
10 UDB कारण असे पुष्कळ लोक आहेत जे विशेषतः ख्रिस्ताचे अनुकरण करणाऱ्यांना सुंता करून घेण्यासाठी सांगतात व त्यांना स्वतःवर कोणतेही नियंत्रण नको म्हणून मी तुला ह्या गोष्टी सांगत आहे. त्यांचे बोलणे व्यर्थ आहे. ते लोकांना मूर्ख बनवतात आणि चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवण्यास भाग पाडतात. BSB BSB: For many are rebellious and full of empty talk and deception, especially those of the circumcision,
11 UDB ह्या लोकांना अशा प्रकारची शिकवण विश्वासणाऱ्यांना देता येऊ नये ह्यासाठी तू व ज्या पुढाऱ्यांना तू नेमणार आहेस त्यांनी त्यांना प्रतिबंधित करावे. ते जे करतात ते शिकवण्याचा त्यांना काही अधिकार नाही. लोकांनी त्यांना पैसे द्यावेत ह्यासाठी ते अशा गोष्टी शिकवतात. हे अतिशय लजिरवाणे आहे! संपूर्ण कुटूंबांनी चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवावा असे देखील ते करतात. BSB BSB: who must be silenced. For the sake of dishonorable gain, they undermine entire households and teach things they should not.
13 UDB तो जे काही बोलला ते खरे आहे, तर मग जे योग्य ते तुम्ही त्यांना जोर देवून शिकवा, जेणे करुन त्यांनी विश्वास ठेवावा आणि देवाविषयी योग्य त्या गोष्टी शिकवाव्यात. BSB BSB: This testimony is true. Therefore rebuke them sternly, so that they will be sound in the faith
14 UDB ह्या लोकांनी यहुद्यांच्या निरर्थक कहाण्यांवर व ज्या आज्ञा देवापासून नव्हेत तर मनुष्यापासून आलेल्या आहेत, त्यावर आपला वेळ वाया घालवू नये. हे लोक सत्यापासून मागे फिरले आहेत. BSB BSB: and will pay no attention to Jewish myths or to the commands of men who have rejected the truth.
15 UDB जर एखाद्याचे विचार किंवा इच्छा पापमय नसतील, तर तो सर्व गोष्टींना उत्तम असे पाहतो. परंतु जो कोणी दुष्ट आहे आणि येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाही, त्याला सर्व गोष्टी अशुद्ध करणाऱ्या असतात. असे लोक घाणेरड्या प्रकारे विचार करतात आणि ते दुष्टतेने वागण्याचा निर्णय करतात. BSB BSB: To the pure, all things are pure; but to the defiled and unbelieving, nothing is pure. Indeed, both their minds and their consciences are defiled.
16 UDB आम्ही देवाला ओळखतो, असा ते दावा करतात, परंतु त्यांच्या कामावरुन असे दिसते की, ते त्याला ओळखत नाहीत. इतर लोकांना ते किळसवाणे वाटतात. ते देवाची अवज्ञा करतात आणि त्याच्यासाठी काहीही चांगले करू शकत नाही. BSB BSB: They profess to know God, but by their actions they deny Him. They are detestable, disobedient, and unfit for any good deed.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.