1 UDB तर कदाचित मी जे लिहले ह्यावर मला कोणीतरी असे बोलू शकतो की, देव आपल्या सोबत कृपाळू असा आहे, तर मग आपण सतत पाप करतच राहावे काय म्हणजे देव आपल्याला सतत क्षमा करणार? BSB BSB: What then shall we say? Shall we continue in sin so that grace may increase?
2 UDB तर त्यांना माझे उत्तर असे असणार की, खात्रीने नाही, आपण तर पापाला मेलेलो असे आहोत, ह्याचा अर्थ आपण पाप कसे करणार? म्हणजेच आपण पाप करू नये. BSB BSB: Certainly not! How can we who died to sin live in it any longer?
3 UDB कारण जेव्हा आपला येशूच्या ऐक्यात बाप्तिस्मा होतो, तेव्हा देव आपणास ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर मरण पावलेला असे बघतो. हे तुम्हांला माहीत नाही का? BSB BSB: Or aren’t you aware that all of us who were baptized into Christ Jesus were baptized into His death?
4 UDB म्हणून जेव्हा आपला बाप्तिस्मा केला जोतो, तेव्हा देव आपल्याला ख्रिस्ताबरोबर त्याच्या कबरेत असे पाहतो. ज्याप्रकारे देवाने त्याच्या सामर्थ्याने ख्रिस्तास मरणातून उठवले, त्याच प्रकारे आपण नव्याप्रकारे जीवन जगावे हे त्याने शक्य केले आहे. BSB BSB: We were therefore buried with Him through baptism into death, in order that, just as Christ was raised from the dead through the glory of the Father, we too may walk in newness of life.
5 UDB कारण देव ख्रिस्ताच्या मरणासोबत आपणाला त्याच्याशी जोडलेले असे पाहतो, आणि त्याला मरणातून उठवताना तो आपणासही त्याच्यासोबत मरणातून उठवणार आहे. BSB BSB: For if we have been united with Him like this in His death, we will certainly also be united with Him in His resurrection.
6 UDB कारण पाहा, आपण पून्हा पाप करू नये व त्याद्वारे आपला नाश होऊ नये, ह्यासाठी देव आपल्याला ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला असे पाहतो. BSB BSB: We know that our old self was crucified with Him so that the body of sin might be rendered powerless, that we should no longer be slaves to sin.
7 UDB अशासाठी की जो कोणी ख्रिस्ताबरोबर पापाकरता मरतो, त्याने पून्हा पाप करू नये. BSB BSB: For anyone who has died has been freed from sin.
8 UDB आणि आता देव आपणास ख्रिस्ताबरोबर पापाकरता मरण पावलेला पाहत असल्याकारणाने, आम्ही असाहि विश्वास धरतो की, त्याच्याबरोबर आम्ही जिवंतही राहू. BSB BSB: Now if we died with Christ, we believe that we will also live with Him.
9 UDB आम्हांस माहीत आहे की, ख्रिस्त जो मेलेल्यांतून देवाद्वारे उठविला गेला, तो ख्रिस्त यापुढे पून्हा मरणार नाही. ह्यास्तव आता कुठलीहि गोष्ट त्याला पून्हा मरण्यास भाग पाडणार नाही. BSB BSB: For we know that since Christ was raised from the dead, He cannot die again; death no longer has dominion over Him.
10 UDB जेव्हा तो मरण पावला, तेव्हा तो आपल्या पापी जगातून स्वतंत्र होऊन निघून गेला, आणि आता तो पून्हा कधीच मरणार नाही. परंतू तो पून्हा जीवंत असल्या कारणाने, तो देवाला गौरव देण्यास जगेल. BSB BSB: The death He died, He died to sin once for all; but the life He lives, He lives to God.
11 UDB त्याचप्रकारे आपण स्वतःलाहि देवाच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे, आणखी पाप करण्यास असमर्थ असे तुम्ही मृत व्यक्ती आहात, परंतू त्याचबरोबर तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये जूळलेले व देवाची स्तुति करणारे असे जिवंत लोक आहात. BSB BSB: So you too must count yourselves dead to sin, but alive to God in Christ Jesus.
12 UDB म्हणून जेव्हा तुम्ही पाप करू इच्छिता तेव्हा आपल्या इच्छेप्रमाणे वागू नका, लक्षात असूद्या की तुमचे शरिर एक दिवस मरणार आहे. BSB BSB: Therefore do not let sin reign in your mortal body so that you obey its desires.
13 UDB कुठलेही वाईट काम करू किंवा बोलूही नका, तसे केल्यास तुम्ही जणू काय मेलेल्यांसारखे व्हाल, कारण मृत लोकांना काही एक कळत नाही व त्यांना देवही कळत नाही. याउलट, स्वत:ला देवाचे लोक, जे जीवंत आणि त्याला ओळखणारे आहेत, असे सादर करा. तुम्ही जे काही बोलता आणि करता, ते देवासाठी करा. धार्मिकतेचे कार्य करण्यास त्याला तुमचा उपयोग करू द्या. BSB BSB: Do not present the parts of your body to sin as instruments of wickedness, but present yourselves to God as those who have been brought from death to life; and present the parts of your body to Him as instruments of righteousness.
14 UDB जर पाप करण्याची तुमची इच्छा झाली तर, ते करू नका. कारण मोशेला देवाने दिलेले नियम हे तुम्हास पाप करण्यापासून थांबण्यास असमर्थ आहेत, परंतू देव आता तुमची पाप न करण्यास कृपेने मदत करतो. BSB BSB: For sin shall not be your master, because you are not under law, but under grace.
15 UDB यावरून मग कोणी मला असे बोलावे काय, “तुम्ही म्हटल्या प्रमाणे मोशेचे नियम जे देवाने त्याला दिले, ते आपणास पाप करण्यापासून थांबवण्यास असमर्थ आहे, परंतू आपली लायकी नसतानाही देव आपणा सोबत कृपाळू असा आहे, तर याचा अर्थ हा आहे की देवाने आपणास पाप करण्यास परवाणगी दिली आहे?” मी त्यांना उत्तर देऊ इच्छीतो की, बिलकूल नाही, खचितच आपण पाप करू नये. BSB BSB: What then? Shall we sin because we are not under law, but under grace? Certainly not!
16 UDB कारण जर तुम्ही कोणाची आज्ञा पाळण्याचे मानता, तेव्हा तुम्ही त्याचे सेवक बनता. याचा अर्थ असा की मी जर पाप करण्याचे इच्छिले, तर मी पापाचा सेवक होणार आणि ह्याचा परिणाम मृत्यू हा असणार. परंतू मी जर देवाला अनुसरले, तर मी देवाचा सेवक होईन, आणि ह्याचा परिणाम असा होईल की ज्या चांगल्या गोष्टी देव आपल्या कडून करू इच्छितो, त्या तो करेल. BSB BSB: Do you not know that when you offer yourselves as obedient slaves, you are slaves to the one you obey, whether you are slaves to sin leading to death, or to obedience leading to righteousness?
17 UDB पूर्वी तुम्ही पापाचे गुलाम असल्या कारणाने, तुम्ही जे वाईट इच्छिले ते केले. परंतू त्या नंतर तुम्ही प्रामाणिकपणे ख्रिस्ताने जे शिकवले ते पाळण्यास सुरुवात केली. ह्यासाठी मी देवाला धन्यवाद देऊ इच्छितो. BSB BSB: But thanks be to God that, though you once were slaves to sin, you wholeheartedly obeyed the form of teaching to which you were committed.
18 UDB म्हणून आता ह्या नंतर तुम्ही पाप करू नये आणि पापाने तुम्हावर स्वामीत्व गाजवू नये. याउलट देव जो नितीमान, ह्याचे तुम्ही सेवक आहात. BSB BSB: You have been set free from sin and have become slaves to righteousness.
19 UDB तुमच्या स्वत:बाबत आणि देवाबाबत सत्य तुम्हास कळावे, ह्यासाठी मी तुम्हा लोकांस समजावे म्हणून लिहीताना दाखल्यांचा उपयोग करीत आहे. भूतकाळात तुम्ही तुमच्या इच्छेच्या गुलामगिरीत होता, त्यामुळे तुम्ही सगळ्या प्रकारची अशूद्ध आणि वाईट अशा गोष्टी केल्या. परंतू आता, देवासारखी न्यायीपणाची कामे करण्यास तुम्ही स्वत:ला परवानगी द्या, म्हणजे तो तुम्हास त्याच्याकरता त्याचे स्वत:चे लोक असे वेगळे करील. BSB BSB: I am speaking in human terms because of the weakness of your flesh. Just as you used to offer the parts of your body in slavery to impurity and to escalating wickedness, so now offer them in slavery to righteousness leading to holiness.
20 UDB कारण हे सत्य आहे की, तुम्ही देवाच्या नितीमत्वासंबंधाने आणि त्याच्या सामर्थ्यापासून मोकळे होता. (कारण तुम्ही जे मनात इच्छीले तेच केले). जे सत्य ते तुम्ही केलेच नाही. BSB BSB: For when you were slaves to sin, you were free of obligation to righteousness.
21 UDB परंतू अशी स्वतंत्रता तुमच्या काय कामाची, ज्यात काही गोष्टी करण्याने तुम्हाला अप्रतिष्ठा मिळते आणि देवापासून दुर करते? BSB BSB: What fruit did you reap at that time from the things of which you are now ashamed? The outcome of those things is death.
22 UDB परंतु आता तुम्हांला पाप करण्याची काही गरज नाही, त्या प्रकारचे गुलाम तुम्ही नाही, उलट तुम्ही देवाचे सेवक बनले आहा. ह्याची परतफेड म्हणून देवाने तुम्हाला त्याचे वेगळे केलेले लोक आणि त्याच्यासोबत सार्वकालीक जीवन दिले आहे. BSB BSB: But now that you have been set free from sin and have become slaves to God, the fruit you reap leads to holiness, and the outcome is eternal life.
23 UDB पाहा जे सर्व आपल्या मनाचे ऐकून वाईट करतात, ते त्याची मजुरी मिळवतील, आणि त्याची मजूरी मरण आहे. उलट देवाने आपणास मोफत अशी भेट दिली आहे, त्याने आपणास त्याच्यासोबत सार्वकालीक जीवन जगण्यास आणि ख्रिस्ताशी जूळण्यास परवानगी दिली आहे. BSB BSB: For the wages of sin is death, but the gift of God is eternal life in Christ Jesus our Lord.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.