1 ULB देवाच्या इच्छेप्रमाणे ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्याकरता बोलावलेला, पौल आणि बंधू सोस्थनेस यांजकडून, BSB BSB: Paul, called to be an apostle of Christ Jesus by the will of God, and our brother Sosthenes,
2 ULB करिंथ शहरात असलेल्या देवाच्या मंडळीस, म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेले आणि पवित्रजन होण्यास बोलावलेले आहेत त्यांना व आपला प्रभू येशू ख्रिस्त, म्हणजे त्यांचा व आमचाही प्रभू, याचे नाव सर्व ठिकाणी घेणाऱ्या सर्व लोकांस, BSB BSB: To the church of God in Corinth, to those sanctified in Christ Jesus and called to be holy, together with all those everywhere who call on the name of our Lord Jesus Christ, their Lord and ours:
3 ULB देव आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यापासून कृपा व शांती असो. BSB BSB: Grace and peace to you from God our Father and the Lord Jesus Christ.
4 ULB ख्रिस्त येशूमध्ये तुमच्यावर झालेल्या देवाच्या कृपेबद्दल मी सतत तुमच्यासाठी माझ्या देवाचे उपकार मानतो. BSB BSB: I always thank my God for you because of the grace He has given you in Christ Jesus.
5 ULB त्याने तुम्हास प्रत्येक बाबतीत, सर्व बोलण्यात व सर्व ज्ञानात समृद्ध केले आहे. BSB BSB: For in Him you have been enriched in every way, in all speech and all knowledge,
6 ULB जशी ख्रिस्ताविषयी साक्ष खरी असल्याची खात्री तुम्हामध्ये झाली तसल्याच प्रकारे त्याने तुम्हासही संपन्न केले आहे. BSB BSB: because our testimony about Christ was confirmed in you.
7 ULB म्हणून तुम्हांत कोणत्याही आत्मिक दानाची कमतरता नाही, तर तुम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याची वाट पाहता. BSB BSB: Therefore you do not lack any spiritual gift as you eagerly await the revelation of our Lord Jesus Christ.
8 ULB तोच तुम्हास शेवटपर्यंत दृढ देखील राखील, जेणेकरून आपल्या प्रभू येशूच्या ख्रिस्ताच्या दिवशी तुम्ही निर्दोष असावे. BSB BSB: He will sustain you to the end, so that you will be blameless on the day of our Lord Jesus Christ.
9 ULB ज्याने आपला पुत्र येशू ख्रिस्त, आपला प्रभू याच्या सहभागितेत तुम्हास बोलावले होते, तो देव विश्वासू आहे. BSB BSB: God, who has called you into fellowship with His Son Jesus Christ our Lord, is faithful.
11 ULB कारण माझ्या बंधूनो ख्लोवेच्या मनुष्यांकडून मला असे कळविण्यात आले की, तुमच्यात भांडणे आहेत. BSB BSB: My brothers, some from Chloe’s household have informed me that there are quarrels among you.
12 ULB माझे म्हणणे असे आहे की तुमच्यातील प्रत्येकजण म्हणतो, “मी पौलाचा आहे.” “मी अपुल्लोचा आहे,” “मी केफाचा आहे,” “मी ख्रिस्ताचा आहे.” BSB BSB: What I mean is this: Individuals among you are saying, “I follow Paul,” “I follow Apollos,” “I follow Cephas,” or “I follow Christ.”
13 ULB ख्रिस्त विभागला गेला आहे का? पौल वधस्तंभावर तुमच्यासाठी खिळला गेला होता का? पौलाच्या नावाने तुमचा बाप्तिस्मा झाला का? BSB BSB: Is Christ divided? Was Paul crucified for you? Were you baptized into the name of Paul?
14 ULB मी देवाचे आभार मानतो की, क्रिस्प व गायस यांच्याशिवाय मी कोणाचाही बाप्तिस्मा केला नाही. BSB BSB: I thank God that I did not baptize any of you except Crispus and Gaius,
15 ULB यासाठी की, माझ्या नावात तुमचा बाप्तिस्मा करण्यात आला, असे कोणीही म्हणू नये. BSB BSB: so no one can say that you were baptized into my name.
16 ULB स्तेफनाच्या घरच्यांचा सुद्धा मी बाप्तिस्मा केला, याव्यतिरीक्त, तर इतर कोणाचाही बाप्तिस्मा केल्याचे मला आठवत नाही. BSB BSB: Yes, I also baptized the household of Stephanas; beyond that I do not remember if I baptized anyone else.
17 ULB कारण ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा करण्यासाठी नाही तर शुभवर्तमान सांगण्यासाठी पाठवले, ते देखील मानवी ज्ञानाने नव्हे, यासाठी की, ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मृत्यूचे सामर्थ्य व्यर्थ होऊ नये. BSB BSB: For Christ did not send me to baptize, but to preach the gospel, not with words of wisdom, lest the cross of Christ be emptied of its power.
19 ULB कारण असे नियमशास्त्रात लिहिले आहे, “शहाण्यांचे शहाणपण मी नष्ट करीन आणि बुद्धिवंताची बुद्धि मी व्यर्थ करीन.” BSB BSB: For it is written: “I will destroy the wisdom of the wise; the intelligence of the intelligent I will frustrate.”
21 ULB म्हणून, देवाचे ज्ञान असतानाही, या जगाला स्वतःच्या ज्ञानाने देवाला ओळखता आले नाही, तेव्हा आम्ही जो “मूर्खपणाचा” संदेश गाजवितो त्यामुळे जे विश्वास ठेवणारे आहेत त्यांचे तारण करण्याचे देवाला बरे वाटले. BSB BSB: For since in the wisdom of God the world through its wisdom did not know Him, God was pleased through the foolishness of what was preached to save those who believe.
22 ULB कारण अनेक यहूदी लोक चमत्काराची चिन्हे विचारतात आणि ग्रीक लोक ज्ञानाचा शोध घेतात, BSB BSB: Jews demand signs and Greeks search for wisdom,
24 ULB परंतु ज्यांना बोलावलेले आहे, अशा यहूदी व ग्रीक दोघांसही ख्रिस्त हा संदेश आहे तो देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान असाही आहे. BSB BSB: but to those who are called, both Jews and Greeks, Christ the power of God and the wisdom of God.
25 ULB तथापि ज्यांस तुम्ही देवाचा “मूर्खपणा” म्हणता ते मानव प्राण्याच्या शहाणपणापेक्षा अधिक शहाणपणाचे आहे आणि ज्यांस तुम्ही देवाचा “दुर्बळपणा” समजता ते मानव प्राण्याच्या सशक्तपणाहून अधिक शक्तिशाली आहे. BSB BSB: For the foolishness of God is wiser than man’s wisdom, and the weakness of God is stronger than man’s strength.
26 ULB तर आता बंधूनो, देवाने तुम्हास केलेल्या पाचारणाबद्दल विचार करा. मानवी दृष्टिकोनातून तुमच्यातील पुष्कळसे शहाणे, सामर्थ्यशाली, उच्च कुळातले नव्हते, BSB BSB: Brothers, consider the time of your calling: Not many of you were wise by human standards; not many were powerful; not many were of noble birth.
27 ULB त्याऐवजी जगातले जे मूर्ख त्यांना देवाने निवडले, यासाठी की, शहाण्या मनुष्यास फजित करावे. BSB BSB: But God chose the foolish things of the world to shame the wise; God chose the weak things of the world to shame the strong.
28 ULB कारण जगातील देवाने दीन, तुच्छ मानलेले, जे “नगण्य” त्यांना निवडले. यासाठी की जे “काहीतरी” आहेत त्यांना नगण्य करावे. BSB BSB: He chose the lowly and despised things of the world, and the things that are not, to nullify the things that are,
29 ULB यासाठी की कोणाही मनुष्याने देवासमोर बढाई मारू नये. BSB BSB: so that no one may boast in His presence.
30 ULB कारण तो ख्रिस्त येशूमध्ये तुमच्या जीवनाचा उगम आहे व तो देवाची देणगी म्हणून आपले ज्ञान, आपले नीतिमत्त्व, आपले पवित्रीकरण आणि आपली मुक्ती असा झाला आहे. BSB BSB: It is because of Him that you are in Christ Jesus, who has become for us wisdom from God: our righteousness, holiness, and redemption.
31 ULB यासाठी की नियमशास्त्रात असे लिहिले आहे, “जो अभिमान बाळगतो त्याने परमेश्वराविषयी बाळगावा.” BSB BSB: Therefore, as it is written: “Let him who boasts boast in the Lord.”
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.