2 ULB तुम्ही पवित्र जनांस शोभेल असे तिचे प्रभूमध्ये स्वागत करा आणि तिच्या ज्या कामात तुमची गरज लागेल त्यामध्ये तिचे साहाय्यक व्हा; कारण ती स्वतः पुष्कळांना व मलाही साहाय्यक झाली आहे. BSB BSB: Welcome her in the Lord in a manner worthy of the saints, and assist her with anything she may need from you. For she has been a great help to many people, including me.
3 ULB ख्रिस्त येशूमध्ये माझे जोडीदार-कामकरी प्रिस्का व अक्विला ह्यांना सलाम द्या. BSB BSB: Greet Prisca and Aquila, my fellow workers in Christ Jesus,
4 ULB यांनी माझ्या जिवासाठी आपला जीव धोक्यात घातला आणि मीच एकटा त्यांचे उपकार मानतो असे नाही, पण परराष्ट्रीयातील सर्व मंडळ्या त्यांचे उपकार मानतात. BSB BSB: who have risked their lives for me. Not only I but all the churches of the Gentiles are grateful to them.
5 ULB त्याचप्रमाणे, त्यांच्या घरात जमणार्या मंडळीलाही सलाम द्या आणि माझ्या प्रिय अपैनतला सलाम द्या; तो ख्रिस्तासाठी आशियाचे प्रथमफळ आहे. BSB BSB: Greet also the church that meets at their house. Greet my beloved Epenetus, who was the first convert to Christ in the province of Asia.
6 ULB मरीयेला सलाम द्या; तिने तुमच्यासाठी पुष्कळ कष्ट केले आहेत; BSB BSB: Greet Mary, who has worked very hard for you.
7 ULB माझे आप्त व जोडीदार-बंदिवान अंद्रोनिकस व युनिया ह्यांना सलाम द्या; प्रेषितांत त्यांचे नाव आहे व माझ्यापूर्वीच ते ख्रिस्ताचे झाले होते. BSB BSB: Greet Andronicus and Junia, my fellow countrymen and fellow prisoners. They are outstanding among the apostles, and they were in Christ before I was.
8 ULB प्रभूमध्ये माझा प्रिय अंप्लियात ह्याला सलाम द्या. BSB BSB: Greet Ampliatus, my beloved in the Lord.
9 ULB ख्रिस्तात आमचा जोडीदार-कामकरी उर्बान आणि माझा प्रिय स्ताखू ह्यांना सलाम द्या. BSB BSB: Greet Urbanus, our fellow worker in Christ, and my beloved Stachys.
10 ULB ख्रिस्तात स्वीकृत अपिल्लेस ह्याला सलाम द्या. अरिस्तबूलच्या घरातल्यांना सलाम द्या. BSB BSB: Greet Apelles, who is approved in Christ. Greet those who belong to the household of Aristobulus.
11 ULB माझा आप्त हेरोदियोन ह्याला सलाम द्या. नार्कीसच्या घरचे जे प्रभूत आहेत त्यांना सलाम द्या. BSB BSB: Greet Herodion, my fellow countryman. Greet those from the household of Narcissus who are in the Lord.
12 ULB प्रभूमध्ये श्रम करणार्या त्रुफैना व त्रुफोसा ह्यांना सलाम द्या. प्रिय पर्सिस हिला सलाम द्या. प्रभूमध्ये तिने पुष्कळ श्रम केले आहेत. BSB BSB: Greet Tryphena and Tryphosa, women who have worked hard in the Lord. Greet my beloved Persis, who has worked very hard in the Lord.
13 ULB प्रभूमध्ये निवडलेला रुफस व त्याची आई ह्यांनाही सलाम द्या. ती मला आई समान आहे. BSB BSB: Greet Rufus, chosen in the Lord, and his mother, who has been a mother to me as well.
14 ULB असुंक्रित, फ्लगोन, हरमेस, पत्रबास आणि हरमास ह्यांना व त्यांच्याबरोबर राहणार्या बांधवांना सलाम द्या. BSB BSB: Greet Asyncritus, Phlegon, Hermes, Patrobas, Hermas, and the brothers with them.
15 ULB फिललोगस, युलिया, निरीयस व त्याची बहीण आणि ओलुंपास ह्यांना सलाम द्या आणि त्यांच्याबरोबर राहणार्या सर्व पवित्र जनांस सलाम द्या. BSB BSB: Greet Philologus and Julia, Nereus and his sister, and Olympas and all the saints with them.
16 ULB पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम द्या. ख्रिस्ताच्या सर्व मंडळ्या तुम्हास सलाम पाठवत आहेत. BSB BSB: Greet one another with a holy kiss. All the churches of Christ send you greetings.
17 ULB आता, बंधूंनो, मी तुम्हास विनंती करतो की, तुम्ही शिकलेल्या शिकवणीविरुद्ध जे फुटी व अडथळे निर्माण करतात त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांना टाळा. BSB BSB: Now I urge you, brothers, to watch out for those who create divisions and obstacles that are contrary to the teaching you have learned. Turn away from them.
18 ULB कारण असे लोक जो ख्रिस्त आपला प्रभू आहे त्याची सेवा करीत नाहीत पण आपल्या पोटाची सेवा करतात आणि गोड भाषणे व प्रशंसा करून भोळ्या मनुष्यांची मने बहकवतात; BSB BSB: For such people are not serving our Lord Christ, but their own appetites. By smooth talk and flattery they deceive the hearts of the naive.
19 ULB कारण तुमचे आज्ञापालन सर्वत्र सर्वांना कळले आहे म्हणून मी तुमच्यासाठी आनंद करतो. पण तुम्ही चांगल्याविषयी ज्ञानी व्हावे आणि वाईटाविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा आहे. BSB BSB: Everyone has heard about your obedience, so I rejoice over you. But I want you to be wise about what is good and innocent about what is evil.
20 ULB आणि शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायांखाली लवकरच तुडवील. आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्याबरोबर असो. आमेन. BSB BSB: The God of peace will soon crush Satan under your feet. The grace of our Lord Jesus Christ be with you.
21 ULB माझा जोडीदार-कामकरी तीमथ्य आणि माझे आप्त लुकियस, यासोन व सोसिपेतर हे तुम्हास सलाम पाठवतात. BSB BSB: Timothy, my fellow worker, sends you greetings, as do Lucius, Jason, and Sosipater, my fellow countrymen.
22 ULB हे पत्र ज्याने लिहिले आहे तो तर्तियस तुम्हास प्रभूमध्ये सलाम पाठवत आहे. BSB BSB: I, Tertius, who wrote down this letter, greet you in the Lord.
24 ULB आता माझ्या सुवार्तेप्रमाणे व येशू ख्रिस्ताच्या घोषणेप्रमाणे जे रहस्य मागील युगात गुप्त ठेवण्यात आले, BSB BSB: Not in the BSB
26 ULB पण आता प्रकट करण्यात आले आहे व संदेष्ट्यांच्या शास्त्रलेखावरून सनातन देवाच्या आज्ञेप्रमाणे विश्वासाच्या आज्ञापालनासाठी सर्व राष्ट्रांना कळवले आहे त्या रहस्याच्या प्रकटीकरणानुसार जो तुम्हास स्थिर करण्यास समर्थ आहे, BSB BSB: but now revealed and made known through the writings of the prophets by the command of the eternal God, in order to lead all nations to the obedience that comes from faith—
27 ULB त्या अनन्य ज्ञानी देवाला येशू ख्रिस्ताद्वारे युगानुयुग गौरव असो. आमेन. BSB BSB: to the only wise God be glory forever through Jesus Christ! Amen.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.