1 ULB मिसराचा राजा फारो याच्या मुलीशी लग्र करून शलमोनाने फारोशी करार केला. शलमोनाने तिला दावीद नगरात आणले. त्याच्या महालाचे आणि परमेश्वराचे मंदिर बांधण्याचे काम तेव्हा चालू होते. यरुशलेमासभोवती तटबंदी उभारायचे कामही शलमोनाने हाती घेतले होते. BSB BSB: Later, Solomon formed an alliance with Pharaoh king of Egypt by marrying his daughter. Solomon brought her to the City of David until he had finished building his palace and the house of the LORD, as well as the wall around Jerusalem.
2 ULB परमेश्वराचे मंदिर अजून बांधून पुरे झाले नव्हते त्यामुळे लोक यज्ञात बली अर्पण करायला डोंगरमाथ्यासारख्या उंच ठिकाणी जात. BSB BSB: The people, however, were still sacrificing on the high places because a house for the Name of the LORD had not yet been built.
3 ULB राजा शलमोनही आपले वडिल दावीद यांनी सांगितलेल्या नियमांचे मन:पूर्वक पालन करून परमेश्वरावरील आपले प्रेम प्रकट करीत असे. त्या गोष्टीखेरीज यज्ञ करायला आणि धूप जाळायला तो उंच ठिकाणी जात असे. BSB BSB: And Solomon loved the LORD and walked in the statutes of his father David, except that he sacrificed and burned incense on the high places.
4 ULB राजा गिबोन हे एक महत्वाचे उंचावरील ठिकाण असल्यामुळे शलमोन यज्ञासाठी तिकडे गेला. तेथे त्याने एक हजार होमार्पणे वाहिली. BSB BSB: Now the king went to Gibeon to sacrifice there, for it was the great high place. Solomon offered a thousand burnt offerings on the altar there.
5 ULB शलमोन गिबोन येथे असतानाच परमेश्वराने एका रात्री त्यास स्वप्नात दर्शन दिले तो म्हणाला, माग! “तुला काय हवे ते माग मी ते देईन.” BSB BSB: One night at Gibeon the LORD appeared to Solomon in a dream, and God said, “Ask, and I will give it to you!”
6 ULB तेव्हा शलमोन म्हणाला, “तुझा सेवक म्हणजेच माझे वडिल दावीद यांच्यावर तुझी कृपा होती. ते तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागले. ते विश्वासूपणाने आणि न्यायाने वागले. त्यानंतर आज त्याच्या मुलालाच गादीवर बसवून तू तुझ्या महान कराराबद्दल मोठाच दयाळूपणा दाखवला आहेस. BSB BSB: Solomon replied, “You have shown much loving devotion to Your servant, my father David, because he walked before You in faithfulness, righteousness, and uprightness of heart. And You have maintained this loving devotion by giving him a son to sit on his throne this very day.
7 ULB माझे वडिल दावीदानंतर, परमेश्वर देवा, तू मला राजा केले आहेस. पण मी लहान मुलासारखाच आहे. मला बाहेर जायला व आत यायला समजत नाही. BSB BSB: And now, O LORD my God, You have made Your servant king in my father David’s place. But I am only a little child, not knowing how to go out or come in.
8 ULB तू निवडलेल्या लोकांमध्ये तुझा सेवक राहत आहे, त्यांचा जमाव मोठा आहे ते असंख्य व अगणित आहेत. BSB BSB: Your servant is here among the people You have chosen, a people too numerous to count or number.
9 ULB म्हणून तुझ्या सेवकास लोकांचा न्याय करण्यास शहाणपणाचे मन दे, त्यामुळे मला बऱ्यावाईटामधील फरक समजेल. त्याखेरीज तुझ्या एवढ्या लोकांचा न्याय करणे कोणास शक्य आहे?” BSB BSB: Therefore give Your servant an understanding heart to judge Your people and to discern between good and evil. For who is able to govern this great people of Yours?”
10 ULB शलमोनाने हा वर मागितला याचा परमेश्वरास फार आनंद झाला BSB BSB: Now it pleased the Lord that Solomon had made this request.
11 ULB म्हणून देव त्यास म्हणाला, “तू स्वत:साठी दीर्घायुष्य किंवा सुखसमृध्दी मागितली नाहीस. तसेच शत्रूंचा नि:पात व्हावा असे म्हणाला नाहीस. तू फक्त न्यायबुध्दी आणि विवेक याची मागणी केलीस. BSB BSB: So God said to him, “Since you have asked for this instead of requesting long life or wealth for yourself or death for your enemies—but you have asked for discernment to administer justice—
12 ULB तेव्हा तुझे मागणे मी मान्य करतो. तुला ज्ञानी आणि शहाणपणाचे मन देतो, तुला एवढे शहाणपण लाभेल की तुझ्यासारखा भूतकाळात कधी झाला, नाही आणि पुढे कधी होणार नाही. BSB BSB: behold, I will do what you have asked. I will give you a wise and discerning heart, so that there will never have been another like you, nor will there ever be.
13 ULB आणखी तू जे मागीतले नाही तेही मी तुला देत आहे धन आणि वैभव ही तुला देत आहे. तुझ्या आयुष्यभर तुझ्यासारखा कोणी दुसरा राजा असणार नाही. BSB BSB: Moreover, I will give you what you did not request—both riches and honor—so that during all your days no man in any kingdom will be your equal.
14 ULB जर तू माझ्या दाखवलेल्या मार्गांने चाललास आणि माझ्या आज्ञा आणि नियम पाळलेस, जसा तुझा पिता दावीद चालला, तर तुलाही मी दीर्घायुषी करीन.” BSB BSB: So if you walk in My ways and keep My statutes and commandments, just as your father David did, I will prolong your days.”
15 ULB शलमोन जागा झाला. परमेश्वर स्वप्नात येऊन आपल्याशी बोलला हे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर शलमोन यरुशलेमेला जाऊन परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे उभा राहिला. शलमोनाने परमेश्वरासाठी होमार्पण केले. त्यामध्ये त्याने परमेश्वरास शांत्यर्पणे वाहिली. मग आपल्या सर्व सेवकांना मेजवानी दिली. BSB BSB: Then Solomon awoke, and indeed it had been a dream. So he returned to Jerusalem, stood before the ark of the covenant of the Lord, and offered burnt offerings and peace offerings. Then he held a feast for all his servants.
16 ULB नंतर दोन वेश्या शलमोनाकडे आल्या. राजापुढे त्या दोघी उभ्या राहिल्या. BSB BSB: At that time two prostitutes came to the king and stood before him.
17 ULB त्यातली एक म्हणाली, “महाराज, ही आणि मी एकाच घरात राहतो. मी बाळाला जन्म दिला तेव्हा ही माझ्या जवळच होती. BSB BSB: One woman said, “Please, my lord, this woman and I live in the same house, and I gave birth while she was in the house.
18 ULB तीन दिवसानंतर हिने पण बाळाला जन्म दिला. आमच्याखेरीज घरात आणखी कोणी नव्हते. आम्ही दोघीच काय त्या राहत होतो. BSB BSB: On the third day after I gave birth, this woman also had a baby. We were alone, with no one in the house but the two of us.
19 ULB एका रात्री ती बाळाला घेऊन झोपलेली असताना तिचे बाळ तिच्याखाली चेंगरुन मरण पावले. BSB BSB: During the night this woman’s son died because she rolled over on him.
20 ULB तेव्हा मी झोपेत असताना त्या रात्रीच तिने माझे बाळ माझ्या कुशीतून घेतले आणि ते स्वत:कडे ठेवून आपले मृत बालक माझ्या अंथरुणावर ठेवले. BSB BSB: So she got up in the middle of the night and took my son from my side while I was asleep. She laid him in her bosom and put her dead son at my bosom.
21 ULB दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी बाळाला पाजायला घेतले तर बाळ मृत असल्याचे माझ्या लक्षात आले. म्हणून मी बारकाईने न्याहाळले असता हे बाळ माझे नाही असे मला आढळले.” BSB BSB: The next morning, when I got up to nurse my son, I discovered he was dead. But when I examined him, I realized that he was not the son I had borne.”
22 ULB पण तेवढ्यात ती दुसरी स्त्री म्हणाली, “नाही, जिवंत बाळ माझे आहे, मरण पावलेले बाळ तुझे आहे.” पहिली त्यावर म्हणाली, “तू खोटे बोलतेस, मरण पावले ते तुझे बाळ आणि जिवंत आहे ते माझे.” अशाप्रकारे दोघीचांही राजासमोर कडाक्याचा वाद झाला. BSB BSB: “No,” said the other woman, “the living one is my son and the dead one is your son.” But the first woman insisted, “No, the dead one is yours and the living one is mine.” So they argued before the king.
23 ULB तेव्हा राजा म्हणाला, “एक म्हणते जिवंत मूल माझे आणि मरण पावलेले बाळ तुझे आहे; दुसरी असे म्हणते नाही, मरण पावलेला तो तुझा मुलगा आणि जीवंत जो माझा मुलगा.” BSB BSB: Then the king replied, “This woman says, ‘My son is alive and yours is dead,’ but that woman says, ‘No, your son is dead and mine is alive.’”
24 ULB राजाने मग आपल्या सेवकाला एक तलवार घेऊन यायला सांगितले. BSB BSB: The king continued, “Bring me a sword.” So they brought him a sword,
25 ULB नंतर राजा म्हणाला, “आता आपण असे करु. त्या जिवंत बाळावर वार करून त्याचे दोन तुकडे करु आणि एकीला अर्धा व दुसरीला अर्धा देऊ.” BSB BSB: and the king declared, “Cut the living child in two and give half to one and half to the other.”
26 ULB पण पहिल्या स्त्रीला, खऱ्या आईला, वात्सल्याचा उमाळा आला. ती राजाला म्हणाली, “हे माझ्या स्वामी नको, बाळाला मारु नका ते तिच्याकडेच राहू द्या.” दुसरी स्त्री म्हणाली, “बाळाचे दोन तुकडे करा.” म्हणजे आमच्यापैकी कोणालाही ते मिळणार नाही. BSB BSB: Then the woman whose son was alive spoke to the king because she yearned with compassion for her son. “Please, my lord,” she said, “give her the living baby. Do not kill him!” But the other woman said, “He will be neither mine nor yours. Cut him in two!”
27 ULB तेव्हा हे ऐकून राजा म्हणाला, “बाळाला मारु नका. त्यास पहिल्या स्त्रीच्या हवाली करा. तीच खरी आई आहे.” BSB BSB: Then the king gave his ruling: “Give the living baby to the first woman. By no means should you kill him; she is his mother.”
28 ULB राजाचा हा न्याय इस्राएल लोकांच्या कानावर गेला. राजाच्या चाणाक्षपणाबद्दल त्यांना भय वाटले. योग्य निर्णय घेण्याचे परमेश्वराचे शहाणपण त्याच्याकडे आहे हे त्यांच्या लक्षात आले. BSB BSB: When all Israel heard of the judgment the king had given, they stood in awe of him, for they saw that the wisdom of God was in him to administer justice.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.