1 ULB राजा शलमोन सर्व इस्राएलाचा राजा होता. BSB BSB: So King Solomon ruled over Israel,
2 ULB त्यास शासनात मदत करणाऱ्या प्रमुख अधिकाऱ्यांची नावे अशी: सादोकाचा पुत्र अजऱ्या, हा याजक होता. BSB BSB: and these were his chief officials: Azariah son of Zadok was the priest;
3 ULB शिशाचे पुत्र अलिहोरेफ आणि अहीया. न्यायालयातील घडामोडींची टिपणे ठेवणे हे त्यांचे काम होते. अहीलुदाचा पुत्र यहोशाफाट हा बखरकार होता. BSB BSB: Elihoreph and Ahijah, the sons of Shisha, were secretaries; Jehoshaphat son of Ahilud was the recorder;
4 ULB बनाया हा यहोयादाचा पुत्र सेनापती होता सादोक आणि अब्याथार याजक होते BSB BSB: Benaiah son of Jehoiada was in charge of the army; Zadok and Abiathar were priests;
5 ULB नाथानचा पुत्र अजऱ्या हा जिल्हाधिकाऱ्यांचा प्रमुख होता, नाथानाचा पुत्र जाबूद याजक असून राजाचा सल्लागार होता. BSB BSB: Azariah son of Nathan was in charge of the governors; Zabud son of Nathan was a priest and adviser to the king;
6 ULB अहीशार हा राजाच्या महालातील सर्व गोष्टींचा प्रमुख होता, अब्दाचा पुत्र अदोनीराम गुलामांच्या खात्याचा प्रमुख होता. BSB BSB: Ahishar was in charge of the palace; and Adoniram son of Abda was in charge of the forced labor.
7 ULB इस्राएलचे कारभाराच्या सोयीसाठी बारा भाग पाडलेले होते. प्रत्येक भागावर शलमोनाने कारभारी नेमले होते. त्या त्या भागातून अन्नधान्य गोळा करून राजाच्या कुटुंबियांना देण्याची त्यांची जबाबदारी होती. बारा कारभाऱ्यापैकी प्रत्येकावर प्रतिवर्षी एक महिना ही पाळी येई. BSB BSB: Solomon had twelve governors over all Israel to provide food for the king and his household. Each one would arrange provisions for one month of the year,
8 ULB त्या बारा कारभाऱ्याची नावे अशी: बेन-हूर, हा एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशावर अधिकारी होता. BSB BSB: and these were their names: Ben-hur in the hill country of Ephraim;
9 ULB माकस, शालबीम, बेथ-शेमेश व एलोन बेथ-हानान यांच्यावर बेन-देकेर हा कारभारी. BSB BSB: Ben-deker in Makaz, in Shaalbim, in Beth-shemesh, and in Elon-beth-hanan;
10 ULB अरुबोथ, सोखो आणि हेफेर या प्रांतावर बेन-हेसेद हा कारभारी होता. BSB BSB: Ben-hesed in Arubboth (Socoh and all the land of Hepher belonged to him);
11 ULB बेन-अबीनादाब पूर्ण दोर प्रांतावर होता. शलमोनाची कन्या टाफाथ ही याची पत्नी. BSB BSB: Ben-abinadab in Naphath-dor (Taphath, a daughter of Solomon, was his wife);
12 ULB तानख, मगिद्दो व पूर्ण बेथ-शान म्हणजेच सारतानाजवळ इज्रेलच्या खाली बेथ-शानापासून आबेल-महोलापर्यंत व यकमामाच्या उतारापर्यंत अहीलुदाचा पुत्र बाना हा होता. BSB BSB: Baana son of Ahilud in Taanach, in Megiddo, and in all of Beth-shean next to Zarethan below Jezreel, from Beth-shean to Abel-meholah and on past Jokmeam;
13 ULB रामोथ-गिलादावर बेन-गेबेर; हा प्रमुख होता. गिलाद येथील मनश्शेचा पुत्र याईर याची सर्व गावे, बाशानातले अर्गोब प्रांत हे भाग त्याच्याकडे होते. या भागात भक्कम तटबंदीची आणि पितळेची अडसर असणारी साठ मोठी नगरे होती. BSB BSB: Ben-geber in Ramoth-gilead (the villages of Jair son of Manasseh in Gilead belonged to him, as well as the region of Argob in Bashan with its sixty great cities with walls and bronze bars);
14 ULB इद्दोचा पुत्र अहीनादाब महनाईम प्रांतावर होता. BSB BSB: Ahinadab son of Iddo in Mahanaim;
15 ULB नफतालीवर अहीमास होता. (ज्याने शलमोनाची कन्या बासमथ हिच्याशी लग्न केले होते.) BSB BSB: Ahimaaz in Naphtali (he had married Basemath, a daughter of Solomon);
16 ULB हूशयाचा पुत्र बाना, हा आशेर आणि आलोथ यांच्यावर कारभारी होता. BSB BSB: Baana son of Hushai in Asher and in Aloth;
17 ULB पारुहाचा पुत्र, यहोशाफाट इस्साखारवर होता. BSB BSB: Jehoshaphat son of Paruah in Issachar;
18 ULB एलाचा पुत्र शिमी बन्यामीनचा कारभारी होता. BSB BSB: Shimei son of Ela in Benjamin;
19 ULB उरीचा पुत्र गेबेर गिलाद प्रांतावर होता. अमोऱ्यांचा राजा सीहोन आणि बाशानाचा राजा ओग हे या प्रांतात राहत होते. गेबेर मात्र त्या प्रांताचा एकमेव कारभारी होता. BSB BSB: Geber son of Uri in the land of Gilead, including the territories of Sihon king of the Amorites and of Og king of Bashan. There was also one governor in the land of Judah.
20 ULB यहूदा आणि इस्राएलमध्ये समुंद्रातील वाळूसारखी बहुसंख्य माणसे होती. ती खात, पीत व मजा करत आनंदाने जगत होती. BSB BSB: The people of Judah and Israel were as numerous as the sand on the seashore, and they were eating and drinking and rejoicing.
21 ULB नदीपासून ते पलिष्ट्यांच्या भूमीपर्यंत व मिसराच्या सीमेपर्यंत शलमोनाची सत्ता होती. या देशांकडून शलमोनाला नजराणे येत आणि ते आयुष्यभर त्याचा आदर करीत. BSB BSB: And Solomon reigned over all the kingdoms from the Euphrates to the land of the Philistines, as far as the border of Egypt. These kingdoms offered tribute and served Solomon all the days of his life.
22 ULB शलमोनाला एका दिवसास जेवणाऱ्या सर्वांसाठी खालील अन्नपदार्थ लागत:तीस कोर मापाचे सपीठ; साठ कोर मापाचे पीठ, BSB BSB: Solomon’s provisions for a single day were thirty cors of fine flour, sixty cors of meal,
23 ULB दहा पुष्ट गुरे कुरणावर चरलेली वीस गुरे, शंभर मेंढरे, हरीण, सांबरे, भेकर, खाण्यायोग्य पक्षी. BSB BSB: ten fat oxen, twenty range oxen, and a hundred sheep, as well as deer, gazelles, roebucks, and fattened poultry.
24 ULB महानदाच्या अलीकडील सर्व देशांवर म्हणजे तिफसाह येथून गज्जापर्यंतच्या सर्व देशांवर व जीतके राजे होते त्यावर त्याची सत्ता होती. या प्रदेशात सर्वत्र शांतता नांदत होती. BSB BSB: For Solomon had dominion over everything west of the Euphrates—over all the kingdoms from Tiphsah to Gaza—and he had peace on all sides.
25 ULB शलमोनाच्या दिवसात दानपासून बैर-शेबापर्यंत, यहूदा आणि इस्राएलमधील सर्व लोक निर्धास्तपणे व शांततेने राहत होते. आपापल्या अंजीर वृक्षांखाली आणि द्राक्षबागांमध्ये ते निवांत होते. BSB BSB: Throughout the days of Solomon, Judah and Israel dwelt securely from Dan to Beersheba, each man under his own vine and his own fig tree.
26 ULB रथाच्या चार हजार घोड्यांसाठी पागा होत्या. तसेच शलमोनाकडे बारा हजार स्वार होते. BSB BSB: Solomon had 4,000 stalls for his chariot horses and 12,000 horses.
27 ULB शिवाय ते बारा कारभारी प्रत्येक महिन्याला शलमोनाला सर्व जीवनावश्यक गोष्टी पुरवत होते. राजाच्या पंगतीला बसून जेवणाऱ्या सर्वांना ते पुरेसे होते. BSB BSB: Each month the governors in turn provided food for King Solomon and all who came to his table. They saw to it that nothing was lacking.
28 ULB रथाच्या आणि स्वारीच्या घोड्यांसाठी पुरेसा पेंढा आणि सातूही ते कारभारी पुरवीत. नेमलेल्या ठिकाणी प्रत्येकजण हे धान्य आणून टाकी. BSB BSB: Each one also brought to the required place their quotas of barley and straw for the chariot horses and other horses.
29 ULB देवाने शलमोनाला भरपूर शहाणपण व बुध्दी दिली होती. आणि समुद्राच्या वाळूप्रमाणे विशाल मन दिले. BSB BSB: And God gave Solomon wisdom, exceedingly deep insight, and understanding beyond measure, like the sand on the seashore.
30 ULB पूर्वेकडील सर्वांपेक्षा शलमोनाचे शहाणपण अधिक होते. मिसरमधल्यापेक्षा ते थोर होते. BSB BSB: Solomon’s wisdom was greater than that of all the men of the East, greater than all the wisdom of Egypt.
31 ULB पृथ्वीच्या पाठीवर त्याच्याइतका सूज्ञ कोणी नव्हता. एज्राही एथान तसेच माहोलची पुत्र, हेमान व कल्यकोल व दर्दा, यांच्यापेक्षा तो शहाणा होता. त्याचे नाव इस्राएल राष्ट्रा बाहेर सर्वत्र पसरले होते. BSB BSB: He was wiser than all men—wiser than Ethan the Ezrahite, and wiser than Heman, Calcol, and Darda, the sons of Mahol. And his fame spread throughout the surrounding nations.
32 ULB आपल्या आयुष्यात त्याने तीन हजार बोध वचने आणि पंधराशे गीते लिहिली. BSB BSB: Solomon composed three thousand proverbs, and his songs numbered a thousand and five.
33 ULB निसर्गाविषयी ही त्यास ज्ञान होते. लबानोनातल्या गंधसरुपासून भिंतीतून उगवणाऱ्या वनस्पतीपर्यंत सर्व तऱ्हेच्या झाडांचे त्यास ज्ञान होते. प्राणी, पक्षी, मासे आणि सरपटणारे प्राणी यांचेही त्याने वर्णन केले आहे. BSB BSB: He spoke of trees, from the cedar in Lebanon to the hyssop growing in the wall, and he taught about animals, birds, reptiles, and fish.
34 ULB देशोदेशीचे लोक त्याच्याकडे ज्ञानार्जनासाठी येत. सर्व राष्ट्रांचे राजे आपल्या पदरच्या हुशार मनुष्यांना शलमोनाकडून ज्ञान घ्यायला पाठवत. BSB BSB: So men of all nations came to listen to Solomon’s wisdom, sent by all the kings of the earth, who had heard of his wisdom.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.