1 ULB शोमरोनच्या पर्वतावर राहणाऱ्या, बाशानाच्या गायींनो, जे तुम्ही गरिबांवर जुलूम करता, जे तुम्ही गरजवंतांना ठेचता, जे तुम्ही आपल्या नवऱ्यास असे म्हणता, “आण आणि आम्ही पीऊ.” ते तुम्ही हे वचन ऐका. BSB BSB: Hear this word, you cows of Bashan on Mount Samaria, you women who oppress the poor and crush the needy, who say to your husbands, “Bring us more to drink.”
2 ULB परमेश्वर देवाने आपल्या पवित्रतेची शपथ घेऊन सांगितले की, पाहा, ते तुम्हास आकड्यांनी, आणि तुमच्या उरलेल्यांना माशांच्या गळांनी काढून नेतील, असे दिवस तुम्हावर येतील. BSB BSB: The Lord GOD has sworn by His holiness: “Behold, the days are coming when you will be taken away with hooks, and your posterity with fishhooks.
3 ULB तुमच्यातील प्रत्येकीला तटाच्या भगदाडातून बाहेर पडावे लागेल, तुम्ही आपणास हर्मोन पर्वतावर टाकाल, असे परमेश्वर म्हणतो. BSB BSB: You will go out through broken walls, each one straight ahead of her, and you will be cast out toward Harmon,” declares the LORD.
4 ULB “बेथेलला जा आणि पाप करा, गिलगालला जाऊन बहूतपट पापे करा, तुम्ही रोज सकाळी आपले यज्ञ आणि तीन वर्षांनी आपल्या पिकाचा दहावा भाग आणा. BSB BSB: “Go to Bethel and transgress; rebel even more at Gilgal! Bring your sacrifices every morning, your tithes every three days.
5 ULB खमिराच्या भाकरीने उपकारस्तुतीचे यज्ञ अर्पण करा; खुशीच्या अर्पणांची गोष्ट गाजवून घोषीत करा; कारण हे इस्राएलाच्या लोकांनो, हे करायला तुम्हास आवडते.” असे परमेश्वर म्हणतो. BSB BSB: Offer leavened bread as a thank offering, and loudly proclaim your freewill offerings. For that is what you children of Israel love to do,” declares the Lord GOD.
7 ULB “कापणीला तीन महिने राहीले असता, त्यावेळेस मी तुम्हापासून पाऊस आवरून धरला. आणि मी एका शहरावर पाऊस पाडला आणि दुसऱ्या शहरावर पाऊस पाडला नाही. एका भागावर पाऊस पडला आणि ज्या भागावर पाऊस पडला नाही तो सुकून गेला. BSB BSB: “I also withheld the rain from you when the harvest was three months away. I sent rain on one city but withheld it from another. One field received rain; another without rain withered.
8 ULB म्हणून दोन्ही तिन्ही शहरातील लोक दुसऱ्या शहराकडे पाणी प्यायला धडपडत गेले. परंतु तृप्त झाले नाहीत, तरीही तुम्ही माझ्याकडे फिरला नाहीत.” असे परमेश्वर म्हणतो. BSB BSB: People staggered from city to city for water to drink, but they were not satisfied; yet you did not return to Me,” declares the LORD.
9 ULB “मी तुम्हास तांबेऱ्याने व भेरडाने पीडले आहे. टोळांनी तुमच्या बागांचा, व द्राक्षमळ्यांचा, व अंजिराच्या व जैतूनाच्या झाडांना फार खाऊन टाकले. तरीही तुम्ही माझ्याकडे फिरला नाही.” असे परमेश्वर म्हणतो. BSB BSB: “I struck you with blight and mildew in your growing gardens and vineyards; the locust devoured your fig and olive trees, yet you did not return to Me,” declares the LORD.
10 ULB “मिसरला पाठविली होती, तशीच रोगराई मी तुमच्यावर पाठविली आहे. तुमचे तरुण मी तलवारीने मारले आहेत, आणि तुमचे घोडे पाडाव करून नेले आहेत, तुमच्या छावण्यांचा दुर्गंध तुमच्या नाकपुडयात येईल असे केले आहे. तरीसुध्दा तुम्ही माझ्याकडे फिरला नाही.” असे परमेश्वर म्हणतो. BSB BSB: “I sent plagues among you like those of Egypt; I killed your young men with the sword, along with your captured horses. I filled your nostrils with the stench of your camp, yet you did not return to Me,” declares the LORD.
11 ULB “सदोम आणि गमोरा यांचा मी जसा नाश केला. तसाच मी तुमच्यातील कित्येक शहरांचा नाश केला; आगीत पटकन ओढून काढलेल्या जळक्या काटकीप्रमाणे तुमची स्थिती होती. तरीही तुम्ही माझ्याकडे फिरला नाही.” असे परमेश्वर म्हणतो. BSB BSB: “Some of you I overthrew as I overthrew Sodom and Gomorrah, and you were like a firebrand snatched from a blaze, yet you did not return to Me,” declares the LORD.
12 ULB “म्हणून हे इस्राएला, मी तुझ्याबाबत असेच करीन, आणि हे इस्राएला मी असे तुझ्याशी करेन तेव्हा, इस्राएलाच्या परमेश्वरास भेटण्यास सज्ज हो. BSB BSB: “Therefore, that is what I will do to you, O Israel, and since I will do this to you, prepare to meet your God, O Israel!
13 ULB कारण पाहा, जो पर्वत निर्माण करतो व वारा अस्तित्वांत आणतो, आणि मनुष्यास त्याची कल्पना काय ती प्रगट करतो, जो पाहाटे अंधार करतो, आणि पृथ्वीच्या उंच स्थानांवर चालतो. त्याचे नाव परमेश्वर, सेनाधीश देव आहे.” BSB BSB: For behold, He who forms the mountains, who creates the wind and reveals His thoughts to man, who turns the dawn to darkness and strides on the heights of the earth—the LORD, the God of Hosts, is His name.”