1 ULB निवासमंडप दहा पडद्यांचा कर. ते कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुतापासून तयार करावेत. व त्यावर कुशल कारागिराकडून करूब काढावेत. BSB BSB: “You are to construct the tabernacle itself with ten curtains of finely spun linen, each with blue, purple, and scarlet yarn, and cherubim skillfully worked into them.
2 ULB प्रत्येक पडद्याचे मोजमाप एक सारखेच असावे म्हणजे लांबी अठ्ठावीस हात व रूंदी चार हात असावी; BSB BSB: Each curtain shall be twenty-eight cubits long and four cubits wide—all curtains the same size.
3 ULB त्यांपैकी पाच पडदे एकत्र जोडून एक भाग करावा व दुसऱ्या पाचांचा जोडून दुसरा भाग करावा; BSB BSB: Five of the curtains are to be joined together, and the other five joined as well.
4 ULB जेथे एक पडदा दुसऱ्याशी जोडला जाईल तेथे किनारीवर निळ्या सुताची बिरडी करावीत, तसेच दुसऱ्या पडद्यावरील किनारीवरही तशीच बिरडी कर BSB BSB: Make loops of blue material on the edge of the end curtain in the first set, and do the same for the end curtain in the second set.
5 ULB एका पडद्याला पन्नास बिरडी कर व दुसऱ्या पडद्याच्या किनारीला पन्नास बिरडी कर. ही बिरडी समोरासमोर असावी; BSB BSB: Make fifty loops on one curtain and fifty loops on the end curtain of the second set, so that the loops line up opposite one another.
6 ULB पडद्यांचे ते दोन भाग जोडण्यासाठी सोन्याच्या पन्नास गोल कड्या बनवून त्यांच्या साहाय्याने ते दोन भाग एकत्र असे जोडावेत की सर्व मिळून निवासमंडप तयार होईल. BSB BSB: Make fifty gold clasps as well, and join the curtains together with the clasps, so that the tabernacle will be a unit.
7 ULB त्यानंतर निवासमंडपावरच्या तंबूसाठी बकऱ्याच्या केसांचे पडदे करावेत. हे पडदे अकरा असावे. BSB BSB: You are to make curtains of goat hair for the tent over the tabernacle—eleven curtains in all.
8 ULB हे सर्व पडदे एकसारख्या मोज मापाचे म्हणजे तीस हात लांब व चार हात रुंद अशा मापाचे बनवावेत. BSB BSB: Each of the eleven curtains is to be the same size—thirty cubits long and four cubits wide.
9 ULB त्यातून पाच पडदे एकत्र जोडावे आणि सहा पडदे एकत्र जोडावे. सहावा पडदा तंबूच्या पुढल्या बाजूला दुमडावा. BSB BSB: Join five of the curtains into one set and the other six into another. Then fold the sixth curtain over double at the front of the tent.
10 ULB पहिल्या भागाच्या कडेखाली पन्नास बिरडी करावीत व दुसऱ्या भागाच्या कडेलाही तशीच पन्नास बिरडी करावीत; BSB BSB: Make fifty loops along the edge of the end curtain in the first set, and fifty loops along the edge of the corresponding curtain in the second set.
11 ULB नंतर पडदे जोडण्यासाठी पितळेच्या पन्नास गोल कड्या कराव्यात; त्यामुळे दोन भागांना जोडून तंबू अखंड होईल. BSB BSB: Make fifty bronze clasps and put them through the loops to join the tent together as a unit.
12 ULB या तंबूच्या शेवटच्या पडद्याचा अर्धा भाग पवित्र निवासमंडपाच्या मागच्या टोकाखाली लोंबत राहील. BSB BSB: As for the overlap that remains of the tent curtains, the half curtain that is left over shall hang down over the back of the tabernacle.
13 ULB आणि तंबूचे पडदे लांबीकडून हातभर या बाजूला व हातभर त्या बाजूला निवासमंडप झाकण्यासाठी त्याच्या दोन्ही बाजूला लोंबते ठेवावे. BSB BSB: And the tent curtains will be a cubit longer on either side, and the excess will hang over the sides of the tabernacle to cover it.
14 ULB तंबूसाठी तांबडा रंग दिलेल्या मेंढ्याच्या कातड्याचे एक आच्छादन व दुसरे समुद्र प्राण्याच्या कातड्याचे एक आच्छादन करावे. BSB BSB: Also make a covering for the tent out of ram skins dyed red, and over that a covering of fine leather.
15 ULB पवित्र निवासमंडपाला बाभळीच्या लाकडाच्या उभ्या फळ्यांचा आधार करावा. BSB BSB: You are to construct upright frames of acacia wood for the tabernacle.
16 ULB प्रत्येक फळीची लांबी दहा हात व उंची दीड हात असावी. BSB BSB: Each frame is to be ten cubits long and a cubit and a half wide.
17 ULB प्रत्येक फळी दुसऱ्याशी जोडण्यासाठी दोन बाजूला दोन कुसे करावीत; निवासमंडपाच्या सर्व फळ्या अशाच कराव्यात. BSB BSB: Two tenons must be connected to each other for each frame. Make all the frames of the tabernacle in this way.
18 ULB पवित्र निवासमंडपाच्या दक्षिण बाजूसाठी वीस फळ्या कराव्यात. BSB BSB: Construct twenty frames for the south side of the tabernacle,
19 ULB फळ्यांसाठी चांदीच्या चाळीस बैठका कराव्यात. प्रत्येक फळीला आत खोल जाण्यासाठी प्रत्येक बाजूस एक बैठक या प्रमाणे चांदीच्या दोन बैठका असाव्यात. BSB BSB: with forty silver bases under the twenty frames—two bases for each frame, one under each tenon.
20 ULB पवित्र निवासमंडपाच्या दुसऱ्या म्हणजे उत्तर बाजूसाठी वीस फळ्या कराव्यात; BSB BSB: For the second side of the tabernacle, the north side, make twenty frames
21 ULB आणि त्यांच्यासाठी प्रत्येक फळीखाली दोन बैठका या प्रमाणे चांदीच्या चाळीस बैठका कराव्यात. BSB BSB: and forty silver bases—two bases under each frame.
22 ULB पवित्र निवासमंडपाच्या मागच्या बाजूसाठी म्हणजे पश्चिम बाजूसाठी आणखी सहा फळ्या कराव्यात; BSB BSB: Make six frames for the rear of the tabernacle, the west side,
23 ULB आणि मागील बाजूला कोपऱ्यांसाठी दोन फळ्या कराव्यात. BSB BSB: and two frames for the two back corners of the tabernacle,
24 ULB कोपऱ्याच्या फळ्या खालच्या बाजूला जोडाव्यात; त्यांच्यावरील भागांची कडी त्यांना जोडून ठेवील, दोन्ही कोपऱ्यांसाठी असेच करावे. BSB BSB: coupled together from bottom to top and fitted into a single ring. These will serve as the two corners.
25 ULB पवित्र निवासमंडपाच्या पश्चिम टोकास एकूण आठ फळ्या असतील आणि त्या प्रत्येक फळीच्या खाली दोन याप्रमाणे चांदीच्या सोळा बैठका असतील. BSB BSB: So there are to be eight frames and sixteen silver bases—two under each frame.
26 ULB त्यांच्या फळ्यांसाठी बाभळीच्या लाकडाचे अडसर करावेत; त्यांच्या पहिल्या बाजूस पाच अडसर व BSB BSB: You are also to make five crossbars of acacia wood for the frames on one side of the tabernacle,
27 ULB दुसऱ्या बाजूस पाच अडसर असावेत; आणि त्यांच्या पाठीमागच्या म्हणजे पश्चिम बाजूस पाच अडसर असावेत. BSB BSB: five for those on the other side, and five for those on the rear side of the tabernacle, to the west.
28 ULB मध्य भागावरील अडसर लाकडांच्या फळ्यातून एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जावा. BSB BSB: The central crossbar in the middle of the frames shall extend from one end to the other.
29 ULB फळ्या आणि अडसर सोन्याने मढवावेत आणि त्यांना जोडणाऱ्या कड्याही सोन्याच्या कराव्यात. BSB BSB: Overlay the frames with gold and make gold rings to hold the crossbars. Also overlay the crossbars with gold.
30 ULB मी तुला पर्वतावर दाखवल्याप्रमाणे पवित्र निवासमंडप बांधावा. BSB BSB: So you are to set up the tabernacle according to the pattern shown you on the mountain.
31 ULB तलम सणाच्या कापडाचा व निळ्या जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा एक अंतरपट बनवावा आणि त्यावर कुशल कारागिराकडून करूब काढून घ्यावेत. BSB BSB: Make a veil of blue, purple, and scarlet yarn, and finely spun linen, with cherubim skillfully worked into it.
32 ULB बाभळीच्या लाकडाचे चार खांब बनवून ते सोन्याने मढवावेत, त्यावर सोन्याच्या आकड्या लावाव्यात आणि ते खांब चांदीच्या चार उथळ्यांत उभे करावेत; BSB BSB: Hang it with gold hooks on four posts of acacia wood, overlaid with gold and standing on four silver bases.
33 ULB सोन्याच्या आकड्याखाली हा पडदा ठेवावा मग त्याच्यामागे आज्ञापटाचा कोश-ठेवावा; हा अंतरपट पवित्र स्थान व परमपवित्र स्थान यांना अलग करील; BSB BSB: And hang the veil from the clasps and place the ark of the Testimony behind the veil. So the veil will separate the Holy Place from the Most Holy Place.
34 ULB परमपवित्रस्थानातील आज्ञापटाच्या कोशावर दयासन ठेवावे. BSB BSB: Put the mercy seat on the ark of the Testimony in the Most Holy Place.
35 ULB अंतरपटाच्या दुसऱ्या बाजूला तू बनविलेला मेज ठेवावा; तो निवासमंडपाच्या उत्तर बाजूला असावा व दक्षिण बाजूला मेजासमोर दीपवृक्ष ठेवावा. BSB BSB: And place the table outside the veil on the north side of the tabernacle, and put the lampstand opposite the table, on the south side.
36 ULB “पवित्र निवासमंडपाच्या दारासाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा पडदा करून त्यावर वेलबुट्टीदार पडदा बनवावा. BSB BSB: For the entrance to the tent, you are to make a curtain embroidered with blue, purple, and scarlet yarn, and finely spun linen.
37 ULB हा पडदा लावण्यासाठी बाभळीच्या लाकडाचे पाच खांब करावेत व ते सोन्याने मढवावेत; त्यांच्याकरिता पितळेच्या पाच बैठका बनवाव्यात; हा पडदा अडकविण्यासाठी सोन्याच्या आकड्या कराव्यात.” BSB BSB: Make five posts of acacia wood for the curtain, overlay them with gold, use hooks of gold, and cast five bronze bases for them.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.