1 ULB मग परमेश्वर मोशेला म्हणाला, BSB BSB: Then the LORD said to Moses,
2 ULB “पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी दर्शनमंडपाचा निवासमंडप उभा कर. BSB BSB: “On the first day of the first month you are to set up the tabernacle, the Tent of Meeting.
3 ULB साक्षपटाचा कोश त्यामध्ये ठेव व तू अंतरपटाने कोशाला पडदा घाल. BSB BSB: Put the ark of the Testimony in it and screen off the ark with the veil.
4 ULB मग मेज आत आणून त्याच्यावरील सामान व्यवस्थित ठेव; नंतर दीपवृक्ष आत नेऊन त्याचे दिवे लाव. BSB BSB: Then bring in the table and set out its arrangement; bring in the lampstand as well, and set up its lamps.
5 ULB साक्षपटाच्या कोशापुढे सोन्याची धूपवेदी ठेव आणि निवासमंडपाच्या दाराचा पडदा लाव. BSB BSB: Place the gold altar of incense in front of the ark of the Testimony, and hang the curtain at the entrance to the tabernacle.
6 ULB दर्शनमंडपाच्या निवासमंडपाच्या दारापुढे होमवेदी ठेव. BSB BSB: Place the altar of burnt offering in front of the entrance to the tabernacle, the Tent of Meeting.
7 ULB दर्शनमंडप व वेदी यांच्यामध्ये गंगाळ ठेव व त्यामध्ये पाणी भर. BSB BSB: And place the basin between the Tent of Meeting and the altar, and put water in it.
8 ULB सभोवती अंगण कर व मग त्याच्या प्रवेशदारापाशी पडदा लाव. BSB BSB: Set up the surrounding courtyard and hang the curtain for the entrance to the courtyard.
9 ULB अभिषेकाचे तेल घेऊन निवासमंडपाला व त्यातल्या सर्व वस्तूंना अभिषेक कर व त्याच्या सर्व वस्तू पवित्र कर म्हणजे तो पवित्र होईल. BSB BSB: Take the anointing oil and anoint the tabernacle and everything in it; consecrate it along with all its furnishings, and it shall be holy.
10 ULB होमवेदी व तिची सर्व उपकरणे यांना अभिषेक करून पवित्र कर म्हणजे ती परमपवित्र होईल. BSB BSB: Anoint the altar of burnt offering and all its utensils; consecrate the altar, and it shall be most holy.
11 ULB गंगाळ व त्याच्या खालची बैठक ह्यास अभिषेक कर व त्यांना पवित्र कर. BSB BSB: Anoint the basin and its stand and consecrate them.
12 ULB अहरोन व त्याचे पुत्र ह्याना दर्शनमंडपाच्या दारापाशी नेऊन त्यांना आंघोळ घाल. BSB BSB: Then bring Aaron and his sons to the entrance to the Tent of Meeting and wash them with water.
13 ULB अहरोनाला पवित्र वस्रे घाल व त्यास तेलाने अभिषेक करून पवित्र कर, मग तो याजक या नात्याने माझी सेवा करील. BSB BSB: And you are to clothe Aaron with the holy garments, anoint him, and consecrate him, so that he may serve Me as a priest.
14 ULB त्याच्या पुत्रांनाजवळ बोलावून अंगरखे घाल. BSB BSB: Bring his sons forward and clothe them with tunics.
15 ULB त्यांच्या पित्याला जसा अभिषेक करशील त्याप्रमाणेच त्यांना कर म्हणजे याजक या नात्याने ते माझी सेवा करतील; हा त्यांचा अभिषेक त्यांच्यासाठी पिढ्यानपिढ्या निरंतरच्या याजकपदाचा दर्शक होईल.” BSB BSB: Anoint them just as you anointed their father, so that they may also serve Me as priests. Their anointing will qualify them for a permanent priesthood throughout their generations.”
16 ULB मोशेने परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे सर्वकाही तसे केले. BSB BSB: Moses did everything just as the LORD had commanded him.
17 ULB दुसऱ्या वर्षातील पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पवित्र निवासमंडपाची उभारणी झाली. BSB BSB: So the tabernacle was set up on the first day of the first month of the second year.
18 ULB परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे मोशेने पवित्र निवासमंडप उभा केला; प्रथम त्याने उथळ्या बसवून घेतल्या, मग त्याने त्यांच्यावर फळ्या लावल्या. अडसर लावले व त्यांचे खांब उभे केले; BSB BSB: When Moses set up the tabernacle, he laid its bases, positioned its frames, inserted its crossbars, and set up its posts.
19 ULB त्यानंतर निवासमंडपावरचा तंबू केला, मग वरच्या तंबूवर त्याने आच्छादन घातले; परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने हे सर्व केले. BSB BSB: Then he spread the tent over the tabernacle and put the covering over the tent, just as the LORD had commanded him.
20 ULB मोशेने साक्षपट घेऊन कोशात ठेवला व कोशाला दांडे लावून त्याच्यावर दयासन ठेवले. BSB BSB: Moses took the Testimony and placed it in the ark, attaching the poles to the ark; and he set the mercy seat atop the ark.
21 ULB त्याने तो कोश निवासमंडपात आणला आणि योग्य ठिकाणी अंतरपट लावून साक्षपटाचा कोश झाकला; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले. BSB BSB: Then he brought the ark into the tabernacle, put up the veil for the screen, and shielded off the ark of the Testimony, just as the LORD had commanded him.
22 ULB मोशेने पवित्र निवासमंडपाच्या उत्तर बाजूला दर्शनमंडपामध्ये पडद्याच्या बाहेर मेज ठेवले; BSB BSB: Moses placed the table in the Tent of Meeting on the north side of the tabernacle, outside the veil.
23 ULB त्याने त्याच्यावर परमेश्वरासमोर समर्पित भाकर ठेवली; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले. BSB BSB: He arranged the bread on it before the LORD, just as the LORD had commanded him.
24 ULB त्याने पवित्र निवासमंडपाच्या दक्षिण बाजूस दर्शनमंडपामध्ये मेजासमोर दीपवृक्ष ठेवला. BSB BSB: He also placed the lampstand in the Tent of Meeting opposite the table on the south side of the tabernacle
25 ULB नंतर त्याने परमेश्वरासमोर दीपवृक्षावर दिवे लावले; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले. BSB BSB: and set up the lamps before the LORD, just as the LORD had commanded him.
26 ULB त्याने दर्शनमंडपामध्ये अंतरपटासमोर सोन्याची वेदी ठेवली. BSB BSB: Moses placed the gold altar in the Tent of Meeting, in front of the veil,
27 ULB नंतर त्याने तिच्यावर सुगंधी धूप जाळला; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले. BSB BSB: and he burned fragrant incense on it, just as the LORD had commanded him.
28 ULB त्याने पवित्र निवासमंडपाच्या दाराला पडदा लावला. BSB BSB: Then he put up the curtain at the entrance to the tabernacle.
29 ULB त्याने पवित्र निवासमंडपाच्या दर्शनमंडपाच्या दारापाशी होमवेदी ठेवली व तिच्यावर होमार्पणे व अन्नार्पणे अर्पण केली; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले. BSB BSB: He placed the altar of burnt offering near the entrance to the tabernacle, the Tent of Meeting, and offered on it the burnt offering and the grain offering, just as the LORD had commanded him.
30 ULB त्याने दर्शनमंडप आणि वेदी यांच्यामध्ये गंगाळ ठेवले व धुण्यासाठी त्यामध्ये पाणी भरले. BSB BSB: He placed the basin between the Tent of Meeting and the altar and put water in it for washing;
31 ULB मोशे, अहरोन व अहरोनाचे पुत्र त्यामध्ये आपआपले हातपाय धूत असत; BSB BSB: and from it Moses, Aaron, and his sons washed their hands and feet.
32 ULB ते दर्शनमंडप व वेदीपाशी जाताना प्रत्येक वेळेस आपले हातपाय तेथे धूत असत; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी हे केले. BSB BSB: They washed whenever they entered the Tent of Meeting or approached the altar, just as the LORD had commanded Moses.
33 ULB त्याने निवास मंडपाभोवती अंगणाची कनात उभी केली व अंगणात वेदी बसवली आणि अंगणाच्या फाटकाला पडदा लावला; या प्रकारे परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे मोशेने सर्व काम संपविले. BSB BSB: And Moses set up the courtyard around the tabernacle and the altar, and he hung the curtain for the entrance to the courtyard. So Moses finished the work.
34 ULB दर्शनमंडपावर मेघाने छाया केली व पवित्र निवासमंडप परमेश्वराच्या तेजाने भरून गेला. BSB BSB: Then the cloud covered the Tent of Meeting, and the glory of the LORD filled the tabernacle.
35 ULB दर्शनमंडपावर मेघ राहिला व परमेश्वराच्या तेजाने निवासमंडप भरून गेला म्हणून मोशेला आत जाता येईना. BSB BSB: Moses was unable to enter the Tent of Meeting because the cloud had settled on it, and the glory of the LORD filled the tabernacle.
36 ULB पवित्र निवास मंडपावरील मेघ वर जाई तेव्हा इस्राएल लोक आपला पुढील प्रवास सुरू करीत; BSB BSB: Whenever the cloud was lifted from above the tabernacle, the Israelites would set out through all the stages of their journey.
37 ULB परंतु तो मेघ निवासमंडपावर असेपर्यंत लोक तेथून हलत नसत; तो वर जाईपर्यंत ते तेथेच थांबत. BSB BSB: If the cloud was not lifted, they would not set out until the day it was taken up.
38 ULB परमेश्वराचा मेघ दिवसा निवासमंडपावर राही आणि रात्री त्यामध्ये अग्नी असे त्यामुळे सर्व इस्राएल लोकांस आपल्या प्रवासात तो दिसत असे. BSB BSB: For the cloud of the LORD was over the tabernacle by day, and fire was in the cloud by night, in the sight of all the house of Israel through all their journeys.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.