1 ULB परमेश्वराने दर्शनमंडपातून मोशेला हाक मारली आणि त्यास म्हटले, BSB BSB: Then the LORD called to Moses and spoke to him from the Tent of Meeting, saying,
2 ULB इस्राएली लोकांस असे सांग की, जेव्हा तुम्ही परमेश्वरास पशूबली अर्पण करता तेव्हा त्यांनी तो गुराढोरांपैकी किंवा शेरडामेढरांपैकी अर्पावा. BSB BSB: “Speak to the Israelites and tell them: When any of you brings an offering to the LORD, you may bring as your offering an animal from the herd or the flock.
3 ULB जेव्हा एखाद्या मनुष्यास गुरांढोरातले होमार्पण अर्पावयाचे असेल तेव्हा त्याने दोषहीन नर अर्पावा; तो त्याने दर्शनमंडपाच्या दारापाशी आणून अर्पावा म्हणजे परमेश्वरासमोर तो मान्य होईल. BSB BSB: If his offering is a burnt offering from the herd, he is to present an unblemished male. He must bring it to the entrance to the Tent of Meeting for its acceptance before the LORD.
4 ULB त्या मनुष्याने यज्ञपशूच्या डोक्यावर आपला हात ठेवावा म्हणजे तो पशू त्याच्याबद्दल प्रायश्चित्त म्हणून मान्य होईल. BSB BSB: He is to lay his hand on the head of the burnt offering, so it can be accepted on his behalf to make atonement for him.
5 ULB त्यानंतर त्याने परमेश्वरासमोर तो गोऱ्हा वधावा. दर्शनमंडपाच्या दाराशी परमेश्वरासमोर अर्पण करून अहरोनाचे पुत्र, जे याजक, त्यांनी त्याचे रक्त सादर करावे आणि दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वारासमोरील वेदीवर सभोवती शिंपडावे. BSB BSB: And he shall slaughter the young bull before the LORD, and Aaron’s sons the priests are to present the blood and splatter it on all sides of the altar at the entrance to the Tent of Meeting.
6 ULB याजकाने त्या यज्ञपशूचे कातडे काढावे व त्याचे तुकडे करावे. BSB BSB: Next, he is to skin the burnt offering and cut it into pieces.
7 ULB नंतर अहरोन याजकाच्या मुलांनी वेदीवर विस्तव ठेवावा व नंतर त्याच्यावर लाकडे रचावी; BSB BSB: The sons of Aaron the priest shall put a fire on the altar and arrange wood on the fire.
8 ULB अहरोनाचे मुले जे याजक होते, त्यांनी वेदीवरच्या विस्तवावरील लाकडावर त्याचे तुकडे, डोके, व चरबी रचावी; BSB BSB: Then Aaron’s sons the priests are to arrange the pieces, including the head and the fat, atop the burning wood on the altar.
9 ULB त्याचे पाय व आतडी ही पाण्याने धुवावी, मग याजकाने त्या सर्वांचा वेदीवर होम करून तो अर्पावा, हे होमार्पण आहे; हे परमेश्वरासाठी सुवासिक हव्य होय हे अग्नीद्वारे केलेले अर्पण होय. BSB BSB: The entrails and legs must be washed with water, and the priest shall burn all of it on the altar as a burnt offering, a food offering, a pleasing aroma to the LORD.
10 ULB जर कोणाला शेरडाचे किंवा मेंढराचे होमार्पण करावयाचे असल्यास त्याने दोषहीन नर अर्पावा. BSB BSB: If, however, one’s offering is a burnt offering from the flock—from the sheep or goats—he is to present an unblemished male.
11 ULB त्याने वेदीच्या उत्तरेस परमेश्वरासमोर तो वधावा; मग अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत त्यांनी त्याचे रक्त वेदीवर व वेदीच्या सभोवती शिंपाडावे. BSB BSB: He shall slaughter it on the north side of the altar before the LORD, and Aaron’s sons the priests are to splatter its blood against the altar on all sides.
12 ULB मग याजकाने त्या पशूचे कापून तुकडे करावेत व त्याने ते तुकडे, डोके, व चरबी वेदीवरील विस्तवाच्या लाकडावर रचावी, BSB BSB: He is to cut the animal into pieces, and the priest shall arrange them, including the head and fat, atop the burning wood that is on the altar.
13 ULB त्याचे पाय व आतडी पाण्याने धुवावी; मग याजकाने त्या सर्व भागांचा वेदीवर होम करावा; हे होमार्पण परमेश्वरासाठी सुवासिक हव्य होय; BSB BSB: The entrails and legs must be washed with water, and the priest shall present all of it and burn it on the altar; it is a burnt offering, a food offering, a pleasing aroma to the LORD.
14 ULB जर कोणाला परमेश्वरासाठी पक्षाचे होमार्पण करावयाचे असेल तेव्हा त्याने त्याचे अर्पण होले किंवा पारव्याची पिल्ले अर्पावी. BSB BSB: If, instead, one’s offering to the LORD is a burnt offering of birds, he is to present a turtledove or a young pigeon.
15 ULB याजकाने तो पक्षी वेदीजवळ आणावा, त्याचे मुंडके मुरगळून उपटून काढावे व वेदीवर त्याचा होम करावा आणि त्याचे रक्त वेदीच्या बाजूवर निचरून टाकावे. BSB BSB: Then the priest shall bring it to the altar, twist off its head, and burn it on the altar; its blood should be drained out on the side of the altar.
16 ULB त्याने त्याचा चुनाळ व पिसे काढून वेदीच्या पूर्वेस वेदीवरील राख टाकण्याच्या जागी फेकून द्यावी. BSB BSB: And he is to remove the crop with its contents and throw it to the east side of the altar, in the place for ashes.
17 ULB त्याने तो पक्षी पंखाच्या मधोमध फाडावा, परंतू त्याचे दोन वेगळे भाग करू नयेत; मग याजकाने त्या पक्षाचा वेदीवरील जळत्या लाकडावर होम करावा; हे पण होमार्पण आहे. हे परमेश्वरासाठी केलेले सुवासिक हव्य होय हे अग्नीद्वारे केलेले होमार्पण होय. BSB BSB: He shall tear it open by its wings, without dividing the bird completely. And the priest is to burn it on the altar atop the burning wood. It is a burnt offering, a food offering, a pleasing aroma to the LORD.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.