1 ULB आता मी म्हणतो की, वारीस लहान बाळ आहे, तोपर्यंत तो सर्वांचा धनी असूनही त्याच्यामध्ये व दासामध्ये काही फरक नसतो. BSB BSB: What I am saying is that as long as the heir is a child, he is no different from a slave, although he is the owner of everything.
2 ULB पण पित्याने ठरवलेल्या मुदतीपर्यंत तो शिक्षकांच्या व कारभाऱ्याच्या स्वाधीन असतो. BSB BSB: He is subject to guardians and trustees until the date set by his father.
3 ULB अशाप्रकारे आपणदेखील बाळ असताना, आपण जगाच्या प्राथमिक शिक्षणाच्या दास्यात होतो. BSB BSB: So also, when we were children, we were enslaved under the basic principles of the world.
5 ULB ह्यात उद्देश हा होता की, नियमशास्त्राखाली असलेल्यांना त्याने खंडणी भरून सोडवावे; म्हणजे आपल्याला पुत्र होण्याचा हक्क मिळावा. BSB BSB: to redeem those under the law, that we might receive our adoption as sons.
6 ULB आणि तुम्ही पुत्र आहात म्हणून, देवाने अब्बा-पिता, अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्याआमच्या अंतःकरणात पाठवले आहे; BSB BSB: And because you are sons, God sent the Spirit of His Son into our hearts, crying out, “Abba, Father!”
7 ULB म्हणून तू आतापासून दास नाही तर पुत्र आहेस; आणि पुत्र आहेस, तर देवाच्याद्वारे वारीसही आहेस. BSB BSB: So you are no longer a slave, but a son; and since you are a son, you are also an heir through God.
8 ULB तथापि पूर्वी तुम्ही देवाला ओळखीत नव्हता, तेव्हा, जे स्वभावतः देव नाहीत त्यांचे दास होता; BSB BSB: Formerly, when you did not know God, you were slaves to those who by nature are not gods.
9 ULB पण आता तुम्ही देवाला ओळखीत असताना किंवा देव तुम्हास ओळखीत असताना तुम्ही त्या दुर्बळ व निःसत्व प्राथमिक शिक्षणाकडे पुन्हा कसे परत जाता? आणि पुन्हा त्यांच्या दास्यात राहण्याची इच्छा करता? BSB BSB: But now that you know God, or rather are known by God, how is it that you are turning back to those weak and worthless principles? Do you wish to be enslaved by them all over again?
10 ULB तुम्ही दिवस, महिने, ऋतू आणि वर्षे पाळता. BSB BSB: You are observing special days and months and seasons and years!
11 ULB तुमच्यासाठी मी केलेले श्रम कदाचित व्यर्थ झाले असतील, अशी मला तुमच्याविषयी भीती वाटते. BSB BSB: I fear for you, that my efforts for you may have been in vain.
12 ULB बंधूंनो, मी तुम्हास विनवणी करतो की, तुम्ही माझ्यासारखे व्हा, कारण मीही तुमच्यासारखा होतो. तुम्ही माझे काहीच वाईट केले नाही. BSB BSB: I beg you, brothers, become like me, for I became like you. You have done me no wrong.
13 ULB प्रथम तुम्हास शुभवर्तमान सांगण्याचा पहिला प्रसंग मला माझ्या शारीरीक व्याधीमुळे मिळाला हे तुम्हास माहित आहे. BSB BSB: You know that it was because of an illness that I first preached the gospel to you.
14 ULB आणि माझ्या देहाच्या अशक्तपणात तुमची परीक्षा होत असता, तुम्ही तिरस्कार केला नाही पण माझा देवाच्या दूतासारखा, ख्रिस्त येशूसारखा स्वीकार केला. BSB BSB: And although my illness was a trial to you, you did not despise or reject me. Instead, you welcomed me as if I were an angel of God, as if I were Christ Jesus Himself.
15 ULB तर तेव्हाचा तुमचा तो आशीर्वाद कोठे आहे? कारण, मी तुमच्याविषयी साक्ष देतो की, शक्य असते तर तुम्ही मला तुमचे स्वतःचे डोळे काढून दिले असते. BSB BSB: What then has become of your blessing? For I can testify that, if it were possible, you would have torn out your eyes and given them to me.
16 ULB मग मी तुम्हास खरे सांगतो म्हणून मी तुमचा वैरी झालो आहे काय? BSB BSB: Have I now become your enemy by telling you the truth?
17 ULB ते लोक तुमच्याविषयी आवेशी आहेत तरी चांगल्या प्रकारे नाही पण तुम्ही त्यांच्याविषयी आवेशी असावे म्हणून ते तुम्हास आमच्यापासून वेगळे करू पाहतात. BSB BSB: Those people are zealous for you, but not in a good way. Instead, they want to isolate you from us, so that you may be zealous for them.
18 ULB तर चांगल्या कारणांसाठी सर्वदा आवेशी असणे हे चांगले आणि मी तुम्हाजवळ प्रत्यक्ष आहे तेव्हाच मात्र आवेशी असावे असे नाही. BSB BSB: Nevertheless, it is good to be zealous if it serves a noble purpose—at any time, and not only when I am with you.
19 ULB माझ्या मुलांनो, तुमच्यात ख्रिस्ताचे रूप निर्माण होईपर्यंत मला तुमच्यासाठी पुन्हा प्रसूती वेदना होत आहेत. BSB BSB: My children, for whom I am again in the pains of childbirth until Christ is formed in you,
20 ULB ह्यावेळी मी तुमच्याबरोबर हजर असतो आणि आवाज चढवून बोलता आले असते तर मला बरे वाटले असते कारण तुमच्याविषयी मी संशयात आहे. BSB BSB: how I wish I could be with you now and change my tone, because I am perplexed about you.
21 ULB जे तुम्ही नियमशास्त्राधीन व्हावयास पाहता ते तुम्ही नियमशास्त्र ऐकत नाही काय? हे मला सांगा. BSB BSB: Tell me, you who want to be under the law, do you not understand what the law says?
22 ULB कारण शास्त्रात असे लिहिले आहे की, अब्राहामाला दोन पुत्र होतेः एक दासीपासून व एक स्वतंत्र स्त्रीपासून झालेला. BSB BSB: For it is written that Abraham had two sons, one by the slave woman and the other by the free woman.
23 ULB पण दासीपासून झालेला देहस्वभावानुसार जन्माला आला होता; तर स्वतंत्र स्त्रीपासून झालेला वचनामुळे जन्मला. BSB BSB: His son by the slave woman was born according to the flesh, but his son by the free woman was born through the promise.
24 ULB या गोष्टी दृष्टांतरूपाने समजावल्या जावू शकतात. त्या स्त्रिया दोन करारासारख्या आहेत एक सीनाय पर्वतावरून केलेला व दास्यासाठी मुलांना जन्म देणारा करार म्हणजे हागार होय. BSB BSB: These things serve as illustrations, for the women represent two covenants. One covenant is from Mount Sinai and bears children into slavery: This is Hagar.
25 ULB कारण ही हागार अरबस्तानातील सीनाय पर्वत आहे आणि ती आत्ताच्या यरुशलेमेच्या जोडीची आहे. आपल्या मुलांबाळांसह दास्यात आहे. BSB BSB: Now Hagar stands for Mount Sinai in Arabia and corresponds to the present-day Jerusalem, because she is in slavery with her children.
26 ULB नविन वरील यरुशलेम स्वतंत्र आहे; ही आपल्या सर्वांची आई आहे. BSB BSB: But the Jerusalem above is free, and she is our mother.
27 ULB शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘अगे वंध्ये, तुला मूल होत नसले तरी, तू आनंदित हो! ज्या तुला प्रसूतिवेदना होत नाही, ती तू आनंदाने जयघोष कर! आनंदाची आरोळी मार! कारण जिला पती आहे तिच्या मुलांपेक्षा, आशा सोडलेल्या स्त्रीची मुले अधिक आहेत.’ BSB BSB: For it is written: “Rejoice, O barren woman, who bears no children; break forth and cry aloud, you who have never travailed; because more are the children of the desolate woman than of her who has a husband.”
28 ULB आता बंधूनो, इसहाकासारखे तुम्ही अभिवचनाची संतती आहात. BSB BSB: Now you, brothers, like Isaac, are children of promise.
29 ULB परंतु त्यावेळेस देहस्वभावानुसार जो जन्मला होता, त्याने जो आत्म्यानुसार जन्मलेल्या मुलाचा छळ केला, तसा आताही होत आहे. BSB BSB: At that time, however, the son born by the flesh persecuted the son born by the Spirit. It is the same now.
30 ULB पण शास्त्रलेख काय सांगतो? ‘तू त्या दासीला व तिच्या मुलाला घालवून दे; कारण दासीचा मुलगा स्वतंत्र स्त्रीच्या मुलाबरोबर वारीस होणारच नाही.’ BSB BSB: But what does the Scripture say? “Expel the slave woman and her son, for the slave woman’s son will never share in the inheritance with the free woman’s son.”
31 ULB तर मग, बंधूंनो, आपण दासीची मुले नाही, पण स्वतंत्र स्त्रीची मुले आहोत. BSB BSB: Therefore, brothers, we are not children of the slave woman, but of the free woman.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.