1 ULB आता पृथ्वीवरील सर्व लोक एकच भाषेचा वापर करत होते आणि शब्द समान होते. BSB BSB: Now the whole world had one language and a common form of speech.
2 ULB ते पूर्वेकडे प्रवास करत असताना त्यांना शिनार देशात एक मैदान लागले आणि त्यांनी तेथेच वस्ती केली. BSB BSB: And as people journeyed eastward, they found a plain in the land of Shinar and settled there.
3 ULB ते एकमेकांना म्हणाले, “चला, आपण विटा करू व त्या पक्क्या भाजू.” त्यांच्याकडे बांधकामासाठी दगडाऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर होते. BSB BSB: And they said to one another, “Come, let us make bricks and bake them thoroughly.” So they used brick instead of stone, and tar instead of mortar.
4 ULB मग लोक म्हणाले, “चला, आपण आपल्यासाठी नगर बांधू आणि ज्याचे शिखर आकाशापर्यंत पोहचेल असा उंच बुरूज बांधू, आणि आपण आपले नाव होईल असे करू या. आपण जर असे केले नाही, तर पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होईल.” BSB BSB: “Come,” they said, “let us build for ourselves a city with a tower that reaches to the heavens, that we may make a name for ourselves and not be scattered over the face of all the earth.”
5 ULB आदामाच्या वंशजांनी बांधलेले ते नगर व तो बुरूज पाहण्यासाठी म्हणून परमेश्वर खाली उतरून आला. BSB BSB: Then the LORD came down to see the city and the tower that the sons of men were building.
6 ULB परमेश्वर देव म्हणाला, “पाहा, हे सर्व लोक एक असून, एकच भाषा बोलतात आणि ही तर त्यांची सुरुवात आहे! लवकरच, जे काही करण्याचा त्यांचा हेतू आहे ते करणे त्यांना मुळीच अशक्य होणार नाही. BSB BSB: And the LORD said, “If they have begun to do this as one people speaking the same language, then nothing they devise will be beyond them.
7 ULB चला आपण खाली जाऊन त्यांच्या भाषेचा घोटाळा करून टाकू. मग त्यांना एकमेकांचे बोलणे समजणार नाही.” BSB BSB: Come, let Us go down and confuse their language, so that they will not understand one another’s speech.”
8 ULB मग परमेश्वराने पृथ्वीभर त्यांची पांगापांग केली आणि म्हणून नगर बांधण्याचे काम त्यांनी थांबवले. BSB BSB: So the LORD scattered them from there over the face of all the earth, and they stopped building the city.
9 ULB त्यामुळे त्या ठिकाणाचे नाव बाबेल पडले, कारण तेथे परमेश्वराने सर्व पृथ्वीच्या भाषेचा घोटाळा केला आणि परमेश्वराने त्यांना तेथून सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगविले. BSB BSB: That is why it is called Babel, for there the LORD confused the language of the whole world, and from that place the LORD scattered them over the face of all the earth.
11 ULB अर्पक्षदाला जन्म दिल्यानंतर शेम पाचशे वर्षे जगला, तो आणखी मुले व मुलींचा पिता झाला. BSB BSB: And after he had become the father of Arphaxad, Shem lived 500 years and had other sons and daughters.
13 ULB शेलहाला जन्म दिल्यानंतर अर्पक्षद चारशे तीन वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला. BSB BSB: And after he had become the father of Shelah, Arphaxad lived 403 years and had other sons and daughters.
14 ULB जेव्हा शेलह तीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने एबरला जन्म दिला; BSB BSB: When Shelah was 30 years old, he became the father of Eber.
15 ULB एबरला जन्म दिल्यावर शेलह चारशे तीन वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला. BSB BSB: And after he had become the father of Eber, Shelah lived 403 years and had other sons and daughters.
16 ULB एबर चौतीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने पेलेगाला जन्म दिला. BSB BSB: When Eber was 34 years old, he became the father of Peleg.
17 ULB पेलेग झाल्यावर एबर चारशे तीस वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला. BSB BSB: And after he had become the father of Peleg, Eber lived 430 years and had other sons and daughters.
18 ULB पेलेग तीस वर्षांचा झाला, तेव्हा त्याने रऊ याला जन्म दिला. BSB BSB: When Peleg was 30 years old, he became the father of Reu.
19 ULB रऊ याला जन्म दिल्यावर पेलेग दोनशे नऊ वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला. BSB BSB: And after he had become the father of Reu, Peleg lived 209 years and had other sons and daughters.
20 ULB रऊ बत्तीस वर्षांचा झाला, तेव्हा त्याने सरुगाला जन्म दिला. BSB BSB: When Reu was 32 years old, he became the father of Serug.
21 ULB सरुगाला जन्म दिल्यावर रऊ दोनशे सात वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला. BSB BSB: And after he had become the father of Serug, Reu lived 207 years and had other sons and daughters.
22 ULB सरुग तीस वर्षांचा झाला, तेव्हा त्याने नाहोराला जन्म दिला. BSB BSB: When Serug was 30 years old, he became the father of Nahor.
23 ULB नाहोराला जन्म दिल्यावर सरुग दोनशे वर्षे जगला आणि त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला. BSB BSB: And after he had become the father of Nahor, Serug lived 200 years and had other sons and daughters.
24 ULB नाहोर एकोणतीस वर्षांचा झाला, तेव्हा त्याने तेरहाला जन्म दिला. BSB BSB: When Nahor was 29 years old, he became the father of Terah.
25 ULB तेरहाला जन्म दिल्यावर नाहोर आणखी एकशे एकोणीस वर्षे जगला आणि त्याने मुलांना व मुलींना जन्म दिला. BSB BSB: And after he had become the father of Terah, Nahor lived 119 years and had other sons and daughters.
26 ULB तेरह सत्तर वर्षांचा झाला, तेव्हा त्याने अब्राम, नाहोर व हारान यांना जन्म दिला. BSB BSB: When Terah was 70 years old, he became the father of Abram, Nahor, and Haran.
27 ULB तेरहाची वंशावळ ही: तेरहाने अब्राम, नाहोर व हारान यांना जन्म दिला. हारानाने लोटाला जन्म दिला. BSB BSB: This is the account of Terah. Terah became the father of Abram, Nahor, and Haran. And Haran became the father of Lot.
28 ULB हारान, आपला पिता तेरह जिवंत असताना आपली जन्मभूमी खास्द्यांचे ऊर येथे मरण पावला. BSB BSB: During his father Terah’s lifetime, Haran died in his native land, in Ur of the Chaldeans.
29 ULB अब्राम व नाहोर या दोघांनीही लग्न केले. अब्रामाच्या पत्नीचे नाव साराय आणि नाहोरच्या पत्नीचे नाव मिल्का होते. मिल्का ही हारानाची मुलगी होती. हा हारान मिल्का व इस्का यांचा पिता होता. BSB BSB: And Abram and Nahor took wives for themselves. Abram’s wife was named Sarai, and Nahor’s wife was named Milcah; she was the daughter of Haran, who was the father of both Milcah and Iscah.
30 ULB साराय वांझ होती, तिला मूलबाळ नव्हते. BSB BSB: But Sarai was barren; she had no children.
32 ULB तेरह दोनशे पाच वर्षे जगला; त्यानंतर तो हारान येथे मरण पावला. BSB BSB: Terah lived 205 years, and he died in Haran.