1 ULB नंतर देवाने नोहाला व त्याच्या मुलांना आशीर्वाद दिला आणि म्हटले, “फलदायी व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी भरून टाका. BSB BSB: And God blessed Noah and his sons and said to them, “Be fruitful and multiply and fill the earth.
2 ULB पृथ्वीवरील प्रत्येक जिवंत प्राणी, आकाशातील प्रत्येक पक्षी, जमिनीवर सरपटणारे सर्व प्राणी आणि समुद्रातील सर्व मासे ह्यांच्यावर तुमचे भय व धाक राहील; ते तुमच्या कह्यात दिले आहेत. BSB BSB: The fear and dread of you will fall on every living creature on the earth, every bird of the air, every creature that crawls on the ground, and all the fish of the sea. They are delivered into your hand.
3 ULB प्रत्येक हालचाल करणारा प्राणी हा तुमचे अन्न होईल. जशा मी हिरव्या वनस्पती दिल्या आहेत, तसेच आता सर्वकाही तुम्हास देत आहे. BSB BSB: Everything that lives and moves will be food for you; just as I gave you the green plants, I now give you all things.
4 ULB पण ज्यामध्ये त्याचे जीवन म्हणजे रक्त आहे, ते मांस तुम्ही खाऊ नये. BSB BSB: But you must not eat meat with its lifeblood still in it.
5 ULB परंतु तुमच्या रक्तासाठी, जे रक्त तुमचे जीवन आहे, त्याबद्दल मी आवश्यक भरपाई घेईन. प्रत्येक प्राण्याच्या हातून मी ती घेईन. मनुष्याच्या हातून, म्हणजे ज्याने आपल्या भावाचा खून केला आहे त्याच्या हातून, त्या मनुष्याच्या जिवाबद्दल मी भरपाईची मागणी करीन. BSB BSB: And surely I will require the life of any man or beast by whose hand your lifeblood is shed. I will demand an accounting from anyone who takes the life of his fellow man:
6 ULB जो कोणी मनुष्याचे रक्त पाडतो, त्याचे रक्त मनुष्याकडून पाडले जाईल, कारण देवाने मनुष्यास त्याच्या प्रतिरूपाचे बनवले आहे. BSB BSB: Whoever sheds the blood of man, by man his blood will be shed; for in His own image God has made mankind.
7 ULB तुम्ही मात्र फलदायी आणि बहुगुणित व्हा, सर्व पृथ्वीवर विस्तारा, आणि तिच्यावर बहुगुणित व्हा.” BSB BSB: But as for you, be fruitful and multiply; spread out across the earth and multiply upon it.”
9 ULB “माझे ऐका! मी तुमच्याशी व तुमच्या नंतर तुमच्या वंशजाशी एक करार स्थापन करतो, BSB BSB: “Behold, I now establish My covenant with you and your descendants after you,
10 ULB आणि तुमच्याबरोबर असलेले सर्व जिवंत प्राणी, म्हणजे तुमच्याबरोबर तारवातून बाहेर आलेले पक्षी, गुरेढोरे, आणि पृथ्वीवर राहणारे सर्व प्राणी त्यांच्याशीही एक करार स्थापित करतो. BSB BSB: and with every living creature that was with you—the birds, the livestock, and every beast of the earth—every living thing that came out of the ark.
11 ULB अशा प्रकारे मी तुमच्याशी करार स्थापित करतो की, यापुढे पुराच्या पाण्याने पृथ्वीवरील सर्व देह पुन्हा कधीही नष्ट केले जाणार नाहीत व पुन्हा कधीही पुराने पृथ्वीचा नाश होणार नाही.” BSB BSB: And I establish My covenant with you: Never again will all life be cut off by the waters of a flood; never again will there be a flood to destroy the earth.”
12 ULB देव म्हणाला, “मी माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये, व तुमच्याबरोबर जे सर्व जिवंत जीव आहेत त्यांच्यामध्ये भावी पिढ्यानपिढ्यासाठी हा करार केल्याची निशाणी हीच आहे. BSB BSB: And God said, “This is the sign of the covenant I am making between Me and you and every living creature with you, a covenant for all generations to come:
13 ULB मी ढगात मेघधनुष्य ठेवले आहे; ते सर्व पृथ्वी व माझ्यामध्ये केलेल्या कराराची निशाणी आहे. BSB BSB: I have set My rainbow in the clouds, and it will be a sign of the covenant between Me and the earth.
14 ULB मी जेव्हा पृथ्वीवर ढग आणीन तेव्हा तुम्हास ढगात मेघधनुष्य दिसेल, BSB BSB: Whenever I form clouds over the earth and the rainbow appears in the clouds,
15 ULB नंतर मी ते पाहीन तेव्हा मी तुमच्याशी व पृथ्वीवरील सर्व देहातल्या जिवंत प्राण्यांशी केलेल्या माझ्या कराराची मला आठवण होईल, या कराराप्रमाणे पुराच्या पाण्याने पृथ्वीवरील सर्व देहाचा पुन्हा कधीही नाश करणार नाही. BSB BSB: I will remember My covenant between Me and you and every living creature of every kind. Never again will the waters become a flood to destroy all life.
16 ULB मेघधनुष्य ढगात राहील आणि जो सर्वकाळचा करार देव आणि पृथ्वीवरील सर्व देहातले जिवंत प्राणी यांच्यामध्ये आहे त्याची आठवण म्हणून मी त्याकडे पाहीन.” BSB BSB: And whenever the rainbow appears in the clouds, I will see it and remember the everlasting covenant between God and every living creature of every kind that is on the earth.”
17 ULB नंतर देव नोहाला म्हणाला, “हे मेघधनुष्य माझ्यामध्ये व पृथ्वीवरील सर्व देहांमध्ये स्थापित केलेल्या कराराची निशाणी आहे.” BSB BSB: So God said to Noah, “This is the sign of the covenant that I have established between Me and every creature on the earth.”
18 ULB नोहाबरोबर त्याचे पुत्र तारवाबाहेर आले; त्यांची नावे शेम, हाम व याफेथ अशी होती. आणि हाम हा कनानाचा पिता होता BSB BSB: The sons of Noah who came out of the ark were Shem, Ham, and Japheth. And Ham was the father of Canaan.
19 ULB हे नोहाचे तीन पुत्र होते, आणि यांच्यापासूनच सर्व पृथ्वीवर लोकविस्तार झाला. BSB BSB: These three were the sons of Noah, and from them the whole earth was populated.
21 ULB तो थोडा द्राक्षारस प्याला आणि तो धुंद झाला. तो त्याच्या तंबूत उघडा-वाघडा पडला होता. BSB BSB: But when he drank some of its wine, he became drunk and uncovered himself inside his tent.
22 ULB तेव्हा कनानाचा पिता हाम याने आपला पिता उघडा-वागडा पडलेला असल्याचे पाहिले व त्याने तंबूच्या बाहेर येऊन ते आपल्या भावांना सांगितले. BSB BSB: And Ham, the father of Canaan, saw his father’s nakedness and told his two brothers outside.
23 ULB मग शेम व याफेथ यांनी एक कपडा घेतला व तो आपल्या खांद्यावर ठेवून ते पाठमोरे तंबूत गेले. अशा प्रकारे त्यांनी आपल्या पित्याची नग्नता झाकली; पाठमोरे असल्यामुळे ती त्यांना दिसली नाही. BSB BSB: Then Shem and Japheth took a garment and placed it across their shoulders, and walking backward, they covered their father’s nakedness. Their faces were turned away so that they did not see their father’s nakedness.
24 ULB जेव्हा नोहा नशेतून जागा झाला, तेव्हा आपला धाकटा मुलगा हाम याने काय केले हे त्यास समजले. BSB BSB: When Noah awoke from his drunkenness and learned what his youngest son had done to him,
25 ULB तेव्हा नोहा म्हणाला, “कनान शापित होवो, तो आपल्या भावाच्या गुलामातील सर्वांत खालचा गुलाम होवो.” BSB BSB: he said, “Cursed be Canaan! A servant of servants shall he be to his brothers.”
26 ULB तो म्हणाला, “शेमाचा देव परमेश्वर धन्यवादित असो. कनान त्याचा सेवक होवो. BSB BSB: He also declared: “Blessed be the LORD, the God of Shem! May Canaan be the servant of Shem.
27 ULB देव याफेथाचा अधिक विस्तार करो, आणि शेमाच्या तंबूत तो त्याचे घर करो. कनान त्यांचा सेवक होवो.” BSB BSB: May God expand the territory of Japheth; may he dwell in the tents of Shem, and may Canaan be his servant.”
28 ULB पूरानंतर नोहा तीनशे पन्नास वर्षे जगला; BSB BSB: After the flood, Noah lived 350 years.
29 ULB नोहा एकूण नऊशें पन्नास वर्षे जगला; मग त्यानंतर तो मरण पावला. BSB BSB: So Noah lived a total of 950 years, and then he died.