1 ULB “त्या सर्वशक्तीमानाने न्यायवेळ का नेमून ठेवली नाही? त्यास ओळखणाऱ्यांना त्या न्याय दिवसाची का प्रतिती येत नाही? BSB BSB: “Why does the Almighty not reserve times for judgment? Why may those who know Him never see His days?
2 ULB आणि काही जण हद्द दर्शविणाऱ्या खुणा सरकवतात. लोक पशूंचे कळप चोरुन स्वच:च्या रानात चरायला नेतात. BSB BSB: Men move boundary stones; they pasture stolen flocks.
3 ULB ते अनाथ मुलांची गाढवे चोरतात. ते विधवेचा बैल गहाण म्हणून ठेवतात. BSB BSB: They drive away the donkey of the fatherless and take the widow’s ox in pledge.
4 ULB ते गरजंवताना त्यांच्या मार्गापासून बहकवतात. सगळ्या पृथ्वीवरील गरीबांना या दुष्टांपासून लपून रहावे लागते. BSB BSB: They push the needy off the road and force all the poor of the land into hiding.
5 ULB गरीब लोक वाळवंटात हिंडून अन्न शोधणाऱ्या मोकाट गाढवाप्रमाणे आहेत ते काळजीपूर्वक अन्नाचा शोध घेतात. त्यांच्या मुलाबाळांना जंगल अन्न पुरवते. BSB BSB: Indeed, like wild donkeys in the desert, the poor go to work foraging for food; the wasteland is food for their children.
6 ULB गरीब लोक रात्रीपर्यंत इतरांच्या शेतात कापणी करतात, आणि ते दुष्टांच्या पिकातील द्राक्षे वेचतात. BSB BSB: They gather fodder in the fields and glean the vineyards of the wicked.
7 ULB त्यांना रात्री कपड्यांशिवाय झोपावे लागते. थंडीपासून रक्षण करण्यासाठी त्यांच्याजवळ पांघरुण नसते. BSB BSB: Without clothing, they spend the night naked; they have no covering against the cold.
8 ULB ते डोंगरावरील पावसाने भिजतात, आश्रय नसल्याकारणाने ते खडकांना कवटाळून बसतात. BSB BSB: Drenched by mountain rains, they huddle against the rocks for want of shelter.
9 ULB दुष्ट लोक स्तनपान करणारे बाळ आई जवळून घेतात. ते गरीबाच्या त्याने काढलेल्या कर्जाबद्दल तारण म्हणून त्यांची मुले ठेवून घेतात. BSB BSB: The fatherless infant is snatched from the breast; the nursing child of the poor is seized for a debt.
10 ULB ते कपडे नसल्यामुळे उघडेच असतात, ते दुसऱ्यांच्या धान्यांच्या पेंढ्या वाहतात पण स्वत: मात्र उपाशीच राहतात. BSB BSB: Without clothing, they wander about naked. They carry the sheaves, but still go hungry.
11 ULB ते आवाराच्या आत तेल काढतात, ते दुष्टांच्या द्राक्षकुंडात द्राक्ष तुडवतात तरी ते तान्हाले राहतात. BSB BSB: They crush olives within their walls; they tread the winepresses, but go thirsty.
12 ULB शहरात मरणास टेकलेल्या मनुष्यांचे दु:खद रडणे ऐकू येते, घायाळाचा आत्मा आरोळी मारतो, परंतु देव त्यांच्या प्रारर्थनेकडे लक्ष देत नाही. BSB BSB: From the city, men groan, and the souls of the wounded cry out, yet God charges no one with wrongdoing.
13 ULB काही लोक प्रकाशा विरूद्ध बंड करतात. देवाला काय हवे आहे हे जाणून घ्यायची त्यांची इच्छा नसते. देवाच्या इच्छेप्रमाणे जगणे त्यांना आवडत नाही. BSB BSB: Then there are those who rebel against the light, not knowing its ways or staying on its paths.
14 ULB खुनी सकाळी लवकर उठतो आणि गरीब व असहाय्य लोकांस ठार मारतो तो रात्रीच्या वेळी चोरासारखा असतो. BSB BSB: When daylight is gone, the murderer rises to kill the poor and needy; in the night he is like a thief.
15 ULB ज्या मनुष्यास व्यभिचार करायचा आहे तो रात्रीची वाट बघतो. तो म्हणतो, ‘मला कोणीही बघणार नाही’ पण तरीही तो त्याचा चेहरा झाकतो. BSB BSB: The eye of the adulterer watches for twilight. Thinking, ‘No eye will see me,’ he covers his face.
16 ULB रात्रीच्या वेळी अंधार असतो तेव्हा दुष्ट लोक दुसऱ्यांची घरे फोडतात. पण दिवसा ते स्वत:ला त्यांच्या घरांत कोंडून घेतात. ते प्रकाशाला टाळतात. BSB BSB: In the dark they dig through houses; by day they shut themselves in, never to experience the light.
17 ULB त्या दुष्टांना काळीकुटृ रात्र सकाळसारखी वाटते. त्या भयंकर काळोखाची भयानकता त्यांना चांगलीच माहीत असते. BSB BSB: For to them, deep darkness is their morning; surely they are friends with the terrors of darkness!
18 ULB पुरात जशा वस्तू वाहून जातात तशी दुष्ट माणसे वाहून नेली जातात, त्यांच्या जमिनीला शाप दिला जातो, त्यांच्या शेतात काम करण्यास कोणीही जात नाहीत. BSB BSB: They are but foam on the surface of the water; their portion of the land is cursed, so that no one turns toward their vineyards.
19 ULB हिवाळ्यातल्या बर्फापासून मिळालेले त्यांचे पाणी उष्ण आणि कोरडी हवा शोषून घेते. त्याप्रमाणे त्या पापी लोकांस थडग्यात नेले जाते. BSB BSB: As drought and heat consume the melting snow, so Sheol steals those who have sinned.
20 ULB ज्या उदराने त्यास जन्म दिला ती विसरून जाईल, त्याची आठवण राहणार नाही, त्याप्रमाणे दुष्टपणा झाडासारखा मोडून पडेल. BSB BSB: The womb forgets them; the worm feeds on them; they are remembered no more. So injustice is broken like a tree.
21 ULB दुष्ट माणसे वांझ बायकांना त्रास देतात ज्यांना मुले झालेली नाहीत, ते विधवांसाठी काही चांगले करीत नाहीत. BSB BSB: They prey on the barren and childless, and show no kindness to the widow.
22 ULB तरी देव आपल्या सामर्थ्याने बलवानास राखतो, ज्याला जगण्याचा भरवसा नाही तो उठतो, BSB BSB: Yet by His power, God drags away the mighty; though rising up, they have no assurance of life.
23 ULB देव दुष्टांना आपण सुरक्षित आहेत असा विचार करण्यास भाग पाडतो आणि त्याविषयी ते आनंदी होतात. BSB BSB: He gives them a sense of security, but His eyes are on their ways.
24 ULB ते उंचावले जातात परंतू थोड्या काळापुरते नंतर ते जातात. खरोखर, ते खचून जातात, ते इतर सर्वांप्रमाणे काढून टाकले जातात. आणि ते कणसाच्या शेड्यांप्रमाणे कापून टाकले जातात. BSB BSB: They are exalted for a moment, then they are gone; they are brought low and gathered up like all others; they are cut off like heads of grain.
25 ULB या गोष्टी खऱ्या नाहीत असे कोण म्हणतो, मी खोटे बोललो हे कोण सिध्द करेल? माझे बोलने निरर्थक आहे हे कोण दाखवून देईल?” BSB BSB: If this is not so, then who can prove me a liar and reduce my words to nothing?”
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.