1 ULB “खरोखर चांदी मिळते अशा खाणी आहेत, सोने शुद्ध करण्याची जागा असते. BSB BSB: “Surely there is a mine for silver and a place where gold is refined.
2 ULB जमिनीतून लोखंड काढतात, पाषाणामधून तांबे वितळवले जाते. BSB BSB: Iron is taken from the earth, and copper is smelted from ore.
3 ULB मणुष्य अंधाराचे निवारण करतो, अगदी खोलवर जाऊन, गडद अंधारातील व मृत्यूछायेतील पाषाणाचा तो शोध करीतो. BSB BSB: Man puts an end to the darkness; he probes the farthest recesses for ore in deepest darkness.
4 ULB लोकांच्या राहण्याच्या जागेपासून तो दुर खाण खणतो, जिथे आजपर्यंत कोणाचेही पाऊल गेले नसेल तिथे तो जातो, तो दोरीला लोंबकळतो इतरांपेक्षा खूप खोल जातो. BSB BSB: Far from human habitation he cuts a shaft in places forgotten by the foot of man. Far from men he dangles and sways.
5 ULB जसे जमिनीकडे पाहा, तिच्यातून आपणास अन्न मिळते, जसे अग्नीने तीला उलटवले जाते. BSB BSB: Food may come from the earth, but from below it is transformed as by fire.
6 ULB जमिनीच्या खालचे पाषाण म्हणजे जेथे नीलमणी मिळतात, आणि त्या मातीमध्ये सोने असते. BSB BSB: Its rocks are the source of sapphires, containing flecks of gold.
7 ULB पक्ष्यांना त्या वाटांविषयी काही माहिती नसते, कोणत्याही बहिरी ससाण्याच्या डोळ्यांनी त्या वाटा पाहिलेल्या नसतात. BSB BSB: No bird of prey knows that path; no falcon’s eye has seen it.
8 ULB रानटी जनावरे त्या वाटांवरुन गेलेली नसतात, सिंहही त्या वाटेने गेलेला नसतो. BSB BSB: Proud beasts have never trodden it; no lion has ever prowled over it.
9 ULB मणुष्य कठीण खडकावर हात टाकतो, तो ते डोंगर पूर्ण मुळापासून उलटवून टाकतो. BSB BSB: The miner strikes the flint; he overturns mountains at their base.
10 ULB ते खडकातून बोगदा खणतात, आणि त्यांचे डोळे खडकातला खजिना बघतात. BSB BSB: He hews out channels in the rocks, and his eyes spot every treasure.
11 ULB ते पाण्याचे प्रवाह बंद करतात म्हणजे त्यातून पाणि बाहेर पडत नाही, ते दडलेल्या वस्तू बाहेर प्रकाशात आणतात. BSB BSB: He stops up the sources of the streams to bring what is hidden to light.
12 ULB पण मनुष्यास शहाणपण कुठे मिळेल? समजूतदारपणा शोधण्यासाठी आपल्याला कुठे जावे लागेल? BSB BSB: But where can wisdom be found, and where does understanding dwell?
13 ULB शहाणपण किती मोलाचे आहे हे मणुष्याला कळत नाही, पृथ्वीवरचे लोक जमीन खणून शहाणपण शोधू शकत नाहीत. BSB BSB: No man can know its value, nor is it found in the land of the living.
14 ULB पृथ्वीवरील मोठे खोल जलाशय असे म्हणते, ‘माझ्यामध्ये ते नाही.’ सागर म्हणतो, ‘माझ्याजवळीही ते नाही.’ BSB BSB: The ocean depths say, ‘It is not in me,’ while the sea declares, ‘It is not with me.’
15 ULB तुम्ही सोने देऊन ते विकत घेऊ शकत नाही, ते विकत घेण्यासाठी जगात तेवढी चांदी नाही. BSB BSB: It cannot be bought with gold, nor can its price be weighed out in silver.
16 ULB तुम्ही ओफीरच्या सोन्याने किंवा मौल्यवान गोमेद किंवा नीलमण्याने शहाणपण विकत घेऊ शकत नाही. BSB BSB: It cannot be valued in the gold of Ophir, in precious onyx or sapphire.
17 ULB शहाणपण सोन्यापेक्षा किंवा स्फटिकापेक्षा मौल्यवान असते, सोन्यात जडवलेले मौल्यवान खडेही शहाणपण विकत घेऊ शकत नाही. BSB BSB: Neither gold nor crystal can compare to it, nor jewels of fine gold be exchanged for it.
18 ULB शहाणपण पोवळ्यापेक्षा व स्फटिकापेक्षाही मौल्यवान आहे, माणकापेक्षा ही त्याचे मोल अधिक आहे. BSB BSB: Coral and quartz are unworthy of mention; the price of wisdom is beyond rubies.
19 ULB इथिओपियातील (कूश) पीतमणि त्याच्या बरोबरीचा नाही, शुध्द सोन्याने तुम्ही तो विकत घेऊ शकत नाही. BSB BSB: Topaz from Cush cannot compare to it, nor can it be valued in pure gold.
20 ULB मग शहाणपणा कुठून येते? समजूतदारपणा आपल्याला कुठे मिळेल? BSB BSB: From where, then, does wisdom come, and where does understanding dwell?
21 ULB पृथ्वीवरील सर्व जिवंत प्राण्यापासून शहाणपण लपवून ठेवले आहे, आकाशातले पक्षीसुध्दा ते बघू शकत नाहीत. BSB BSB: It is hidden from the eyes of every living thing and concealed from the birds of the air.
22 ULB मृत्यू आणि विनाश म्हणतात, ‘आम्हास शहाणपण सापडले नाही, आम्ही त्याबद्दलच्या फक्त अफवाच ऐकल्या आहेत.’ BSB BSB: Abaddon and Death say, ‘We have heard a rumor about it.’
23 ULB फक्त देवालाच शहाणपणाकडे नेणारा मार्ग माहीत आहे, फक्त देवालाच तो कुठे आहे हे माहीत आहे. BSB BSB: But God understands its way, and He knows its place.
24 ULB देवाला पृथ्वीचे अगदी शेवटचे टोकसुध्दा दिसू शकते, त्यास आकाशाखालचे सर्वकाही दिसते. BSB BSB: For He looks to the ends of the earth and sees everything under the heavens.
25 ULB देवाने वाऱ्याला त्यांची शक्ती दिली, सागराला किती मोठे करायचे ते त्यानेच ठरवले. BSB BSB: When God fixed the weight of the wind and measured out the waters,
26 ULB पावसास कोठे पाठवायचे ते त्यानेच ठरवले आणि वादळाने कुठे जायचे तेही त्यानेच ठरवले. BSB BSB: when He set a limit for the rain and a path for the thunderbolt,
27 ULB तेव्हा देवाला शहाणपण दिसले आणि त्याने त्याचा विचार केला, शहाणपणाचे मूल्य किती आहे ते त्याने पारखले आणि त्या शहाणपणाला संमती दिली. BSB BSB: then He looked at wisdom and appraised it; He established it and searched it out.
28 ULB आणि देव लोकांस म्हणाला, परमेश्वराची भीती बाळगा व त्यास मान द्या हेच शहाणपण आहे, वाईट गोष्टी करु नका तोच समजूतदारपणा आहे.” BSB BSB: And He said to man, ‘Behold, the fear of the Lord, that is wisdom, and to turn away from evil is understanding.’”
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.