1 ULB तुला लिव्याथानाला गळ टाकून पकडता येईल का? तुला त्याची जीभ दोरीने बांधता येईल का? BSB BSB: “Can you pull in Leviathan with a hook or tie down his tongue with a rope?
2 ULB तुला लिव्याथानाच्या नाकातून दोरी घालून त्यास वेसण घालता येईल का? किंवा त्याच्या जबड्यात गळ घालता येईल का? BSB BSB: Can you put a cord through his nose or pierce his jaw with a hook?
3 ULB लिव्याथान तुझ्याकडे सोडून देण्यासाठी याचना करील का? तो तुझ्याशी मृदू शब्दात बोलेल का? BSB BSB: Will he beg you for mercy or speak to you softly?
4 ULB लिव्याथान तुझ्याशी करार करून जन्मभर तुझा दास होऊन राहील का? BSB BSB: Will he make a covenant with you to take him as a slave for life?
5 ULB तू पक्ष्याशी जसा खेळशील तसा लिव्याथानाशी खेळशील का? तू त्यास दोरीने बांधशील का? तुझ्या मुली त्याच्याशी खेळू शकतील काय? BSB BSB: Can you pet him like a bird or put him on a leash for your maidens?
6 ULB मच्छीमार तुझ्याकडून लिव्याथानाला विकत घेण्याचा प्रयत्न करतील का? ते त्याचे तुकडे करून ते व्यापाऱ्यांना विकण्याचा प्रयत्न करतील का? BSB BSB: Will traders barter for him or divide him among the merchants?
7 ULB तू लिव्याथानाच्या कातडीत किंवा डोक्यात बरच्या फेकशील का? BSB BSB: Can you fill his hide with harpoons or his head with fishing spears?
8 ULB तू एकदा का लिव्याथानावर हात टाकलास तर पुन्हा तसे कधी करु शकणार नाहीस. ती कशा प्रकारची लढाई असेल याचा एकदा विचार कर. BSB BSB: If you lay a hand on him, you will remember the battle and never repeat it!
9 ULB तू लिव्याथानाचा पराभव करु शकशील असे तुला वाटत असेल तर ते विसरून जा. तशा आशेला जागाच नाही. त्याच्याकडे नजर टाकताच तुझी भीतीने गाळण उडेल. BSB BSB: Surely hope of overcoming him is false. Is not the sight of him overwhelming?
10 ULB एकही मनुष्य त्यास जागे करून त्याचा राग ओढवून घेण्याइतका शूर नाही. “माझ्याविरुध्द उभा राहणाराही कोणी नाही. BSB BSB: No one is so fierce as to rouse Leviathan. Then who is able to stand against Me?
11 ULB मला कोणी काही प्रथम दिले नाही म्हणून मी त्यांची परत फेड करू? या नभोमंडळाखाली जे जे आहे ते सर्व माझे आहे. BSB BSB: Who has given to Me that I should repay him? Everything under heaven is Mine.
12 ULB मी तुला लिव्याथानाच्या पायांविषयी, त्याच्या शक्तीविषयी आणि त्याच्या ऐटदार बांध्याविषयी सांगेन. BSB BSB: I cannot keep silent about his limbs, his power and graceful form.
13 ULB कोणीही त्याची कातडी छेदू शकत नाही. त्याची जबड्यांत कोणाला शिरता येईल? BSB BSB: Who can strip off his outer coat? Who can approach him with a bridle?
14 ULB लिव्याथानाला त्याचा जबडा उघडायला कोणीही भाग पाडू शकत नाही. त्याच्या तोंडातल्या दातांची लोकांस भीती वाटते. BSB BSB: Who can open his jaws, ringed by his fearsome teeth?
15 ULB लिव्याथानाच्या पाठीवर ढालीसारख्या खवल्यांच्या रांगा एकमेकांना चिकटून आहेत. BSB BSB: His rows of scales are his pride, tightly sealed together.
16 ULB ते खवले एकमेकांना इतके चिकटले आहेत की त्यातून हवासुध्दा जाऊ शकत नाही. BSB BSB: One scale is so near to another that no air can pass between them.
17 ULB त्याचे खवले एकमेकांशी घटृ बांधलेले आहेत. ते एकमेकांशी इतके घटृ बांधलेले आहेत की कोणी ते ओढून वेगळे करु शकत नाही. BSB BSB: They are joined to one another; they clasp and cannot be separated.
18 ULB लिव्याथान जेव्हा शिंकतो तेव्हा वीज चमकल्यासारखी वाटते. त्याचे डोळे पहाटेच्या प्रकाशासारखे चमकतात. BSB BSB: His snorting flashes with light, and his eyes are like the rays of dawn.
19 ULB त्याच्या तोंडातून आगीचे लोळ बाहेर पडतात. आगीच्या ठिणग्या निघतात. BSB BSB: Firebrands stream from his mouth; fiery sparks shoot forth!
20 ULB उकळत्या भांड्याखाली ठेवलेल्या जळत्या लव्हाळ्यातून निघतो तसा धूर त्याच्या नाकातून येतो. BSB BSB: Smoke billows from his nostrils as from a boiling pot over burning reeds.
21 ULB लिव्याथानाच्या श्वासांनी कोळसे पेटतात आणि त्याच्या तोंडातून ज्वाला बाहेर पडतात. BSB BSB: His breath sets coals ablaze, and flames pour from his mouth.
22 ULB लिव्याथानाची मान मजबूत आहे. लोक त्यास घाबरतात आणि त्याच्यापासून दूर पळत सुटतात. BSB BSB: Strength resides in his neck, and dismay leaps before him.
23 ULB त्याच्या कातडीवर एकही मऊ भाग नाही ती लोखंडासाखी कठीण आहे. BSB BSB: The folds of his flesh are tightly joined; they are firm and immovable.
24 ULB लिव्याथानाचे हृदय पाषाणासारखे आहे. त्यास भीती वाटत नाही ते पाट्यासारखे आहे. जात्याच्या खालच्या तळीसारखे ते आहे. BSB BSB: His chest is as hard as a rock, as hard as a lower millstone!
25 ULB लिव्याथान उठून उभा राहिला की शूर वीरही घाबरतात लिव्याथानाने त्यांची शेपटी हलवली की ते पळून जातात. BSB BSB: When Leviathan rises up, the mighty are terrified; they withdraw before his thrashing.
26 ULB तलवारी, भाले आणि तीर त्याच्यावर फेकले तरी ते त्यास न लागता परत येतात. त्या शस्त्रांनी त्यास काहीही इजा होत नाही. BSB BSB: The sword that reaches him has no effect, nor does the spear or dart or arrow.
27 ULB तो लोखाडास गवताच्या काडीसारखे मोडू शकतो कुजलेले लाकूड जसे पटकन मोडते तसे तो पितळ मोडतो. BSB BSB: He regards iron as straw and bronze as rotten wood.
28 ULB तो बाणांना घाबरुन पळून जात नाही वाळलेल्या गवताप्रमाणे दगड त्याच्यावर आपटून परत येतात. BSB BSB: No arrow can make him flee; slingstones become like chaff to him.
29 ULB जेव्हा लाकडी गदा त्याच्यावर आपटली जाते तेव्हा त्यास ते गवत आपटल्याप्रमाणे वाटते. लोक त्याच्यावर भाले फेकतात तेव्हा तो हसतो. BSB BSB: A club is regarded as straw, and he laughs at the sound of the lance.
30 ULB लिव्याथानाच्या शरीरावरची कातडी तीक्ष्ण, टणक खापरासाखी आहे. तो चिखलात कुळक फिरवल्याप्रमाणे तास पाडतो. BSB BSB: His undersides are jagged potsherds, spreading out the mud like a threshing sledge.
31 ULB लिव्याथान पाण्याला उकळी आल्याप्रमाणे हलवतो. तो त्यास उकळत्या तेलाच्या भांड्याप्रमाणे तो त्यावर बुडबुडे आणतो. BSB BSB: He makes the depths seethe like a cauldron; he makes the sea like a jar of ointment.
32 ULB लिव्याथान पोहतो तेव्हा तो आपल्यामागे मार्ग तयार करतो. तो पाणी ढवळून टाकतो आणि आपल्यामागे पांढरा फेस ठेवतो. BSB BSB: He leaves a glistening wake behind him; one would think the deep had white hair!
33 ULB पृथ्वीवरचा एकही पशू लिव्याथानासारखा नाही. तो एक भीतिविरहित प्राणी आहे. BSB BSB: Nothing on earth is his equal—a creature devoid of fear!
34 ULB लिव्याथान गर्विष्ठ प्राण्याला कमी (तुच्छ) लेखतो तो सगळ्या रानटी श्वापदांचा राजा आहे. आणि मी, परमेश्वराने त्यास निर्माण केले आहे.” BSB BSB: He looks down on all the haughty; he is king over all the proud.”
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.