2 ULB तोच प्रारंभी देवासह होता. BSB BSB: He was with God in the beginning.
4 ULB त्याच्यामध्ये जीवन होते; आणि ते जीवन मनुष्यमात्राचा प्रकाश होते. BSB BSB: In Him was life, and that life was the light of men.
5 ULB तो प्रकाश अंधारात प्रकाशतो; तरी अंधाराने त्यास स्वीकारले नाही. BSB BSB: The Light shines in the darkness, and the darkness has not overcome it.
7 ULB तो साक्षीकरीता, त्या प्रकाशाविषयी साक्ष द्यावी म्हणून आला; यासाठी की सर्वांनी त्याच्याद्वारे विश्वास ठेवावा. BSB BSB: He came as a witness to testify about the Light, so that through him everyone might believe.
8 ULB योहान तो प्रकाश नव्हता, पण त्या प्रकाशाविषयी साक्ष द्यावी म्हणून आला. BSB BSB: He himself was not the Light, but he came to testify about the Light.
9 ULB जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्यास प्रकाशित करतो तो जगात येणार होता. BSB BSB: The true Light, who gives light to everyone, was coming into the world.
10 ULB तो जगात होता व जग त्याच्याद्वारे निर्माण झाले, तरी जगाने त्यास ओळखले नाही. BSB BSB: He was in the world, and though the world was made through Him, the world did not recognize Him.
11 ULB जे त्याचे स्वतःचे त्यांच्याकडे तो आला, तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. BSB BSB: He came to His own, and His own did not receive Him.
12 ULB पण जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवला, तितक्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. BSB BSB: But to all who did receive Him, to those who believed in His name, He gave the right to become children of God—
13 ULB त्यांचा जन्म रक्त किंवा देहाची इच्छा किंवा मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही, तर देवापासून झाला. BSB BSB: children born not of blood, nor of the desire or will of man, but born of God.
15 ULB योहान त्याच्याविषयी साक्ष देतो आणि मोठ्याने म्हणतो, “ज्याच्याविषयी मी सांगितले की, माझ्यामागून जो येत आहे तो माझ्यासमोर झाला आहे, कारण तो माझ्या पूर्वी होता, तो हाच आहे.” BSB BSB: John testified concerning Him. He cried out, saying, “This is He of whom I said, ‘He who comes after me has surpassed me because He was before me.’”
16 ULB त्याच्या पूर्णतेतून आपल्या सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे. BSB BSB: From His fullness we have all received grace upon grace.
17 ULB कारण नियमशास्त्र मोशेच्याद्वारे देण्यात आले होते; कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे झाली. BSB BSB: For the law was given through Moses; grace and truth came through Jesus Christ.
19 ULB आणि योहानाची साक्ष ही आहे; जेव्हा यहूदी अधिकाऱ्यांनी यरुशलेम शहराहून याजक व लेवी यांना त्यास विचारायला पाठवले की, “तू कोण आहे?” BSB BSB: And this was John’s testimony when the Jews of Jerusalem sent priests and Levites to ask him, “Who are you?”
20 ULB त्याने उघडपणे कबूल केले, नाकारले नाही, “मी ख्रिस्त नाही,” असे त्याने कबूल केले. BSB BSB: He did not refuse to confess, but openly declared, “I am not the Christ.”
22 ULB यावरुन ते त्यास म्हणाले, “आपण कोण आहा? म्हणजे ज्यांनी आम्हास पाठवले त्यांना आम्ही उत्तर देऊ. स्वतःविषयी आपले काय म्हणणे आहे?” BSB BSB: So they said to him, “Who are you? We need an answer for those who sent us. What do you say about yourself?”
23 ULB तो म्हणाला, “यशया संदेष्ट्याने सांगितल्याप्रमाणे ‘परमेश्वराचा मार्ग नीट करा ज्याच्या वाट सरळ करा, असे अरण्यात ओरडणाऱ्याची वाणी’ मी आहे.” BSB BSB: John replied in the words of Isaiah the prophet: “I am a voice of one calling in the wilderness, ‘Make straight the way for the Lord.’”
24 ULB आणि पाठविलेली माणसे परूश्यांपैकी होती. BSB BSB: Then the Pharisees who had been sent
25 ULB आणि त्यांनी त्यास प्रश्न करून म्हटले, “आपण जर ख्रिस्त नाही किंवा एलिया नाही किंवा तो संदेष्टाहि नाही, तर आपण बाप्तिस्मा का करता?” BSB BSB: asked him, “Why then do you baptize, if you are not the Christ, nor Elijah, nor the Prophet?”
26 ULB योहानाने त्यांना उत्तर दिले, “मी पाण्याने बाप्तिस्मा करतो, पण तुम्ही ज्याला ओळखित नाही असा एकजण तुम्हामध्ये उभा आहे. BSB BSB: “I baptize with water,” John replied, “but among you stands One you do not know.
27 ULB तो माझ्यामागून येणारा आहे, त्याच्या वहाणांचा बंद सोडावयास मी योग्य नाही.” BSB BSB: He is the One who comes after me, the straps of whose sandals I am not worthy to untie.”
28 ULB यार्देनेच्या पलीकडील बेथानीत योहान बाप्तिस्मा करीत होता तेथे या गोष्टी घडल्या. BSB BSB: All this happened at Bethany beyond the Jordan, where John was baptizing.
29 ULB दुसर्या दिवशी येशूला आपल्याकडे येताना पाहून योहान म्हणाला, “हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा! BSB BSB: The next day John saw Jesus coming toward him and said, “Look, the Lamb of God, who takes away the sin of the world!
30 ULB ज्याच्याविषयी मी म्हणालो होतो की, ‘माझ्यामागून एकजण येत आहे तो माझ्या पुढचा झाला आहे कारण तो माझ्या पूर्वी होता,’ तो हाच आहे. BSB BSB: This is He of whom I said, ‘A man who comes after me has surpassed me because He was before me.’
31 ULB मी त्यास ओळखत नव्हतो; तरी त्याने इस्राएलात प्रकट व्हावे म्हणून मी पाण्याने बाप्तिस्मा करीत आलो आहे.” BSB BSB: I myself did not know Him, but the reason I came baptizing with water was that He might be revealed to Israel.”
32 ULB योहानाने अशी साक्ष दिली की, “आत्मा कबुतरासारखा आकाशातून उतरत असतांना आणि त्याच्यावर स्थिर राहिलेला मी पाहिला. BSB BSB: Then John testified, “I saw the Spirit descending from heaven like a dove and resting on Him.
33 ULB मी तर त्यास ओळखत नव्हतो, तरी मी पाण्याने बाप्तिस्मा करावा म्हणून ज्याने मला पाठवले त्याने मला सांगितले की, ‘तू ज्या कोणावर आत्मा उतरत असतांना आणि स्थिर राहिलेला पाहशील तोच पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणारा आहे.’ BSB BSB: I myself did not know Him, but the One who sent me to baptize with water told me, ‘The man on whom you see the Spirit descend and rest is He who will baptize with the Holy Spirit.’
34 ULB मी स्वतः पाहिले आहे आणि साक्ष दिली आहे की, हा देवाचा पुत्र आहे.” BSB BSB: I have seen and testified that this is the Son of God.”
35 ULB त्यानंतर दुसर्या दिवशी योहान व त्याच्या शिष्यांतील दोघांसह उभा असता; BSB BSB: The next day John was there again with two of his disciples.
36 ULB येशूला जातांना न्याहाळून पाहून म्हणाला, “हा पाहा, देवाचा कोकरा!” BSB BSB: When he saw Jesus walking by, he said, “Look, the Lamb of God!”
37 ULB त्याचे हे म्हणणे त्या दोघा शिष्यांनी ऐकले आणि ते येशूच्या मागोमाग निघाले. BSB BSB: And when the two disciples heard him say this, they followed Jesus.
38 ULB तेव्हा येशू वळून त्यांना आपल्यामागे येताना पाहून म्हणाला, “तुम्ही काय शोधीता?” ते त्यास म्हणाले, “रब्बी, (म्हणजे गुरूजी) आपण कोठे राहता?” BSB BSB: Jesus turned and saw them following. “What do you want?” He asked. They said to Him, “Rabbi” (which means Teacher), “where are You staying?”
39 ULB तो त्यांना म्हणाला, “या म्हणजे पाहाल.” मग त्यांनी जाऊन तो कोठे राहतो ते बघितले आणि ते त्यादिवशी त्याच्या येथे राहिले; तेव्हा तो सुमारे चार वाजले होते. BSB BSB: “Come and see,” He replied. So they went and saw where He was staying, and spent that day with Him. It was about the tenth hour.
40 ULB योहानाचे बोलणे ऐकून त्याच्यामागे जे दोघे जण गेले, त्यांच्यापैकी एक शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया हा होता. BSB BSB: Andrew, Simon Peter’s brother, was one of the two who heard John’s testimony and followed Jesus.
41 ULB त्यास त्याचा सख्खा भाऊ शिमोन पहिल्याने भेटला व त्यास म्हणाला, “आम्हास मसीहा (म्हणजे ख्रिस्त) सापडला आहे.” BSB BSB: He first found his brother Simon and told him, “We have found the Messiah” (which is translated as Christ).
42 ULB त्याने त्यास येशूकडे आणले; येशूने त्याच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, “तू योहानाचा पुत्र शिमोन आहेस. तुला केफा (म्हणजे पेत्र किंवा खडक) म्हणतील.” BSB BSB: Andrew brought him to Jesus, who looked at him and said, “You are Simon son of John. You will be called Cephas” (which is translated as Peter).
43 ULB दुसर्या दिवशी त्याने गालील प्रांतात जाण्याचा बेत केला; आणि तेव्हा फिलिप्प त्यास भेटला; येशूने त्यास म्हटले, “माझ्यामागे ये.” BSB BSB: The next day Jesus decided to set out for Galilee. Finding Philip, He told him, “Follow Me.”
45 ULB फिलिप्पाला नथनेल भेटल्यावर तो त्यास म्हणाला, “ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात लिहिले व तसेच संदेष्ट्यांनी लिहिले, तो म्हणजे योसेफाचा पुत्र येशू नासरेथकर आम्हास सापडला आहे.” BSB BSB: Philip found Nathanael and told him, “We have found the One Moses wrote about in the Law, the One the prophets foretold—Jesus of Nazareth, the son of Joseph.”
46 ULB नथनेल त्यास म्हणाला, “नासरेथमधून काहीतरी उत्तम निघू शकेल काय?” फिल्लीपाने त्यास म्हणाला, “येऊन पाहा.” BSB BSB: “Can anything good come from Nazareth?” Nathanael asked. “Come and see,” said Philip.
47 ULB नथनेल आपल्याकडे येत आहे हे येशूने बघितले व तो म्हणाला, “पाहा, हा खरा इस्राएली आहे, याच्यात कपट नाही.” BSB BSB: When Jesus saw Nathanael approaching, He said of him, “Here is a true Israelite, in whom there is no deceit.”
48 ULB नथनेल त्यास म्हणाला, “आपणांला माझी ओळख कोठली?” येशूने त्यास उत्तर दिले, “तुला फिल्लीपाने बोलावले त्यापुर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होतास तेव्हाच मी तुला बघितले.” BSB BSB: “How do You know me?” Nathanael asked. Jesus replied, “Before Philip called you, I saw you under the fig tree.”
49 ULB नथनेलाने उत्तर दिले, “रब्बी, आपण देवाचे पुत्र आहा, आपण इस्राएलाचे राजे आहात.” BSB BSB: “Rabbi,” Nathanael answered, “You are the Son of God! You are the King of Israel!”
50 ULB येशूने त्यास उत्तर देऊन म्हटले, “मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे तुला सांगितले म्हणून तू विश्वास ठेवतोस काय? तू याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी पाहशील.” BSB BSB: Jesus said to him, “Do you believe just because I told you I saw you under the fig tree? You will see greater things than these.”
51 ULB आणखी तो त्यास म्हणाला, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, तुम्ही यापुढे आकाश उघडलेले आणि देवदूतांना चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरत असताना पहाल.” BSB BSB: Then He declared, “Truly, truly, I tell you, you will all see heaven open and the angels of God ascending and descending on the Son of Man.”